ज्युनिअर चित्रकार--माझा आवडता प्राणी--पाल्याचे नाव--मन्या

Submitted by मिर्ची on 21 September, 2015 - 06:27

Junior chitrakar-Red crested feather tail.jpg

उपक्रमाचे विषय वाचून दाखवल्याबरोबर लगेच 'मी आवडत्या प्राण्याचं चित्र काढीन' हे जाहीर करून झालं.
'ड्रॅगनचं काढू नको रे' ह्या फुकट सल्ल्यावर घनघोर चर्चा झाली आणि 'ओके, ड्रॅगन नाही काढत' अशी १००% कबूलीसुद्धा मिळाली.
हातातलं काम संपवून परत आल्यावर हे वरचं चित्र दिसलं.
"वॉव, छान आलंय की. काय आहे हे?"
"Red crested feather tail"
"हो पण Red crested feather tail काय? पक्षी, साप, कासव...नेमकं काय?"
"अं...इट्स ए सॉर्ट ऑफ ड्रॅगन !!!!" Uhoh

माझ्या आणि नवर्‍याच्या चेहर्‍यावरचे हताश, हतबल इत्यादी भाव बघून "ओके फाइन, गिम्मी फाइव्ह मिनिटस" म्हणत हे पुढचं चित्र काढलं.
आणि आम्हाला आणखी मस्का लावण्याच्या प्रयत्नात 'हत्ती वाचवा' चा संदेशही देऊन झाला Lol

Junior chitrakar-Elephant.jpg

"अगं माझं स्पेलिंग चुकलंय ना, तू हे कशाला टाकणार आहेस माबोवर?" अशी शंका काढून झाली आहे.
"चालतं रे गणूबाप्पाला आणि माबोच्या काका-मावश्यांना" अशी त्याची समजूत घालून चित्र टाकलंय.

आमचं सध्याचं तेचबुक स्टेटस : फुल्ली एन्जॉयिंग माबो गणेशोत्सव !!! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही आवडले. आवडता प्राणी ड्रॅगन .. भारी बा!
हत्ती पण गोड आहे.
लाय भारी मन्या! कीप इट अप! एंजॉय माबो उत्सव.

अरे मन्या,
मस्तं आलीत दोन्ही चित्रे. हत्ती तर गोडच आहे
माझ्या मुलाचा आवडता प्राणी पण ड्रॅगन आहे.
पण त्याला चित्र काढता येत नाही.

सर्वांना धन्यवाद.:)
साती, तुझ्या 'सही का खोडली' ह्या प्रश्नावर लिहीपर्यंत तू प्रश्नच खोडलास की गं.
तर ती बाण दाखवलेली खोडल्यासारखी दिसणारी जागा म्हणजे सही नाहीये. ती हत्तीची स्किन आहे. मलासुद्धा आधी कळलं नव्हतं त्या काय गिरगोट्या ओढल्या आहेत ते.
त्याच्यापुढे पडलेला कोन म्हणजे हस्तिदंत आहे.

तेच तर. मला पण कळलं नाही सही का वाटली ते. मी हत्तीची कातडी किंवा रिमेन्स आणि दात, असंच समजले होते. बाण पण काढलेत की!
मिर्ची, सांगा हो मन्याला, सोनूमावशीला भावना पोचल्या लगेच म्हणून! Wink

मिर्ची, Lol
कसलं गं हुशार आणि कल्पक आहे तुझं पिल्लू Lol
स्किन काय हस्तिदंत काय, सॉर्ट ऑफ ड्रॅगन काय Lol

छान Happy

सॉर्ट ऑफ ड्रॅगन मस्त.

हत्तीच्या खालचा संदेश लिहीण्याएवढे भान असणे हेच खूप आवडलय मला.