बाप्पा इन टॉप गिअर- यश-६वर्षे-साती

Submitted by साती on 17 September, 2015 - 11:31

हा माझ्या लेकाने केलेला प्रयत्न!
माध्यम- क्रेयॉन्स.
शेडींग बिडींग सगळं काही फक्तं हातानेच.
image_49.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रंगवलंय.
एकच चित्र प्रत्येक मुल किती वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारे रंगवत आहे!!

टोपी छान रंगितसंगित. आवडली.
बाप्पाच्या अंगाचा रंग सहीच जमलाय. चाक दोन्ही वेगवेगळ्या रंगाची Happy झाडाचे शेडसही मस्तं.

एक टायर लाल अन दुसरं निळं!
कठीण आहे.
>>>>>

ते लिटमस टायर असावेत आणि त्या डबक्यातील पाणी अ‍ॅसिडीक.
आधी दोन्ही टायर ब्लू असतील, पण पुढचा टायर त्या अ‍ॅसिडीक पाण्याच्या डबक्यातून गेल्याने रेड झाला Happy

चित्र बाकी मस्त .. घरातल्या घरात कॉम्पिटीशन Happy

ऋन्मेष, काय फंडा आहे.
तुस्सी ग्रेट हो जी!

सगळ्यांचे आभार. ऋन्मेषचे डब्बल आभार. ऋन्मेष काय म्हणाला ते यशला आत्ता कळणार नाही.
पण जेव्हा कळायला लागेल तेव्हा ही गंमत नक्की सांगेन.

आमच्या सरांनी लक्षात ठेवायला शिकवलेलं गाणं आठवलं - चाल 'कोयलसी तेरी बोली'

आम्लात निळा लिटमस- तांबडा होतो, तांबडा तांबडा होतो.
Happy

साती, आमच्यावेळीही अशी गाणी सांगायचे सर, पण मला त्यांची किंमत नाही समजायची. आता समजते जेव्हा वरची पोस्ट लिहिताना मला गूगाळून कन्फर्म करावे लागले. Happy

हे रंगकाम फार म्हणजे फारच आवडलं. व्हेस्पाचा प्रत्येक भाग वेगवेगळ्या रंगाचा आहे. दोन रंगांचे टायर्स तर हायलाइट! रस्त्यातलं डबकं, झाडाच्या खोडातली ढोली हे छान वेगळ्या रंगात रंगवून काढलंय! ऑसम जॉब, यश!

चमचाभर बालमानसशास्त्र पिऊन दिलेला प्रतिसाद :
मुलांच्या मनातल्या सृजनशीलतेला आणि कल्पकतेला आपणच साचेबंद चौकटबद्ध करून खुरटवून टाकतो.

मस्त रंगकाम यश.

मस्त रंगीबेरंगी बाप्पा , खूप सुंदर..
भरत, बरोबरे.. 'मुलांच्या कल्पनेतला बाप्पा ' असा विषय असता तर अजून कल्पकता अनुभवायला मिळाली असती!! Happy

सुरेख रंगवलंयस, यश. शाब्बास!

>>> ते लिटमस टायर असावेत आणि त्या डबक्यातील पाणी अ‍ॅसिडीक.
आधी दोन्ही टायर ब्लू असतील, पण पुढचा टायर त्या अ‍ॅसिडीक पाण्याच्या डबक्यातून गेल्याने रेड झाला
>>>> लै भारी, लै लै भारी.

मस्त रंगवलंय.

आधी दोन्ही टायर ब्लू असतील, पण पुढचा टायर त्या अ‍ॅसिडीक पाण्याच्या डबक्यातून गेल्याने रेड झाला >>>>> झकासच.

वा हे पण छान. यशला आमच्यावतीने शाबासकी दे. लहान मुलान्चे विश्व किती आनन्दी असते ना.

ऋन्मेष लय भारी.

एकच चित्र प्रत्येक मुल किती वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारे रंगवत आहे!! >>> हो ना ! मस्तच आहे Happy

ऋ , भारी हां !

आधी दोन्ही टायर ब्लू असतील, पण पुढचा टायर त्या अ‍ॅसिडीक पाण्याच्या डबक्यातून गेल्याने रेड झाला
>> भन्नाट!!! तुला प्रत्येकी १०० परीक्षानळ्या, चंचूपात्रं आणि नरसाळी बक्षीस.

Pages