घरचा नैवेद्य

Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 05:34

आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा घरी आला, की त्याचा पाहूणचार यथायोग्य व्हावा, यासाठी आपण सगळेच झटत असतो.. त्याच्यासाठी नैवेद्य बनवतांना तर पाककृतींच्या सुवासाबरोबरच घरात उत्साह, आनंदाचे भावही दरवळत असतात.

विविधतेने नटलेल्या आपल्या देशातल्या प्रत्येक प्रातांची भाषा, वेशभूषा जशी वेगळी, तशीच बाप्पाच्या पाहूणचाराची पद्धतही वेगळीच असते. देशातच काय, आपल्या महाराष्ट्राच्या प्रांता-प्रांतात, गावागावात, घराघरात आपण पाळत असलेल्या वैविध्यपूर्ण चालीरितीनुसार आपण बाप्पाचा पाहूणचार करतो.

तर आपल्या ह्या आपुलकीने केलेल्या नैवेद्याचे ताट मायबोलीच्या परिवारालाही दाखवाल ना? आणि त्या सोबतच आपल्या रितीरिवाजांची ओळखही सर्वांना करुन देता आली, तर ते ही बघाल ना?

तुमच्या भरघोस प्रतिसादांची, फोटोंची, अनुभवांची आणि वैविध्यपूर्ण आठवणींची वाट पहात आहोत.
269039_4316408981977_357772300_n.jpg
प्रकाशचित्र सौजन्य: उदयन

तुमचे प्रतिसाद, फोटो, ह्याच धाग्यात खाली द्या.

धन्यवाद.

संयोजक मंडळ, गणेशोत्सव २०१३ Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त एकापेक्षा एक पदार्थ
,
,
,
धन्यवाद संयोजक फोटो वापरल्याबद्दल। Happy

आमच्याघरी दर गणेश चतुर्थीला आणि अंगारकी चतुर्थीला नैवेद्यात असणारे खतखते.
याची कृती स्वतंत्रपणे लिहितो.

आमचा प्रसाद...

उकडीचे मोदक
DSC04065.jpg

पंचखाद्य
DSC03971.jpg

रवा-नारळाचे पाकातले लाडू- खास आईच्या हातचे
DSC03967.jpg

सुक्या खोबर्याची बर्फी
2013-09-07-23.26_0.jpg

आदिती१,

नैवेद्याचे ताट पक्वान्नांनी अगदी भरुन गेलेय. गौरींना काय खाऊ आणि काय नको असे झाले असेल. Happy

सर्वांचे नैवैद्य पाहुन पोट गच्च भरले असेल बाप्पांचे.:स्मित: माझे तर भरलेच आहे. ए श्रद्धा त्या सुक्या खोबर्‍याच्या बर्फीची रेसेपी टाक ना.:स्मित:

रवा नारळ लाडु माझ्या खास आवडीतले. दिनेशजी आईने केलेल्या कुठल्याही पदार्थाला खास आई टच असतोच असतो. त्यामुळे तुम्ही केलेत तरी आईची आठवण काढुन खायचे.:स्मित:

माझ्या पेढ्यांची रेसिपी माग्तली आहे हे वाचून मला भरूनच आलं एकदम Happy

ती रेसिपी लाजो ने लिहिलेली आहे. इथे आहे ती. ही घ्या लिंक.
http://www.maayboli.com/node/44519

Pages