वांग्याचं भरीत (चिंच गूळ घालून)

Submitted by स्वाती_आंबोळे on 8 July, 2008 - 10:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ भरीताचं वांगं
१ कांदा
कोथिंबीर
लाल तिखट
मीठ
चिंचेचा कोळ
गूळ
दाण्याचं कूट
आवडत असल्यास गोडा मसाला
फोडणीचं साहित्य - तेल, मोहरी, हिंग, हळद (आवडत असल्यास जिरं )

क्रमवार पाककृती: 

तेलाचा हात लावून वांगं भाजून घ्यावं.
मी ओव्हनमधे ब्रॉइल करते. साधारण २० - २५ मिनिटात होतं. मधे एकदा उलटते. एखादी ब्लंट सुरी किंवा चमच्याची मागची बाजू वांग्यात खुपसून बघायची. सहज आत गेली की समजतं की पूर्ण भाजलं गेलं.
मग बाहेर काढून गार होवू द्यायचं. साल काढून कुस्करायचं.
त्यात बारीक चिरलेला कच्चा कांदा आणि कोथिंबीर घालायची. दाण्याचं कूट आणि हवं तर थोडा गोडा मसाला घालायचा.
चवीप्रमाणे तिखट, मीठ, चिंच, गूळ घालायचा आणि वरून फोडणी घालून कालवायचं.

वाढणी/प्रमाण: 
चार माणसांसाठी. (कसं होतं आणि कोणाला किती आवडतं त्यानुसार आकडा बदलू शकतो.) :D
अधिक टिपा: 

३० मिनिटं हा वेळ वांगं भाजण्याचा वेळ धरून लिहीला आहे. नाहीतर आपली ५-७ मिनिटंच वापरली जातात. Happy

माहितीचा स्रोत: 
आई.
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वातीताई, हे भरीत सरबरीत होते का? की चिंचेचा घट्ट कोळ घालायचा?

मी इथे भारतीय दुकानांत मिळते ती पेस्टच घालते. पण आई कोळ घालते.
तसंही मुळात वांगं/कांद्यामुळे ते सरभरीतच असतं. आणि कोळ थोडाच असतो. त्यामुळे त्याने consistency मधे फार फरक पडू नये.

एकदा टमाटे घालून पाहीलेलं पण चव काही विशेष वाटली नव्हती. असे करून पाहीन. धन्यवाद.