मायबोली गणेशोत्सव २०१५ - उपक्रम "रंगरेषांच्या देशा - चित्रकला" - प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत!

Submitted by संयोजक on 14 September, 2015 - 03:51

आपल्या मायबोलीवर वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात. त्यातील 'जलरंगाची कार्यशाळा' ह्यावरून आम्हाला हा उपक्रम सुचला. दरवर्षी लहान मुलांसाठी चित्र रंगवणे हा उपक्रम होतोच, ह्या वर्षी आम्ही ही संधी मोठया मायबोलीकरांनासुद्धा देत आहोत.

उपक्रमाविषयी -

१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.

२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांकरताच आहे.

३) उपक्रमात सहभागी होण्यासाठी मायबोलीचे सभासदत्व असणे आवश्यक आहे.

४) उपक्रमासाठी वयोगट १५ वर्षे व पुढे आहे.

५) चित्र हाताने काढून रंगवलेले असावे. जलरंग, अ‍ॅक्रिलिक, ऑइल, पेस्टल, कलर पेन्सिल असे कुठलेही रंग वापरता येतील.

६) चित्रासाठी विषय -
१. श्रावणमासी हर्ष मानसी
२. उत्सव रंगांचा
३. तुझे रूप चित्ती राहो

७) चित्रं पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता १७ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

८) 'मायबोली गणेशोत्सव २०१५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.

९) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१५ ग्रूपमधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)

चित्र अपलोड कशी करायची त्याची माहिती इथे मिळेल.
१. लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
२. पिकासा ते मायबोली फोटो देणे.

१०) एक आयडी एकापेक्षा जास्त चित्रे देऊ शकतात. प्रत्येक प्रवेशिका विषयाचे नाव घालून द्यावी.

११) प्रवेशिका "रंगरेषांच्या देशा - विषय" ह्या नावाने द्यावी.

१२) चित्रं गणेश चतुर्थीपासून, १७ सप्टेंबर २०१५ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, २७ सप्टेंबर २०१५ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एकदा ऑटॉफसिलॅबस पण वाचनमात्र. मला वाटतं या रेटने मी स्वतः हस्ताक्षर स्पर्धेत पण (ठेवली असेल तर) भाग घेऊ शकणार नाही Light 1

संयोजक, नियम क्र. ११ प्रमाणे प्रवेशिका "रंगरेषांच्या देशा - विषय" ह्या नावाने द्यावी. परंतु नियम क्र. १० प्रमाणे एका आयडीची सगळी चित्रे एकाच प्रविशिकेत द्यायची आहेत. चित्रांचे विषय वेगवेगळे असतील तर धाग्याचे नाव एकाच विषयाचे असून कसे चालेल?