श्रीलंका सहल -भाग ३ - न्यू झीलंड फार्म, अशोक वाटीका, अरालिया ग्रीन हिल्स

Submitted by दिनेश. on 12 September, 2015 - 16:29

श्रीलंका सहल - भाग १ - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/55306
श्रीलंका सहल - भाग १ - एअरपोर्ट ते नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55355
श्रीलंका सहल - भाग २ अ - हॉर्टॉन प्लेन्स नॅशनल पार्क
http://www.maayboli.com/node/55444
श्रीलंका सहल - भाग २ ब - हॉर्टोन प्लेन्स नॅशनल पार्क http://www.maayboli.com/node/55445

इथून पुढे...

हॉर्टॉन प्लेन्स वरून परत येताना, रस्त्याची वळणे नीट अनुभवता आली. येताना सतत उतार आणि वळणे, पण दुशीकडे गर्द हिरवाई. आधी काहि वेळ ढग होते पण नंतर ते मळभ दूर झाले.
नुवारा एलिया पासून हॉर्टॉन पर्यंत रिक्षानेही येता येते. म्हणजे काही जिगरबाज रिक्षावाले येतात. या रस्त्यावर रिक्षा
चालवणे म्हणजे दिव्यच आहे. मी बघितलंय कि युरपमधल्या तरुणांना रिक्षांचे खुप आकर्षण असते. या रस्त्यावर
मी काही युरपमधून आलेल्या तरुण आणि तरुणींनाही हौसेने रिक्षा चालवताना बघितले. मूळ रिक्षाचालकाला त्यांनी
मागे बसवले होते.

याच वाटेवर मला एक शिकारी पक्षीही दिसला. मला अर्थातच ओळखता आला नाही. तसा तो खुप दूरही होता.
मी गाडीतूनच त्याचा फोटो काढलाय.

मग अचानक मला वाटू लागले कि आपण ऑकलंड ला आलोय आणि नेहमीप्रमाणे मित्रमैत्रिंणीसोबत लाँग
ड्राईव्हला निघालोय, कारण आजूबाजूचे दृष्य म्हणजे हिरवीगार कुरणे आणि त्यावर चरणार्‍या पुष्ट गायी अगदी
थेट तसेच होते. ही जागा होती न्यू झीलंड फार्म.

हे एक खुप मोठे फार्म आहे. पर्यटकांना खुले आहे. ( नाममात्र तिकिट आहे ) तिथे गायी आणि बकर्‍यांची
दूधासाठी पैदास केली जाते. तिथे एक मिल्क बार आहे आणि दूध आणि दूधाचे पदार्थ तिथे मिळतात. दूध
अगदी मस्त चवीचे असते. तिथे सश्यांचीपण पैदास होते पण गायी सोडल्या तर सर्व प्राणी बंदीस्त जागेत
होते. तिथली आणखी एक खासियत म्हणजे न्यू झीलंडमधे दिसणारी फुले तिथे जागोजाग जोपासली आहेत.
तिथेच बियाण्यासाठिंच्या बटाट्याची पण पैदास केली जाते. एक छोटीशी चीज फॅक्टरी पण आहे तिथे.

आम्ही तिथे होतो त्यावेळी भन्नाट वारा सुटला होता.. मी एखादे वासरू असतो तर अक्षरशः कानात वारा
भरल्यासारखा उंडारलो असतो..

तिथेच जवळपास एक बोटॅनिकल गार्डनही आहे, पण मी ते टाळून अशोक वाटीकेत जायचे ठरवले. ( ते गार्डन टाळायला नको होते, पण मी तेथे गेलो असतो तर किमान दोन तीन तास तरी रेंगाळलो असतो.. मग आमचे पुढचे
कार्यक्रम करता आले नसते. )

अशोक वाटीका बाबत मात्र फार निराशा झाली. तिथे एक उंच डोंगर आहे, त्या शिखरावर सीतेला ठेवली होती असे
सांगतात. प्रत्यक्ष जागा मात्र एका ओहोळाकाठी एक छोटेसे मंदीर म्हणून दाखवतात. ओहोळाच्या काठी
हनुमानाच्या पावलाचे ठसेही दाखवतात. तिथे अशोक वाटीका असे हिंदीतही लिहिलेले आहे, पण आपण ज्याला
सीतेचा अशोक म्हणतो, त्याचे एकही झाड तिथे नाही. देवळाचीही अवस्था दयनीयच आहे. कुणी तिथे येत जात
असेल असे वाटत नाही. मी असताना युरपमधल्या काही वृद्ध बायका तिथे आल्या होत्या पण त्यांना माहिती
द्यायलाही तिथे कुणी नव्हते. तिथल्या मूर्तींचे फोटो देतोय, ते आपल्याकडच्या दाक्षिणात्य शैलीतलेच वाटतात.

मग आम्ही परत नुवारा एलियात आलो. या गावाला लिटील इंग्लंड म्हणतात. त्याच धर्तीच्या काही इमारती
तिथे अजून आहेत. जेवायची वेळ झालीच होती. मला स्थानिक जेवण जेवायचे होते. त्यांच्या कोथू रोटी बद्दल
बरेच वाचले होते आणि मला ती खायची होती. पण थिवांका म्हणाला ती जेवणावर खात नाहीत. जेवण म्हणजे
करी आणि राईस ( किंवा राईस आणि करी ) आम्ही तिथल्याच एका गर्दीच्या हॉटेलमधे शिरलो.

करी राईस मागितल्यावर भाताची भली मोठी मूद सोबत पापडाचा तूकडा, वांग्याची भाजी आणि फरसबीची भाजी
असे आले.. मी हे कशासोबत खायचे असा विचार करत असतानाच मसूर डाळ, संबळ आणि चक्क फणसाची
करी आली. सर्वच पदार्थ फार रुचकर होते. आधी जास्त वाटलेला भात मला सहज संपला. वर आणखी दही
पण मागून खाल्ले.

आता परत हॉटेलवर जाऊन थोडा वेळ झोप काढली. ( सकाळी लवकर उठलो होतो ) पण ते गाव आणि हॉटेलही
इतके सुंदर होते कि झोपून राहणे हा गुन्हा वाटत होता. मी अनेक पंचतारांकीत हॉटेलात राहिलोय, तिथे
साधारणपणे कोरडा व्यवहार असतो, पण अरालिया ग्रीनमधे मात्र मला एक जिव्हाळा जाणवत होता. जरा कुठे
रेंगाळलो कि काही हवंय का, असे विचारत असत. गप्पा मारायला, माहिती द्यायला सगळाच स्टाफ तत्पर
वाटला. त्याच्या आवारातच सुंदर फुलबाग आहे. तिथे मी थोडे फोटो काढलेच.

पाच वाजता ठरल्याप्रमाणे थिवांका आलाच. मग आम्ही पायी पायीच गावात भटकायला गेलो. तिथे एक
मोठे गोल्फ मैदान आहे. त्या आवारात एका ब्रिटीश अधिकार्‍याचे थडगे आहे. ह्याने म्हणे आपल्या हयातीत,
१८६७ हत्तींची शिकार केली. मला त्याचे काय कवतिक असणार ? पण बघू तरी म्हणत थिवांका मला तिथे
घेऊन गेला. अपेक्षेप्रमाणे ती जागा दुर्लक्षितच आहे.. ( तशीच असावी ) या माणसामूळे कि काय माहीत नाही,
पण इतरत्र सर्वत्र आढळणारे हत्ती मात्र तिथे अजिबात आढळत नाहीत.

पण एकंदर तो रस्ता मात्र सुंदर होता. मला तिथे पॅसीफ्लोरा कुळातले एक सुंदर गुलाबी फूल दिसले. उंचावर होते
ते... पण मग तिथे मी खुडबूड करणे आलेच. शेवटी एक फूल हाताला लागलेच. त्या खुडबुडीत मला काही
जंगली स्ट्रॉबेरीज पण मिळाल्या. अगदी वाटाण्याएवढ्या पण मधुर चवीच्या होत्या त्या.. ( सॉरी, मी सगळ्या
खाल्ल्या, फोटो काढायला पण शिल्लक नाही ठेवल्या. )

तिथेच जवळ एक सुंदर उद्यानही आहे. आम्ही गेटवर गेलो तर साडेसहा वाजले होते. गेटवरूनच ते फार सुंदर
दिसत होते, तिथल्या काऊंटरवरच्या बाई म्हणाल्या, नियमाप्रमाणे मी तूला आता तिकिटही देऊ शकते पण
अर्ध्या तासात काही बघून होणार नाही तूझे ( तिने मला बरोबर ओळखले होते. ) शिवाय अंधारही पडायला आला आहे, फोटो नीट येणार नाहीत. तेव्हा उद्या ये.

तिथल्या गेटवरच असणार्‍या चेरी ब्लॉसम ( हो चेरी ब्लॉसम.. आयूष्यात पहिल्यांदा प्रत्यक्ष बघत होतो मी. ) चा
फोटो काढला आणि समोरच्या हॉटेलमधे शिरलो. अर्थातच कोथु रोटी खायला.

कोथु रोटी म्हणजे आपली फोडणीची चपाती.. पण अगदी खास. यासाठी अगदी पातळ चपात्या लाटतात आणि
त्याचा रोल करून बारीक तुकडे करतात. मग भाज्या ( कोबी, गाजर, पातीचा कांदा वगैरे ) परतून त्यात ते तूकडे
परततात. फोडणीत मिरच्या आणि भरपूर कढीपत्ता असतो, शिवाय त्यांची करी पावडरही.. एकंदर हा प्रकार
फारच भन्नाट लागला ( त्यात हवे तर अंडे आणि चिकनकरी पण घालतात. ) आणि एकाच डिशमधे पोट भरले. ( फोटो आता मी करेन तेव्हा )
नंतर जेवणाची भूकच राहिली नाही.. पण चहाची मात्र तल्लफ होती, तिथे तोही घेतलाच.

तिथून बाहेर आलो तर एक अतिशय देखणा कुत्रा दिसला. इतका ऐटबाज कुत्रा बघून मला राहवलेच नाही.
जवळ बोलावल्यावर उड्या मारत आला. अगदी सिंहासारखी आयाळ होती त्याला. बराच वेळ मी त्याच्याशी खेळत
होतो. तोपण माझ्याकडून लाड करून घेत होता.

उद्या आम्हाला कँडीसाठी निघायचे होते. तिथे जरा उशीराच जाऊ असे ठरवले कारण ते गार्डन बघितल्याशिवाय माझा पाय तिथून निघालाच नसता. तर ते पुढच्या भागात.

( पुढचा भाग आपल्या बाप्पांचे विसर्जन झाल्यावर !! )

क्रमशः

1) Returning from Norton Plains

2)

3)

4)

5) Who is this ?

6) Are we in NZ ?

7)

8)

9)

10) Entrance of the farm

11) We generally see a small bush of these flowers, there was a big bush !

12 )

13 ) These flowers are very common in Auckland

14) these too

15)

16)

17)

18)

19)

20)

21)

22)

23 )

24 )

25 ) All these photos were taken inside the farm

26 ) Ashok Vatika

27) The peak of the mountain, where Seeta was believed to have been kept in captivity.

28 )

29) Foot prints of Hanuman

30)

31)

32 )

33)

34 )

35)

36) Rice… waiting for curry !!!

37) Colonial Buildings of Nuwara Eliya

38) Relaxed Town..

39) Aloe vera..

40) Araliya Green Hills Hotel

41)

42) From their Gardens

43)

44)

45)

46)

47)

48)

49) Paciflora…

50) A romantic lane..

51 )

52)

53) Menu card on display !!

54 ) Victoria Park entrance

55) What a Royal Look…

56) Cherry Blossom

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह मस्तच..
आता डायरेक्ट अनंतचथुर्दशी नंतर का ?
आधी का नाही.. इतक्यात निव्वळ कुत्रे दिसताहेत मला सगळीकडे.. नॉस्टॅल्जिक व्हायला होत Sad

हा हा टीना. हा कुत्रा मस्त रुबाबदार आहे पण.

भाताची मूद डोंगराएवढी आहेत. मस्त आहेत वनसंपदेचे फोटो Happy

मस्त हा भाग पन. फो टो क्र. २४ पॅस्टोरल सीन इतका रम्य आहे. इथे केवळ हिरॉइनची पिकनिकच जाउ शकते. व रिंग
फेकायचा खेळ !!! किंवा खास पिकनिक बास्केट भरून व्हाइट फ्लोइंग समर ड्रेस आणि हॅट घालून समर पिक निक. फारच उत्तम जागा आहे.

वाह, ब्यूटीफुल!!! न्यूझीलँड एकदम डिट्टो!!!
साऊथ इंडियन मेकप मधील शंकर, हनुमान,, सेम पोझ असली तरी वेगळेच दिस्ताहेत.. Happy
आणी त्या मंदिरात राम सीता लक्ष्मण यांच्या मूर्ती असतील नक्कीच.. क्लिअर दिसत नाहीत..

फुलं सुंदरच आहेत..पण कुत्रा फारच रॉयल आहे , भारीच डिग्नीफाईड !!! Happy

कोट्टु/ कोथु रोटी बनवण्याकरता पांडान लीव्ज आणली कि नाहीत तिकडून??
तमिळ इन्फ्लुएंस मुळे ,' रोटी ' शब्द प्रचलित झाला असावा तिकडे.

अशोक वाटीका बाबत मात्र फार निराशा झाली. तिथे एक उंच डोंगर आहे, त्या शिखरावर सीतेला ठेवली होती असे
सांगतात. प्रत्यक्ष जागा मात्र एका ओहोळाकाठी एक छोटेसे मंदीर म्हणून दाखवतात. ओहोळाच्या काठी
हनुमानाच्या पावलाचे ठसेही दाखवतात. तिथे अशोक वाटीका असे हिंदीतही लिहिलेले आहे, पण आपण ज्याला
सीतेचा अशोक म्हणतो, त्याचे एकही झाड तिथे नाही. देवळाचीही अवस्था दयनीयच आहे. कुणी तिथे येत जात
असेल असे वाटत नाही

>>
दिनेश , मागेच यापैकी कुठल्या तरी , बहुधा पहिल्याच भागात मी यावर लिहिले आहे. आम्हीही श्रीलंकेत बर्‍याच उच्च विद्या विभूषित लोकांकडे या रामायणाच्या जागेबाबत चौकशी केली. त्यावर ते ओशाळवाणे हसत. ते म्हणत असे इथे काही नाही. प्रत्येक भारतीय माणूस हेच प्रश्न विचारतो. हल्ली काही लबाड लोकानी अशा काही जागा दाखवायला सुरुवात केली आहे धंद्याच्या दृष्टीने . नाशकातही लक्षणरेषा नावाची जागा ५-६ ठिकाणी दाखवतात व त्यांची अंतरेही एकमेकापासून काही किमी. आहेत. परत्येक ठिकाणचे दुकानदार हीच 'जेन्युइन' लक्शमण्रेषा असल्याचे ठासून सांगतात.
खरे रामायण तर कंबोडिया आणि इन्डोनेशियात घडलेले आहे ::फिदी:

फोटो आणि माहिती मस्त. सीतेला ठेवलेला डोंगर एकदम तिरुपतीच्या डोंगरासारखा वाटला.
फोटो ७, २०, २४, ५५ विशेष आवडले.

आभार !!

साती, टीना.. तूम्ही रात्रभर जाग्याच असता का ? Happy
अन्जू.. मी पोस्ट केलेले सर्व फोटो प्रताधिकार मुक्त असतात. कुठलाही घ्या.
वर्षू.. अगदी दिवाबत्तीही नव्हती तिथे.. काही मसाले आनलेत मी तिथून.. पण शक्य असते तर त्या कुत्र्यालाच आणले असते.

अमा.. अगदी अगदी.. आणि हवाही फार छान होती तिथली.

मामी.. हिरविणी अगदी खात्या पित्या घरच्या आहेत !

रॉबीन खरे आहे.. पण एक मात्र खरे जसे बालि मधे ते लोक रामायण महाभारताच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात, तसे इथे नाही. तिथे रावण, किंग ऑफ लंका असे एक पुस्तकही बघितले, पण मी नाही घेतले.
पुढेही एक दोन वेळा या लेखमालेत रामायणाचा संदर्भ येईल. ( जाफनाला गेलो असतो तर रामसेतू पण दिसला असता ! )

आता गणपतिच्या तयारीला लागू. मी पण सगळे फोटो अपलोड करुन ठेवतो.

फोटो आणि माहिती एकदम सुंदर. इतक्या जवळचा देश पण त्या बद्दल इतकी कमी माहिती आहे , त्य देशात इतकं काही बघण्यासारखं आहे हे माहित नव्हतं! तु प्रत्यक्षात अनुभव सांगितलेस त्याच वेळी लक्ष्यात आलं हे!
बाय द वे, सिलॉन चा चहा पण फक्कड आहे बरं Wink

Khup sundar pics. Agdi desktop wallpaper thevnyasarkhe ..
.n flowers che tar just awesome

Pages