दुष्काळ

Submitted by बेफ़िकीर on 31 August, 2015 - 11:37

महाराष्ट्रात यंदा विशेष पाऊस झालेला नाही. उरलेल्या दिवसांत तो पुरेसा होईल असेही काहीजण म्हणत आहेत आणि यंदा पाऊस दगा देणार असेही काहीजण म्हणत आहेत. काल तर असे समजले की येते दशकभर हा पाऊस कमी असण्याचा प्रश्न सतावण्याची शक्यता असून त्या प्रश्नाचे पुढचे स्वरूप कल्पनेपेक्षाही उग्र, भयानक असेल.

दात कोरून पोट भरता येत नसले तरी पाणीबचत हा जीवनशैलीचा, दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनवण्याचा काळ केव्हापासूनच आलेला आहे. आता त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. अजून दोन महिन्यांनी आणखीन जाणवतील आणि नंतर दिवसेंदिवस कदाचित अधिकच! पाऊस पडला तर मात्र विशेष परिणाम जाणवणार नाहीत.

वैयक्तीक पातळीपासून ते संस्था, सार्वजनिक स्थाने व एकुणच समाज ह्या पातळीवर पाण्याच्या वापराबाबत बरीच जागृती आवश्यक आहे असे आजचे चित्र वाटते.

नुकतेच एका फॉर्वर्डेड व्हॉट्स अ‍ॅप मेसेजमध्ये कोणीतरी कोकाकोलावर तोंडसुख घेतले. ते अगदीच गैर नाही. मी कोकला सप्लाय करायचो तेव्हा वाडा ह्या त्यांच्या देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पामुळे तेथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करायला लागायचा म्हणून ते आंदोलन करायचे. नंतर एक मत असे समजले की त्यांना कोकने नोकर्‍या दिल्या नाहीत म्हणून ते प्रकरण चिघळवत आहेत. केरळमध्ये ह्या कोक-पेप्सीवर कायमच गदा येत असते.

पण असे कित्येक व्यवसाय आहेत जेथे पाण्याचा गैरवापर होतो. व्यवसाय बंद करणे अशक्यप्राय आहे कारण रोजगार अवलंबून आहेत. इतकेच नव्हे तर मांसाहारासाठी प्राण्यांची पैदास करण्यापासून ते प्रत्यक्ष ते प्राणी खाल्ले जाणे ह्या संपूर्ण प्रक्रियेत पाणी प्रचंड प्रमाणावर लागते. म्हणूनच मध्यंतरी काही माध्यमांनी परदेशात भारताकडून मांसाची आयात केली जाते असे दर्शवलेही होते. आपण तिसर्‍या जगातील बिचारे असल्याने निर्यात होत आहे ह्यावरच खुष असतो.

रस्त्याकडेला काही लोक टपरीवरून पाण्याचा तांब्या घेऊन चार, सहा जोरदार चुळा भरतात, एक घोट पाणी पितात आणि बाकीचे फेकून देतात असे काल एकांनी सांगितले. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव, मते वगैरे!

एकुण हा प्रश्न आपल्याला अगदी जवळून अनुभवावा लागणार आहे ह्याची जाणीव प्रत्येकाने करून घ्यायला हवी. ह्यापुढे दुष्काळाच्या बातम्या नुसत्या पेपरमध्ये वाचून क्षणभर हळहळणे इतपत थेंबभराची सहृदयता उपयोगी पडणार नाही तर स्वतःच चटके सहन करावे लागतील असा काळ येण्याची शक्यता वाटते.

रानावनात राहणार्‍या मंडळींना भेटण्यासाठी गेले दिड-दोन महिने फिरत आहे. सगळीकडे हिरवेगार आहे पण ते क्षुल्लक सरींमुळे! त्याला भरघोस पाऊस म्हणता येणारच नाही. बाकी काही इलाके तर आत्ताच रुक्ष पडलेले आहेत.

दुष्काळात तेरावा महिना ह्या वर्षी खरंच आला होता. पण सतराशे साठ समस्यांमध्ये आणखी एक दुष्काळ ही समस्या उभी राहील असे वाटते. जर खरंच ही समस्या सर्वत्र भेडसावू लागली तर बाकी सगळ्याच समस्यांना काहीच अर्थ उरणार नाही असे म्हणावे लागेल.

ह्या एका समस्येने इतर अनेक गोष्टी बंद पडत जातील. धरणातील सध्याचे पाणीसाठे केविलवाणे वाटत आहेत.

हे सगळे खोटे ठरो ही प्रार्थना!
==================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत अमेझिंग लिंक आहे ती एआरसी! मनःपूर्वक धन्यवाद!

त्यातील अनेक प्रकारचा डेटा वाचून अवाक व्हायला झाले.

पुण्यात आजपासून एक दिवसाआड पाणीकपात जाहीर झालेली आहे. अवेअरनेस निर्माण होऊ लागला आहे. पण सर्वाधिक होरपळलेला घटक म्हणजे शेतकरी स्वतः मात्र बराचसा उदाईन आहे. गणपती व नवरात्रात तूट भरून निघेल अशी आशा ठेवून आहे. नाही झाला पाऊस तर काय करायचे ह्याचे नियोजन त्याच्याकडे नाही. मग तो सरकारवर अवलंबून असेल.

तापमानात झालेली वाढ अधिकच अर्धेमेले करून सोडत आहे.

दुष्काळाचे राजकारण करायचे की सगळ्यांनी एकत्र यायचे असा काही चॉईस आता राहिलेला नाही. त्यामुळे 'आता तरी सर्वांनी एक व्हा' वगैरे आर्त, उदात्त हाकाही आता नाटकीच वाटू लागल्या आहेत.

arc खरचं भारी लिंक आहे.
असा उपक्रम सगळीकडे राबविता येवु शकतो का हा विचार करायला हवा.
बेफी, आजपासुन पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे, पण मला असे वाटते की आपल्या सगळ्यांनाच (incl. राजकारणी वगैरे) तहान लागली की विहीर खणायची सवय लागली आहे.
मी गेली १० वर्ष पुण्यात राहतो आहे, आणि २००५-२००८ ही दोन तीन वर्ष सोडली तर नेहमीच ही भीषण परिस्थिती ओढवलेली दिसते. आज इतक्या उशीरा पाणीकपात जाहीर झाली आणि अंमलबजावणी सुरु झाली ती थोडी अलिकडे सुरु करता आली नसती का? माझा कुठल्या ही उद्योग्-धंद्यांवर किंवा कंपन्यांवर आकस नाही पण पुण्यात असलेल्या बहुतांश एम्.एन्.सी. पाणी किती आणि कसे वापरतात, आणि कसे उधळतात हा एखाद्या स्वतंत्र लेखाचा विषय होउ शकेल. आमच्या विदर्भातल्या अकोल्या सारख्या ठिकाणी जेथे पाण्याचे दुर्भीक्ष आहे तिथे नाहीच देत प्रशासन पाणी दोन वेळेला, आपोआप च लोकांना पाणी कसे जपुन वापरावे ह्याचा धडा मिळतो. मी फार जनरलाईझ स्टेट्मेंट करत असीन कदाचित पण इथे मी अजुन एक मत प्रवाह हा देखील पाहिला आहे की बोअरींग चे पाणी वापरायचेच नाही. ठीक आहे, पिण्यासाठी नका वापरु पाणी पण इतर गोष्टींसाठी वापरायला काय हरकत आहे ?
इथे पुणेरी अ‍ॅटीट्युड वि. इतर सर्व असा वाद घालायचा नाहीये, परंतु ज्या गोष्टी खटकल्यात त्या प्रामाणिक्पणे मांडल्या आहेत.

-प्रसन्न

लिंक ओपन होत नाहिये.
अक्कलकोटला राहणारी माझी आजी काल सांगत होती त्यांच्याकडे १३ दिवसांतून एकदा पाणी येते...!
पुण्यामुंबईचे लोक फारच सुदैवी हो त्यामानाने!!

arc, खूप चांगली लिंक - धन्यवाद! अरुण देशपांडे यांच्या कामावर अनिल अवचट यांच्या कार्यरत ह्या पुस्तकात एक प्रकरण आहे. ते वाचून मी खूप प्रभावीत झाले होते आणि त्या विचारांचा प्रभाव आजही कमी झालेला नाही. त्यांनी दिलेला पाण्याचा हिशोब डोळ्यात अंजन घालणारा आहे. rurbanization ही कल्पना प्रत्यक्षात आली पाहिजे. अरुण सरांच्या कामाचे वर्णन वाचून खूप छान वाटलं!

पुण्यामुंबईचे लोक फारच सुदैवी हो त्यामानाने!! >>> तुलनात्मक पाहता गेले तर नक्कीच. मात्र पाणी साठवण्यास अपुरी जागा, काही ठिकाणी अपुरा पाणी पुरवठा हे सारे घटकही आहेत.

मात्र पाणीवापराबाबत आपली अनास्था भरपूर आहे.आमच्याकडे ज्या बैठ्या चाळी आहेत,त्यांच्या प्रत्येकाच्या घरासमोर नळ आहे.नळ चालूपाणी भरून वाहून चाललंय तरी या लोकांना शुद्ध नसते. स्टेशनवरून येताना मी कितीवेळा नळ बंद करत येते.पहिल्यांदा आवाज द्यायची,नळ बंद करा म्हणून.इथे आमच्या इमारतीत बर्‍याच घरी हीच अनास्था.गुजु-मारवाडी तर रोज पाईप लावून खिडक्या धुतात.पाईप लावून रोज गाड्या धुणे वगैरे चालू असते.

होय, पुण्यामुंबईतील लोक खरंच सुखी आहेत.

हा विषय वेगळा की दोन्ही शहरातील मूळ लोकांनी इतर विभागातून आलेल्या लोकांबाबत खासगी वर्तुळातही कधी संताप व्यक्त केलेला नाही. अन्यथा पुण्याचे पाणीवैभव काय वर्णावे! पाच पाच धरणे असून पाणी पुरत नाही असे कधीही होत नव्हते.

तो विषय वेगळा हे वर लिहिलेच!

प्रसन्न,

'पुणेरी अ‍ॅटिट्यूड' असे काही असते असे मला वाटत नाही. येथे सुबत्ता आहे व होती. असेलही. कन्झूमर्स किती असावेत ह्याचे ताळतंत्र उद्योजक, राजकारणी आणि नोकरशाहीने पाहायला हवे आहे. पुण्यात राहिल्यामुळेच रोजीरोटी मिळते म्हणून पुण्यात 'येऊन' राहणार्‍यांना उद्या पाणी नाही मिळाले तर ते स्वतःच्या गावी किंवा इतरत्र जातीलच ना?

प्रश्न फक्त पुण्याचा तर नाहीच, पण पुण्याचा प्रश्न खरे तर सगळ्यात शेवटी आहे. मराठवाडा वगैरे प्रदेश होरपळत आहेत.

महात्मा गांधींना महात्मा का म्हंटले जाते हे बहुधा लवकरच कळेल. पण गांधी आमचे, तुमचे नाहीतच अशी भूमिका घेणारे आणि त्या भूमिकेचा विरोध करणारे संख्येने इतके वाढले आहेत की ते कळले तरी ते एकमेकांनाच दोष देत बसतील.

बाकी शरद पवार साहेबांचे नियोजन ह्याबाबत कोणी तज्ञाने जरा व्यवस्थित लिहायला हवे आहे. ज्या माणसाची अशी ख्याती आहे की कुशल संघटक आहेत, शेतकर्‍यांचे प्रश्न अ‍ॅड्रेस करणारे आहेत, त्यांचे आजवरचे एकुण नियोजन कसे होते, त्याचे काय झाले आणि काय नाही हे नोंदवले जाणे आवश्यक आहे.

येथे एक लक्षात घ्यायला हवे की शरद पवार ह्यांना केवळ एका पक्षाचे नेते म्हणून टीकेचे धनी करणे योग्य नाही. त्यांच्या हातात अनेकदा सत्ता होती व लार्जर इश्यूजवर स्वानुभूतीतून फोकस करणारा दुसरा समकालीन नेता महाराष्ट्रात नव्हता.

त्यांची दूरदृष्टी काय सांगते आणि त्याबाबत नक्की काय झाले आहे, काय राहिले आहे ह्यावर चर्चा घडायला हवी.

आपण एक मूर्ख देश आहोत. बाकी सर्वधर्मसमभाव, मोठ्ठी लोकशाही वगैरे बिरुदे नैसर्गीक आपत्तीत मठ्ठपणाची लक्षणे ठरतात हे सिद्ध होतेच.

चला, उदाहरणार्थ पुणे!

येथील लोकांना पाणीटंचाई ज्ञातच नाही.

आता अचानक बदल घडवून आणण्याची जबाबदारी पडली. कोणामुळे? तर जे पुण्यातले नाहीतच त्यांच्यामुळे! ते सगळे स्वगृही परतले तर इथले पाणी रोज ट्रक दोनदा धुण्याइतके पुरेलही.

पण त्यांनी का जावे? देश तर एकच आहे.

त्यांनी जावे असे गांधींचे म्हणणे होते. मुळात त्यांनी स्थलांतरीतच होऊ नये असे त्यांचे (गांधींचे) म्हणणे होते.

हे आता संपूर्णपणे गैरलागू झालेले आहे.

आपण व्यक्तीला महान मानत बसण्यात जिंदग्या घालवतो. विचारांना पायदळी तुडवतो. बिना खड्ग बिना ढाल हे गीत वाजवतो.

ती व्यक्ती सांगत काय होती हे सगळ्यांना समजलेले असते. पण 'मी माझे बघणार' ही वृत्ती फोफावते.

आता ते फोफावणे मृतवत होणार आहे.

जिथे पाऊस पडत असेल तिथे आता कोणीच नसेल. जिथे पाऊस पडतच नाही आहे तिथे सगळेजण आभाळाकडे बघत बसलेले असतील. त्यात शेतकर्‍यापासून 'हडूप' मध्ये तज्ञ असलेले सगळे असतील.

गेल्या वर्षी जसा डिसेंबरपर्यंत पाऊस पडत होता, तसाच या वर्षीपण पडेल असे वाटतेय. सरासरी गाठावी त्याने.

बेफ़िकीर, do you really think any serious discussion is possible here without certain people trying to twist everything into political score settling and using every issue as opportunity to convert people into supporters of the parties they campaign for here?

दुष्काळाचाही इथे राजकारणी मुद्दाच बनतो.,पक्ष कोणीही का असेना.

कळीचामुद्दा..
जागरण करुन फायदा काय?
मुळात जे माजुन आहे सोबत डोक्यानं पैदल पन त्यांच कस होणार ?
साध मी राहते त्या कॅालनीतल्या हरेक घरी पाणी टाकीत चढवायला मोटर आहे आणि ते तिसर्या क्वचित दुसर्या मजल्यावरुन खाली बदाबदा पडेसतोवर सगळे झोपुन असतात...
समोरच्या घरातले सो कॅाल्ड बुजुर्ग लोक हातात तांब्या घेउन थुंकने, गुरळा करने आणि काय काय प्रकार हायजिन व पाण्याचा अपव्यय गधीच्या *** घालुन जय मल्हार बघत काम करत असतात..
या सर्वांसाठी एखाद सुधार ग्रुह उघडायचा विचारे माझा...
चिड येते...

असलेला मोबाइल जेवढ प्रोव्हाइड करतो त्यात टंकल आहे ...
शुद्धलेखनाच्या चुका काढू नये..

गेल्या वर्षी जसा डिसेंबरपर्यंत पाऊस पडत होता, तसाच या वर्षीपण पडेल असे वाटतेय. सरासरी गाठावी त्याने.
>>>
आमीन ! मलाही असेच वाटतेय
फक्त मधला काळ जरा क्रिटीकल आला तर सांभाळून घ्यावे लागेल.
जूनमधला पाऊस विक्रमी होता, नंतर दोन महिने तोंडच्या पाण्यासारखा पळालाय.
गणपती नवरात्र हे सण पाऊस घेऊन येतील अशी आशा Happy

३ वर्षांत पाच लाख हेक्टर जमीन शाश्वत सिंचनाखाली आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. शिवाय पिण्याच्या पाण्यासाठी ८६ कोटींची तरतूद केलेली आहे. वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे तहान किंवा आग लागल्यावर विहीर खणण्याचाच हा प्रकार आहे.

पण सरकारांना दोष देतानाच स्वतः पाण्याचा वापर जबाबदारीने करणे आवश्यक आहे.

बाळासाहेब विखे पाटील पवारांवर राग काढत आहेत हे मजेशीर आहे. सनसनाटी वक्तृत्वाची वेळ आता नाही हे त्यांच्या लक्षात का येऊ नये समजत नाही.

पवारांची धोरणे काय होती आणि ती कितपत परिणामकारक ठरली ह्याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा.

बेफी,
माझे अ‍ॅटीट्युड वाले वाक्य सोडुन द्या, पण बाकीचे मुद्दे तरी बरोबर आहेत की नाही हे सांगा.
पाणी कपात आपल्या इथे किती उशीरा सुरु केली ? पाणी नियोजनाची अक्कल आपल्या इथे लोकांना का येत नाही हा मूळ मुद्दा आहे असे मला वाटते. कूप-नलिके चे पाणी वापरायचेच नाही हा कुठला वेडगळ कारभार ? आमच्या च सोसा. तील अती हुशार मंडळी म्हणतात बोअरींग चे पाणी नको. प्यायला नको, भांडी घासायला नको का तर म्हणे भांडी पांढरी पडतात, कपडे धुवायला नको का तर ते फाटतात असे करुन कसे चालायचे ? मान्य आहे की क्षार अतीरिक्त असल्याने काही प्रॉब्लेम होउ शकतात पण जर आपल्या कडे हे पाणी मिळ्ते आहे तर त्याचा वापर ह्या कामांसाठी करुन पिण्याचे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरले तर पाणाचे नियोजन होणार नाही का ? आपण हे करत नाही कारण २४ तास, १२ महिने आपल्याला पाणी मिळते आहे इथे पुण्यात तीच बाब मुंबई ची. रेन वॉटर हार्वेस्टींग हा ही एक उत्तम पर्याय आहे. एरंडवणे परिसरात परांजपे कन्स्ट्र. चे ऑफीस जिथे आहे, त्याच्या मागील गल्लीत एक इमारत आहे, तिथे त्यांनी बाहेर चक्क एक बोर्ड लावुन ठेवला आहे की ह्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टींग केलेले असुन त्या बाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. पण आपल्या इथे जाउ द्या ना, आत्ता आपल्याला टंचाई चा भिषण सामना करावा लागत नाहीये ना, जेव्हा होईल तेव्हा बघु असा दृष्टीकोन बाळगल्या जातोय जे चुकीचे आहे येवढेच मला म्हणायचे होते. माझ्या प्रतिसादामुळे कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.
राहता राहिल्या राजकारणी मंडळींच्या गप्पा इथे ही पुन्हा हा विरुद्ध तो असे नाही म्हणायचे पण विद्यमान विरोधी पक्षांनी इतके वर्ष सरकार असताना किती पाणी नियोजन केले आणि पुण्या सारख्या शहरातून चोरुन लवासा ला नेले हे जगजाहीर आहे.

प्रसन्न,

अर्थातच तुमच्याशी सहमत आहेच. खरे तर एरवीसुद्धा पाणीवापराबाबत कडक कायदे असावेत.

पण पॉकेट्समध्ये विकास झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.

स्वतःचा comfort zone सोडून कोणाला जायचे असते? आणि गावात तुम्हाला सहकार्य होइलच असे नाही. selefless
कार्यकर्त्याचे कालेज्ळीज असेल तरच शक्यय गावी परत जाणे.बर एकाने जरी ठरवले तरी त्याच्या जोदीदाराचे तयारी हवी ना.
सध्या तरी अशा कामांना आर्थिक मदत करने एव्ह्देच जमु शकते.
प्रत्येक दुश्काल काहीतरी देउअन जातो. ७२ मधे रोजगार हमी योजना दिली. २००२-३ मधे पाणे अडवा पाणे जिरवाचे महत्व अधोरेखित केले.
ह्याव्र्षी बघु काय धोरणात्मक बदल होन्णार आहेत?

हो बेफी,
एरवीसुद्धा पाणीवापराबाबत कडक कायदे असावेत ही काळाची गरज आहे. वॉटर ऑडीटींग करणे, गळती कुठे होते ते तपासणे, अनधिकृत नळजोडणी शोधणे इ. कामे मला वाटते म. न. पा. नी संपूर्णपणे आपल्या हातात न ठेवता ती आउटसोर्स करावीत, आणि नागरिकांनी ही दक्षता बाळगावी.
परवा भेलके नगर, यशवंतराव च. नाट्यगृहासमोर जी दोन तीन छोटी दुकाने गॅरेज आहेत तिथे गेलो होतो, अगदी लहान आणि दाटीवाटीच्या त्या खोपटांच्या मागील बाजुस, आडोश्याला चक्क ३-४ अवैध नळजोडणी केलेली दिसत होती, तिथल्या दुकानदारांना त्या बद्दल विचारल्यावर त्यांनी उडवाउडवी ची उत्तरे दिली, मग बहुदा त्यांना मी म. न. पा. चा माणूस वाटलो, त्यांचा गैरसमज तसाच राहु दिला आणि तंबी देउन आलोय की चार दिवसात हे टॅप बंद करा, आता ह्या शनिवारी पुन्हा चक्कर टाकुन बघणार, काही केले नसेल तर मात्र कंप्लेंट करणार आहे मी. Happy

arc तो लेख बराच जुना आहे. अरूण देशपांडे यांनी सुरु केलेला वॉटर बँक प्रकल्प पहायचा आहे. त्यावेळेस MKCL ने सुद्धा या प्रयोगाकरता त्यांना आर्थिक सहकार्य केले होते.

आता सध्याच्या दुष्काळात या वॉटर बँक ची काय स्थिती आहे.

आहे ना!

एक व्रत आहे. त्यात एप्रिल/मे मध्ये आंब्याच्या कोयी किंवा इतर कमी पाणी लागणार्‍या झाडांच्या बिया रुजायला घालायच्या. नंतर चातुर्मासाच्या सुरुवातीला दर रविवारी सकाळी उठून एखाद्या माळरानावर जायचे असते आणि मन प्रसन्न होईल असा कुठलाही जप, गाणं गुणगुणत एका वृक्षाचे रोप लावायचे. पुढच्या पुढच्या रविवारी आधीच्या रोपांची तब्बेत कशी आहे बघायचं आणि पुढचे पुढचे रोप लावायचे. नंतर वर्षभर जात राहायचं. गाडीने जात असाल तर सोबत पाण्याच्या बाटल्या घेवून जायचं आणि एकेका रोपाला एकेका बाटलीतल्या पाण्याने अभिषेक घालायचा. एक वर्षाने ती रोपं चांगला जीव धरुन थोडी मोठी झालेली असतील. पुढल्या वर्षी त्या रोपांना निसर्गाच्या हवाली करुन पुढचा पॅच झाडं लावायला घ्यायचा. ह्या व्रताने शाकंभरी नक्की प्रसन्न होईल. जेवढी पापं झाली आहेत त्याप्रमाणात जास्त वर्षे व्रत करावं लागेल. हळूहळू रखरखाट कमी होत जाईल, निसर्गाची रसमयता वाढेल, दुष्काळ कमी होईल.

अजून एक व्रत आहे ऋषी राजेंद्र सिंह ह्यांनी स्वतः केलेले आणि इतरांना सांगितलेले. त्याबद्दल गूगलोपनिषदात माहिती मिळेलच.

अंकोलीत १८ म्हिमह्यिन्यांचे नियोजन आहे. त्यामुळे ह्यवर्‍शी पाउस कमी झाला तरी पाणी टिकते. तिथे उसासारखी पिके घेतली जात नाहीत.
तीव्र व्दुष्काळाअत्त देखील १००० जनावरे आणि १०० कुटुंबाची चावणी चालेल अशी सोय तिथे आहे.
पाण्याशिवाय असेहिअतर बरेच प्रयोग आहेत. सायकल चालवुन वीज निर्मितीसारखे.

http://www.prayog.org/2013/01/about.html