गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, लार्जेस्ट ब्लँकेट, मदर इंडियाज क्रोकेट क्विन, पुणे मीट

Submitted by अवल on 5 September, 2015 - 13:12

चेन्नईच्या सुभश्री नटराजन यांची मूळ कल्पना आणि जगभरातील हजारो भारतीय स्त्रियांनी उचललेले शिवधनुष्य म्हणजे, गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड:लार्जेस्ट ब्लँकेट.

आता पर्यंत हे रेकॉर्ड आफ्रिकेतील आहे आणि ते ३३७७ स्क्वेअर मीटरचे आहे. हे रेकॉर्ड मोडून ५०००, हो पाच हजार स्क्वेअर मीटरचे अजस्त्र ब्लँकेट विणण्याचा विडा भारतीय स्त्री शक्तीने उचलला आहे.

भारतातील अनेक शहरांतील, जगातील अनेक देशांतील भारतीय स्त्रिया ऑगस्टपासून ही ब्लँकेट्स विणत आहेत. प्रत्येकजण एक,एक स्क्वेअर मीटरचे ब्लँकेट विणताहेत.प्रत्येक स्त्री सदस्य किमान दोन वा त्याहून जास्त ब्लँकेट्स विणत आहेत. प्रत्येक शहरातील ब्लँकेट्स जोडली जातील. अन शेवटी ही सगळी ब्लँकेट्स चेन्नईत सोडली जातील. अशा रितीने हजारो हातांनी विणलेले वर्ल्डस लार्जेस्ट ब्लँकेट 26जानेवारी 2016ला तयार होईल. गिनीजचे तज्ज्ञ येतील अन हे रेकॉर्ड तपासले आणि जाहीर केले जाईल.

हे प्रोजेक्ट इथेच संपणार नाही. यामागे एक मोठी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. एकदा हे रेकॉर्ड मान्य आणि जाहीर झाले की त्या नंतर हे मोठे ब्लँकेट पुन्हा छोट्या ब्लँकेट्स मधे रुपांतरीत केले जाईल. आणि अनाथ, गरजू लोकांना ही ब्लँकेट्स पुरवली जातील. हजारो हात हजारो गरजुंना पांघरूण घालतील.

या प्रचंड मोठ्या प्रोजेक्टमधे माझाही खारीचा वाटा आहे हे मला खूप अभिमानाचे आणि आनंदाचेही Happy माझी 82वर्षाची आईही यात सहभागी आहे. या प्रोजेक्ट मधे अगदी 8वर्षापासून 82 वर्षापर्यंतच्या स्त्रियांचा अतिशय उत्साही सहभाग आहे.

आज पुण्यातील काही जणी एकत्र आल्या. त्यातील अनेकजणी प्रथमच एकमेकींना भेटत होत्या. पण त्यांच्यातला ब्लँकेटचा समान धागा त्यांच्यातले नाते उबदार करायला पुरेसा होता Happy

या भेटीचे काही फोटो :

IMG_20150905_220849.jpgIMG_20150905_220906.jpgIMG_20150905_220833.jpg

या प्रोजेक्ट साठी ज्यांना विणकाम करायचे आहे, अथवा आर्थिक सहाय्य द्यायचे आहे त्यांनी कृपया फेसबुक वरील MOTHER INDIA'S CROCHET QUEENS या गृपवरती संपर्क साधावा.

सध्या प्रत्येक विणणारी ब्लँकेटचा खर्च स्वत:च करते आहे. मात्र 26जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी (गिनीजच्या तज्ज्ञांना बोलावणे, तेथील स्टिडियम भाड्याने घेणे, त्या दिवशीचा इतर खर्च वगैरे साठी)स्पॉन्सरर लागणार आहेत.
आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि प्रोत्साहनही लागेल Happy आशा आहे गिनिज वर्ड रेकॉर्ड बरोबरच अनेक गरजुंपर्यंत आपल्या शुभेच्छा पोहचतील. धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर उपक्रम. मलाही सहभागी व्हायला आवडले असते. उपक्रमामागची सामाजिक बांधिकलीची कल्पनाही आवडली.

अवल, माझ्या डोक्यात हे विणकाम वगैरे बसत नाही, प्रयत्न केला तर त्या अशी ही बनवाबनवीतल्या लक्षासारखे झाले. खालचा टाका खाली आणी वरचा टाका वरच राहीला. पण प्रत्येक वेळेस तुझे विणकाम आणी कलाकुसर बघुन फार छान वाटते. आताचा उपक्रम तर स्तुत्य आहेच. पण हे ब्लॅन्केटस पण कसले मस्त आहेत. तुला अनेक शुभेच्छा.

धन्यवाद ___/\___
साधना अजूनही होऊ शकशील. नोव्हेंबर पर्यंत क्मान दोन अपेक्षित आहेत. प्लिज जॉईन MOTHER INDIA'S CROCHET QUEENS गृप , फेसबुक वरती.
रश्मी, माझा ऑनलाईन ब्लॉग जॉईन कर Wink मग नक्की जमेल

उपक्रमाबद्दल स्थानिक वर्तमानपत्रांमधून् वाचले होते.पण माबोकर यात सामिल असतील असे बिल्कुल वाटले नव्हते. Happy

मस्त कल्पना आणि उपक्रम. आमच्या शुभेच्छा आहेतच.

छान उपक्रम! माझ्या शुभेच्छा... मला नेहमी प्रश्न पडतो की ह्या वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे साठी बनवण्यात येणाऱ्या गोष्टींचे (केक, रांगोळी इत्यादी) पुढे काय होते. ह्या उपक्रमात त्याचा विचार केला आहे हे वाचून छान वाटले.

अवलताई,

उपक्रमाला शुभेच्छा. मस्त कल्पना आहे. एक किडा वळवळला डोक्यात. जे तुकडे दाखवलेत ते वेगवेगळ्या रंगांचे आहेत. मग ते जोडतांना काही खास पद्धती अनुसरली आहे का? की तुकडे जसे येतील तसे जोडंत जाणार? तसेच पुन्हा सुट्टे करतांना कसेही कापणार का विवक्षित आकारातच कापणार? आणि जाडी किती ठेवायची? इत्यादि बाबींवर पण थोडा प्रकाश टाकावा ही विनंती. Happy

आ.न.,
-गा.पै.

गामा,
रंगसंगती सगळ्यांची सारखी आणणे फारच अशक्य गोष्ट होती. अनेक ठिकाणी रंग सारखे मिळणं मॅनेजेबलही नव्हतं. त्यामुळे फक्त पांढरा वगळता बाकीचे रंग, शेवटची ओळ डार्क रंग, 5 मिलिमीटरची सुई आणि फोर प्लाय लोकर एव्हढच सेम ठरवलं गेल.
ही सगळे छोटे तुकडेे नंतर पांढऱ्या रंगाने जोडले जाणार आहेत. त्यामुळे आपोआपच एक एक मीटरचे चौकोन उठून दिसतील. हे जोडतानाच अशा प्रकारे जोडले जातील की सुटे करताना फक्त हा पांढरा धागा उसवला (कापला तर सगळेच वाया जाईल) की हवे तसे चौकोन सुटे करता येतील.

धन्यवाद सर्वांना

ज्यांनी ही कल्पना मांडली, सुरुवात केली त्या सुभश्री नटराजन स्वत: मॅनेजमेंट वाल्या आहेत Happy त्यामुळे बहुतांशी गोष्टी अतिशय आखीव रेखीव होत आहेत. प्रत्येक गावानुसार कोण किती चौकोन करणार याचा तपशीलवार डाटा रेडी आहे. त्यानुसार आता तरी 5000चा आकडा नक्की साध्य करू असा विश्वास आहे Happy
नियमावली, विणण्याचे तपशील,,स्पॉन्सर्स मिळवण्यासाठीचे निवेदन, या आणि अशा अनेक गोष्टी खूप सुसूत्रतेने केल्या आहेत, त्यांनी आणि टिमने.
या निमित्ताने अनेक स्त्रिया एकत्र आल्या, त्यांनी आपापल्या कामाचे योग्य नियोजन केले, एकमेकींशी ऑफिशिअल पद्धतीने संवाद साधला हे मला खूप महत्वाचे वाटते. Happy

खरेच अवल. छंद म्हणुन विणकाम खुप जणी करतात पण यात सामिल झाल्यावर त्याना नक्कीच आपण काहीतरी करतोय ही भावना आली असेल. एवढ्या मोठ्या ग्रुपचे आपण मेंबर आहोत आणि एका प्रचंड मोठ्या गोधडीमध्ये आपण विणलेला एक हिस्साही आहे ही भावना खुप मोठी आहे. उद्या जेव्हा सगळ्या मिळुन अनेक गोधड्यांतुन एक गोधडी विणतील तेव्हा किती मजा येईल.. Happy

अवल ... ह्या मधे क्रोशे सुई चा नबर म्हत्वाचा आहे का? आणी किति नम्बर ची सुई घ्ययची हे सन्गाल का?

साधना, येस Happy बघू जाता आलं चेन्नईला तर अनुभवता येईल हे सारे Happy फायनल जोडणी चेन्नईत आहे डिसेंबरमधे.

उपक्रमास हार्दिक शुभेच्छा! या निमित्ताने अनेक स्त्रिया एकमेकींशी क्रोशेकामातून जोडल्या जाण्याची संकल्पना व त्यातून काही वेगळा विचार हेही आवडले.

अवांतर: जगातील कैक देशांत बसेस, खांब, बसस्टॉप्स, कंपाऊंड वगैरेंना क्रोशेकामाने वेढून केलेल्या देखण्या कलाकृती याअगोदर फोटोंमधून पाहिल्या तेव्हा कौतुकाबरोबरच मनात यायचे की जगात (किंबहुना त्याच देशात) कितीतरी लोक थंडीने गोठून मरतात त्यांना यातले थोडेसे लोकरीचे आच्छादन मिळाले असते तर किती बरे झाले असते!

या विणकामातली ऊब काही 'शे' लोकांपर्यंत जरी पोचली तरी तुम्हां सर्व सहभागी स्त्रियांना खूप समाधान व प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे. Happy

अकु अगदी अगदी ग Happy
इव्हन विणतानाही हे फिलिंग आहे ग. कित्ती अनोळखी होतो आम्ही सगळ्या, पण असं वाटलच नाही भेटल्यावर. एक धागा समान होता सगळ्यांच्यात. ना स्पर्धा, ना कसला अंतस्थ हेतू, ना स्वार्थ. निखळ आनंद मिळाला Happy

खूप छान! ती लहान blankets छोट्या बाळांना देता येतील. सरकारी प्रसूतिगृह, अनाथाश्रम याठिकाणी खूप हेल्प होईल.

हे 7*7= 49 ब्लँकेट्सचे जोडलेले एक मोठे ब्लँकेट
IMG_20151110_183312.jpg

आणि ही अशी मोठी ब्लँकेट्स जोडतानाचा फोटो
IMG_20151110_183349.jpg

Pages