Submitted by क्रांति on 20 August, 2009 - 14:55
या जिवाला एक ज्याचा ध्यास होता
तोच की त्याचा खुळा आभास होता?
भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी,
सक्तमजुरी आणि कारावास होता
रंगलेल्या मैफली उधळून जाणे
हा कुणाचा सांग अट्टाहास होता?
चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले,
फक्त ओल्या पालवीचा वास होता
राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी
गोंदलेला आमरण वनवास होता
हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता
मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता
गुलमोहर:
शेअर करा
>>हुंदक्यांनी पेलले आयुष्य
>>हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता
वा!
मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता
क्या बात है! मस्तच.
व्वा! एक एक शेर पुन्हा पुन्हा
व्वा! एक एक शेर पुन्हा पुन्हा वाचावा, मनात उतरवून ठेवावा आणि त्याचं आतल्या आत चिंतन होत रहावं असं वाटतं.
छान!
सीतेवरून इलाहींचा एक शेर आठवला:
"चौदा वर्षे पतीविना राहिली उर्मिला,
'हाच खरा वनवास', म्हणालो, चुकले का हो?
शरद
क्या बात है, खासच
क्या बात है, खासच
न्यास - अतिशय
न्यास - अतिशय सुंदर...
क्रांती : तुमच्या गझलेतली वेदना मनावर खुप घाव घालते...
हुंदक्यांनी पेलले आयुष्य
हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता
मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता>>> क्या बात है! मस्त गजल!
कारागिरी का म्हणू जवाहिरी
कारागिरी का म्हणू जवाहिरी ही
ह्या गजलचा प्रत्येक शेर खास होता.
माफ करा पण न्यास म्हणजे लयबद्ध हालचाल ना ? नक्की आठवत नाहीये म्हणून विचारतोय.
मस्तच आवडली.
मस्तच आवडली.
धन्यवाद मंडळी. शरदजी,
धन्यवाद मंडळी. शरदजी, इलाहींच्या शेराची आठवण करून दिल्याबद्दल खास धन्यवाद.
अमितजी, आपला प्रतिसाद अगदी विशेष! हो, न्यास म्हणजे लयबद्ध हालचाल, पण हा अर्थ नृत्यासाठी. गायन किंवा वादनात न्यास म्हणजे एखादं गीत किंवा बंदिश गाताना एखाद्या स्वरावर थांबणं, त्याच स्वरावर वारंवार येणं. हा स्वर त्या बंदिशीतला महत्वाचा स्वर असतो. ग्रह स्वर म्हणजे सुरुवातीचा स्वर आणि न्यास स्वर म्हणजे शेवटचा स्वर. इथे हा न्यास गृहित आहे.
खासच ! श्वासाचा शेर ....अगदी
खासच ! श्वासाचा शेर ....अगदी कातील !
एकदम खल्लास.. चाबुक...
एकदम खल्लास.. चाबुक...
सुंदरच.
सुंदरच.
>>हुंदक्यांनी पेलले आयुष्य
>>हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता
वाह!
वा वा... हुंदक्यांनी पेलले
वा वा...
हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता
भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी,
सक्तमजुरी आणि कारावास होता
वाह..
आवडली गझल...
पुलेशु..
क्रांती: सर्वच शेर खुप
क्रांती: सर्वच शेर खुप छान!
गझल एकदम मनाला भिडते...
<<हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता>> हा शेर मला खुप आवडला.
पुलेशु...
वा! सुरेख.
वा! सुरेख.
काय गझल ! काय तिची मजल
काय गझल ! काय तिची मजल !!
सलाम.
अतीव सुंदर !
अतीव सुंदर !
सर्व शेर आवडले
सर्व शेर आवडले
क्रांती : पामराने या
क्रांती :
पामराने या कलाकृतीवर लिहीणे साहसाचे आहे पण दाद अट्टाहासाची आहे... फारच छान !!!!
सगळेच शेर जमलेयत.... अमितन अगदी समर्पक दाद दिलीय....!!!!
"मी निषादाभोवती गुंतून गेले,हाय, त्याचा पंचमावर न्यास होता
रंगलेल्या मैफली उधळून जाणे हा कुणाचा सांग अट्टाहास होता?
चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले, फक्त ओल्या पालवीचा वास होता "----: क्या बात है !!!!
जियो मॅडम... ब्रावो !!!!
वा! पालवीचा शेर विशेष आवडला!!
वा! पालवीचा शेर विशेष आवडला!!
सगळे शेर खास आहेत. सगळेच
सगळे शेर खास आहेत. सगळेच आवड्ले, शेवट्चे दोन जास्त.
धनु.
क्रांती, सगळेच शेर लाजवाब.
क्रांती, सगळेच शेर लाजवाब. अगदी वेचायचेच म्हटलं तर मतला, ऋतू, कारावास, आणि न्यास... एकदम आरपार!
जियो
मी निषादाभोवती गुंतून
मी निषादाभोवती गुंतून गेले,
हाय, त्याचा पंचमावर न्यास होता
संपुर्ण गंजल अतिशय सुंदर्..... कितीतरी वेळेस वरच्या द्विपदी वाचल्या!!!
व्वा!!! सुरेख
व्वा!!! सुरेख गझल!
हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे,
जो दगा देऊन गेला, श्वास होता>>>>सही!
खुपच छान गझल!आणि शरद
खुपच छान गझल!आणि शरद पाटलान्चा शेर फारच सुन्दर!(अनुस्वार काम करत नाही आहे)
अप्रतिम गजल....लगे रहो
अप्रतिम गजल....लगे रहो क्रांती.
छान. मस्त. लगे रहो.
छान. मस्त. लगे रहो.
छान!!!!
छान!!!!
सर्व शेर आवडले .
सर्व शेर आवडले .
येथे प्रतिक्रिया द्यायची
येथे प्रतिक्रिया द्यायची राहून गेली होती....क्षमस्व क्रान्ति. अप्रतीम.
Pages