वटवट्या/Prinia

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 September, 2015 - 03:40

फ्लेमिंगो दर्शनासाठी गेले तेव्हा खाडीच्या रस्त्याला ह्या वटवट्याचे दर्शन झाले. साधारण चिमणी एवढा किंवा लहान म्हणा ह्याचा आकार. खुप अ‍ॅक्टीव्ह आहे हा पक्षी आणि धीटही. हा पळेल म्हणून मी भराभर फोटो घेत होते पण मला आजिबात न घाबरता ह्याने फोटो काढून दिले. अर्थातच ह्याच्या आवाजामुळे ह्याला वटवट्या हे नाव पडले आहे. गवत-झुडुपावरील किडे ह्यांचे भक्ष असते.

हा वटवट्या
१)

खालचे सगळे फोटो पिल्लू वटवट्याचे आहेत.
२)

३)

४)

५)

६)

७)

८)

(पक्षाचे नि.ग. करांनी पक्षाचे नाव माहीती करून दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख....कितीतरी दिवसांनी वटवट्याचे दर्शन झाले. आमच्याकडील टेंबलाई मंदिराच्या परिसरात असलेल्या झाडांच्या गर्दीत साळुंक्यासोबतीने (पण बाजूला) ह्यांचीही वटवट चालू असल्याचे मी ऐकले आहे...पण विरळ होत चालली आहे ही जात असेच हल्ली वाटत आहे.

याना ’खाटीक’ देखील म्हणतात का ? एक शंका आली आहे मनी उगीचच...बहुधा नसावे.

बरे घे उ दिले तुला फोटो. आमच्या इथे खुप आहेत पण एका जागी स्थिर राहणे स्वभावातच नाही त्यांच्या.

सगळे फोटो छान आलेत.

याना ’खाटीक’ देखील म्हणतात का ? एक शंका आली आहे मनी उगीचच...बहुधा नसावे.

नै हो, खाटिक वेगळा, याच्यापेक्षा मोठा असतो तो. श्राईक असे गुगलुन पाहा.

हा वटवट्या काय! हा गेल्या आठवड्यात बेडरुमच्या ग्रीलवर बसून वटवट करत होता. फोन उचलून फोटो काढायला गेले तर उडून गेला.

साधना...थॅन्क्स

गुगलले "श्राईक" असे देवनागरी नाम टंकून...आणि तेथील एका लिंकने मला जागू यांच्याच मायबोलीवरील एका लेखाकडे निर्देश केला....तिथे जागूने एका पक्ष्यासमोर "..खाटीक (रूफस बॅक्ड श्राईक)..." असे लिहिले आहे. वटवट्यात आणि खाटीकात दिसतो फ़रक....पण फ़ारसा नाही.

खाटीक आणि वटवट्याच्या रंगात पण फरक असतो.
जयू, गार्गि, अशोक, साधना, अश्विनी धन्यवाद.

सकुरा उरण पाणजे खाडी. सध्या फ्लेमिंगो आणि चित्रबलाक आले आहेत तिथे.

त्या पिल्लु वटवट्याचा फोटो जाम गम्मतशीर आलाय.:हाहा: पाय वर करुन बहुतेक कान खाजवत असावा. बाकी फोटो पण खूप आवडले.

jaagu, just awesome photography.. सुपर लाईक..

वेका ये एकदा वेळ काढून.

इंद्रा, दिनेशदा, आर.एम.डी, देवकी, हिमस्कूल, सावली, टीना, स्वाती, वर्षूताई धन्यवाद.

रश्मी हो ग मला पण आवडला त्याचा बालीशपणा तो.

एस्.आर.डी नाही हो मी ऐकला कधी त्याचा आवाज. हा मी प्रथमच पाहीला.

ऋन्मेष नाही हो खंड्या निळा, चॉकलेटी रंग असलेला आणि मोठ्या जाड चोचीचा असतो.

रायगड हो मी म्हटल ना की तो घाबरतच नव्हता. जवळून फोटो काढून दिले त्याने.

Pages