ज्योतिष आणि शरीर

Submitted by y2j on 26 August, 2015 - 22:47

ज्योतिष आणि शरीर .
ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करताना समजलेले काही ग्रहयोग
1} सप्तम स्थानी गुरु असता जातक सहा फूट किंवा त्याहून
अधिक उंच असतो. नवम स्थानी गुरु असता जातक सहा
फूट पर्यंत उंच असतो.
2}कोणत्याही ग्रहाची अपवाद -(राहू केतू प्लुटो नेपच्यून हर्षल)
हे ग्रह सोडून कुठलाही ग्रह चंद्रावर द्र्ष्टी टाकत असल्यास
जातक पावणे सहा फूट उंच असतो.
3} कर्क ,धनु, मीन या राशींमध्ये गुरु आणि चंद्र यांची युती असेल
तर जातक सहा फूट ते साडेसहा फुट पर्यंत उंच
असतो.
4} कुठलाही ग्रह स्वतः च्या उच्च किंवा नीच राशीमधुन चंद्रावर द्र्ष्टी
टाकत असल्यास जातक सहा फूट पर्यंत उंच असतो.
5}जर चंद्रावर एकाच वेळी गुरु ची पाचवी कींवा नववी व अन्य ग्रहाची
सातवी द्र्ष्टी असल्याच जातक सहा फूट पर्यंत उंच असतो.
6} जर गुरु आणि चंद्र यांची युती सप्तम कींवा नवम स्थानी असेल
तर जातक अत्यंत उंच असतो.

7} कर्क ,धनु, मीन या राशींमध्ये गुरु आणि चंद्र यांची युती असेल
व जर ती युती सप्तम कींवा नवम स्थानी असेल तर जातक
अत्यंत उंच असतो.
8} गुरु ची चौथी कींवा नववी द्र्ष्टी नवम स्थानातुन चंद्रावर असेल
तर जातक अत्यंत उंच असतो.
9} या सर्व वेळी चंद्र व गुरू सोबत राहू असल्यास काही प्रमाणात
उंची कमी करतो.
10} एकाच वेळी अनेक ग्रह चंद्राबरोबर युती कींवा द्र्ष्टी साधत
असल्याच उंची मध्ये कमी दिसुन येते.
11} कुंडली मध्ये लग्नेश कमकुवत किंवा ग्रहबळ नसेल किंवा
चंद्र राहू केतू बरोबर असल्यास उंची कमी असते.

हे सर्व मनाला पटत नसेल तर स्वतः च्या , मित्र मैत्रिणी, नातेवाईक
यांच्या कुंडल्यां पडताळा........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली उदाहरणे. बरीचशी पटताहेत, बाकीची पडताळून बघायला हवीत.
>>>> गुरु ची चौथी कींवा नववी द्र्ष्टी नवम स्थानातुन चंद्रावर असेल <<<<<
गुरुची पाचवी दृष्टी (चंद्राशी नवपंचम) असेल तर? कारण वरील वाक्यातील गुरुच्या चौथ्या वा नवव्या नजरेचा कार्यकारण भाव समजला नाही. चौथ्या नजरेने केंद्रयोग, तर नवव्या नजरेने नवपंचम साधतोय. थोडे विश्लेषण कराल तर बरे होईल.

ओके. माझ्या कुंडलीत चंद्राकडुन नवव्यास्थानी गुरु आहे.
सुरवातीला अगदी ११ वी/१२ वी पर्यंत मी अतिशय बुटका होतो. मग मात्र सर सर उंची वाढत गेली. सहा फुट नाही तरी सहा फुटाला चार इंच कमी इतकी आहे.
आता या दृष्टीने निरीक्षणे करायला/नोंदवायला हवीत.
जमल्यास, बुटकेपणाबद्दलही काही सांगता आले तर सांगा ना प्लिज.

लग्नी राहु एकटा असेल तर बाई/ माणुस वान्ग असत. बरोबर हर्षल असेल तर बरी उन्ची. लग्नी चन्द्र वा मन्गळ असेल तर चान्गली उन्ची.

तूमच्या कुंडली मध्ये चंद्रावर गुरुची पाचवी द्र्ष्टी असल्या कारणाने
आपण पावणे सहा फूट पर्यंत उंच झालात.जेव्हा चंद्रावर कुठल्याही
ग्रहाची द्र्ष्टी नसते, जेव्हा चंद्र राहू केतू बरोबर असतो, जेव्हा सर्व ग्रह 6,8,12 या स्थानी असतात तेव्हा जातकाची उंची कमी असते.

चांगलं कोडं आहे.

मागे reader's digest मध्ये असायची अशी.
माझी उंची ५'७'' असेल तर गुरुला दृष्टी किती वगैरे. जाम मजा यायची सोडवतांना.

कर्क, धनु, मीन या राशींमध्ये गुरु आणि चंद्र यांची युती असेल तर व ती कोणत्याही स्थानी (1 ते 12) असतील तरी जातक सहा फूट किंवा त्याहून अधिक उंच असतोच . म्हणजे नुसत्या जन्म तारखेवरुनच उंचीचा योग् ओळखता येऊ शकतो.

बर्यापैकी बरोबर आहे. माझ्या सप्तम स्थानात मीनेचा गुरु आहे. माझी उंची ६ फुट १ इंच आहे.

बाकीचे ग्रहयोग तपासयला हवेत. चंद्र पाप कर्तारीत असताना, बुध ग्रहासारख्या ( ज्यामुळे माणसे कमी उंचीची असतात असे म्हणतात ) ग्रहाच्या योगात असताना वर दिलेले ग्रहयोग फलदायी होतात का ? हे तपासायला हवे.

बर्यापैकी बरोबर आहे. माझ्या सप्तम स्थानात मीनेचा गुरु आहे. माझी उंची ६ फुट १ इंच आहे.

बाकीचे ग्रहयोग तपासयला हवेत. चंद्र पाप कर्तारीत असताना, बुध ग्रहासारख्या ( ज्यामुळे माणसे कमी उंचीची असतात असे म्हणतात ) ग्रहाच्या योगात असताना वर दिलेले ग्रहयोग फलदायी होतात का ? हे तपासायला हवे.

राहू व केतू बरोबर चंद्र असता बुठकेपणा असतो.सप्तम व नवम स्थानी गुरु असता पापकर्तारी योगाचा प्रभाव जाणवत नाही मात्र चांडाळ योगाचा प्रभाव जाणवतो.