चविष्ट चीजी डंपलींग -२ ((चायनीज स्टाईल)

Submitted by प्राप्ती on 20 October, 2013 - 11:08

डंपलींग (चायनीज स्टाईल)

पदार्थ :-

मैदा
मीठ
तेल
उकडलेले बटाटे
मोझरेला चीज
बारीक चिरलेला लसुन
किसलेले आलं
साबूत सुकी लाल मिरची
शिमला मिरची/ पानकोबी / फरसबी/ कांद्याची पात / कोथिंबीर
(यापैकी जे जे मिळेल ते घ्यावं)
डार्क सोय सॉस / विनेगर / टोमटो सॉस / अजिनोमोटो/ रेड चिली सॉस / शेजवान सॉस
(यापैकी जे आवडेल ते)
दोन चमचे कॉर्नफ्लोर

(हे सर्व पदार्थ आपल्याला हव्या त्या प्रमाणात वा आपापल्या चवीप्रमाणे वापरावे)

कृती :-

मैदा तेल आणि मीठ घालून मळून घ्यावे

उकडलेला बटाटा कुचकरुन त्यात मोझरेला चीज किसून घालावा. (शक्यतो तोडतांना तार तुटेल इतके भरपूर चीज घालावे)
त्यात थोडी कांद्याची हिरवी पात, कोथिंबीर, मीठ हवं असल्यास तिखट जीर पूड घालावे

हे मिश्रण मैद्याच्या पातीमध्ये भरून छोट्या छोट्या करंजी किंवा मोमोज च्या आकाराचे डंपलींग
बनवून घ्यावे.
ह्यांना इडली पात्रात किंवा पातेल्यावर चाळणी ठेवून त्यात डंपलींग ठेवून वरून झाकण लावून वाफवून घ्यावेत.

त्यानंतर परत कढईत थोडं तेल घालून ते गरम झालं कि त्यात बारीक चिरलेला लसुन, किसलेलं आलं घालून थोडं परतवून चिरलेल्या भाज्या घालाव्यात थोडावेळ परतवून सोया सॉस, विनेगर आणि इतर सॉस आवडीप्रमाणे घालावे आणि चमचा हलवणे चालू ठेवून वाफवलेले डंपलींग त्यात सोडावे एक वाफ आली कि एका वाटीत तयार केलेले कॉर्नफ्लोर आणि मैदा मिश्रित पाणी त्यात सोडावे.

लहान मुलांना आवडेल असे गरम वाफाळते चीजी डेलीशीयस डंपलींग तयार आहेत Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कणिक वाफवता येत नाही किंवा वाफवल्यावर मैद्याला येणारी चव कणकेला येणार नाही (माझा अंदाज). एकवेळ तांदळाची पिठी वापरून पाहता येईल पण त्याची हमी मला देता येणार नाही

तरीही कणिक वापरायचीच असेल तर वाफवून घेण्या ऐवजी तळून घेऊन प्रयोग करून बघता येइल.

साबूत सुकी लाल मिरची>>>> साबूत म्हणजे काय?

रेसिपीबद्दल धन्यवाद! लेकीने परवाच डम्प्लिंग्बद्दल विचारले होते.

कॉर्नफ्लोर आणि मैदा मिश्रित पाणी त्यात सोडावे. > ह्याच्यात मैदा आणि पाणी किती घालायच? कॉर्नफ्लोर २ चमचे लिहिलय वरती. आणि नंतर ह्याच्या सकट शिजवायच का ग्रेवी म्हणून?

ग्रेवी हवी असेल तर दोन चमचे कॉर्नफ्लोर आणि एक चमचा मैदा आणि हवे तेवढे पाणी घालायचे. विनाग्रेवी (ड्राय) पण एक विशिष्ट कंसीस्तन्सी यावी म्हणून वाटीभर पाण्यात १-१ चमचा असे प्रमाण घ्यावे

छोट्या छोट्या करंजी किंवा मोमोज च्या आकाराचे डंपलींग च्या सारणासाटी सोया़नगेट्स च्या भाजीचे सारण भरता येइल का ?
तुमची रेसिपी एकदम म स्त... झकास....

.