फोटोग्राफी स्पर्धा क्र. २ : पर्यावरण - सकारात्मक आणि नकारात्मक

Submitted by संयोजक on 8 August, 2009 - 00:14

कुठे थेंब थेंब पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत तर कुठे नळ उघडे ठेवून अक्षरशः हजारो लिटर पाणी फुकट चाललंय...
कुठे "टाकाऊतून टिकाऊ" तत्त्वावर कचर्‍यातून सौंदर्य शोधलं जातंय तर कुठे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा खच नैसर्गिक सौंदर्य नष्ट करतोय...
कुठे सौरउर्जा, पवनचक्क्यांसारखे अपारंपारिक उर्जा स्त्रोत अधिकाधिक कसे वापरता येतील ह्यावर प्रयत्न चाललेत तर कुठे अजूनही ओली लाकडे जाळून प्रदुषण वाढतंय ...
एकीकडे पर्यावरण संरक्षणासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा तर दुसरीकडे स्वार्थापायी किंवा अज्ञानामुळे चालू असलेली पर्यावरणाची अपरिमीत हानी...
जरा उघड्या डोळ्यांनी आणि सरसावलेल्या कॅमेर्‍याने हा विरोधाभास टिपायचा प्रयत्न करूया ?

गणेशोत्सव २००९ - फोटोग्राफी स्पर्धा क्र. २ : पर्यावरण - सकारात्मक आणि नकारात्मक

*********************************************************

स्पर्धेचे नियम :

१. ह्या स्पर्धेसाठी दोन (२) छायाचित्रे पाठवणे आवश्यक आहे.
छायाचित्र क्र. १ :- पर्यावरणामधे सकारात्मक बदल घडवून आणणार्‍या घटना, तंत्रज्ञान, व्यक्ती अथवा संघटना हा विषय आहे. उदा.: अपारंपारिक उर्जा स्त्रोत, उर्जेचा तसेच साधनसंपत्तीचा पुर्नवापर, वृक्षारोपण ई. (renewable energy, recycling, tree plantations, water conservations, etc.)

छायाचित्र क्र. २ :- पर्यावरणावर नकारात्मक परिणाम घडवून आणणार्‍या घटना, तंत्रज्ञान, व्यक्ती अथवा संघटना हा विषय आहे. उदा.: प्रदुषण, पर्यावरण हानी, उर्जेचा गैरवापर ई.
(pollution, deforestation, wastage of energy & water resources, garbage dumping, etc.)

२. दोन्ही छायाचित्रांचा परस्परसंबंध असणे गरजेचे नाही. मात्र छायाचित्रांच्या माध्यामातून योग्य तो संदेश दिला गेला पाहिजे. छायाचित्रांचा मूळ उद्देश हा पर्यावरणाबद्दलची जागरूकता हा असावा.

३. दोन्ही पैकी फक्त एकाच विषयावर पाठवलेला फोटो बाद ठरवला जाईल.

४. दोन्ही छायाचित्रे काढलेल्या स्थळाचे नाव देणे बंधनकारक आहे. शक्य असल्यास थोडी माहिती पण द्यावी.

५. कॅमेराच्या सेटींगचे डीटेल्स (शक्य असल्यास) देणे अपेक्षित आहे, मात्र बंधनकारक नाही.

६. पिकासा, फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडीटींग सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी आहे. फोटोत असे काही बदल केले असल्यास ते नमूद करावे.

७. ह्या स्पर्धेत मतदान हे निनावी पद्धतीने घेतले जाणार असल्याने फोटोवर स्पर्धकाच्या नावाचा अथवा मायबोली आयडीचा वॉटरमार्क टाकू नये. त्याऐवजी "मायबोली गणेशोत्सव २००९" असा वॉटरमार्क टाकावा.

८. एका आयडीतर्फे एकच एन्ट्री स्वीकारली जाईल.

९. दोन्ही छायाचित्रे स्वत:च काढलेली असावी.

१०. दोन्ही छायाचित्रे या आधी मायबोलीवर प्रकाशित झालेली नसावी.

११. मतदान पध्दत वापरून विजेता निवडला जाईल.

स्पर्धेची सुरवात गणेश चतुर्थीला होईल आणि प्रवेशिका कशा आणि कुठे पाठवायच्या याबद्दल माहिती लवकरच दिली जाईल.

*********************************************************

इतर स्पर्धांसाठी पहा : मायबोली गणेशोत्सव २००९ स्पर्धा घोषणा

सर्व स्पर्धा गणेश चतुर्थीला सुरू होतील.
त्या दिवशी स्पर्धेसाठी प्रकाशचित्रे कशी व कुठे स्वीकारली जातील, ह्या विषयी माहिती इथे दिली जाईल.

|| गणपती बाप्पा मोरया ||

.

>>>>>> सकारात्मक व नकारात्मक बाजू एकाच छायाचित्रात असेल तर?
तुकडे करुन दोन द्या Wink नाहीतर एकच फोटु दोनदा द्या Lol

आयला, ह्या विषयात गती असूनही मला एन्ट्री देता येणार नाही Sad क्यामेराच नाही, अन जुन्या स्टॉक मधे असल्या विषयावर फोटू नाहियेत Sad

.

७. ह्या स्पर्धेत मतदान हे निनावी पद्धतीने घेतले जाणार असल्याने फोटोवर स्पर्धकाच्या नावाचा अथवा मायबोली आयडीचा वॉटरमार्क टाकू नये. त्याऐवजी "मायबोली गणेशोत्सव २००९" असा वॉटरमार्क टाकावा. <<<<

हा नियम वर संयोजकांनी दिला आहे. तेव्हा काही शंका असतील तर संयोजकांना ई-मेल पाठवून विचारा. नाहीतर तुम्ही कोणती छायाचित्रं पाठवताय याचा मतदात्यांना अंदाज येईल आणि या नियमाला काही अर्थ राहणार नाही. Happy

संयोजकांना विचारल्यावर त्यांनीच बीबीवर टाकायची सूचना केली म्हणून इथे टाकलं. Happy
माझा वरचा प्रतिसाद संपादित केलाय. संयोजक तुम्ही पण करून टाका. धन्स.