भुताची गोष्ट

Submitted by graceful on 14 May, 2013 - 20:28

काल सकाळी उठल्या उठल्या बायको मला म्हणाली, "तुका किते सांगपाक जाय ". मी म्हटल, "बोल". "मुन्नीला आज सकाळी, पहाटेला, घरांत भूत दिसलं". कन्यारत्नाला (व. वर्षे ८ ) चार-पाच दिवसापासून ताप येत आहे. त्यामुळे दिवसभर ती झोपून असते. काल पहाटेला तिला झोप येत नव्हती व ती डोळे उघडे ठेवून जागी होती. इतक्यात म्हणे तिच्या खेळण्याच्या खोक्यातून एक पांढरी शुभ्र आकृती बाहेर आली आणि हवेत तरंगू लागली. दुसऱ्याच क्षणाला, त्या भूताच डोकं धडापासून वेगळ झालं आणि खाली पडलं. मग ते डोकं नसलेले धड तसेच हवेत झुलू लागलं. मुन्नी घाबरली आणि बिचारी सकाळ होयीस्तोवर, डोक्यावर पांघरूण घेवून, डोळे बंद करून गुपचूप पडुन राहीली.

नवीन घरांत येवून आम्हाला जेमतेम महिना झालेला आहे. आलो अणि दुसऱ्यांच दिवसापासून सगळ्यांना खोकला, ज्वर आणि सर्दीचा त्रास सुरु झाला तो अजून पर्यंत आहे. गेल्याच आठवड्यात बायको म्हणत होती, " ह्या घरांत किते तरी भुताटकी आसा".

माझा असल्या ह्या भूता-खेंतावर बिलकुल विश्वास नाही. लहान मुलं, TV, पुस्तकात भूतांच्या गोष्टी बघतात/वाचतात, आणि मग त्यांना भूतांचे भास होतात, असा माझा स्पष्ट विचार आहे. आणि स्प्रिंग/पोलन च्या सिझन मध्ये सर्दी/खोकला तर चालतच असतो.

भुताची गोष्ट मी माझ्या काही अमेरिकन सहकाऱ्यांना सांगितली. अनेकांना तर ते भूत खरंच वाटलं. एकट्यान तर, "you must perform cleansing of the house by calling a priest", असा serious सल्ला दिला. आता बोला?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्न श्रद्धेचा आहे. आपल्याला पटत नसेल; पण बायकोच्या समाधानासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. Wink

आरसा - भुत .. Kay samband .???
Happy
माझा असल्या ह्या भूता-खेंतावर बिलकुल विश्वास नाही ..right ..