अकोल्यातील खादाडी

Submitted by हर्ट on 27 May, 2009 - 09:41

अकोल्यातील खादाडीबद्दल मी इथे लवकरचं लिहिणार आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी तै,

येऊ शकाल, चिखलदरा वाया अकोला ट्रिप होऊ शकते की! एक दिवस अकोल्यात बाकी दिवस मस्त चिखलदरा (प्रेफेरबली पावसाळा किंवा हिवाळा /पानगळ सीजन)

...

आणि विदर्भात इकडल्या पेक्षा तिखट जास्त खातात हे ध्यानात ठेउन ग बये..
नाहीतर उलट्या बोंबा व्हायच्या..
आमच्या इकडं लाईट, मिडियम आणि तिखट असला भेद नसतो Proud

टेलीफोन ऑफीस समोर आसरा पाणीपूरी ची गाडी असते.. खतरा असते पाणीपूरी त्याची..
कैलाश ची पावभाजी??
आणि आलू पोंगे न्यू ईंग्लीश समोरचे एक नंबर..

वाघमारे साहेब,

धन्यवाद … सौंना घेऊन जावे लागेल डीएसपी कडे … लगेच कळेल चव अकोल्याची आहे की पुण्याच्या पाण्यात बिघडलीय …
बाकी एक मीठी पुरी देना भैय्या … हा हक्क आहे … आणि तो मिळवलाच पाहिजे Wink

विदर्भीय ढाबे या भागात नाहीत Sad

कोंढाळीजवळ काठीयावाडी धाबा होता (आता आहे की नाही ठाऊक नाही) त्याचे पराठे खायला बर्याच शनवारी नागपूरहून जायचो बाइकवर …

अकोल्यात खामगाव रोडवर पण एक दोन झकास ढाबे होते. चिकन रस्सा अन शेवभाजी ओरपली होती.

नीधप,

वर्धेला मी सुद्धा पाव्हणा म्हणुन ते ही लग्नाच्या वर्हाडातच गेलोय तस्मात् मला कल्पना नाही क्षमस्व _/\_

आमच्या इकडं लाईट, मिडियम आणि तिखट असला भेद नसतो

टीना,

मी चुकून कधी चुकून मित्रांसोबत जेवताना "मीडियम तीखा" काढले तोंडातून तर पोट्टे ज्या ज्या शिलकीतल्या शिव्या देतात त्या साऱ्या आठवल्या मले एकदम इकठ्ठा!!

तिखटा संबंधी एक गमतीशीर माहिती

आमच्या अकोला जिल्ह्यात सस्ती-वाड़ेगाव नावाचे एक गाव आहे तिथला पाहुणचार , विशेषतः माहेरवाशिणी सोबत आलेल्या जावईबोवाचा हा एक भारी मामला असतो, पाहुणचारात मटन असते शक्यतो, वारकरी फॅमिली असल्यास पातोडी ची भाजी असते (होय पातोडीच पाटवड्या वगैरे सोफिस्टिकेटेड नाव नाही त्याचे), मसाल्यात माणशी ८ लाल अन ९-१० मिरच्या असतात त्याशिवाय वाटणात काही शिल्लक मिरी वगैरे अन त्या सगळ्या मामल्यावर तेलाची तर्री असते चार बोट जाडी (ग्रामीण भागात आजही तर्रीच्या जाडीवर वधूपिता किती तालेवार ते ठरवतात काही जुनी खोड़े) , बरं तर्री प्रेम किती असेल? तर ग्लासात अर्धाग्लास तर्री घ्यायची त्यात अर्धे लिंबु पिळायचे अन जेवताना सोबत एक एक घोट तोंडी लावायची , इकडे अजुन एक मजेशीर रीत आहे गावात कोणाचे जेवणाचे आवतन आल्यास पाहुणे घरुन ग्लास व लिंबु घेऊन जातात स्वतःचे , अन सगळ्यात अमेजिंग भाग हा की इतके तिखट जेवण असुन ते अजिबात बाधत नाही त्यातल्या मसाल्यांचे ब्लेंड असले असते की ते जिभेला स्वाद देते पण पोटाला त्रास नाही देत!! . लग्नात ऐन पंगतीत वांगे बटाटा रस्सा (स्पेशल पूर्णा काठची बारीक़ काटेरी कोराडवाहु ची वांगी असतात, दमआलू च्या आलू इतके एक वांगे अन चवदार देठ) असतो, पंगतीत तर्री चा आग्रह होतो, लग्नाच्या पंगतीत ठेचा सुद्धा असतो वरुन घ्यायला कच्चे गोड़ेतेल त्यात कोणाला काही गैर नाही वाटत (अगदी शहरात ऐसी हॉल घेतला तरी बुफे मधे सलाद काउंटर ला ठेचा अन तेल सापडेल) असे एकंदरित असते ग्रामीण किंवा काही प्रसंगी गावातल्या सुद्धा लग्नात

पुण्याची पापू पांचट.
मुंबईची त्यातल्या त्यात बरी.
इंदूरची खस्ता कचोरी आणि पोहे एकदम मस्तच. (मी सुद्धा माझे दोन पैसे वरच्या चर्चेला धरून).

बॅक टू विधर्भ खादाडी.....

अकोल्यात खामगाव रोडवर पण एक दोन झकास ढाबे होते. चिकन रस्सा अन शेवभाजी ओरपली होती.

एक तर कलकत्ता ढाबा आहे अंबुजा सॉल्वेक्स कंपनी च्या अलीकडे तिथे दोन्ही आइटम भारी मिळतात विशेषतः शेवभाजी (विथ तर्री ऑफ़कोर्स)

सोन्याबापु मस्त माहिती.

तिखटाच त्रास देण न देण मला वाटत मिरची कुठलि आहे त्यावर पण अवलंबुन असाव. नागपुर अकोला भागात (माझ्या माहितीप्रमाणे) भिवापुरी मिरची वापरतात्.ती बहुदा तेवढी जहाल नसावी. शिवाय कंडिशनिंग हाही एक फॅक्टर आहेच. मी विदर्भात रहात होते तेंव्हा जेवढ तिखट खाउ शकायचे तितक आता खाण जमत नाहि. कारण सासरी अजीबात तिखट खात नाहित कुणिच. त्यांच्यामुळे माझिहि सवय मोडली.

अर्थात!! हवेचा असर आहे बाकी मिरच्या इकडे खुरसनी (लवंगी) वापरतात हिरव्या .

अवांतर

बोलता बोलता विषयाला विषय किस्स्याला किस्सा होता होता १०० प्रतिसाद झाले देवानु!! ह्या बाबतीत तरी विदर्भाचा अनुशेष भरून निघाला हे ही नसे थोड़के

तेच त सोन्याबापू,
आपल्याइकडं भाजीवर तर्री पाहिजेच पाहिजे..नै त बिनातेलाची भाजी केली का अस मनते लोक..
माझ्या इथल्या अर्ध्या पाकृंना इतक तेल असा एकतरी प्रतिसाद असतोच असतो..आता यांना कस सांगाव का त्याच्याशिवाय भाजी घशाखाली उतरत नै म्हणुन Lol

बाकी कच्च तेल आपल्याचकडे खाते वाट्टे वरुन..

खेड्यातल्या लग्नातली आलु वांग्याची भाजी...
बस बस बस बस..त्या एका गोष्टीसाठी त मी लग्नाला जात असते Proud
सोबत कढी, मठ्ठा, मसालेभात नै त साधा भात अन चुलीवरच शिजलेल वरण..बुंदी..क्या याद दिला दी आपने..
इकड एक त मठ्ठा माहित नाई नै त कैतरी भलतच बनवते वाट्टे.. आप्ल्याकडं आंबट दह्याच्या ताकात उल्लीस मिठ, साखर, कुटलेल जिरं, सांभार अन हिरवी मिरची असते..इथ एक त दही आंबट भेटण्याची मारामार त्यात निर्रा सांभार अन जिरं टाकून देते..काय राजेहो पण लय्यच पांचट लागते थे..

भारी आठवणी! मस्त धागा पळतोय.
तायांनो, खस्ता चाट हे वेगळंच अकोल्यातलं. वर सोन्याबापूंच्या लिंकमधला फोटोय तसं रॉ मटेरिअल दिसतं.

मी जाणारेय सप्टेंबरमध्ये अकोल्याला. पापु अन चाट होईलच. बाकी पाहू कितपत जमेल तर.

रच्याकने, गांधी चौकातल्या चौपाटीवरच्या आठवणी नाहीत का? तिथे माता मंदिराच्या मागे ही चौपाटी आहे.
साबुदाणा वडे + अफलातून चटणी; रगडा पॅटीस (इथे रगडा म्हणून छोले असतात), त्याच्याच अजूबाजूला पावभाजी, पाणीपुरी, खस्ता, भेळ ... तोंड हुळहुळलं की वानखडेंच्या आईसक्रीम पार्लर मध्ये तर्‍हेतर्‍हेचे आईसक्रिम्स; गुलकंद, कॉफी, सिताफळ, आंबा, केशर, पिस्ता भरपूर व्हेरायटी. पोट गच्च!!!

टीना और सोन्याबापू तो छा गये है Happy

सोन्याबापू, एकावेळी एका माणसाला ८ मिर्च्या??????? मी २ दिवसात मरून जाईन.

विदर्भात पाणी जड असतं का? शेगावला नेहमी पाणी प्यायचा प्रॉब्लेम होतो.

हल्ली शेगाव कचोरी ह्या नावानी अनेक गाड्या दुकाने दिसतात पण खरी शेगाव कचोरी ती शेगावलाच मिळते. अगदी ठासून सारण भरलेली. बशी इतकी मोठी. चापट. खुसखुशीत.

नाही हो शेगावात असेल त्रास तसा तिथे सरकारी सप्लाई नाही न संस्थानाचे आपले खासगी हाईड्रेन्ट आहेत

त्यातही पिवळ्यारंगाची मोहरी दिसणारी भाजी म्हणजे बामनाचा मामला अस म्हणतात..<<
हे असलं जातीय लिहिलेलं चालतं का आपापल्या खाद्य अस्मितेच्या नावावर? बर.

सांभार म्हणजे काय टिना?

केश्वे, विदर्भात मुळात पाणी आहे हेच महत्त्वाचं. जड, हलकं हे नंतरचे प्रश्न. आतासुद्धा अकोल्याला दर ५/७ दिवसांनी पाणी येतं.

सोन्याबापु,
तुम्ही माबोकरांची एक अकोला खादाडी टुर काढा.
एक एका पदार्थाचे नाव आणि वर्णन वाचचुन कधी तो पदार्थ स्वाहा करतोय असे झालेय.

गांधी चौकातल्या चौपाटीवरच्या आठवणी नाहीत का

साबुदाना वड़े आता शिफ्ट झाले नक्षत्र कॉम्पलेक्स समोर जठारपेठेत (कारागिर तोच आहे अजुन) बाकी त्या चौपाटी वर दीपिका कोल्डड्रिंक्स चे बदाम शेक !!! भाऊ १५०₹ चा एक ग्लास देईल पण असले देईल की एक ग्लास घट्ट शेक प्यायले की किमान ६ तास भुक लागणार नाही !!! तशीच आनंद ची प्लेन लस्सी पिस्ता फ्लेवर आइसक्रीम घातलेली!!!

टीना,

तुम्हाले टाइम आसन अन साधत आसन तर एक खेप ते आलू वांगे तर्री ची रेसिपी टाकसान अटिसा !! मले सारे ज्यमते फ़क्त लेकाची तर्री मोड़ते मायी ! तितकी यक रेसिपी देसान जमन तशी!

अरे नका ..
माझा लिहिण्याचा हेतु स्वच्छ होता.. इकडे जस तिखट खातात तेवढ तिखट विदर्भात हेच खातात सहसा म्हणुन तिथे अस म्हटल्या जात बाकी कुणाला दुखावण्याचा वगैरे अज्जिब्बात हेतु नव्हता..
हव तर मी पोस्ट संपादित करते..
मला भांडण सुरु व्हायची जाम भिती वाटते म्हणुन..

सांभार म्हणजे कोथिंबीर..

हे असलं जातीय लिहिलेलं चालतं का आपापल्या खाद्य अस्मितेच्या नावावर? बर.

अहो इतक्या टोकदार जाज्वल्य वगैरे भावना नसतात ग्रामीण भागात वाटल्या तरी! (निदान आमच्याकडे तरी) हे वैदर्भीय डेली विनोद आहेत असलेच रांगडे असतात

ओ सोन्याबापू,
तुमी ८५शीचे त मी ८९ची..मायी वाली मोटी ताई हाये तुमच्यायवडी जिले मी नावान हाक मारतो..
तेवड आमी तुमी राहुद्या मंग टाकीन मी रेसिपी का काय थे..लहान हाये वो मी अजुन..

बर फक्त बामनं म्हणलं की विनोदी म्हणून घ्यायचं. इतर जातीचे नाव टाकले की जातीय अस्मिता दुखावली जाते. बर.
असो.
अ‍ॅटलिस्ट चुकीचे आहे त्याचे समर्थन तरी नको.

आसाना का बापा!!

बाई मानसाले इज्ज़ती न बलवा लागते न! मह्या उस्तादजी न शिकोले मले तसे!! तुम्ही नोका टेंशन घेजा! तितके तर्री चे पायसान नेमक्या फ़क्त!!!

मी नाही बा शाकाहारी!! मी सर्वाहारी हाओ!! (तितर ते घोरपड़ सबकुछ) आता हे रेसिपी देतो बायकोले! नाही तर सरप्राइज बनोतो तिच्या साठी! लै दिवस झाले किचन मधे हात सप्पा केला नाही !!

रेसिपी बुकमार्क केली ओ माय!

Pages