अकोल्यातील खादाडी

Submitted by हर्ट on 27 May, 2009 - 09:41

अकोल्यातील खादाडीबद्दल मी इथे लवकरचं लिहिणार आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजमलाई चॉकलेट्सची भेट >> आता ते चॉकलेट्स तेवढे छान नाही राहिलेत. मी इकडे माबोवर वाचुनच वर्ध्याहुन मागवले होते. Sad

अकोल्यातली खादाडी ची ठिकाणे!!! वॉव! माय टाउन!!
अ. नाश्ता
१. सातव चौकात राज्याचे पोहे
२ जुन्या इनकमटॅक्स ऑफिस जवळ गजु भाऊ चे पोहे
३ टिळक रोड च्या स्टार्टिंग ला नुक्कड़ कचोरी कॉर्नर
४ शालिनी टॉकीज पुढे श्रीराम चा वडापाव
५ लोखंडी पुला पलीकडे राजस्थान दही बड़ा हाउस
६ राठी जी कडे समोसे अन कचोरी
७ आनंद रेस्टोरेंट चा मसाला डोसा
८ गुजराती स्वीट्स कड़े खमण ढोकला
९ राधास्वामी वाल्याचा चिवड़ा कलाकंद अन पालक भजे अन मुंगवड़े
१० फ्रेश फ्लेवर च वेज बर्गर
११ हॉटेल अल फारुख नगीना मस्जिद जवळ इथले चिकन पकोड़े

जेवण
१ राठी रेस्टोरेंट (समोस्या इतकी चांगली क्वालिटी नाही)
२ बशीर भाई पातुर रोड, सर्वोत्तम नॉन वेज खास करून वर्हाड़ी रस्सा अन काटेपूर्णा प्रकल्पातल्या टाइगर प्रॉन
३ कलकत्ता ढाबा , प्रचंड मोठे पोरशन्स इतके की एक दाल मखनी मधे ३ तगड़ी जवान पोरे जेवून थकतील ह्याच्याकडली शेवभाजी म्हणजे हाहाकारी तूफ़ान असते
४ राजहंस ढाबा, अकोल्याच्या इंजीनियरिंग कॉलेज जवळ आहे हा ढाबा बाभुळगावात, तूफ़ान नॉनवेज अन तंदूरी चिकन च्या मसाल्यात घोळलेले चना फ्राई
५ मॅडम गार्डन ढाबा "वेज अंडाकरी" साठी प्रसिद्ध (एक मोठा बटाटा उकडून त्याच्या मधला गर काढ़तात कोरून त्यात हळद घालून एग योक तयार करतात अन हे "अंडे" मैद्यात् घोळुन तळतात अन ग्रेवी मधे शिजवतात)
६ जैन भोजनालय रेलवे स्टेशन अकोला , इथे मिळतो तसला दालतड़का अख्ख्या ब्रह्मांडात मिळणार नाही ही आमची गारंटी आहे
७ वजीफदार पेट्रोलपंप चौपाटी , इथे सैंडविच ते कबाब अन पावभाजी ते फालूदा सगळे उत्तम
८ आनंद ची भारतीय थाळी
९ आशीष हॉटेल ला नॉन वेज
१० शिवनेरी ढाब्याचा मटन रस्सा

मीसुद्धा यातल्या निम्म्याअधिक ठिकाणी गेलेलो नाही.
महाराष्ट्र कन्याशाळेसमोर एक नवीन ढाबा सुरू झाला आहे. तिथलं पंजाबी पद्धतीचं जेवण मस्त असतं.

<<६ जैन भोजनालय रेलवे स्टेशन अकोला , इथे मिळतो तसला दालतड़का अख्ख्या ब्रह्मांडात मिळणार नाही ही आमची गारंटी आहे>>

----- महाराष्ट्र स्टोअर्सच्या शेजारी आहे का?

वाघमारे सर माफ़ी !!! फारच मोठा गुन्हा झाला!!!

मधु रेस्टोरेंट सिविल लाइन्स चौक दुनियेत सर्वाधिक बेस्ट गिल्ली मिसळ अन रस्सा आलू बोंडे, कलाकंद, तर्री भजे!!

बाकी,

वाघमारे सर मधु न क्वांटिटी कमी केली (किंमत बरीच कमी आहे अजुन) त्याला कम्पटीशन म्हणुन रतनलाल प्लॉट्स चौकात श्रीगणेश ऊघडले आहे ते निव्वळ तुफान आहे!! क्वांटिटी अन क्वालिटी एकदम मस्त!! इतके तुफान चालते की त्याने त्या आलू बोंडे अन तर्री च्या जोरावर आज पालिका मार्किट च्या खड्यात असलेले उत्तम डोसा चालवायला घेतले आहे

योकु अन चिनुक्स ,

आम्ही बहुतेक ठिकाणी गेलो आहे कारण मित्र परिवार अफाट आहे आमचा पोट्टे शोधतात स्पॉट अन "चला भाऊ जा लागते" इतकी ऑर्डर सोडतात फ़क्त !!

कन्याशाळे समोर मी नाही गेलेलो आजवर (तो पुर्ण प्लॉट एका सिविल कॉन्ट्रैक्टर सरदारजी चा होता असे ऐकले होते)

अजुन काही काही वैयक्तिक श्रद्धास्थाने बंद पडली आमची उदा गोविंदा भोजनालय रेलवे स्टेशन अकोला हा इसम चीज़ बटर मसाला मधे अख्खे चंक्स घालत असे चीज़ चे भरपुर सारे,

वरील ठिकाणात स्टेशन ला मारवाड़ी धर्मशाळा शेजारी असलेले लोकप्रिय नावाचे पण दिसायला भयानक गचाळ रेस्टोरेंट सुटले आहे, तो गड़ी रस्सा समोसा मस्त देतो एकदम

वाघमारे सर?
कायले एवढ्या लौकर बुढे करून र्‍हायले मले राजेहो..

आता पंधरा ऑगस्ट जवळ येऊन राहिली म्हणून आठवलं...पूर्वी शाळेतअसताना पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आमचे बाबा आम्हाला स्पेशल भजे खायला घेऊन जायचे. तेव्हा समोसे कचोरी काय रोज खायच्या गोष्टी नव्हत्या. भेळ आणि खस्ता खायला आम्ही वसंत टॉकीजसमोर जात असू. अकोला सोडल्यापासून पुण्यात आल्यावर आमच्या खायच्या खस्ता खाणं बंद होऊन भलत्याच खस्ता खाव्या लागल्या. आता मात्र पुण्याहून पलायन करून विदर्भात परत आल्यावर 'अच्छे दिन' आले आहेत.

जवाहर नगरच्या चौकात एक 'खिलोसिया'चं हॉटेल होतं. तिथे आम्ही नेहमी भजे खात असू. ते बंद पडूनही आता बरीच वर्षे झाली.

आता अकोला ही ट्यूशन, दवाखाने आणि पाणीपुरी इकॉनॉमी झाली आहे.

दिवसाढवळ्या फुगे खायची वाईट सवय पोट्ट्यापाट्ट्यांना लागली आहे.

आणि हा खादाडी हा शब्द काही बरोबर वाटत नाही. परका वाटतो. त्यापेक्षा 'खायगोबरेपणा' बरोबर बसला असता. पण कुणाला समजला नसता.असो.

पुण्यात मी राहायला गेलो ते फुगे खाणे सुटलेच !! एकदा गेलो हिंमत करून तर एकाच फुग्यात गणित हुकले सायचे!! मरो म्हणले बापा फुगे!! कहर तर आमच्या एका मित्राने केला तो गडी अस्सल गावठी आपला डोंगरगावचा आपल्या त्याले आम्ही नेले बा तर तो म्हणे फुगे खायचे ! आम्ही गंमत म्हणुन त्याला एक पुणेरी पाणीपुरी सेंटर वर नेले तिथले ते रगड़ा घातलेला एक फुगा तोंडात गेल्याबरोबर आमचा गड़ी त्या माणसाला म्हणाला

"भाऊ फुग्यात आलू घालसान ते वरण नोका घालजा" राहिली पाणीपुरी बाजुला पोट्टे पडू पडू हसत निरा म्याटावानी

खस्ता एकदा जळगावात बघितला होता. बरा होता.

सोन्याबापू,
तो कन्याशाळेसमोरचा धाबा त्याच व्यक्तीचा आहे. त्या स्टेशनाजवळच्या भोजनालयातून माझा भाऊ पनीर बटर मसाला आणायचा. ते बंद पडलेलं माहीत नव्हतं. शेगावच्या भक्तनिवास क्र. ५च्या शेजारी, त्याच संकुलात एक हॉटेल आहे. तिथला पनीर बटर मसाला जबरी असतो. पूर्वी देहलीवाल्याकडचं जेवणही चांगलं असायचं.

तुमच्या गप्पा वाचायला मजा येते. मी खवय्य्या नाही. त्यामुळे आमच्या गावातल्या खादाडीबद्दल कुणी विचारलं तर फारसं सांगता येणार नाही. मात्र इथल्या गप्पा वाचताना (तसेच इतर गावच्या बाफंवरसुद्धा) असे वाटते की जगात किती गावे, शहरे, तिथल्या गल्ल्या, माणसे, विषय, दुकाने! आपण किती कमी हिस्सा बघतो जगाचा.

"भाऊ फुग्यात आलू घालसान ते वरण नोका घालजा" राहिली पाणीपुरी बाजुला पोट्टे पडू पडू हसत निरा म्याटावानी >>> Biggrin

हे मात्र खरं, इकडे पुण्या-मुंबईत पाणीपुरीमध्ये तो रगडा घालून मूळ पाणीपुरीची चवच घालवतात. मला अशी पाणीपुरी अजिबातच आवडत नाही. आणि अकोल्यातच बेस्ट पाणीपुरी मिळते हे मी नम्रपणे ठणकावून सांगतो Wink

चिनूक्स भाऊ,

सनातनी इटरी मधे बाहेती साइकल्स च्या बाजुला असलेले अलबेला विसरून चालणार नाही अन अस्सल देसी घी मधल्या जलेबी साठी खत्री रिफ्रेशमेंट , ओल्ड कॉटन मार्केट, ह्या खत्री चा जो आजोबा होता तो २०१० मधे वारला ह्याची खासियत म्हणजे हा काउंटर वर बसुन ग्राहकाला शिव्या देत असे!! फ़क्त त्याच्या जिलेबी ला तोड़ नसे/नाही बॉस!

टण्या,

गाव म्हणले की माझ्यासारख्याची हळवी तार छेड़ली जाते, आयुष्याची २४ सोनेरी वर्षे घालवलेली जागा राव, त्यात नॉर्थ अन साउथ इंडियन इफ़ेक्ट चा सुवर्णमध्य संस्कृती मधे, भरभरून बोलावे वाटते , बोलले जाते आफ्टर ऑल जननी जन्मभूमिश्च _/\_

हो, अलबेला. त्यांचा मलई कोफ्ता म्हणजे बटाटा कोरून आत पनीर आणि चीज भरलेलं असायचं, पण तेव्हा ते खूप आवडायचं.

खानदेश डेअरीतल्यासारखं श्रीखंडही कुठे मिळत नाही. यवतमाळच्या रानड्यांकडचं श्रीखंड मस्त असतं.

योकु,
स्टेट बँकेच्या रामदासपेठ शाखेशेजारी असलेल्या एका दुकानात खस्ता, भेळ, पाणीपुरी मस्त मिळतात. कधी गेलास तर खाऊन ये. (अग्रवाल नव्हे).

काय पण म्हणा .. ... पुण्यात धड पाणीपुरी खायला मिळत नाही ... हे सार्वमत आहे! पाणीपुरीतर आहेच, त्याशिवाय आलू पोंगे हा पण एक जबराट अकोले प्रकार खाल्ला यंदाच्या ट्रीपमध्ये.

राठी ची कचोरी सुद्धा उत्तम असते, त्याचा USP आहे त्याची चटणी, केशरी भगव्या रंगाची असते, ती बनवतात कसली देव जाणे पण गोडसर असते चवीला मधेच तिखट ठसका देते! भारी प्रकरण!!

पाणीपुरी साठी अजुन एक भारी ठिकाण म्हणजे कलेक्टर ऑफिस शेजारी अन झेडपी / पंचायत समिती जवळ असलेला पाटिल चना चिवड़ा भेळ वाला दोन भाऊ दोन जागी, भेळ अन खस्ता एक नंबर देतात, अकोल्यात खस्ता तयार करायची एक भारी रीत आहे तळलेला खस्ता पहिले चिंचेच्या खटाई मधे बुडवतात मग त्यावर उकडलेला बटाटा लावतात दाबून मग परत खटाई बाथ वरतुन दही कांदा टोमॅटो शेव मसाले चाट मसाला काळे मीठ थोड़े लिंबु पिळुन झकास मामला तयार!!!

Happy

आम्ही आता गाव फ़क्त वर्षात एकदा १५ दिवस पाहतो, तस्मात आमची अवस्था मक्के बाहेर राहणाऱ्या खास्या धार्मिक खांसाहेबांसारखी आहे! बहुतेकवेळी बांग सुद्धा जोरातच दिली जाते!!

अकोला किंवा जनरल वर्‍हाडप्रांती सरमिसळ संस्कृती आहे भारताचे ह्रदय आहे ते! पिढ्यांनपिढ्या वसलेले सर्वभाषिक लोक आहेत (मारवाड़ी,गुजराती,सिंधी, तेलुगु, बंगाली, तमिळ) तितका इफ़ेक्ट खाण्यात रिफ्लेक्ट होतोच, ग्रामीण भागात अस्सल वर्हाड़ी ठसका जेवण सुद्धा आहेच! नॉस्टॅल्जिक होतोय दर वेळी हा धागा उघडला की मी !!

मला अकोल्यातील उसाचा रस फार आवडतो आणि तसा रस इतर कुठे मला मिळत नाही. बहुतेक हा फरक उसामुळे असेल.

मला अकोल्यातील टॉवरजवळाचा भाजीबाहार आवडतो. इतका सुंदर बाजर इतर कुठल्याचा गावा शहरात पाहिला नाही. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत फक्त ताज्या आणि वैविध्यपुर्ण भाज्या असतात. फळे त्या तुलनेनी इतकी छान नाही मिळत.

बाकी अकोला काहीच बदलले नाही. आहे तसेच आहे. रस्ते फार खराब आहे. आणि स्वच्छताही फार चांगली नाही. त्यातुलनेने अमरावती केवढे तरी सुंदर रमणीय शहर वाटते.

Pages