BLS /USPS ने पासपोर्ट हरवला आहे...

Submitted by sneha1 on 6 August, 2015 - 16:12

नमस्कार,
मी काही दिवसांपूर्वी ह्यूस्टन येथील BLS ला पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन पाठवली होती. १५ जुलै ला त्यांनी तो डिस्पॅच केल्याचे सांगितले. USPS वर ट्रॅकिंग दिसत नव्हते, not found असा मेसेज येत होता..अजूनही पासपोर्ट मिळाला नाही. BLS /USPS दोन्हीकडे फोन झालेत, अगदी भरपूर..BLS च म्हणणे आहे की आम्ही पाठवला, USPS वाले म्हणतात की आमच्याकडे आलाच नाही..आता BLS वाले म्हणतात की आम्ही USPS कडे investigation initiate करू पण त्यात काही निघाले नाही तर तुम्हाला पुन्हा हरवलेल्या पासपोर्ट साठी अप्लाय करावे लागेल, पोलिस कंप्लेंट पण करावी लागेल. मी consulate general ,passport officer सगळ्यांना मेल केली आहे. काही आशादायी उत्तर नाही, passport officer पुढे काय करायचे ते सांगेल म्हणे! त्याची मेल येईपर्यंत इथे कोणी काही सल्ले देऊ शकेल का प्लीज?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला काही सांगता येणार नाही पण अजुनही काही लोकांचा पासपोर्ट गहाळ झाला आहे वाटते ह्युस्टन हून. मला २ दिवसांपुर्वी इमेल आला होता विचारायला की चुकून मला मिळाला का म्हणून.

सध्या तरी तुमच्या हातात काही नाही त्यामु़ळे घाबरून जाऊ नका अगदी. तुम्ही कंप्लेंट केली आहे त्यामुळे ते आता नविन पासपोर्ट देतील तुम्हाला. फक्त अजुन थोडा त्रास होईल. जो पर्यंत इकडे आहात तो पर्यंत तरी काही प्रॉब्लेम्स यायला नकोत. जर देशातून बाहेर जयचे असेल लगेच तर मात्र धावपळ करावी लागेल.

अगदीच जर घाई असेल तर परराष्ट्र मंत्रालयाला ट्वीट करा.

तुम्ही सरळ इंडियन एंबसी ला फोन करून कळवा, जर का खूप घाई असेल तर, परराष्ट्रा मंत्रालाया ला कळवुन टाका..