मायबोलीवरचे साहित्य इतरत्र प्रकाशित करता येईल का?

Submitted by webmaster on 4 May, 2008 - 01:41

काही अपवाद वगळता, मायबोलीवर लिहिलेल्या लेखनाचे पूर्ण मालकीहक्क ते लेखन/कलाकृती करणार्‍या साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील. मायबोलीवर लेखन करून तुम्ही मायबोली प्रशासनाला maayboli.com वर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.inc ला त्या लेखनाचा/कलाकृतीचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.

याचा अर्थः

* लेखनाचे पूर्ण मालकीहक्क लेखकाचे असतील व लेखक ते लेखन्/कलाकृती इतरत्र प्रसिद्ध करु अथवा वैयक्तिक आर्थिक नफ्यासाठी विकू शकतात. त्यासाठी मायबोलीची पूर्वपरवानगी घ्यायची आवश्यकता नाही.

* परंतु मायबोली प्रशासन ते लेखन/कलाकृती मायबोलीवर अथवा मायबोलीशी संबंधीत इतर वेबसाईट किंवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना)

* भविष्यात ते लेखन मायबोलीवरुन अथवा इतर माध्यमांमधून काढून टाकावे असे तुम्हाला वाटले तरी मायबोली तसे करण्यासाठी बांधिल राहणार नाही. (कायमस्वरुपी परवाना)

* तुम्ही तुमचे लेखन्/कलाकृती इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ते लेखन मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना)

मालकी हक्क लेखकाकडेच असल्यामुळे, लेखकाच्या परवानगीशिवाय इतर कुणाला, मायबोलीवर प्रसिद्ध झालेले लिखाण, इतरत्र प्रकाशित करता येणार नाही.

यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया support at maayboli dot com येथे ईमेलद्वारे संपर्क साधावा. धन्यवाद.

अपवादः
१. "संवाद" या खास मायबोलीसाठी असलेल्या लेखन विभागाचे पूर्ण हक्क मायबोलीकडे आहेत आणि मायबोलीच्या परवानगीशिवाय ते इतरत्र वापरता येणार नाही.

Copyright remains with respective author and artists. But by submitting your work, you are giving unlimited, perpetual and irrevocable license to maayboli to publish on maayboli.com or where ever maayboli.inc wants to use it in any media.

What it means:
* The copyright and ownership remains with author / artist and they can use it however they want such as sell, publish their work etc.
* The Author/artist has given the license to maayboli to publish on maayboli or any affiliated site or any other media such as PDF, CD etc in future. (unlimited)
* Maayboli is not obligated to remove the work from maayboli or other media if author wants in future. (perpetual)
* If author sells his/her copyright to a new owner, the new owner can not ask maayboli to remove the work from maayboli. (irrevocable)

Since copyright belongs to original author, nobody is allowed to re-publish (previously work on maayboli) without author's permission

Exception:
1. Copyrights of all work published under "sanvad" belongs to maayboli.

<<>>>मालकी हक्क लेखकाकडेच असल्यामुळे, लेखकाच्या परवानगीशिवाय इतर कुणाला, मायबोलीवर प्रसिद्ध झालेले लिखाण, इतरत्र प्रकाशित करता येणार नाही.<<<

ह्यात इतर कुणाला ह्या शब्दप्रयोगापुढे 'अगदी मायबोलीलाही' असे असायला हवे होते बहुधा. >>>

अगदी अगदी भुषणजी. सहमत आहे. तो शेवटचा 'बहुधा' काढून टाकला तरी चालेल Happy

मला वाटते खालील दोन मुद्दे आहेत त्यापेक्षा थोडेसे जास्तच जाचक वाटतात.

* भविष्यात ते लेखन मायबोलीवरुन अथवा इतर माध्यमांमधून काढून टाकावे असे तुम्हाला वाटले तरी मायबोली तसे करण्यासाठी बांधिल राहणार नाही. (कायमस्वरुपी परवाना)

वरील वाक्यात बांधील हा शब्द महत्वाचा आहे. मायबोली लिखाण काढून टाकणार नाही असे लिहिलेले नाही. एखाद्याने आपण लिहिलेला लेख अप्रकशित करावा अशी विनंती केला तर मायबोली ते करतेच. बांधील नसणे हा शब्द केवळ मायबोलीची कटकट कमी करण्यासाठी असावा. काही तांत्रिक कारणाने हे शक्य झाले नाही किंवा ते वेळेत शक्य झाले नाही किंवा ते लेखन काढूनही cache मध्ये दिसत असेल तर ती चूक मायबोलीची नाही.

* तुम्ही तुमचे लेखन्/कलाकृती इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ते लेखन मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना)

हेही थोडेसे जाचक वाटत असले तरी योग्यच आहे. समजा तुम्ही ही कलाकृती विकली आहे असा दावा करून एखाद्या प्रकाशकाने तुमच्या अपरोक्ष ते लेखन मायबोली वरून काढून टाकावे अशी विनंती केली तर ते तुम्ही खरेच विकले आहे कि नाही हे तपासून पहाण्याची जबाबदारी कोणाची ? ती कलाकृती विकली आहे कि नाही यावरून तुमचे आणी त्या प्रकाशकाचे भांडण झाले तर मायबोलीने कुणाची बाजू घ्यावी ? आणी अशा प्रसंगासाठी सर्व देशात एकेक वकील पैसे देऊन नेमावेत का ? या सार्‍या सव्यपसव्यापेक्षा तुम्ही एकदा लेखन विकले की तुम्हीच विनंती करून ते लेखन काढून टाकावा. खरे तर हा नियम लेखकाच्या फायद्याचाच आहे. लेखन विकले आही कि नाही यावर लेखकाचा शब्द अंतीम असणे लेखकाच्या फायद्याचेच नाही का?

वि सू : मी एक सामान्य सदस्य आहे. प्रशासक नाही किंवा प्रशानाशी दोरूनही संबंधीत नाही. मला जे वाटले ते लिहिले इतकेच.

>>>जर एखाद्याचा आयडी उडवला गेला तर तो/ती स्वतःचे लिखाण कसे उडवणार वा संपादित करणार<<<

माफ करा, हा प्रश्न कोणाला उद्देशून असावा हे लक्षात येत नाही आहे. प्रशासन तर म्हणत आहे की सक्रीय असलेल्या सदस्याचेही लेखन उडवणार नाही. (सदस्य ते संपादीत व अप्रत्यक्षपणे अप्रकाशित करू शकतो ते वेगळे).

जिथे सक्रीय सदस्याचेच लेखन उडवणार नाही आहेत तिथे उडालेल्या आय डी चे का करतील?

माझ्या https://www.maayboli.com/node/33570 या लेखातील मजकूर तोडून ८-१० नवीन धागे केलेे दिसताहेत। तेही माझे नाव न लिहिता? प्रत्याधिकार अधिकार मायबोली ॲडमिन टिमच तोडणार का?

म्हणजे कोणाला वाटू शकतं की त्यात काय। यादीतर आहे। पण तो एकत्रित लेख भरपूर कष्ट करून लिहिलेला
आणि मुळात एक ओळ काय नुसतं नावही प्रत्याधिकारात येतंच। याबाबत ॲडमिनचे मत वाचायला नक्की आवडेल।

>>>* परंतु मायबोली प्रशासन ते लेखन/कलाकृती मायबोलीवर अथवा मायबोलीशी संबंधीत इतर वेबसाईट किंवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना)<<<

हे जरी असले तरी लेखकाचे नाव न देता मायबोली वापरणार का इथल्या लेखकांचे लेखन? तसा अधिकार असतो???

Pages