ब्रिटिश राज आणि नुकसानभरपाई

Submitted by Mandar Katre on 24 July, 2015 - 06:41

http://www.bbc.com/news/world-asia-india-33618621?ocid=fbindia

नुकतेच माजी परदेशमंत्री शशी थरूर यांनी ब्रिटन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात ब्रिटन कडून त्यांच्या सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . त्याबद्दल संपूर्ण देशात थरूरजी यांचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थरूर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजतागायत कोणी हा मुद्दा उचलून धरला होता का? इथे तर अशी परिस्थिति आहे की ब्रिटीशांनीच भारताचे कल्याण केले ,विकास घडवला , रेल्वे /पोस्ट /तार आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान आणून पुराणकथात रमणार्या भारतीय /हिंदू समाजाचा उद्धार (?) केला अशी मते बाळगणारे आणि व्यक्त करणारे लोकही आज भारतात सापडतात , त्यांना सणसणीत चपराक हाणत शशी थरूर यांनी ब्रिटीशांनी भारताला किती व कसे लुटले? भारतीय सैनिकांचा वापर करून पहिले व दुसरे महायुद्ध जिंकताना भारताच्या हाती मात्र धुपाटणेच कसे आले ?बंगाल मध्ये 1943 साली पाडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी ब्रिटिश सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, जालियानवाला बागेत क्रौर्या ची परिसीमा गाठणारे अमानुष हत्याकांड याचा समग्र ऊहापोह थरूर यांनी केला . ब्रिटिश येण्यापूर्वी जगाच्या व्यापारातील भारताचा हिस्सा 24% होता ,परंतु 1947 साली तो हिस्सा फक्त 4% राहिला होता. देशी उद्योगधंद्याना पद्धतशीरपणे मारून टाकायचे, भारतीय कच्चा माल स्वस्त दरात विकत घेवून ब्रिटनमध्ये त्यावर प्रक्रिया करून पुन्हा चढया दराने भारतात आणि जगात विकायचा ,असा अव्यापारेषू व्यापार ब्रिटीशांनी केला . या आणि आशा अनेक "गुन्ह्यांसाठी" ब्रिटन जबाबदार असून त्याची जबाबदारी ब्रिटनला टाळता येणार नाही ! त्याचबरोबर भारतातून “चोरलेला” कोहिनूर हिरा त्वरित भारतास परत करावा आणि ब्रिटिश सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची ,अशी रास्त मागणीही केली .

परखड मत व्यक्त करून खर्या इतिहासाची जाणीव ब्रिटीशांना ,जगाला आणि भारतीयांनादेखील करून दिल्याबद्दल शशी थरूर यांचे (ते कोंग्रेसवासी असूनही ) माझ्याकडून जाहीर आभार व अभिनंदन !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स, तुमच्याकडून अशा लेखाचा केवळ दुवा अपेक्षित नाही. त्यासंबंधी तुमची स्वत:ची मते देखील द्यावीत, अशी अपेक्षा आहे.
------ सहमत....

निव्वळ पैशासाठी सैन्य लढत होते हे पुर्ण असत्य पण नाही... तसेही होत होतेच... देशाचे सोडा मराठ्यान्चा इतिहास बघितल्यास अनेक उदा मिळतील. सम्भाजी राजे कसे, कुणामुळे आणि का पकडले गेलेत? सन्ताजी धनाजी या दोन शुर सरदारा चा अन्त कसा झाला ? मला नाही मिळाले तरी चालेल पण तुम्हालाही नको मिळायला मग या मारामारित तिसर्‍याचा (इन्ग्रजान्चा) फायदा झाला तरी चालेल.
याच मानसिकते मधुन असे लेख येतात.

जालियनवाला बागेत गोळ्या झाडणारे पोलिस, सैन्य कोण होते या पेक्षा देणारे ORDER देणारे कोण होते हे महत्वाचे आहे. २५००० हजारान्च्या निशस्त्र जनता-समुहावर गोळीबार केला गेला, गोळ्या सम्पल्यावरच नर सन्हार थन्डावला.... येथे गोळीबार करणारे गुरका, बलुच होते हे महत्वाचे नाही आहे, ऑर्डर देणारे कोण होते ?

मला थरुरान्चे उत्कृष्ट भाषण आणि त्यात ले सन्देश पुन्हा बघावा असाच वाटले. Happy

महाराष्ट्र राज्य निर्मिती च्या वेळी १०५ लोक शहिद झालेत (हुतात्मा चौक), गोळीबार करणारे पोलिस भारताचे नागरिक, महाराष्ट्रिय होते.... पण अपश्रेय देताना त्या काळात गृहमन्त्री पदी असणार्‍या मोरारजी देसाईन्ना देतो. जे योग्य आहे. निशस्त्र जमाव आणि शुट अ‍ॅट साईट... अशी ऑर्डर होती. Sad

तेव्हा गेली दिडशे वर्षे काय झोपा काढत होतात का वगैरे मुद्दे गैरलागू आहेत.

बरोबर आहे. माझे चुकले.

जिसकी लाठी उसकी भैस.........मग आज भारताला ब्रिटनला जाब विचारण्याचा पुरेपूर हक्क आहे. आणि तो त्यांनी वसूल करावा, सव्याज.
मला साधारणपणे असेच लिहायचे होते. पण माझ्या मनात कायम एक कल्पना घट्ट बसली आहे ती म्हणजे आपल्या लोकांनी पूर्वी एकत्र न येण्यात व परकीयांना मदत करण्यात चूक केली नि त्याचा विषाद मनातून जात नाही.
तसे पाहिले तर मुसलमान प्रथम आले ते परकेच होते, पण तेहि आपल्याविरुद्ध जिंकले कारण आपली एकी नाही. आता मुसलमान हि भारतीयच असे आपण म्हणू लाङलो आहोत. समजा ब्रिटीश पण परत न जाता इथेच राहिले असते नि फक्त राज्य आपल्याला दिले असते तर असेहि म्हणता येईल की ते पण आपलेच.
नि मुसलमान, ब्रिटिश काय, हे विश्वची माझे घर नि वसुधैव कुटुंबकम म्हंटल्यावर (नि त्यावर माझा विश्वास आहे) तेहि आपलेच.

आज सगळे मानव समान मानले जातात. हा तुमचा गोड समज आहे. तसे काही नाही.
तुमच्या पेक्षा जास्त बलवान किंवा हुषार भावाने किंवा मित्राने तुमच्या वाट्याचा लाडू आधीच पळवला एक दोन तुकडे खाऊन टाकले, तर उरलेल्या लाडू मिळवण्याइतके सामर्थ्य किंवा हुषारी तुमच्यात असेल तर वाटल्यास तुम्ही ते तुकडे आणि त्याच्या वाटणीचा लाडू पण पळवा!!

आज सगळे मानव समान मानले जातात. हा तुमचा गोड समज आहे. तसे काही नाही.
तुमच्या पेक्षा जास्त बलवान किंवा हुषार भावाने किंवा मित्राने तुमच्या वाट्याचा लाडू आधीच पळवला एक दोन तुकडे खाऊन टाकले, तर उरलेल्या लाडू मिळवण्याइतके सामर्थ्य किंवा हुषारी तुमच्यात असेल तर वाटल्यास तुम्ही ते तुकडे आणि त्याच्या वाटणीचा लाडू पण पळवा!!>>>असहमत.

झक्कींचे चुकलेले प्रतिसाद फार दुर्मीळ असतात.
बेफिकीर तुम्ही फारच उदार मनाचे! दुर्मिळ वगैरे नसतात. मी भावनांच्या आहारी जाऊन लिहीतो. तसेहि डोक्यात फारसे काही उरलेच नाही.

पगारे यांच्या विधानावरील भाष्य इंटरेस्टिंग आहे. खाई त्याला खवखवते म्हणतात तसे कुणि तरी त्यांना तसाच प्रतिसाद दिला आहे.
जिसकी लाठी उसकी भैस.....आज सगळे मानव समान मानले जातात. हा तुमचा गोड समज आहे. तसे काही नाही.
या विधानांवर विश्वास असेल तर पगारेंचा प्रश्न मूट होतो.

चिनूक्स, वाचला ब्लॉग. काही सहमत होण्यासारखी वाक्ये, काही अचाट क्लेम्स व उरलेला लेख तर ब्रिटिशांनी भारतावर राज्य का केले याचे हे सहज समजण्याइतका "प्रादेशिक" भावनेतून लिहीलेला आहे.

The British didn’t come to conquer India; it was a creeping takeover facilitated and encouraged by Indians. >>> हे सर्वसाधारणपणे खरे वाटते. प्रत्येक वेळेस भारतीयांचा भरपूर सहभाग होता ब्रिटिशांच्या बाजूने.

पण

The fact is that the Indian army has historically been an army of mercenaries that became a national army overnight on August 15, 1947. It has zero history of fighting for national causes, only ever for money. Herodotus describes the clothing and weaponry of an Indian contingent in Greece hired by the Persians against the Athenians at the Battle of Plataea in 479 BC. A century later Alexander fought and massacred mercenaries in Punjab, according to Arrian. >>> हे कायच्या काय आहे. भारतीयांच्या बाजूने एकतर्फी लिहू नये, पण हे तर दुसरे टोक आहे.

>>
आज सगळे मानव समान मानले जातात. हा तुमचा गोड समज आहे. तसे काही नाही.
<<
आज जाहिररित्या ब्रिटनचा पंतप्रधान असे म्हणू शकतो का की भारतीय आणि त्यांची संस्कृती दोन्ही रानटी आहेत. चर्चिलने असे म्हटले होते. आज कुठला युरोपियन वा अमेरिकन राजकीय वजन असणारा नेता असे म्हणू शकेल का की काळ्या लोकांना मतदानाचा हक्क द्यायला नको होता? ह्याचे कारण गोर्‍या लोकांचे श्रेष्ठत्व ही संकल्पना कचर्यात गेली आहे. आणि सर्व माणसांना तत्त्वत: समान लायकीचे मानले जाऊ लागले आहे. हा गोड समज नाही. आपण डोळे उघडे ठेवलेत तर आपल्यालाही स्वच्छ दिसेल.

>>
तुमच्या पेक्षा जास्त बलवान किंवा हुषार भावाने किंवा मित्राने तुमच्या वाट्याचा लाडू आधीच पळवला एक दोन तुकडे खाऊन टाकले, तर उरलेल्या लाडू मिळवण्याइतके सामर्थ्य किंवा हुषारी तुमच्यात असेल तर वाटल्यास तुम्ही ते तुकडे आणि त्याच्या वाटणीचा लाडू पण पळवा!!
<<
बलवान भाऊ किंवा मित्र आणि लाडू ही बालिश तुलना इथे लागू होत नाही असे माझे मत. ब्रिटनकडे नुकसानभरपाई मागितली जात आहे ती उघड उघड, सगळ्या जगासमोर जाहीरपणे ठणकावून. कुठलीही चोरी नाही. सरळ सरळ हिशेब मांडून तो चुकता करण्याची मागणी केली गेली आहे.
याउलट ब्रिटनने व्यापाराच्या मिषाने चंचूप्रवेश करुन नंतर सामदामभेददंडादि सगळे प्रकार वापरुन राज्य बळकावले. आग्रहच असेल तर त्यांची ही कारवाई चोरी म्हणता येईल.

लबाड कोल्हया,

>> दमड्या दिल्या की लोक लंडनला जातात , पानिपतचं काय घेऊन बसलात !

जर एव्हढ्या दमड्या पानिपतावर मिळत होत्या तर मऱ्हाटा आणि सूरजमल्ल जाट वगळता इतर कोणीच का दिसलं नाही?

आ.न.,
-गा.पै.

>>
आज सगळे मानव समान मानले जातात. हा तुमचा गोड समज आहे. तसे काही नाही.
<<

बरोबर आहे चोर्,लबाड, आळशी, स्वार्थी नेहमी दुसर्‍याला वेड्यात काढुन त्याचा लाडु पळवतो किंवा बळाचा वापर करुन हिसकावुन घेतो.अश्यांना मानव न समजता पशु मानव समजावे .

पण सत्तेत मोदी आहेत आणि ते थरूर ह्यांना अ‍ॅप्रिशिएट करत आहेत (पण स्वतः तसे काहीच म्हणत नाही आहेत) ही एक मुत्सद्दी खेळी आहे.

>>>

याला म्हणतात "नथीतुन तीर मारणे".

छेछे! याला म्हणतात "सौंचे" काय झाले त्याबद्दल स्वपार्श्वभागास लोह-आलेपन (आयर्नप्लेटिंग युअर ओन बॅकसाईड) करणे. (अतीमराठी : कर्टसी गामा)
भाजपातली इंपोर्टेड काँग्रेसी, व घड्याळजी-तत्सम, बाहेरून बिनशर्त पाठींबावाले चौकशीभीत इ. लोक कोण? याचा लेखाजोखा मांडायचाय का इथे?

कशाला भलत्याच गोष्टीची अपेक्षा धरता?अगदी सर्व जगाने तुमचे मुद्दे मान्य केले तरी शेवटी तसे होणार नाही! ब्रिटिशांनी अजून उत्तर दिले नाही यातच काय ते समजा!

कितीहि वादविवाद केले तरी ब्रिटिश त्यांना हवे तेच करणार, फार तर थोडे पैसे फेकतील तुमच्या तोंडावर.

सर्व काश्मीर कायदेशीरपणे भारतात असायला हवे. कमी का प्रयत्न केले युनो मध्ये? मिळाले का?

खोटी कारणे सांगून बारा वर्षांपूर्वी अमेरिकेने इराकवर हल्ला केला. कित्येक निरपराध लोकांचे आयुष्य बरबाद केले. तेंव्हा सुद्धा आंतरराष्ट्रीय कायदे, न्यायालये होती. कुणाची हिंमत आहे का अजून अमेरिकेला कोर्टात खेचण्याची?

काय सांगता सर्व लोक समान च्या बाता?
बळी तो कान पिळी. तेंव्हाहि नि आताहि.

अमेरिकेने आधी स्वतःला बलवान बनवले मग गप्पा केल्या नीती, कायदा, समान हक्क वगैरेच्या. तेंव्हा भारताने गप्पा मारणे सोडून आधी बलवान बनायला पाहिजे.

लाच घेणे, पैशाची अफरातफर इ. बेकायदेशीर असून भारतातल्याच लोकांनी इतर भारतीय जनतेचे पैसे लुटले. ते तरी परत मिळवण्याची काही शक्यता, क्षमता आहे का? कुठे जगाच्या उठाठेवीत पडता?

तेंव्हा भारताने गप्पा मारणे सोडून आधी बलवान बनायला पाहिजे.
<<
कसें? तुम्ही आम्रविकेत जाऊन बलवान झालात.
भारताने आम्रिकेच्या ५३व्या* राज्याचा "दर्जा" द्या, म्हणून आप्लिकेशन द्यावें काय?
*
लाच घेणे, पैशाची अफरातफर इ. बेकायदेशीर असून भारतातल्याच लोकांनी इतर भारतीय जनतेचे पैसे लुटले. ते तरी परत मिळवण्याची काही शक्यता, क्षमता आहे का? कुठे जगाच्या उठाठेवीत पडता?
<<
झक्की,
सिरियसली. तुम्ही अमेरिकन आहात ना? मग कशाला जगाच्या अर्थात भारताच्या उठाठेवीत पडत आहात?

खाली तुमच्या एका वक्तव्याचा स्क्रीनशॉट डकवतो आहे. उगंच भारतीयांना, अर्थातच आपल्याच माहेरच्यांना डिवचायचा ***ट म्हातारचाळा बंद केलात तर बरे होईल. नाही का?

zakki2.png

जरा थंड घ्या दी मा. उपरोधानी बोलणे म्हणजे काय हे तुम्हाला नक्की माहित असेल. मी तर म्हणतो उपरोधानी नसतील बोलले त्यावेळी तरी सतत त्याच चष्म्यातून त्यांच्या विधानांकडे बघायची काय गरज आहे. आणि ह्या उपर, त्यांची भाषा पाहिलीत का? कुठेतरी संयम सुटला आहे का? तसं असताना तुम्हाला कशाला इतका त्रागा करता?
खरं तर इथे येऊन, चर्चा करुन कुठल्याच समस्या सुटत नाहीत मग इतकी आगपाखड कशाकरता? फक्त आपला मुद्दा बरोबर आहे हे सांगायला किंवा त्यांचा मुद्दा खोडायला? इथे येऊन आपल्याला बर्‍याच लोकांशी चर्चा करता येते, वेगळे विचार कळतात हा मुख्य उद्देश का विसरता? Happy

वैद्यबुवा, धन्यवाद.
पण जाऊ द्या हो! मी नेहेमीच म्हणत आलो आहे की भारतात भरपूर लोकसंख्या, भरपूर प्रमाणात विद्वान, शिकलेले, कर्तबगार लोक आहेत, त्यांना बलवान बनायला काहीच हरकत नाही नि होतीलहि.

पण काही लोक आपले दुसर्‍यांना विचारत बसतात, कसे?
शिवाय आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे ना? मग मी मा़झे मत दिले तर एव्हढे का झोंबते? मी म्हणतो ते खोटे आहे अश्या प्रकारचे मुद्दे नाहीत.
अहो, उठाठेवी करत नाहीये भारताच्या, पण तुमच्यासारखे लोक पाहिले की कुणिहि उठावे नि टिंगल करावी!

लाच लुचपत आहेच ना! मग त्याची टिंगल करायची नाही तर काय वा वा म्हणायचे?

मी २७ वर्षे भारतात होतो. मला लाचेच्या समर्थनार्थ एक दोन मुद्दे सुचतात, ते मी मांडले तर तर कदाचित बर्‍याच लोकांना पटणार नाहीत. ते ठीक आहे, पण तुम्ही कशाला उठाठेवी करता? हे उत्तर नव्हे. विशेषतः अमेरिकेत येऊन नोकर्‍या नि पैसे घेता, अमेरिकन लोक बोलणारच तुम्हाला!

शिवाय मी अनेकदा म्हंटल्याप्रमाणे अमेरिके विरुद्ध काही करण्याची कुणाची हिंमत नाही! त्यामुळे तुम्ही कितीहि म्हंटले उठाठेवी का करता? तरी आम्हाला वाटेल ते आम्ही करणारच.
तेंव्हा परत ऐका - ब्रिटन कदाचित थोडे पैसे तुमच्या तोंडावर फेकतीलहि, त्यातच तुम्ही नैतिक विजय समजा!

सीताहरणाबद्दल व शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल श्रीलंकेच्या अध्यक्षाकडून माफीनामा कधी घ्यायचा ?

शशी थरूर यांचं भाषण अप्रतिम आहे. फक्त आठ मिनिटांत.. !!
(ते आता राष्ट्रवादी झाले कि नाही ? सुनंदा थरूर प्रकरणाचं पुढे काय झालं ? हे प्रश्न इथे प्रस्तुत करावेत कि नाही ?)

ओके बुवा.
उपरोधाला हरकत नाही. थोडाफार समजतो.
फक्त, त्यांचे वारंवार "भर रस्त्यावर चड्डी काढून बसणे" प्लस वरच्या चित्रातला हायलाईटेड भाग कमालीचा सूदींग होता, म्हणून थोडी चिडचीड झाली.
यापुढे लक्ष देणार नाही.

>>>> विकृती ती हीच काय? <<<
येवढ्यात पुपुवर गेला होता काय? Proud
अहो दीमा, हे जे धडे तुम्ही देताय, ते ज्या साईटवर देताय ती साईटही अमेरिकेत अमेरिकेतल्या भारतीयांनीच चालवलेली आहे, हे लक्षात असुद्यात म्हणजे झाले. Wink

भारतात का दिसतेय ती ?
अरे देवा! अहो जगभरच्या मायबोलीच्या पाऊलखुणा जपण्यासाठी मोठ्या उदारपणे ही साईट सुरु केली. तर त्यात भारत येणारच ना!
(नसता आला तर बरे झाले असते असे आता वाटायला लागले आहे)
. स्वतः काही करायचे नाही, आयते गिळायची संधी बघायची नि वर आमचेच आहे! . आम्ही जगभरात कुठेहि जाऊ, पण आमच्या घाणेरड्या सवयी, वाईट स्वभाव याबद्दल कुणि बोलायचे नाही!
असे जगात वावरायचे तर लोक बोलतील ते ऐकून घेणे आलेच. प्रश्न असा आहे की ते ऐकून काही सुधारणा करायची की उगीचच तुम्ही बोलू नका असे म्हणणार? असे कुणाकुणाला बोलणार? असे म्हणालात म्हणून जगात तुम्हाला कुणि घाबरतील असे वाटते का? ,
स्वतःला स्व्वतःचा देश, संपत्ती जपायची अक्कल नाही, लोकांनी लुटले की रडायचे, हिंमत नाही कसलीच, नुसताच बकवास!!

झक्की,

उपरोधिक बोलायची तुम्हाला इतकी अतिरिक्त सवय झाली आहे की काही वेळा तुम्ही जी भडास काढता तिलाही तुम्ही स्वतः आणि बाकीचे उपरोध मानतात.

शिवाय मी अनेकदा म्हंटल्याप्रमाणे अमेरिके विरुद्ध काही करण्याची कुणाची हिंमत नाही! त्यामुळे तुम्ही कितीहि म्हंटले उठाठेवी का करता? तरी आम्हाला वाटेल ते आम्ही करणारच. >

मग ते चिनी हॅकिंग अ‍ॅटॅक वाल्यांना पकडायचं जरा बघा लवकर. Proud

https://www.facebook.com/Timesnow/photos/a.10151218016560311.807133.2187...

Kohinoor Diamond: India shouldn't claim the Kohinoor Diamond as it was neither stolen nor forcibly taken.

As per Culture ministry, the Kohinoor diamond was handed to the East India Company by Maharaja Ranjit Singh: Solicitor General to SC

आता प्रखर देशभक्तीने ओतप्रोत असणार्‍या महान राष्ट्रवादी सरकारनेच असे जाहीर केल्यावर भक्तांनी गुपचूप बसावे Wink

Pages