http://www.bbc.com/news/world-asia-india-33618621?ocid=fbindia
नुकतेच माजी परदेशमंत्री शशी थरूर यांनी ब्रिटन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात ब्रिटन कडून त्यांच्या सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . त्याबद्दल संपूर्ण देशात थरूरजी यांचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थरूर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजतागायत कोणी हा मुद्दा उचलून धरला होता का? इथे तर अशी परिस्थिति आहे की ब्रिटीशांनीच भारताचे कल्याण केले ,विकास घडवला , रेल्वे /पोस्ट /तार आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान आणून पुराणकथात रमणार्या भारतीय /हिंदू समाजाचा उद्धार (?) केला अशी मते बाळगणारे आणि व्यक्त करणारे लोकही आज भारतात सापडतात , त्यांना सणसणीत चपराक हाणत शशी थरूर यांनी ब्रिटीशांनी भारताला किती व कसे लुटले? भारतीय सैनिकांचा वापर करून पहिले व दुसरे महायुद्ध जिंकताना भारताच्या हाती मात्र धुपाटणेच कसे आले ?बंगाल मध्ये 1943 साली पाडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी ब्रिटिश सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, जालियानवाला बागेत क्रौर्या ची परिसीमा गाठणारे अमानुष हत्याकांड याचा समग्र ऊहापोह थरूर यांनी केला . ब्रिटिश येण्यापूर्वी जगाच्या व्यापारातील भारताचा हिस्सा 24% होता ,परंतु 1947 साली तो हिस्सा फक्त 4% राहिला होता. देशी उद्योगधंद्याना पद्धतशीरपणे मारून टाकायचे, भारतीय कच्चा माल स्वस्त दरात विकत घेवून ब्रिटनमध्ये त्यावर प्रक्रिया करून पुन्हा चढया दराने भारतात आणि जगात विकायचा ,असा अव्यापारेषू व्यापार ब्रिटीशांनी केला . या आणि आशा अनेक "गुन्ह्यांसाठी" ब्रिटन जबाबदार असून त्याची जबाबदारी ब्रिटनला टाळता येणार नाही ! त्याचबरोबर भारतातून “चोरलेला” कोहिनूर हिरा त्वरित भारतास परत करावा आणि ब्रिटिश सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची ,अशी रास्त मागणीही केली .
परखड मत व्यक्त करून खर्या इतिहासाची जाणीव ब्रिटीशांना ,जगाला आणि भारतीयांनादेखील करून दिल्याबद्दल शशी थरूर यांचे (ते कोंग्रेसवासी असूनही ) माझ्याकडून जाहीर आभार व अभिनंदन !
साति बरोबर ओळखलेत.आपल्याला
साति बरोबर ओळखलेत.आपल्याला ब्रिटिशाकडुन माफि मागण्याचा नैतिक अधिकार नाहि.हे माझे स्पष्ट मत आहे.
>> संस्थानिक दिसायला भारतीय
>>
संस्थानिक दिसायला भारतीय असले तरी मनाने इंग्रजच होते.
त्यानी गिळलेला पैसा हा त्यांची वैअक्तिक झालेला आहे.
त्यामुळे त्यांच्याकडुनही माफी व दंड अपेक्षित आहेच.
<<
संस्थाने खालसा झाली. आता त्या संस्थानिकांचे वंशज शोधून वेचून त्यांच्याकडून दंड घेणे सोपे नाही. कारण वारसाहक्काप्रमाणे त्या संपत्तीला अनेक फाटे फुटून कुणाचा वाटा किती हे शोधणे अत्यंत दुरापास्त आहे. नंतर कूळकायदा आल्याने त्यातली शेतजमीन ती कसणार्या मालकीच्या लोकांची झाली असणार. कुणी देश सोडून गेले असणार. इतक्या गुंतागुंतीतून माफी आणि दंड कुणाकडे किती प्रमाणात मागणार? त्यामुळे संस्थानिकांचा हिशेब चुकता करण्याची कितीही इच्छा असली तरी ती मारणे भाग आहे.
ब्रिटन हा देश प्लासीच्या लढाईच्या वेळी होता जवळपास तसाच आहे त्यामुळे त्यांच्यासमोर दुष्कृत्यांचा पाढा वाचणे सोपे आहे.
एखाद्या समाजाने दुसर्या
एखाद्या समाजाने दुसर्या समाजावर अत्याचार केला असेल तर त्या समाजातिल सध्याच्या पिढिने माफि मागणे योग्य ठरेल का?
>>>> एखाद्या समाजाने दुसर्या
>>>> एखाद्या समाजाने दुसर्या समाजावर अत्याचार केला असेल तर त्या समाजातिल सध्याच्या पिढिने माफि मागणे योग्य ठरेल का? <<<
जर तर नको, नेमके उदाहरण द्या, जसे ब्रिटीशांबाबत दिले जाते आहे. नुसती आशययुक्त मोघम पण भडकाऊ बोलणी नकोत.
शिवाय, ब्रिटिशांबद्दल बोलताना, त्यांच्याकडून माफिची अपेक्षा करताना, त्यांनी केलेल्या/त्यांचेकडून घडलेल्या चांगल्या गोष्टी येथे नाकारल्या जात नाहीयेत. तसे काही तुमच्या त्या "एखाद्या समाजाबाबत" कधीच घडताना दिसत नाहीये. तर मुद्दा असा की त्या "एखाद्या समाजाकडून" झालेल्या/केलेल्या/त्यांचेकडून घडलेल्या चांगल्या बाबींचे कौतुकही करणार आहात की नाही?
अन्यथा, मी मला जाणवलेले जे गृहितक नेहेमी मांडतो की "ज्यांना हिंदू धर्म नष्ट करायचा आहे, तर हिंदू धर्मातील त्या "विशिष्ट समाजालाच" जळीस्थळीकाष्ठीपाषाणी सतत टारगेट करण्याचे त्यांचे जे अहोरात्र प्रयत्न गेली वीसपंचवीस वर्षे होताहेत जेणेकरुन हिंदू धर्मास प्रखर झटका बसेल", हे सत्य असून, त्यातिलच एक दर्यामे खसखस असलेला असा एक भाग म्हणजे तुमचा प्रश्न आहे.
दोन्हीत प्रचंड फरक आहे.
दोन्हीत प्रचंड फरक आहे. ब्रिटिश सरकार ही एण्टिटी तशीच आहे. सरकारला मागच्या गोष्टीबद्दल जबाबदार राहावेच लागते. ही माफी कोणी ब्रिटिश जनतेला मागायला सांगत नाही, ते याला जबाबदारही नाहीत. जे होते ते कधीचे गेले.
याउलट समाज हा एकसंध नसतो. त्यातही सत्ताधारी गट व सर्वसामान्य लोकांचा गट असतात. 'समाज' कधी अत्याचार करत नाही - त्यातील (धर्म/राज्य) सत्ताधारी गट करतो. त्यांच्याबद्दल बाकीच्या समाजाला कसे जबाबदार धरणार? अगदी औरंगजेबाच्या काळातही असे अनेक सर्वसामान्य मुस्लिम असतील की त्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. ते कशालाही जबाबदार नाहीत. आताची पिढी तर अजिबात नाही.
सति जाणे,केशवपण करणे ह्या
सति जाणे,केशवपण करणे ह्या सारख्या विक्रुत प्रथा स्त्रियांवर लादणारी पुरुषप्रधान व्यवस्था. आपल्या पुर्वज पुरूषांनी स्त्रि जातीवर केलेल्या अनन्वित अत्याचारांबाबत आजचा पुरुषवर्ग समस्त स्त्रि वर्गाची माफि मागु शकेल का?
बाफचा विषय काय आणि पगारे बोलत
बाफचा विषय काय आणि पगारे बोलत आहेत काय
शशी थरूर यांच्या भाषणाची
शशी थरूर यांच्या भाषणाची लिंक
https://youtu.be/f7CW7S0zxv4
लिंक https://youtu.be/f7CW7S0
लिंक
https://youtu.be/f7CW7S0zxv4
सॉरी. लिंक आधीच दिली गेली आहे.
>> सति जाणे,केशवपण करणे ह्या
>>
सति जाणे,केशवपण करणे ह्या सारख्या विक्रुत प्रथा स्त्रियांवर लादणारी पुरुषप्रधान व्यवस्था. आपल्या पुर्वज पुरूषांनी स्त्रि जातीवर केलेल्या अनन्वित अत्याचारांबाबत आजचा पुरुषवर्ग समस्त स्त्रि वर्गाची माफि मागु शकेल का?
<<
तात्कालिन समाजातील सर्व स्त्रिया असे विधी करण्याच्या विरुद्धच होत्या, त्या असल्या प्रथांच्या पूर्ण विरोधात होत्या ह्याबद्दल आपल्याला खात्रीलायक माहिती आहे का? का समाजातील स्त्रीपुरुष दोघे मिळून अशा प्रथांना हातभार लावत होते?
सती आणि केशवपन ह्या प्रथा जवळपास नामशेष झालेल्या आहेत. अशा गोष्टींना कायद्याने बंदी आहे. समाजाने असे कायदे बनवून आपली भावना व्यक्त केली आहे असे वाटत नाही का?
झक्कींचे चुकलेले प्रतिसाद फार
झक्कींचे चुकलेले प्रतिसाद फार दुर्मीळ असतात. ह्या धाग्यावर एक आहे बघा! सगळ्यांनी लाभ घ्या!
दुटप्पी ह्या शब्दाची व्युत्पत्ती पगारेंच्या प्रतिसादांमधून शोधता येईलच.
मोदींनी थरूर ह्यांचे जाहीर कौतुक करून सोनियाजी आणि काँग्रेस ह्यांचा जो प्रॉब्लेम करून ठेवलेला आहे त्याला सलाम!
पाहुण्याच्या काठीने!
मात्र थरूर ह्यांनी केलेले भाषण नक्कीच 'सकृतदर्शनी आवडण्यासारखे' आहे.
थरुर यान्नी ब्रिटन या देशाने
थरुर यान्नी ब्रिटन या देशाने भारत या देशाला पुढची २०० वर्षे १ पौन्ड/ वर्ष अशी नुकसान भरपाई द्यावी असे भाषणात सुचवले आहे.
ब्रिटिश राज्य व्यावस्थेने जालियनवाला बाग हत्याकान्डा बद्दल अजुनही चुक किव्वा माफी मागितलेली नाही आहे. एका देशाने दुसर्या देशाची माफी मागितल्याचे अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. जपान देशाने कोरियाची अनेक वेळा माफी मागितली आहे..., जर्मनीने इस्रायलची...
इच्छुकान्नी थरुर यान्चे अप्रतिम भाषण बघावे....
एका चुकीच्या माहीतीवरून कौतुक
एका चुकीच्या माहीतीवरून कौतुक केले नंतर खरे कळल्यावर तोंडघशी नेहमी प्रमाणे आपटले
बाकी टाळ्या पिटाळणारे नाईलाजाने वाजवतच बसले 
१. थरूर ह्यांनी पोझिशनमध्ये
१. थरूर ह्यांनी पोझिशनमध्ये असताना हे भाषण केले नव्हते.
२. थरूर ह्यांनी जे सांगितले ते महत्त्वाचे आहे.
३. थरूर ह्यांना जबरदस्त सपोर्ट मिळायला हवा.
४. पण सत्तेत मोदी आहेत आणि ते थरूर ह्यांना अॅप्रिशिएट करत आहेत (पण स्वतः तसे काहीच म्हणत नाही आहेत) ही एक मुत्सद्दी खेळी आहे.
मोदी सगळ्यांची हवा टाईट करणार आहेत हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
व्यापम ललित ने हव्वा टाईटच
बेफि सहमत..मोदि संपुर्ण
बेफि सहमत..मोदि संपुर्ण देशाची हवा टाइट करणार आहेत.
अभावाने (?) जमलेल्या
अभावाने (?) जमलेल्या उपरोधयुक्त वक्तव्याची दखल घेत मी असे म्हणेन पगारे की एकदा हवा टाईट व्हायलाच हवी.
आणि जोरदार आवाज करून फुटणार
आणि जोरदार आवाज करून फुटणार आहे
हवा तर काहींची आणिबाणीत टाईट
हवा तर काहींची आणिबाणीत टाईट केलेली
धमाल होती
बेफि शेतकर्यांची झालेलिच
बेफि शेतकर्यांची झालेलिच आहे.आता कुणाची व्हावि अशि तुमची इच्छा आहे.
विदे आणिबाणि काही इतकी वाईट
विदे आणिबाणि काही इतकी वाईट नव्हती.
शेतकरी तर लव मैरिज, ड्रग्ज
शेतकरी तर लव मैरिज, ड्रग्ज अशामुळे आत्महत्या करतात कालच नाहीका कृषीमंत्र्यांनी सांगितले
देशभक्त लोकांनी सांगितलेले खरेच असते
भारतातील प्रत्येकाची हवा टाईट
भारतातील प्रत्येकाची हवा टाईट व्हायला हवी आहे. प्रत्येकाला जबाबदारी समजायला हवी आहे. अगदी कुठेही थुंकणार्यांपासून ते भ्रष्टाचार करणार्यांपर्यंत प्रत्येकाची!
ह्या सरकारकडून माझ्या ह्या अपेक्षा आहेत.
(विषयांतर झाले ह्याबद्दल क्षमस्व)
अजिबात नव्हती फुकटांची हवा
अजिबात नव्हती
फुकटांची हवा इंदीरा गांधींनी टाईट केली आजही नाव काढले की गंज लागलेले लोह पुरूष सुध्दा भीतीने चळाचळा कापतात
बेफि चांगले विचार.परंतु
बेफि चांगले विचार.परंतु तुम्हि उल्लेखिलेले सर्व सेफ राहतिल नि सर्वसामान्यांचिच हवा टाईट होइल असे वाटतेय.
ह्या धाग्यावर जी माफिविषयक
ह्या धाग्यावर जी माफिविषयक चर्चा झलि त्या वरुन् दिवार चित्रपटातिल एका प्रसंगाचि आठवण झालि शशि कपुर अमिताभकडे सहि मागत असतो नि अमिताभ आधि ह्याच्याकडून सहि आण त्याच्याकडून सहि आण असे सुनावत असतो.त्या वेळि त्यान्चि आइ अमिताभला जे सुनावते ते महत्वाचे आहे.ति म्हणते आपल्यावर् जो अन्याय झाला ते करनारे माझे कोणि नव्ह्ते पण तु माझा मुलगा आहेस.moral of the story_ ब्रिटीशांनी आपल्यावर अन्याय केले ते आपले कोण होते कोणि नाहि.ते लुटायला आले होते त्यांनी लुटले.परंतु आपल्या देशात एका वर्गाने देशातीलच मोठ्या समुहावर जातिपातीच्या नि धर्माच्या नावाखाली अत्याचार केले ते कसे काय समर्थनिय ठरू शकतात.
<<२. थरूर ह्यांनी जे सांगितले
<<२. थरूर ह्यांनी जे सांगितले ते महत्त्वाचे आहे.
३. थरूर ह्यांना जबरदस्त सपोर्ट मिळायला हवा.>>
----- वरिल दोन मुद्यान्शी प्रचन्ड सहमत. त्यान्च्या अनुभवचा, ज्ञानाचा, उत्तम वक्तृत्वाचा, मुत्सद्देपणाचा वापर सरकारने सकारात्मकपणे करायला हवा.
http://blogs.timesofindia.ind
http://blogs.timesofindia.indiatimes.com/aakarvani/dear-shashi-tharoor-t...
चिनूक्स, तुम्ही दिलेला दुवा
चिनूक्स,
तुम्ही दिलेला दुवा वाचला. आकार पटेलची (लेखक) वाक्ये धक्कादायक आहेत. त्याच्या मते Marathas still squat on Baroda. या अडाण्याला माहीत नाही की बडोदे ही गाव मराठ्यांनी नावारूपास आणले आहे.
हा आचरट इसम पुढे म्हणतो की भारतीय सैन्य केवळ पेंढाऱ्यांचे होते आणि १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी अचानक राष्ट्रीय झाले. आता या इसमाला बाळबोध म्हणावा की अक्कलशून्य? मराठे पानिपतात कशासाठी लढले हे आकार पटेलला समजावून सांगायचं का? की गाढवापुढे गीता वाचलेली बरी पडेल?
चिनूक्स, तुमच्याकडून अशा लेखाचा केवळ दुवा अपेक्षित नाही. त्यासंबंधी तुमची स्वत:ची मते देखील द्यावीत, अशी अपेक्षा आहे.
असो.
पोप जॉन पॉल द्वितीय याने मागितलेल्या माफ्यांची यादी इथे आहे : https://en.wikipedia.org/wiki/List_of_apologies_made_by_Pope_John_Paul_II
या यादीत गोव्याचे हिंदू (इन्क्विझिशनचे पीडित) नाहीत. विद्यमान पोपच्या यादीत पाहायला आवडतील. अशा प्रकारची माफी ब्रिटनने मागावी.
आ.न.,
-गा.पै.
दोन कोट खंडणी व चौथाइ मिळाली
दोन कोट खंडणी व चौथाइ मिळाली असती तर पेशवे उत्तर ध्रुवावर लढायलाहे गेले असते.
दमड्या दिल्या की लोक लंडनला जातात , पानिपतचं काय घेऊन बसलात !
Pages