तडका - पुळके

Submitted by vishal maske on 26 July, 2015 - 10:57

पुळके

प्रसिध्दी मिळविण्यासाठी
उगीचंच त्यांचे स्टंट असतात
पण सांगा त्यांनाही कुणीतरी
शेळ्या हाकण्या उंट नसतात

मना-मनामध्ये माजलेले
अविचाराचे घोळके असतात
अन् नको असलेल्या गोष्टींचेही
कुणा-कुणाला पुळके असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>मना-मनामध्ये माजलेले
अविचाराचे घोळके असतात<<< मस्त