राजगड-गडांचा राजा, राजियांचा गड

Submitted by मुरारी on 8 October, 2014 - 05:00

ट्रेक ला जायचं कुठे ह्यावरून बरीच चर्चा केल्यानंतर 'राजगड' करायचा असे किसन देवांनी जाहीर केले. बरेच मेंबर गळत गळत शेवटी मी , किसन, सुड, अल्प्या आणि सिड.. एवढे उरलो.इंद्रायणी वेळेवर शिवाजीनगर पोचली.तडक रिक्षा पकडुन आमची वरात सुडच्या घरी पोहोचली.
मग सुड च्या हातचे फक्कड फवे खाल्ले, वर झकास चाय ढोसला. परत स्वारगेट ला आलो.
सुदॆवाने लगेचच भोर ला जाणारी बस मिळाली.नसरापुर फाटा येईस्तोवर मस्त झोप झाली. फाट्यावर देखिल लगेचच जिपडं मिळालं. घासाघीस करुन चारशे रुपड्यांवर डिल फायनल झालं. वाईट्टच उकडत होतं,मंबईच्या वरताण दमटपणा होता.हि सगळी सांच्याला पावसाची लक्षण दिसत होती.भोसले वाडीत पोचेस्तोवर तीन वाजुन गेलेले होते,गड समोर दिसल्यावर दिल खुष झाला.
१.fgf
मरणाच्या ऊन्हात गड चढायला सुरवात केली.
२.fgf

रस्ता विशेष कठीण नाहीये,पण भयंकर उकाड्यामुळे सतत थांबावं लागत होतं.गडाचे बुरुज दिसायला लागल्यावर मात्र अचानक वातावरण बदललं.समोर तोरण्यावरुन ढगांचे लोट यायला लागले,
३.fgf

४.fgf
५.सूड आणि किसनfgf

६.fgf

७.fgf

८.fgf
दमटपणा अजुन वाढला,गडगडाट सुरु झाला, चिन्ह काही निट दिसत नव्हती, आम्ही तसंच स्वता:ला रेटत वर पळालो.वर जाई पर्यंतच गड ढगात हरवुन गेला.
९. पाली दरवाजा
.fgf

सर्वात आधी पद्मावतीच्या देवळात मस्त कोपरा पकडला.बाकीचे पण बरेच ग्रुप देवळात आडोशाला आले.टाक्यांमधलं गार पाणी पिऊन ताजेतवाने झालो,

१०. फुलं पांघरलेली धरती आणि भरून आलेले आभाळ
.fgf
११.fgf
१२.fgf
१३.fgf
१४.fgf

१५.गडावर उतरलेली सांज
.fgffgf

सुवेळा माची बघण्याचा बेत पावसाने ऊधळुन लावला.दाद्या जोरदार कोसळायला लागला, सोबतीला विजांचा कडकडाट.करण्यासारखे काहि नव्हतेच,देवळात पद्मावतीसमोर दिवाबत्ती झाली,संध्याकाळ दाटून आली
१७.fgf

मस्त गार अंधारात पाऊस ऎकत बसलो.किती महिन्यांनी अशी शांतता मिळालेली होती.फक्कड चहाचा राऊंड झाला.पावसाचा जोर थोडासा कमी झाल्यावर अनवाणीच बाहेर पडलो.वातावरण एकदम बदलुन गेलेले होते.रात्रीच्या जेवणाचे सांगुन टाकले.तिन्हीसांजेला देवीची सुरेख आरती झाली.पाऊस परत वाढलेला होता.तिखटजाळ पिठलं,भाकर्या,ठेचा,दही,भात,असा दणकुन बेत होता,बेक्कार हाणलय सर्वांनी,गप्पा मारायचेही त्राण नव्हते,साठेआठलाच झोपुन गेलो.
सकाळी पाचला ऊठलो,कडक थंडी पडलेली होती.फ्रेश होऊन गड भटकायला निघालो.

१८.fgf
१९.gg
२०.आजूबाजूचा परिसर धुक्यात लपेटलेला होता .
.fgf
२१.fgf
२२.fgf
२३.kj
२४.fgf

सर्वात आधी बालेकिल्ल्यावर कूच केले.थोडासा कठीण असा मार्ग आहे.
२५.fgf
खडा चढ
२६.fgf
२७.fgf
वरून दिसणारे विहंगम दृश्य
२७.fgf
२८.fgf
२९.fgf
वर जननीमंदिर,ब्रह्मेश्वराचे देऊळ,बाजारपेठ, चन्द्र तलाव अजुन काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.
३०.fgf
३१.fgf
३२.fgf
३३.संजीवनी माची
.fgf

वरुन आजुबाजुच्या परीसराचा अप्रतीम नजारा दिसत होता.

३४.fgf
३५.मावळे Happy
.fgf
दोन्ही माच्या पाहायच्या राहीलेल्या होत्या ,पण हातात कमी वेळ असल्याने उगाच घाई केली नाही.पाहायचं तर तब्येतीत,या निर्णयावर सगळे आले.खाली आल्यावर दणकुन पोहे खाल्ले.सामान आवरलं, आणि निघालो.गड उतरुन खाली भोसलेवाडीत आलो,खाली जीप कधी येईल विचारले,पण समाधानकारक उत्तर न मिळाल्याने चालत पुढे निघालो.वाटेत एक नदी होती,मग डुंबण्याचा कार्येक्रम झाला,

३६.fgf

३७.fgf

निघालो.पण गाडीचा पत्ता नव्हता,वाझेघर पर्यंत जवळ जवळ चार किलोमीटर ऊन्हात चाललो,

३८. शेतं.
.fgf
तिकडे गेल्यावर समजलं,कोणतरी जीपवाल्यांपेकी स्वर्गवासी झाल्याने आज कोणीच येणार नाही, अडीच ची एक बस येते तीही आलेली नाही.बोंबला .. साडसहाची ईंद्रायणी मिळेल की नाही याची चिंता लागायला लागली,कसाबसा एका तासाने एक टमटमवाला आला,त्याने नसरापुर फाट्यावर सोडले.तिथुन कात्रज दुसर्या टमटमने,कात्रज- स्वारगेट बसने, स्वारगेट-पुणे स्टेशन रिक्षाने असे कसेबसे बरोबर सव्वासहाला ठेसनात पोचलो,धावत धावत गाडी पकडली,रिझर्वेशन नसल्याने झक मारत उभे राहुन कसेबसे रात्री घरी पोचलो.पण राजगडची नशा मात्र काही ऒरच होती, देवळात पडुन ऎकलेला पाऊस अजुनही मनातुन जात नाहीये Happy

त्यातल्या त्यात फोटूग्राफी
रानफुलं
fgffgffgffgffgf

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<
मस्त गार अंधारात पाऊस ऎकत बसलो.किती महिन्यांनी अशी शांतता मिळालेली होती.
>>>

जियो!
सुन्दर प्रकाशचित्रे! २५ वर्षान्पोर्वी राजगडास जाणे झाले त्याची याद करून दिलीत! भैरव्ननाथ तुमचे भले करो!

अप्रतिम प्रचि आहेत. पण सगळ्यात आवडला तो १० नंबरचा फोटो. तो फोटो नसून एक सुरेख पेंटिंग आहे.

पावसाळ्यानंतर राजगड करायचा अस खुप वेळा ठरवुन झालय पण योग येईना.
३-४ प्रचि सोडले तर बाकिचे सगळेच प्रचि एकदम खास आलेत... आवडले..

छान फोटो... अन येवढ्या काटेकोर (मुंबईटाईप) टाईमटेबल मुळे कष्टही जास्त झाले, पण चीज झाल्यासारखे वाटले यातच सर्व आले.

आहा....मस्तं. वर्णन आणि फोटो दोन्हीही. खूप छान लिहिलय. गडावरील देवळातील वर्णन आणि दिवाबत्ति चा फोटो....लाजवाब!

सर्व फोटो सूंदर आहेत.
काल राजगड पाहण्याचा योग आला. खूप आवडला भव्य दिव्य असाच आहे. पहायला दिवस पुरत नाही धूके आणि पाऊस असल्याने ट्रेकची मजा आली.