सुरकं, झबलं आणि काहीबाही.......

Submitted by मानुषी on 13 July, 2015 - 08:12

नातवाच्या बारश्यासाठी अगदी जोरात शिवण शिवायला घेतलं. तर आधी सुरकं शिवावं म्हट्लं....कारण तसं मी माझ्या कुंचीवरच्या लेखात प्रॉमिस केलं होतं. (http://www.maayboli.com/node/53217)
आणी सुरक्याला फार काही मापं घ्यायला लागत नाहीत. कारण याला अक्षरशः गळ्यासाठी एक कट आणि हातांसाठी दोन कट एवढंच बेतणं आहे. आणि गळ्यापाशी नेफा करून त्यात नाडी. असं अगदी सोपंसं हे सुरकं.
नाडी सुर्रकन ओढून बाळाच्या "बाळ्श्या"प्रमाणे हे वस्त्र बाळाला घालायचं.
पण शिवायला घेतल्यानंतर लक्षात आलं की इतक्या "सूक्ष्म" मापाचे कपडे बर्याच दिवसात शिवलेले नाहीत. त्यामुळे कापयला घेतलेलं कापड , बेतलं की जरा मनात गोंधळच उडायला लागला. आणि वाटायला लागलं की आपण फारच काहीतरी चुकीची मापं घेतोय? कारण जरी मैत्रिणी, नातेवाइकांच्या बाळांसाठी बाळंतविडे केले तरी ते .साधारण एक वर्षाच्या बाळाला बसतील या मापाचे शिवले. मग ते मुलीचे फ्रॉक असोत वा मुलांचे बाबा सूट्स.
मग शेवटी "मॉडेल" च्या मापाचं झबलं मागितलं. ते मिळालं आणि हुश्श्य झालं.
हे सुरकं कसं बेतलं हे साधारण कळावं म्हणून हा फोटो.

मग नाडी ओढून बाळाच्या मापाप्रमाणे अ‍ॅड्जस्ट करा.







बादवे.....इथल्या एका दुकानात हे असे तुकडे तुकडे जोडलेले तागेच मिळतात. मी फक्त त्यात थिकनेस साठी आतून एक जुनी चादर टाकून त्याला एक अस्तर व सॅटिन पट्टी शिवली.
हे तुकडे आतून छानपैकी इन्टरलॉकिंग केलेले असतात. तरुण मुली तर याचे स्वता:साठी टॉपही शिवू शकतील इतकी ही तुकडेजोड कापडं सुंदर आहेत. एस्पेश्यली रंगसंगती.

हे क्विल्ट माझ्या मैत्रिणीकडून करून घेतलं. ती ऑर्डर्स घेते आणि अप्रतीम क्विल्ट्स बनवून देते. हे ६०"बाय ३०" आहे. बाळ बरंच मोठं होईपर्यन्त त्याला वापरता येईल.


विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळाच बाळंतविडा सुंदर झालाय.

आज्जीचे अभिनंदन आणि बाळाला खूप खूपआशीर्वाद .

मानुषी, तु शिवलेले सगळेच मला खूप आवडते. शिवणकामाबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर कुतुहल आणि कौतुक असते . शिवणकाम मला जराही येत नाही म्हणून या तिन्ही भावना जरा जास्त असतात मनात. आता मला शिवणकाम जमेल ही आशा मी सोडलीय. . पण ही माझी पॅशन पुढच्या जन्मी तरी पूर्ण होईल अशी आशा करते ( स्मित )

टिना.........अगं खूप वर्षं करतीये ना शिवण............
जागू, चिन्नू धन्यवाद.
मामे......थांकू गं! कलाकारी वगैरे काही नाही . हाताने काही तरी केल्याचं समाधान!
आणि शेवटचे क्विल्ट मैत्रिणीने केलंय गं.

अप्रतिम आहेत. कुंची तर एवढी गोडुली आहे. हे २० वर्षापूर्वीचं माझं बाळ - कुंचीतलं.

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLUc_Iq7ns6vMG_auqD0mT2hXyIBOGWmW2Qo_f7qPq5cpZ8hGpODiafMp19i9ZNfVgUEduv1wMNsnj_W84p4Gjm_8ON7WVp5iFNjScWyKDIlOd1dvYa9Pg9gpF7BUyuKepuQ8rq2UjvwjCqrlYFz-D3Qaw=w1264-h824-no?authuser=0

>>>>नाडी सुर्रकन ओढून बाळाच्या "बाळ्श्या"प्रमाणे हे वस्त्र बाळाला घालायचं.
Happy
कलात्मक आहे. दैवी देणगी आहे असा बाळंतविडा करता येणं.

iZabala

Pages