शटर..... ओपन युवर माइंडस नाऊ!! (सिनेरीव्ह्यु)

Submitted by मी मधुरा on 12 July, 2015 - 08:40

‘तीन-तीन सुगरणी आणि स्वयंपाक मात्र आळणी’ , ‘तीन तिगडा, फिर भी काम बिगाडा??’........ Any thing else to say?
सचिन खेडेकर कडून ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘आजचा दिवस माझा’ आणि ‘काकस्पर्श’ या चित्रपटांमुळे वाढलेल्या अपेक्षा घेऊन हा सिनेमा बघायला जाणार असाल तर जाऊ नका.
अमेय (दी.दो.दु मधला कैवल्य) आवडत नसेल तर तिकीट काढण्याकरता बाहेर काढलेलं क्रेडीट कार्ड आत्ताच्या आत्ता पाकिटात ठेवा परत. नाहीतर ‘नावडतीच मीठ आळणी’ अशी गत व्हायची.
सोनाली कुलकर्णी आणि अमेय वाघ यांचा अभिनय बघायचा असेल, तर मात्र नक्की बघा.

सिनेमाची मुख्य कल्पना मात्र छान आहे. माणसाला एक व्यसन किती संकटात टाकू शकत आणि जीवनाच्या अश्या वळणावर आणून सोडत कि पुढच सगळ जीवन अंधारात दिसू लागतं. त्या वळण्याच्या पुढे अंधारात आपण पाय टाकतोय त्याखाली जमीन आहे कि खसकन सरकणारी वाळू, हे माहित नसत. पटकथा साधी, सोप्पी, पण न रुचणारी; तरीसुद्धा त्यात एक element आहे. पण चित्रपटातून जे सांगायचं, ते चित्रपटाची पटकथा, डायलॉगज आणि अभिनेते अभिनयातून आपल्या पर्यंत पूर्णपणे पोचवण्यात अयशस्वी ठरतात.

पण सिनेमाचा मुळ कणा म्हणजे जित्या भाऊ हा पूर्ण सिनेमा दारू पिऊन वावरल्या सारखा वाटतो. पाण्याऐवजी जित्या भाऊ दारूच्या बाटल्या ढोसत असावा कि काय, अस वाटायला लागतं. हि कथा एका सभ्य माणसाची आहे. ज्याला दारू पिण्याची सवय असते. (सगळेच सभ्य दारू पितात असा गैरसमज नसावा. एखादी कथा, ते हि सिनेमाची, अपवाद असू शकतेच.) जित्या भाऊच्या वादग्रस्त असलेल्या बंद दुकानात मित्रांसोबत रात्री बाटली घेऊन बसणाऱ्या जित्या भाऊला त्याच्या मुलगी मात्र कडक शिस्तीत राहावी आणि वाया जाऊ नये म्हणून तिचं लहान वयातच लग्न करायचं ठरवतो. त्याच्या ओळखीच्या रिक्षावाल्याकडून म्हणजे एक्याकडून (अमेय वाघ) दारू मागवून दुकानात अहोरात्र सो कॉल्ड मित्रांसोबत ‘बसण्याचे’ ठरलेले असतानाच सगळा स्टॉक संपल्यामुळे जित्याभाऊ एक्यासोबत बाहेर दुकानात जातो. आणि परत येताना जित्याभाऊच्या जवळून एक सुंदर तरुणी, (घोगऱ्या आवाजाची सोनाली कुलकर्णी) त्याच्याकडे बघत जाते. आणि त्याच्या मनाचा तोल......!!!

एक्या ते ओळखून जित्यासाठी तिला विचारतो आणि दोघांनाही बंद असलेल्या जित्याच्याच घरासमोरील त्याच्याच दुकानात आणून सोडतो. तिच्यासाठी अंडाभुर्जी आणायला जाताना एक्या शटर ओढून त्याला कुलूप लावतो आणि तिथेच चुकतो! पुढे बाकी काही उपकथानक जोडलेली आहेतच. पण त्या प्रत्येक गोष्टींच स्पष्टीकरण देण्यात चित्रपट “माती खातो!!!” (एक्याच्याच भाषेत) !

त्या बंद शटरच्या आतून बाहेरच्या जगाचा खरा चेहरा उघडकीला येताना, बसलेला धक्का, तुटलेल्या संकल्पना हे सगळ अभिनयातून दाखवण्यात सचिन खेडेकर कमी पडले आहेत, असे वाटते.

दारू पिण, मग अगदी ते रिक्षावाल्याने का असेना, मग किती चुकीच आहे, किती वाईट आहे आणि ते तुमच्या सोबत तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा किती त्रास देऊ शकत, हे दाखवण, हा चित्रपटाचा हेतू होता. आणि ही गोष्ट मला खूप पटली.

का पाहावा?
- अमेय आणि सोनालीने आपापली कामे मन लाऊन केलेली आहेत.
- मूळ कल्पना छान आहे.

का पाहू नये?

- सचिन खेडेकर यांचे पंखे असाल तर! (उगाच acting impression डाऊन होईल.)
- गाणी श्रवणीय नाहीत. (नंतर तर आठवतही नाहीत.)
- काही प्रश्न (प्रेक्षकांना पडलेले...) अनुत्तरीत राहतात.
- ‘का पाहावे’ या लिस्ट मधलं काहीच पटल नसेल तर!

रेटिंग:
(काय बर द्यावं ? १ ? कि अर्धा ? ओके! अमेय आणि सोनालीसाठी २!)
**

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+वरच्या सगळ्या प्रतिक्रिया -वाचुन असे वाटले की
मधुराताईने जणुकाही 'ध' चा 'मा' केलाय, आणि नीधप ना त्याचा सन्ताप आलाय ,कोणीही व्यक्ती परफेक्ट नसते, एखादा शब्द लिहिताना चुकला तर 'मरठी शिका आधी' हे लिहिण फारच अतिरेकी आहे, तसेच स्वताच्या मतावर दुसर्‍याने लिहिलेल्या मताला 'थयथयाट' म्हणणे हे सुद्धा अतिरेकीच आहे. याचा अर्थ नीधप ना स्वताला 'थयथयाट करणे म्हणजे काय याचाच अर्थ माहित नाही असे दिसते.
नीधप, मधुरा काय किंवा मामी काय दोघीही माझ्या कोणीही नात्यातल्या किंवा जवळच्या मैत्रीणी नाहीत, पण तुमच्या कमेन्टस पटल्या नाही म्हणून हा खटाटोप. आणि जशी तुम्ही 'मराठी शिका आधी' अशी कमेंट करु शकता तर तुमच्यावर पण 'बालिश बहू, बायकात बडबडला' अशी केली तर कसे वाटेल?
वेगळी +१००

मधुराताईने जणुकाही 'घ' चा 'मा' केलाय>>> "ध" चा "मा" करतात असा वाक्प्रचार शाळेत शिकलो होतो, पण तो चुकीचा असणार. हो ना? सध्या मलाच मराठी शिकायची गरज आहे एकूणात.

अवांतर - राजकारणावर वाद होतात त्यामुळे काही लिहावेसेच वाटत नाही अशी तक्रार करत असलेल्या मायबोलीकरांना 'राजकारणाआधी कशाकशावर वाद होत असत' ह्याची चांगलीच आठवण झाली असेल आता.

लेख आटोपशीर आणि छान वाटला.

धन्यवाद!

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ....
बर्‍याच दिवसात माबोवर फिरकले नव्हते. आज आले तर नव्या फिल्मचे परिक्षण. कस्काये ते वाचुन पाहुया, म्हणुन आले तर हा गदारोळ. खेद वाटला नक्कीच. असे लिहिणार्‍याला नाउमेद करुन काय होणार? अन मग आताचे लोक कसे ईंग्रजाळलेत अन मराठी कशी मागे पडतेय असे आपणच (म्हणजे फक्त इथले आयडी नाही तर एकुणात समाज) गळे काढायचे. चुक आहे ती दाखवणे हा एक भाग अन ती समजुन दुरुस्त करुन पुढे जाणे हा दुसरा इतकी सहज व्हावी अशी गोष्ट इतकी का ताणली गेली Sad
असोच. मधुरा बाई. नव्याने दुसरा पिक्चर पाहुन या अन परत नविन परिक्षण लिहा. वाट पहातोय Happy

परिक्षण आवडलं एकदम. चित्रपट निदान एकदा तरी पहावा असं वाटायला लागलंय वाचून.

बाकी मामी, निर्मलानंद आणि मोनाली यांच्या पोस्टला अनुमोदन.
खरंच एखाद्याची चूक शांतपणे अक्कल न काढता सांगता येते, त्याने खच्चिकरण होत नाही.

मामी, रसप, दादाश्री, रीया, सामी, वेगळी, चैत्राली ,ऋन्मेऽऽष, नँक्स, नीरा, कविन, कविता, मेधा, मिनू, बेफिकिर, दक्षिणा आणि निर्मलानंद.......

सर्वांचे मनपूर्वक आभार!! खरंच खूप आनंद झाला तुमचे प्रतिसाद वाचून. Happy

बाकी चित्रपटाचा डिरेक्टर, लेखक यांची नावे मी वाचली नाहीत. शटर पाहताना मी माझ्या आवडत्या कैवल्य साठी पाहिला होता, त्यामुळे बाकी त्यात कोण आहे यात माझे लक्षच नव्हते. तुम्हाला हि माहिती गुगलल्यास नक्की मिळेल.

आणि हो, जित्या भाऊची भूमिका सचिन खेडेकरांनीच केलेली आहे.

बाकी 'अहोरात्र' हा शब्द मी त्याच अर्थाने वापरलेला आहे, जो सगळ्यांना अपेक्षित आहे. सिनेमा पाहिल्यावर तुम्हालाही ते पटेलच.

मधुरा, चित्रपटाचे परीक्षण आवडले. छान लिहिलंय.
बाकी नकारात्मक प्रतिक्रिया मी वाचल्या नाहीत.

मामी नेहमी प्रमाणेच एकदम बॅलन्स्ड विचार +1
>>>>>>>>>>>>>>

मामी, अजूनही तू कायम ती साईड व्हील्स लावलेली सायकल घेऊन फिरतेस असा माझा संशय आहे..... Rofl
जिप्सी ला फोटो काढायच्या कामाला लावला पाहिजे Proud

----------------------------------------------------------------

हौशी परिक्षणास प्रोत्साहन.

'सिनेरीव्हू' ('व्ह्यू' हवंय, पण असो !) असं लिहिलंय खरं, पण म्हणून लिहिलेल्या लेखाने सर्वमान्य निकष पाळायलाच हवे, असं नक्कीच नसावं. इथे सगळेच हौशी लिहितात, पेड नाही. मधुराने एक प्रेक्षक म्हणून तिला काय वाटलं ते लिहिलं, एक परीक्षक/ निरीक्षक/ समीक्षक म्हणून नव्हे, असं मी समजतो. त्यामुळे लेखात लेखक-दिग्दर्शक व पडद्यामागील इतर महत्वाच्या लोकांचा उल्लेख न आल्याचं खरं तर मला इतरांच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतरच जाणवलं. बट यस, पुढच्या लेखात तिने त्या दृष्टीने विचार करावाच !

रसप तुमचा प्रतिसाद आवडला आणि अश्या प्रतिसादांनी नक्कीच नविन लिहिणार्यांचा हुरूप वाढेल.
मधुरा, तुमच्या पुढील परिक्षणा च्या प्रतिक्षेत.

त्यामुळे लेखात लेखक-दिग्दर्शक व पडद्यामागील इतर महत्वाच्या लोकांचा उल्लेख न आल्याचं खरं तर मला इतरांच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतरच जाणवलं. बट यस, पुढच्या लेखात तिने त्या दृष्टीने विचार करावाच !
>>
+१

पण त्याच वेळेला मला स्वतःला ती सुचना पटली. मधुराने नंदिनीची कमेंट पॉजिटिव्हली घेऊन पुढच्या लेखात विचार करावा म्हणजे आणखी चांगलं होईल लिखाण.
हे आपलं असं मला वाटतं.

मायबोलीवर एखाद्या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांत +१ देण्याचा रेकॉर्ड काय आहे?

माझाही रसप आणि रीया यांच्या पोस्टीला +१

वाचकात लोकप्रिय (अ‍ॅक्सेप्टेड) झालेली शैली परिक्षणासाठी कळत नकळत फॉलो होतेय हे मात्र हल्ली बरीच हौशी परिक्षणं वाचताना जाणवत राहाते....

इथे बरेच जण हौसेखातर अशी परिक्षणं लिहितात अधूनमधून (माझ्यासकट).
रसप रेग्युलर लिहितो आणि आता वर्तमानपत्रातही.... त्याची एक विशिष्ठ शैली आहे मांडायची जी इथे बरीच अ‍ॅक्सेप्टेड आहे हे प्रतिसादांवरून कळते (निंदकही असणारच, मायबोली आहे ही भाऊ Proud )....
बर्‍याचदा नवी परिक्षणं वाचताना (कळत नकळत) नव्याने लिहिणार्‍यांकडून ती स्टाईल (कळत नकळत) फॉलो होतेय की काय असं वाटून जाते. (पुन्हा हे मा वै म).

सो लिहिताना आपल्या पद्धतीने लिहित रहावे.... बाकी मायबोलीकरांवर सोडा.... ते ज्याला ऊचलायचा त्याला उचलतातच आणि आपटायचा त्याला आपटतातच.

वि. उल्लेखः " किल्ला" वरचा वाघमारेंचं परिक्षण मनस्वी आणि स्वतंत्र वाटलं... मतमतांतरं असली तरी वेगळेपणामुळे भावलं होतं.

निंदकही असणारच, मायबोली आहे ही भाऊ Proud

पण मुद्द्याशी सहमत आहे.

माझ्यामते हौशी लोकांनी आधी मनाशी पक्के करावे की परीक्षण लिहित आहोत की आपण पाहिलेल्या आणि आपल्याला (चांगले वा वाईटरीत्या) भावलेल्या एका चित्रपटाबद्दल काय वाटले हे लिहून चारचौघांना सांगत आहोत.

यात एक हौशी मी देखील आहे आणि मी दुसर्‍या प्रकारात लिहितो. या प्रकारात दिग्दर्शक कथाकार वगैरेंचे नाव आणि त्याची आधीची कामगिरी वगैरे आलीच पाहिजे, तसेच संगीत-कथा-पटकथा-संवाद-अभिनय ईत्यादी सिनेमाच्या प्रत्येक अंगाचे मूल्यमापन झालेच पाहिजे, असे काही गरजेचे नसते. ज्यावर आपल्याला लिहावेसे वाटतेय तेच तेवढेच लिहिणे पुरेसे ठरावे. उगाच त्या लिखाणाला परीक्षणाचा टॅग लागावा या हेतूने गूगाळून माहिती संकलित करणे वा जे आपले क्षेत्र नाही त्यावर अधिकारवाणीने भाष्य केल्याचा आव आणने याला अर्थ नाही.

हौशी लेखक आहेत तर त्यांनी त्यांची हौस भागेल असं लिहावं. साधं-सरळ-सोपं लिखाण हीच हौशीशैली असल्यानं दोन लेखांमध्ये फरक करता येत नाही पण म्हणून कॉपी केलीये असं होत नाही.

>>>माझ्यामते हौशी लोकांनी आधी मनाशी पक्के करावे की परीक्षण लिहित आहोत की आपण पाहिलेल्या आणि आपल्याला (चांगले वा वाईटरीत्या) भावलेल्या एका चित्रपटाबद्दल काय वाटले हे लिहून चारचौघांना सांगत आहोत.

यात एक हौशी मी देखील आहे आणि मी दुसर्‍या प्रकारात लिहितो<<<

अनुमोदन!

मात्र 'आपण पाहिलेल्या आणि आपल्याला आवडलेल्या / न आवडलेल्या' बाबींबाबत लिहिणे हे व्यक्तीगत स्वरुपाचे परीक्षणच असते. समीक्षा वेगळी!
=====================

समजा आपण एखाद्या क्षेत्रातील मान्यवर असलो आणि मान्यवर नसलेल्या एखाद्याने काही खरडले तर त्यावर भाष्य करताना त्याच्या पातळीला जाऊन आणि आब राखून सल्ला देणे हे चांगुलपणाचे लक्षण आहे. Happy

हे वाक्य कोणावरही टीका करण्याच्या उद्देशाने नव्हे.

बेफिकीर, ऋन्मेष ह्यांच्या प्रतिसादावरून मला असं मांडावंसं वाटतं -

निरीक्षण = अमुक एक चित्रपट पाहून मला काय वाटलं, ते सविस्तर लिहिणे. ज्यात कथानकाची तोंडओळख, पात्रांची नावं वगैरे येतील. तसेच काय आवडलं आणि काय नाही हेसुद्धा येईल.
परीक्षण = निरीक्षण + जे आवडलं ते का आवडलं आणि जे नाही आवडलं ते का नाही आवडलं, ह्यावर आपणच विचार करून शोध घेण्याचा प्रयत्न करणे. ह्यात सर्वांगांचा विचार करायला हवा आणि त्यामुळे ओघानेच सर्व महत्वाच्या लोकांची नावे वगैरे आलंच. ह्याला 'रसग्रहण'सुद्धा म्हणता येईल.
समीक्षण = परीक्षण + तांत्रिक उहापोह आणि समकालिन, गतकालिन संदर्भ येतील. एकूणच खूप अभ्यासक दृष्टीने केलेलं विवेचन.

- असं काहीसं असावं का ? जर असेल, तर मी कविता व चित्रपट ह्या विषयांवर आजवर जी काही मुक्ताफळं उधळली आहेत, त्यांना मी अनावधानाने का होईना कधीच 'समीक्षण' म्हटलं नाही, ते बरंच झालं म्हणायचं !

बापरे...किती त्या चर्चा....एखाद्या सदस्याने काही हौसेने लिहायचं ठरवलं तरी अशा चर्चा पाहुन आता १० वेळा विचार करेल ती व्यक्ती लिहिण्याआधी....असो...
बाकी मला आवडलं लिखाण...

स्मिता श्रीपाद,

इथे वर मी रसप बेफी ऋन्मेष ह्यांनी नॉर्मल चर्चेच्या टोनमध्येच मुद्दे मांडलेत..... कुठेही बोचरी टिका नाही किंवा डिस्करेज तर अजिबातच केलेले नाही....

मुळात इथे लिहिले म्हणजे प्रतिसाद सर्व प्रकारचे प्रतिसाद येतातच.... त्यातून चांगले ते घेऊन पुढे जाणं अपेक्षित आहे....

Pages