‘तीन-तीन सुगरणी आणि स्वयंपाक मात्र आळणी’ , ‘तीन तिगडा, फिर भी काम बिगाडा??’........ Any thing else to say?
सचिन खेडेकर कडून ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘आजचा दिवस माझा’ आणि ‘काकस्पर्श’ या चित्रपटांमुळे वाढलेल्या अपेक्षा घेऊन हा सिनेमा बघायला जाणार असाल तर जाऊ नका.
अमेय (दी.दो.दु मधला कैवल्य) आवडत नसेल तर तिकीट काढण्याकरता बाहेर काढलेलं क्रेडीट कार्ड आत्ताच्या आत्ता पाकिटात ठेवा परत. नाहीतर ‘नावडतीच मीठ आळणी’ अशी गत व्हायची.
सोनाली कुलकर्णी आणि अमेय वाघ यांचा अभिनय बघायचा असेल, तर मात्र नक्की बघा.
सिनेमाची मुख्य कल्पना मात्र छान आहे. माणसाला एक व्यसन किती संकटात टाकू शकत आणि जीवनाच्या अश्या वळणावर आणून सोडत कि पुढच सगळ जीवन अंधारात दिसू लागतं. त्या वळण्याच्या पुढे अंधारात आपण पाय टाकतोय त्याखाली जमीन आहे कि खसकन सरकणारी वाळू, हे माहित नसत. पटकथा साधी, सोप्पी, पण न रुचणारी; तरीसुद्धा त्यात एक element आहे. पण चित्रपटातून जे सांगायचं, ते चित्रपटाची पटकथा, डायलॉगज आणि अभिनेते अभिनयातून आपल्या पर्यंत पूर्णपणे पोचवण्यात अयशस्वी ठरतात.
पण सिनेमाचा मुळ कणा म्हणजे जित्या भाऊ हा पूर्ण सिनेमा दारू पिऊन वावरल्या सारखा वाटतो. पाण्याऐवजी जित्या भाऊ दारूच्या बाटल्या ढोसत असावा कि काय, अस वाटायला लागतं. हि कथा एका सभ्य माणसाची आहे. ज्याला दारू पिण्याची सवय असते. (सगळेच सभ्य दारू पितात असा गैरसमज नसावा. एखादी कथा, ते हि सिनेमाची, अपवाद असू शकतेच.) जित्या भाऊच्या वादग्रस्त असलेल्या बंद दुकानात मित्रांसोबत रात्री बाटली घेऊन बसणाऱ्या जित्या भाऊला त्याच्या मुलगी मात्र कडक शिस्तीत राहावी आणि वाया जाऊ नये म्हणून तिचं लहान वयातच लग्न करायचं ठरवतो. त्याच्या ओळखीच्या रिक्षावाल्याकडून म्हणजे एक्याकडून (अमेय वाघ) दारू मागवून दुकानात अहोरात्र सो कॉल्ड मित्रांसोबत ‘बसण्याचे’ ठरलेले असतानाच सगळा स्टॉक संपल्यामुळे जित्याभाऊ एक्यासोबत बाहेर दुकानात जातो. आणि परत येताना जित्याभाऊच्या जवळून एक सुंदर तरुणी, (घोगऱ्या आवाजाची सोनाली कुलकर्णी) त्याच्याकडे बघत जाते. आणि त्याच्या मनाचा तोल......!!!
एक्या ते ओळखून जित्यासाठी तिला विचारतो आणि दोघांनाही बंद असलेल्या जित्याच्याच घरासमोरील त्याच्याच दुकानात आणून सोडतो. तिच्यासाठी अंडाभुर्जी आणायला जाताना एक्या शटर ओढून त्याला कुलूप लावतो आणि तिथेच चुकतो! पुढे बाकी काही उपकथानक जोडलेली आहेतच. पण त्या प्रत्येक गोष्टींच स्पष्टीकरण देण्यात चित्रपट “माती खातो!!!” (एक्याच्याच भाषेत) !
त्या बंद शटरच्या आतून बाहेरच्या जगाचा खरा चेहरा उघडकीला येताना, बसलेला धक्का, तुटलेल्या संकल्पना हे सगळ अभिनयातून दाखवण्यात सचिन खेडेकर कमी पडले आहेत, असे वाटते.
दारू पिण, मग अगदी ते रिक्षावाल्याने का असेना, मग किती चुकीच आहे, किती वाईट आहे आणि ते तुमच्या सोबत तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा किती त्रास देऊ शकत, हे दाखवण, हा चित्रपटाचा हेतू होता. आणि ही गोष्ट मला खूप पटली.
का पाहावा?
- अमेय आणि सोनालीने आपापली कामे मन लाऊन केलेली आहेत.
- मूळ कल्पना छान आहे.
का पाहू नये?
- सचिन खेडेकर यांचे पंखे असाल तर! (उगाच acting impression डाऊन होईल.)
- गाणी श्रवणीय नाहीत. (नंतर तर आठवतही नाहीत.)
- काही प्रश्न (प्रेक्षकांना पडलेले...) अनुत्तरीत राहतात.
- ‘का पाहावे’ या लिस्ट मधलं काहीच पटल नसेल तर!
रेटिंग:
(काय बर द्यावं ? १ ? कि अर्धा ? ओके! अमेय आणि सोनालीसाठी २!)
**
ते बाकी सगळं ठिके पण मधुराबाई
ते बाकी सगळं ठिके पण मधुराबाई कृपया दोन शब्दांचा अर्थ समजावून सांगाल का?
१. वादातीत (भाऊच्या वादातीत असलेल्या बंद दुकानात)
२. अहोरात्र (दारू मागवून दुकानात अहोरात्र सो कॉल्ड मित्रांसोबत)
वादग्रस्त अस लिहायच होतं.
वादग्रस्त अस लिहायच होतं. अहोराञ म्हणजे राञभर किंवा रातंदिवस.... अस म्हणायचे होते.
अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस हे
अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस हे अनेक रात्रंदिवसांसाठी होतं हो. रात्रभर असं मुळीच नाही.
मराठी शिका आधी.
ते ठिक आहे, पण तुम्ही या
ते ठिक आहे, पण तुम्ही या सिनेमात काम केलय का?

मस्तं केलय समीक्षण. आवडले.
मस्तं केलय समीक्षण. आवडले.
नीधप, त्यांना चुकलेल्या
नीधप, त्यांना चुकलेल्या शब्दांचा अर्थ सांगितलास ते ठीक होतं. पुढे 'मराठी शिका आधी' असं लिहिण्याची काहीच गरज नव्हती. असो.
अहो मधुराबाई. तुमचं मराठी
अहो मधुराबाई. तुमचं मराठी फारच गचाळ दिसतंय. तुम्हाला मराठी शिका सांगितल्याचा अर्थ मी त्या सिनेमात काम केलंय असा होत असेल तर खरंच मराठी शिकण्याची गरज आहे. आणि तो सल्लाही कुणीतरी देण्याची गरज आहे तुम्हाला.
मामी, अप्रूव्हल विचारले नाही तेव्हा असोच....
अहोरात्र , वादातीत शब्दांचे
अहोरात्र , वादातीत शब्दांचे अर्थ नीधप म्हणतात तसेच आहेत.
मामी, अप्रूव्हल विचारले नाही
मामी, अप्रूव्हल विचारले नाही तेव्हा असोच.... >>> लेखिकेनंही 'माझा अपमान करा' असं लिहिलेलं नाही. दोन मराठी शब्द चुकीच्या अर्थानं लिहिले आहेत फक्त. ते तेवढे बरोबर करून सांगून गप्प बसता येतं की. त्यांना दिलेला मराठी शिकण्याबद्दलचा सल्ला अजिबात आवडला नाही म्हणून लिहिलं.
१. लेखिकेचा अपमान मी केलेला
१. लेखिकेचा अपमान मी केलेला नाही. हे मला माहितीये. बाकी कोणाचे याबद्दल काय मत आहे याला मी विचारात घेत नाही.
२. तुझ्या शिकवणीला मी काडीची किंमत देत नाही इतकाच अर्थ त्या अप्रूव्हल वाल्या पोस्टीचा होता. तू काय करावेस हे तुला सांगितलेले नाही.
बाकी तिसर्याच व्यक्तीला दिलेल्या सल्ल्यावरून चाललेला तुझा थयथयाट मनोरंजक.
चालू द्या.
मामी | 12 July, 2015 - 21:31
मामी | 12 July, 2015 - 21:31 नवीन
नीधप, त्यांना चुकलेल्या शब्दांचा अर्थ सांगितलास ते ठीक होतं. पुढे 'मराठी शिका आधी' असं लिहिण्याची काहीच गरज नव्हती. असो.
>> पूर्णपणे मान्य.
--------------------------------------
लेख उत्तम.
थाडा हात आखडता घेतला की काय, असंही वाटलं मात्र!
लेख आवडला र,च्या. क.ने.
लेख आवडला
र,च्या. क.ने. सगळ्या धाग्यांवर ठरवुन व्याप्ती वाढ करण्याचा मानस अन त्यातुन मिळणारा आनंद जास्त आवडीचा झालाय का आपला सर्वांचा. (मजसहीत)
थयथयाट
थयथयाट
मामी , मी तुम्हाला बघितल
मामी , मी तुम्हाला बघितल नाहीये ,पण माझ्या डोळ्यासमोर मंजुलिका आली भुभु मधली
मधुरा, छान लिहिलयेस परिक्षण!
मधुरा, छान लिहिलयेस परिक्षण! थांबायला हवं तिथेच थांबलीस
जित्या कोणेय यात? (सचिन खेडेकर का? )
अमेयचं काम मस्तच असणार यात वाद नाही.
सिनेमा मात्र बघणार नाही
मधुरा, छान परिक्षण.
मधुरा, छान परिक्षण. आवडले.
सचिन खेडेकर चा सिनेमा चित्रपटग्रुहात बघणार नाही हे 'नागरीक' बघून ठरवले आहे. त्यामुळे हा बघणार नाही. टिव्ही वर लागला तर बघेन.
मामीशी सहमत.
चोर तो चोर आणि वर शिरजोर ही
चोर तो चोर आणि वर शिरजोर ही म्हण नीधप बाईंना लागू आहे! २ शब्द चुकल्याने मराठी शिका सांगण्याचा निर्बुद्धपणा करणार्याला काय म्ह्णणार? तो थयथयाट नाही पण इतरांनी असं बोलणं चुकीचं आहे दाखवून दिलं तर तो थयथयाट! अत्यंत बिनडोक बाई आहे ती नीधप... अनुल्लेख करा तिचा...
मधुरा छान लिहिलय. पण असा
मधुरा छान लिहिलय. पण असा चित्रपट आलाय हेच माहीत नव्हतं.
सिनेमा मात्र बघणार नाही>>>>>>>> रीये का ग दुनियादारीपासुन मराठी सिनेमांचा धस्का घेतलास काय?

शिकवणी
अगं म्हणजे पैसे देऊन बघणार
अगं म्हणजे पैसे देऊन बघणार नाही असं म्हणायचं होतं मला
टिव्हीवर लागला तर बघु
छान परिक्षण. आवडले
छान परिक्षण. आवडले
रीये का ग दुनियादारीपासुन
रीये का ग दुनियादारीपासुन मराठी सिनेमांचा धस्का घेतलास काय?
>>>>>>>
का?????
का मला या धाग्यावर आमंत्रण देत आहात..
आधीच काय इथे कमी लफडे चालू आहेत का
परीक्षणाबद्दल धन्यवाद या
परीक्षणाबद्दल धन्यवाद
या चित्रपटाबद्दल माहीत नव्व्हते
छान परिक्षण. आवडले मामीशी
छान परिक्षण. आवडले
मामीशी सहमत.
सिनेरीव्ह्यु अथवा परीक्षण
सिनेरीव्ह्यु अथवा परीक्षण लिहिताना चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा (त्याचबरोबर पटकथालेखक वगैरेंचा) साधा उल्लेखही नसणं फार खटकलंय. हा चित्रपट मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे, आणि त्याचे दिग्दर्शक जॉन मॅथ्यु, मराठी रिमेक मल्याळम दिग्दर्शक व्हीकेप्रकाश यांनी दिग्दर्शित केला आहे.
परिक्षण आवडले! हा चित्रपट मुळ
परिक्षण आवडले!
हा चित्रपट मुळ दक्षिण भारतीय चित्रपटा वर बेतलेला आहे असे वाचण्यात आले. त्या बद्दल हि काही माहिती देता येईल असे वाटते.
मराठीकरण करताना काही रहिले किंवा फ़ारच विजोड काही झाले या वर प्रकाश पडेल.
कथा बरिये, अभिनेते चांगले आहेत तरिही भट्टी जमली नाही याचे कारण कळु शकेल.
छान परिक्षण. आवडले मामीशी
छान परिक्षण. आवडले
मामीशी सहमत.
मधुरा, छान परिक्षण. आवडले.
मधुरा, छान परिक्षण. आवडले. टिव्ही वर लागला तर बघेन. मामीशी सहमत.
़व कविन अणि कविता + १
़व
कविन अणि कविता + १
मधुरा, परिक्षण आवडले. नंदिनी
मधुरा, परिक्षण आवडले.
नंदिनी म्हणत्ये तसं दिग्दर्शक, पटकथालेखक वगैरेंचा उल्लेख हवाहोता.
मामीशी सहमत.
मधुरा, छान परिक्षण. मामी +
मधुरा, छान परिक्षण. मामी + १.
Pages