द हॉबिट आणि द लॉर्ड ऑफ द रिंग्ज

Submitted by टीना on 4 July, 2015 - 10:42

जे. के. रोलिंग यांनी लिहिलेल हॅरी पॉटर पुस्तक मायबोली मुळे खर तर वाचण्यात आलं. त्यापूर्वी चित्रपट पाहिले होते. पण जसं जसं पुस्तकात गुंतत गेली तसा तसा चित्रपट किती पोकळ होता हे जरा जास्तच जाणवायला लागलं. भलेही काहीजणांनी त्यांच्या भुमिकेला व्यवस्थित न्याय दिला आहे तरी खुप काही राहुन गेल याची जाणीव पुस्तक वाचल्यावर प्रकर्षाने जाणवली.

पहिले चित्रपट आणि नंतर पुस्तक हाति घेणे हा प्रकार इंग्रजी साहित्याबद्दल जरा जास्तच प्रमाणात झालाय माझ्याहातुन. यात आणखी एका पुस्तकाची भर पडलीय ती म्हणजे जे. आर. आर. टोल्किन यांच 'द हॉबिट' आणि 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' या पुस्तकांची. मला आठ्वत त्यानुसार १२वी मधे कि कॉलेजच्या सुरुवातीच्या वर्षात मी 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' चा 'द फेलोशिप ऑफ द रिंग' हा चित्रपट पाहिला. त्यानंतर मात्र त्या चित्रपटांच्या प्रेमातच पडली ते अगदी 'द हॉबिट' चा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होईस्तोवर. आजपावेतो त्या कादंबर्‍यांना हात लावायची हिम्मत होत नव्हती. पण हॅरी पॉटर वाचल्यानंतर भिड चेपली आणि मग परत त्यासारखाच ह्या सुद्धा कादंबर्‍यांचा प्रवास सुरु झाला. 'द हॉबिट' हे पीडीएफ स्वरुपात वाचल आणि मग समोरची पुस्तक पीडीएफ स्वरुपात वाचायची इच्छा होईना. आधीच जवळपास रु.६५०० मी एप्रिलपर्यंत अवांतर पुस्तकांमधे खर्च केले आणि घरच्यांना माझं पुस्तकवेड माहिती असल्याने ते पण पैसे देणार नाही हे मी गृहितच धरल होत. सरतेशेवटी हि ट्रायोलॉजी मला परवडेल अशा किमतीत एकाच पुस्तकात मिळाली. पुढे पैसे येतील तेव्हा मस्तपैकी पुस्तकखरेदी होईलच पण बुडत्याला काठीचा आधार.

आता निवांत वाचायला बसलीए. एक एक प्रकरण पुढ जातय तस तस छान वाटतय कि निदान ह्या पुस्तकांवर काढलेल्या चित्रपटांनी तरी हॅपॉ एवढी निराशा नक्कीच नाही केलीय. काही काही संदर्भ भलेही चित्रपटाच्या दृष्टिने तोडमरोडले असणार आणि वेळेअभावी कथेमधला वेळसुद्धा कमीजास्त केला असणार पण बर्‍याच अंशी पुस्तकाला न्याय्य दिलाय. आता वाटतय कि हॉबिट ला जस तिन भागात विभागल चित्रपट दाखविताना तसच ह्या ट्रायोलॉजी ला सुद्धा नऊ मधे विभागल असत तरिही बघायला मज्जा आली असती.

१९३७ मधे दुसर्‍या महायुद्धाच्या छायेखाली पुस्तकरुपात सुरु झालेली हि गोष्ट १९५५ मधे संपली. त्यानंतर २००१ मधे या कादंबर्‍यांचा चित्रपट रुपाने प्रवास सुरु झाला. पहिला चित्रपट पाहण्यात आला तेव्हा नेहमीच्या सवयीप्रमाणे मी गुगलींग केल आणि थक्कच झाले. ज्यावेळी आपण (अजुनही खर तर) प्रेमकथांमधे अडकलेलो होतो त्यावेळी या क्लासिक कादंबर्‍यांना चित्रपट स्वरुपात प्रदर्शित सुद्धा करण्यात आल होतं.

मराठी साहित्य जास्त आवडत मला वाचायला पण या मराठेतर साहित्यामधल जे काही वाचनात , पाहण्यात आलं त्यावरुन या लोकांची कम्माल वाटते. एखाद्याची कल्पना कुठ कुठ झेप घेऊ शकते हे बघुनच मी थक्क होते.

सर्वांना किमान ह्या पुस्तकांच नाव अथवा चित्रपट यापैकी काहीतरी माहिती असेल अशी अपेक्षा ठेऊन मी हे लिहिलयं. ज्यांनी अजुन पुस्तकांना हात नसेल लावला आणि फक्त चित्रपट पाहिले असतिल त्यांनी पुस्तकसुद्धा जरुर वाचावी अस मला वाटतं. चित्रपटातुन एकंदर गोष्ट माहिती असुनही प्रत्यक्षात लेखकानं जे लिहिलय ते वाचनं म्हणजे पुर्णपने निराळा आणि सुंदर अनुभव असतो हे परत एकदा मला कळलयं. वाचण्यासारख आणि संग्रही ठेवण्यासारख अजुन एक पुस्तक.

सद्ध्या एका मधेच सामावलेले हे ३ ( कि ६) पुस्तक Happy .. लवकरच हार्डकव्हर कॉपी बोलवेल तोवर हे.. जागते रहो.

WP_20150702_16_58_31_Pro-001_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेलकम टू मिडल अर्थ! टीना lotr माझी सर्वात आवडती fantasy series आहे. मी एकच म्हणेन की पुस्तकाबरोबर तू सप्लिमेंट्री मटेरियल पण वाच म्हणजे टोल्किन का महान आहे हे खऱ्या अर्थाने कळेल. त्याने एक अख्खी नवीन भाषा आणि लिपि बनवली जस्ट फॉर द बुक!! तू वाच पूर्ण मग elvish बोलू Happy
elvish संदर्भ : http://www.elvish.org

पायस,
पोस्ट्ल्यानंतर सर्वात पहिला प्रतिसाद तुमचाच.. मला वाटल कि एकली मीच चाहती आहे कि काय lotr ची.. नाही पुस्तक तर निदान चित्रपट सुद्धा न आवडणारा नसेलच या पृथ्वीतलावर अशी माझी पक्की खात्री इथ फोल ठरते कि काय अस वाटायला लागल होत..
क्लासिक चे चाहते तुम्ही आहात तर तुम्ही इथ येणार याची मनोमन खात्री होती मात्र Happy
येत्या १ २ दिवसातच संपवुन येते elvish शिकायला..

मी पण LOTR fan club ची पर्मनंट मेंबर. फेलोशिप चा चित्रपट आला तेव्हा काहीच कळलं नाही तो बघून. मग पुस्तकं वाचायला घेतली, आणि सुदैवाने हॉबिट पासून सगळी वाचायला मिळाली. तेव्हापासून जी फॅन झाले ती झालेच.

पण लॉर्ड ऑफ द रिंग्ज चे चित्रपट हॅ.पॉ. च्या चित्रपटांपेक्षा कैक पटींनी सरस आहेत.. त्यांनी पुस्तकांशी प्रामाणिक राहण्याचा खूप प्रयत्न केलेला दिसतो. आणि चित्रीकरण!! न्यूझीलँड ला तेवढ्यासाठी जायची माझी कधिची इच्छा आहे!

Welcome aboard Bagz ..

आणि चित्रीकरण!! न्यूझीलँड ला तेवढ्यासाठी जायची माझी कधिची इच्छा आहे! >> +१ मी पन आहे त्यासाठी लाईनीत Lol

स्वागत आहे Bagz . माझे एक वैयक्तिक मत असे आहे कि लॉर्ड ऑफ द रिंग्ज तिन्ही चित्रपट एकाच दिग्दर्शकाने दिग्दर्शित केल्याने खूप फरक पडला आहे. हॅरी पॉटरच्या आठ चित्रपटांत सुरुवातीला वेगळाच फील येतो, मग हॅरी मोठा झाल्यावर अचानक काहीतरी विसंगती जाणवायला लागते (३र्‍या पासून, आणि त्या चित्रपटाला दिग्दर्शक पहिल्यांदा बदलला). असं नक्की काय ते नाही सांगता येणार पण त्याने नक्की फरक पडला आहे.

यावरून ९गॅगवर पडलेली एक खवचट पोस्ट आठवली - हॅरी पॉटर vs. लॉर्ड ऑफ द रिंग्ज (फिल्म सीरिज)
हॅरी पॉटर, चित्रपट ८ - ० ऑस्कर
लॉर्ड ऑफ द रिंग्ज, चित्रपट ३ - १७ ऑस्कर (यातले एकट्या रिटर्न ऑफ द किंग ला ११)
(मला हॅरी पॉटर पुस्तक आवडतात पण चित्रपट किती गंडलेत यावर अगदी मार्मिक टिप्पणी आहे!)

>>मग हॅरी मोठा झाल्यावर अचानक काहीतरी विसंगती जाणवायला लागते (३र्‍या पासून

हो, अगदी. खरतर डंबलडोर चा रोल सर इयान मॅककेलन यांनी केला असता तर सही वाटलं असतं (त्यांना म्हणे विचारलं होतं, पण गँडाल्फ ची भूमिका नुकतीच केलेली असल्याने त्यांनी नकार दिला). मी हॅ.पॉ. चे चित्रपट कधी टी.व्ही. वर लागलेले दिसले तर प्रो. स्नेप चे सीन फक्त बघते. Happy

हॅरी पॉटर मधे खूपच बारीकसारीक पण फार महत्चाच्या, एकमेकांशी आणि मुख्य विषयाशी जोडलेल्या शेकडो गोष्टी आहेत, शिवाय हॅरीचे विचार/स्वगत सुद्धा कितीतरी आहेत.. हे सगळं चित्रपटात दाखवणं अवघड आहे. पण तरी असं वाटत राहतं की ते चित्रपट फक्त हॅ.पॉ. ची प्रसिद्दी कॅश इन करायलाच बनवलेत.

लॉर्ड ऑफ द रिंग्ज बघताना तसं वाटत नाही.

हो, अगदी. खरतर डंबलडोर चा रोल सर इयान मॅककेलन यांनी केला असता तर सही वाटलं असतं (त्यांना म्हणे विचारलं होतं, पण गँडाल्फ ची भूमिका नुकतीच केलेली असल्याने त्यांनी नकार दिला). >> हो पण मायकल गॅम्बन यांनी सुद्धा छान निभावलाय तो रोल.. सर मॅककेलन बद्दल तर काय बोलाव तेवढ कमीच आहे.. He is indeed a great actor..

हॅरी पॉटर मधे खूपच बारीकसारीक पण फार महत्चाच्या, एकमेकांशी आणि मुख्य विषयाशी जोडलेल्या शेकडो गोष्टी आहेत, शिवाय हॅरीचे विचार/स्वगत सुद्धा कितीतरी आहेत.. हे सगळं चित्रपटात दाखवणं अवघड आहे. पण तरी असं वाटत राहतं की ते चित्रपट फक्त हॅ.पॉ. ची प्रसिद्दी कॅश इन करायलाच बनवलेत.
लॉर्ड ऑफ द रिंग्ज बघताना तसं वाटत नाही. >>
ते यासाठी कि हॅपॉ चित्रपट निघाले तेव्हा पुस्तक ऐन जोमात होती त्यामुळ त्या पुस्तकांची ड्यु पब्लिसिटी चित्रपटांना हातोहात पुरलीसुद्धा. त्यातही रोलिंगबाईंनी त्यात पुर्णपने घेतलेला सहभाग. अगदी कलाकार निवडण्यापासुन.. त्यामुळ ती लिहिते ते छानच असतं आणि तिचा सहभाग आहे म्हणजे चित्रपट सुद्धा छानच असणार हि लोकांची धारणा होउन गेली..

माझ्यामते जो पहिले हॅपॉ चित्रपट बघतो त्यालातरी ते नक्किच आवडतात पण त्यानंतर जर पुस्तक वाचलेत तर नक्कीच चित्रपटांवरच प्रेम खुप कमी होउन जात पुस्तकांच्या तुलनेत.. फक्त प्रेम आणि एकमेकांबद्दलची काळजी या ज्या दोन गोष्टी रोलिंगबाईच्या पुस्तकात सर्वात जास्त ताकदिने मांडलेल्या आहेत आणि त्याच नेमक्या चित्रपटात तेवढ्या ताकदीन मांडण्यात दिग्दर्शक अयशस्वी झालाय.

याउलट lotr चित्रपटांमधे मुळ कथेला सर्वेतोपरी न्याय देण्याचा प्रयत्न त्याचा दिग्दर्शकाने केलेला दिसतो.. चित्रपटानुसार कथा फुलवायची याचा अर्थ मुळ कादंबरीसोबत प्रतारणा व्हायला नको याची पुरेपुर काळजी घेतलीए. म्हणुनच एक एक चित्रपट तब्बल साडे तीन ते चार तासांचा बनलाय.. निव्वळ कलाकारांची शस्त्रास्त्रे आकारास आणायला किती अभ्यास केलेला आहे..

रोलिंग यांनी स्वतः चित्रपट बनवताना घेतलेल्या सहभागामुळे कुठ काय कस असेल याबद्दल ती सांगु शकली पण इथ क्लासिक पिस असल्याने आणि मुळ लेखकसुद्धा हयात नसल्याने नेमक त्यांनी त्या त्या पात्राबद्दल कसा विचार केला असेल .. त्याची वेशभुषा, त्याच राहणीमान, त्याच सामान सर्व सर्व काही बरोब्बर असा शेरा द्यायला तो नसुनसुद्धा जसच्या तस वाटत..

जे के रोलिंग आता अतिरेकी व्यावसायिक होत आहेत का काय असे वाटते ! इतक्यातच कुठेतरी त्या आता "हॉग्वार्ट्स इन अमेरिका" ह्या थीम वर हैरी पॉटर चालवणार आहेत असे ही ऐकले आहे

लॉर्ड ऑफ़ द रिंग्स चा मी प्रचंड जास्त चाहता (चित्रपटांचा) अर्थातच कास्ट ते न्यूजीलैंड चे साउथर्न आल्प्स हे एक महत्वाचे कारण तर आहेच!! आपले आवडते पात्र अर्थातच किंग म्हणजे स्ट्राइडर किंवा गिमली आहे

आपले आवडते पात्र अर्थातच किंग म्हणजे स्ट्राइडर किंवा गिमली आहे ?? >> याचा अर्थ कळला नाही.. प्रश्न होता कि तुमच्याबद्दल सांगत आहे कि मला विचारत आहे कि माझ्याबद्दल गेस आहे ? किंवा कस आल तिथ ? आणि असायला हव ना ?

आज नेट रिजार्च ने मान टाकली .. धुगधुगी आहे जराशी पण कधी दगा देईल सांगता येत नाही..
चला आता फुलटाईम पुस्तकाला द्यावा म्हणते.. हवी तशी स्पीड नव्हती पकडली मी..
एक एक चाप्टर अधिकाधिक इंटरेस्टिंग होत चाल्लय..

रच्याकने,
इथ कुणी यावरच कार्टून बघितलय का ?
१९७८ मधली फिल्म आहे..राल्फ बक्षी यांनी डिरेक्ट केलेली ?
मला मिळालीय..म्हणजे टॉरन्ट त्याच.. डाउनलोडींग ला लावुन दिली.. मज्जा..
चलो आता पुस्तकांकडे वळते..

अरे मी पण याची फॅन आहे...
आता होते म्हणावे लागेल कारण पुस्तके वाचुन १२ वर्षे झालित (तप लोटले :-))

________________________________________

हो पण मायकल गॅम्बन यांनी सुद्धा छान निभावलाय तो रोल.. सर मॅककेलन बद्दल तर काय बोलाव तेवढ कमीच आहे.. He is indeed a great actor..

>> आणि तो सारुमान झालेले ख्रिस्तोफर ली या वर्षीच गेले, त्यांना व्हिलन ऑफ सेन्च्युरी अवार्ड मिळालेला
ड्राक्युलाच्या भुमिकेबद्दल हे फार कमी जणांना माहित असेल.

____________________________________________
अर्थातच कास्ट ते न्यूजीलैंड चे साउथर्न आल्प्स हे एक महत्वाचे कारण तर आहेच!!
>> +१

अरे वा...मस्त धागा...मी पण फॅन क्लबात....

पुस्तकाच्या निम्म्यानेही चित्रपटात डिटेल्स आलेल्या नसल्या तरी फारच झकास घेतले आहे. विशेषता युद्धप्रसंग - दुसऱ्या भागातले हेल्मस डीपच्या इथले युद्ध आणि शेवटचे महायुद्ध - जे काय जमलेय त्याला तोड नाही. कितीही वेळेला पाहिले तरी समाधान नाही.

हेल्मसडीपच्या वेळी अॉर्क्स चा आवाज ऐकून भेदरलेली पोरे आणि अगदी शेवटी गिमली तो हॉर्न वाजवतो आणि मृत्युला सामोरे जायला निघतात त्यावेळची सुरावट काय भेदक घेतलीये. अफाट केवळ अफाट.

व्यक्तिश मला फ्रोडोची व्यक्तिरेखा आवडली नाही. फारच आत्मकेंद्री असा वाटतो. मे बी, नंतर नंतर त्या चेनच्या प्रभावामुळे तसा झाला असावा.

पुस्तकं वाचून परत एकदा एक्सटेंडेड एडिशन पहिल्या होत्या चित्रपटाच्या. एक एक चित्रपट ४ तासांचा होता. खुप मस्त वाटलं होतं सगळे संदर्भ लागले तेव्हा.

हेल्मसडीपच्या वेळी अॉर्क्स चा आवाज ऐकून भेदरलेली पोरे आणि अगदी शेवटी गिमली तो हॉर्न वाजवतो आणि मृत्युला सामोरे जायला निघतात त्यावेळची सुरावट काय भेदक घेतलीये. अफाट केवळ अफाट. >> +१ काय संगीत आहे एकूणच!! अंगावर शहारे येतात!!

माझी आवडती व्यक्तिरेखा पुस्तकात अ‍ॅरागॉर्न तर सिनेमात गॅन्डाल्फ आहे. अ‍ॅरागॉर्नचे परिच्छेद इतके कमाल लिहिले आहेत पुस्तकात कि बास!! आणि सिनेमात गॅन्डाल्फ आवडण्याचे कारण स्पष्ट आहे - सर इयन मॅकिलेन!

रच्याकने ते १९७८ चे कार्टून अजिबात पाहू नका. वातावरण निर्मितीत प्रचंड मार खाल्ला आहे. डिस्ने ने lotr बनवलं तर कसं वाटेल? अ‍ॅनिमेशन पण फार बाळबोध आहे. पीटर जॅक्सनने दाखवलेली एपिक सीनरी आणि बॅकग्राऊंड्स समोर ही आवृत्ती अगदीच माती वाटते. वाईट नाही आहे पण इतके चांगले चित्रपट असताना पाहायची गरज नाही हेमावैम! त्यापेक्षा एक्स्टेंडेड एडिशन पाहावी म्हणजे पुस्तकाशी प्रामाणिक राहल्याचे समाधान पण लाभते.

LOTR ची tune कित्येक काळ रिंगटोन म्हणून ठेवली होती. मला तीन्ही चित्रपटांचे संवाद पाठ झालेत सगळे. Happy कितीतरी प्रसंग आहेत जे कितीही वेळा बघितले तरी पुन्हा पाहू शकते.

फ्रोडो चं पात्र वेगळंच आहे - त्याच्यात किती आंतरिक शक्ती असेल ज्याच्यामुळे रिंगच्या प्रभावापासून तो शक्य तितका वाचला. त्याचं आत्मकेंद्री वागणं बघून मलातर तो रिंगमुळे किती बिचारा झालाय असं वाटतं!

हे पाहिलंय का? http://xk3d.xkcd.com/702/

हेल्मसडीपच्या वेळी अॉर्क्स चा आवाज ऐकून भेदरलेली पोरे आणि अगदी शेवटी गिमली तो हॉर्न वाजवतो आणि मृत्युला सामोरे जायला निघतात त्यावेळची सुरावट काय भेदक घेतलीये. अफाट केवळ अफाट. >> +१

ह्याच्याशिवाय, मला तो सीक्वेंस अन म्यूजिक प्रचंड आवडते जेव्हा पिपिन च्या मदतीने गॅंडाल्फ़ बीकन्स ऑफ़ मिनास टिरिथ पेटवतो अन रोहान च्या घोड़ेस्वार योद्धयांस मदतीला बोलवतो.

धन्य..
माझ्याकडे सगळ्या एक्सटेंडेड एडिशनच आहेत.. धन्य त्या दिग्दर्शकाचे.

आशुचँप , सहमत .. पुस्तक वाचल्यावर मला तो चित्रपटात दाखविलेला फ्रोडो जास्त आत्मकेंद्री वाटला.. पुस्तकात अगदी एकुणएक डिटेल दिल्यामुळे त्याचे ते हाल का होत होते हे कळून येतं.

रच्याकने ते १९७८ चे कार्टून अजिबात पाहू नका. वातावरण निर्मितीत प्रचंड मार खाल्ला आहे. डिस्ने ने lotr बनवलं तर कसं वाटेल? अ‍ॅनिमेशन पण फार बाळबोध आहे. >> पायस १९७८ मधल्या अ‍ॅनिमेशनपटाकडुन काय अपेक्षा ठेवु शकतो ? त्यांनी ट्रॅडिशनल पद्धतीने ती बनवलीये हे डोक्यात ठेवुनच मी बघणारे.. Nonetheless, the film was an influence on Peter Jackson, as was detailed in the 'extras' of the DVD to The Lord of the Rings: The Fellowship of the Ring .(विकी वरुन साभार) म्हणुन काही वेगळ आहे का हे बघायची खुमखुमी Wink

माझी आवडती व्यक्तिरेखा पुस्तकात अ‍ॅरागॉर्न तर सिनेमात गॅन्डाल्फ आहे. अ‍ॅरागॉर्नचे परिच्छेद इतके कमाल लिहिले आहेत पुस्तकात कि बास!! आणि सिनेमात गॅन्डाल्फ आवडण्याचे कारण स्पष्ट आहे - सर इयन मॅकिलेन! >> अगदी अगदी.. अगदी सुरुवातीला फ्रोडो ला स्ट्रायडर कधी भेटतो कधी नाही अस झाल होत मला आणि त्यानंतर तो भाग परत परत वाचुन काढला मी..कथेमधे एकेकाची एन्ट्री सुद्धा भन्नाट दाखवली आहे ..

कितीतरी प्रसंग आहेत जे कितीही वेळा बघितले तरी पुन्हा पाहू शकते. >> Bagz, माझे पन पाठ झालेयत चित्रपट.. सुरु केला तर शेवटपर्यंत जातोच जातो.

शायर, रिवनडेल, बिल्बो च घर कसल मस्त लोकेशन घेतले आहेत त्यात..व्वा.

वाचणार्‍यांनो खर्र खर्र सांगा कुणाला पुस्तक वाचताना पेन पेन्सिल कागद न घेता पुस्तक संपवता आले ?
देवा सगळे नाव.. त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध..
वाचतेय वाचतेय..खुप सार्‍या गोष्टींचा खुलासा होतोय जो चित्रपट बघुन नव्हता झाला..

तर मित्रांनो,
जी पुस्तकं मी ३ ते ४ दिवसात संपवण्याची प्रतिज्ञा केली होती ती फोल ठरली.
आज पहिलं फेलोशिप ऑफ द रिंग संपवल. हॅरी पॉटर मी जवळपास आठवड्याभरात संपवले होते त्यावरुन वाटल कि हे पण संपुन जातील.. पण नाही.. ही पुस्तक जर्रा थकवणारी आहे माझ्यासारखीला ; कारण प्रत्येक वाक्याचा अर्थ आणि मागचा पुढचा संदर्भ ल़क्षात आल्याशिवाय समोर न जाण्याची सवय आहे मला.. अप्रतिम.. एक एक गोष्टीला अगदी घडी न मोडता उलगडून सांगण्याचे कसब या लेखकामधे आहे..
खरोखर बापमाणुस आहे हा लेखक..त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीला सलाम.. महायुद्धाच्या सावटाखाली हे जे काही त्यांनी लिहिलय, रचलयं ती पुर्णपणे alternate reality वाटते वाचतेवेळी. जाम इच्छा होते सर्वांवर विश्वास ठेवायची.

चला आता दुसर हाती घेते.. Wink

टीना, मी पण घेतलंय वाचायला.
त्या कातड्याच्या बूटाच्या धाग्यावर कुणीतरी प्रश्नं विचारला होता ना की मानव सोडून सगळ्या प्राण्यांना बूट न घालता कुठे पाय ठेवायचे ते बरोबर कळते म्हणून.
Wink

तर हॉबिटसही बूट घालत नसत म्हणे. त्यांचे पाय निसर्गतःच टणक कातड्याचे आणि तपकिरी केस असलेले असत.

तुच गं बस तुच.. एखाद्याला पुस्तकाची महति सांगितल्यावर ताबडतोब मीपन म्हणत ते वाचायला घेणारे म्हणजे देवमाणस वाटतात मला.. तुला पुस्तकी भाषेत एल्फ म्हणुया आपण Wink
वाचते वाचते अस म्हणत खुप पुस्तक लाईनअप केलीय मी अभ्यापायी भरभर वाचण्याचा आवाका असुनही ती लवकर हाती पडत नाही.. एखाद पुस्तक अर्धवट ठेवुन द्यायला पण जमत नाही म्हणुन एकतर संपवायच नाहीतर हातातच घ्यायच नाही असे पर्याय ठेवावे लागतात मला..

हॉबिट घेतलयस ना हातात ?

तर हॉबिटसही बूट घालत नसत म्हणे. त्यांचे पाय निसर्गतःच टणक कातड्याचे आणि तपकिरी केस असलेले असत. >> early days of human evolution Wink आपले पुर्वजही तसेच आहेत कि अजुन.. आपणच स्वत:ला जास्त लाडाच करुन ठेवल Lol

मल पायरेटेड पण चालतं गं!
गंमत अशी आहे की आमच्या गावात कुठलं पुस्तक विकणारं संस्थळ कॅश ऑन डिलीवरी ऑप्शन देत नाही आणि ऑनलाईन ट्रन्सेक्शन मी करत नाही.
परवा हैद्राबादेत जाऊन चार पाच दुकानांत लॉर्ड ऑफ द रिंग आणि ज्योती कामतने सुचविलेली अर्थ्स चिल्ड्रेन शोधली, पण नाही सापडली (क्विलिंगचं सामान सापडलं Wink )
त्यामुळे आता इबुक्सच वाचणार.

Pages