द हॉबिट आणि द लॉर्ड ऑफ द रिंग्ज

Submitted by टीना on 4 July, 2015 - 10:42

जे. के. रोलिंग यांनी लिहिलेल हॅरी पॉटर पुस्तक मायबोली मुळे खर तर वाचण्यात आलं. त्यापूर्वी चित्रपट पाहिले होते. पण जसं जसं पुस्तकात गुंतत गेली तसा तसा चित्रपट किती पोकळ होता हे जरा जास्तच जाणवायला लागलं. भलेही काहीजणांनी त्यांच्या भुमिकेला व्यवस्थित न्याय दिला आहे तरी खुप काही राहुन गेल याची जाणीव पुस्तक वाचल्यावर प्रकर्षाने जाणवली.

पहिले चित्रपट आणि नंतर पुस्तक हाति घेणे हा प्रकार इंग्रजी साहित्याबद्दल जरा जास्तच प्रमाणात झालाय माझ्याहातुन. यात आणखी एका पुस्तकाची भर पडलीय ती म्हणजे जे. आर. आर. टोल्किन यांच 'द हॉबिट' आणि 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' या पुस्तकांची. मला आठ्वत त्यानुसार १२वी मधे कि कॉलेजच्या सुरुवातीच्या वर्षात मी 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' चा 'द फेलोशिप ऑफ द रिंग' हा चित्रपट पाहिला. त्यानंतर मात्र त्या चित्रपटांच्या प्रेमातच पडली ते अगदी 'द हॉबिट' चा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होईस्तोवर. आजपावेतो त्या कादंबर्‍यांना हात लावायची हिम्मत होत नव्हती. पण हॅरी पॉटर वाचल्यानंतर भिड चेपली आणि मग परत त्यासारखाच ह्या सुद्धा कादंबर्‍यांचा प्रवास सुरु झाला. 'द हॉबिट' हे पीडीएफ स्वरुपात वाचल आणि मग समोरची पुस्तक पीडीएफ स्वरुपात वाचायची इच्छा होईना. आधीच जवळपास रु.६५०० मी एप्रिलपर्यंत अवांतर पुस्तकांमधे खर्च केले आणि घरच्यांना माझं पुस्तकवेड माहिती असल्याने ते पण पैसे देणार नाही हे मी गृहितच धरल होत. सरतेशेवटी हि ट्रायोलॉजी मला परवडेल अशा किमतीत एकाच पुस्तकात मिळाली. पुढे पैसे येतील तेव्हा मस्तपैकी पुस्तकखरेदी होईलच पण बुडत्याला काठीचा आधार.

आता निवांत वाचायला बसलीए. एक एक प्रकरण पुढ जातय तस तस छान वाटतय कि निदान ह्या पुस्तकांवर काढलेल्या चित्रपटांनी तरी हॅपॉ एवढी निराशा नक्कीच नाही केलीय. काही काही संदर्भ भलेही चित्रपटाच्या दृष्टिने तोडमरोडले असणार आणि वेळेअभावी कथेमधला वेळसुद्धा कमीजास्त केला असणार पण बर्‍याच अंशी पुस्तकाला न्याय्य दिलाय. आता वाटतय कि हॉबिट ला जस तिन भागात विभागल चित्रपट दाखविताना तसच ह्या ट्रायोलॉजी ला सुद्धा नऊ मधे विभागल असत तरिही बघायला मज्जा आली असती.

१९३७ मधे दुसर्‍या महायुद्धाच्या छायेखाली पुस्तकरुपात सुरु झालेली हि गोष्ट १९५५ मधे संपली. त्यानंतर २००१ मधे या कादंबर्‍यांचा चित्रपट रुपाने प्रवास सुरु झाला. पहिला चित्रपट पाहण्यात आला तेव्हा नेहमीच्या सवयीप्रमाणे मी गुगलींग केल आणि थक्कच झाले. ज्यावेळी आपण (अजुनही खर तर) प्रेमकथांमधे अडकलेलो होतो त्यावेळी या क्लासिक कादंबर्‍यांना चित्रपट स्वरुपात प्रदर्शित सुद्धा करण्यात आल होतं.

मराठी साहित्य जास्त आवडत मला वाचायला पण या मराठेतर साहित्यामधल जे काही वाचनात , पाहण्यात आलं त्यावरुन या लोकांची कम्माल वाटते. एखाद्याची कल्पना कुठ कुठ झेप घेऊ शकते हे बघुनच मी थक्क होते.

सर्वांना किमान ह्या पुस्तकांच नाव अथवा चित्रपट यापैकी काहीतरी माहिती असेल अशी अपेक्षा ठेऊन मी हे लिहिलयं. ज्यांनी अजुन पुस्तकांना हात नसेल लावला आणि फक्त चित्रपट पाहिले असतिल त्यांनी पुस्तकसुद्धा जरुर वाचावी अस मला वाटतं. चित्रपटातुन एकंदर गोष्ट माहिती असुनही प्रत्यक्षात लेखकानं जे लिहिलय ते वाचनं म्हणजे पुर्णपने निराळा आणि सुंदर अनुभव असतो हे परत एकदा मला कळलयं. वाचण्यासारख आणि संग्रही ठेवण्यासारख अजुन एक पुस्तक.

सद्ध्या एका मधेच सामावलेले हे ३ ( कि ६) पुस्तक Happy .. लवकरच हार्डकव्हर कॉपी बोलवेल तोवर हे.. जागते रहो.

WP_20150702_16_58_31_Pro-001_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे.आर.आर बद्दल वाचलय खुप तेंव्हा पासुन ठरवलय की ही सिरिज वाचायचिच. इपब डालो केलय, पण सध्या कामाच्या रगाड्यात पुर्ण सिरिज वाचण्याइतका वेळ मिळत नहिये, पण २०१५ संपायच्या आत ही सिरिज वाचुन काढायची आहे.
बाकी तुम्ही जर LOR आणि होबिटचे फॅन असाल तर खास तुमच्या साठी हे छोटुसं हॉबिट होम.

हॅपॉ नंतर मीपन हेच वाचायच ठरवल होत. खरच खुप मस्त पुस्तक आहे..
लिंक बघीतली मी.. लोक कित्ती शौकीन असतात याच मस्त उदाहरण आहे Lol .. आवडलं..
काय परफेक्ट बनवलय ते.. वॉव..

इथलं वाचुन मी पण डाउनलोड केल पुस्तक. आमच्या इथली लायब्ररीचा ऑनलाईन पर्याय पण आहे त्यात इबुक मिळाले. तिनही भाग एकाच इबुक मधे आहे. सुरुवातीला थोडीशी माहिती आहे हॉबिटबद्दल ती वाचतेय आता. हॉबिट वाचन गरजेचं आहे का LOTR सुरु करण्याआधी? सगळ्या सिनेमांच्या सिडिजही आणल्या आहेत. आज पासुन बघणार.

सहेली नक्की वाच Happy

पेरु हॉबीट हा पहिला भाग म्हटल तरी चालेल..
दोन्ही पुस्तक मुळात एकमेकांशी संलग्न आहे Happy त्यातले बरेच संदर्भ समोरच्या तीनही पुस्तकात येतात ..

हॉबीट सुद्धा खुप सुंदर आणि खिळवुन ठेवणार पुस्तक आहे. बिल्बो चे अ‍ॅडव्हेंचर आणि त्याच्या सोबत असणारे Dwarf, गँडॉल्फ आणि त्या एका रिंग चा प्रवास सुंदर वर्णिलेला आहे.. हॉबीट पासुनच सुरु करा. ते वाचल्यानंतर समोर वाचायला जास्त मजा येईल. विषेशतः हॉबिट्स मुळात कसे आहेत, Dwarf आणि ड्रॅगन, ट्रोल्स, Dwarf आणि वुडएल्व्ह्स (एकंदर एल्व्ह्स) मधली कटुता, बिल्बो ला थोरीन कडून मिळालेले गिफ्ट्स आणि इतरही बर्‍याच गोष्टी कळतील..कारण लॉर्ड ऑफ द रिंग्ज ची खरी सुरुवात हॉबीट मधुनच होते Happy ..
पण अगदीच मिळाल नाही तर ओके..

आणि आता सर्वात शेवटची लढाई उरलीय..म्हणजे बुक सिक्स ओन्ली..
दम धरुन बसलीए मी..आता डायरेक्ट १४ तारखेनंतर हात घालेल त्या पुस्तकाला..

आता काही प्रश्नोत्तर..

मी पुस्तक वाचताना मला सतत डोळ्यासमोर चित्रपत फिरत होता..इतक्या कमी वेळात खुप काही निभवायचा प्रयत्न केलेला त्यांनी जो खरच खुप स्तुत्य आहे.. पुस्तक अतिशय वाचनिय आहे..काहिही झाल तरी ओरिजनल ची सर कुठल्याच कॉपिला येत नाही हे खरचं..

स्पॉयलर :

पुस्तकात अ‍ॅरॅगॉर्न त्या भुतांच्या आर्मी ला आधीच ओथ मधुन मुक्ती देतो तर चित्रपटात त्यानं त्या भुतांना पार गाँडोर पर्यंत दामटवलय..चित्रपट तयार करणार्‍यांना का अस दाखवाव वाटल असेल बर ?
पाथ ऑफ डेड्स मधे अ‍ॅरॅगॉर्न त्याची पुर्ण कंपनी घेऊन जातो तर चित्रपटात फक्त हे तिघच जाताना दाखवलेय.. का ?---- चित्रपट तयार करणार्‍या चमुला यांना लार्जर दॅन लाईफ दाखवायच असेल म्हणुन असाव अस मला वाटत..

यात परत लेडी इयोविन ऑलमोस्ट मरणाकडे जाते तर चित्रपटात ती थिओडेन सोबत बोलताना दाखवलीये..इथं उगा सच कडवा होता है म्हणुन उगी उगी अस करत कल्पनाविलास करुन नै पुस्तकात तर निदान चित्रपटात तरी दिलासा अस काहीस आता वाटायला लागलय मला..

परत महत्वाच अस प्रिन्स इम्राहील हे पात्र मला चित्रपटात नै दिसल..खरय ना ? कि मलाच नै दिसल ?

अ‍ॅरॅगॉर्न पुस्तकात जेवढा खुंखार दाखवलाय तेवढा त्यामानाने चित्रपटात नै वाटला मला तरीही तो आवडलाय हि बात वेगळी..

पुस्तक वाचन्यापूर्वी काही पात्र कमी आणि काही मनाचे असे चित्रपटात टाकलेय अस वाचल होत ..
मला वाटल कि लिगोलास पन जास्तीचा आहे कि काय पण मग वाचताना भितभित वाचत गेली आणि तो आल्याच बघुन खुप दिलासा वाटला..

परत मुळ पुस्तकात लिगोलास आणि गिमली खुपच पक्के दोस्त दिले आहेत आणि चित्रपटात कॅट-डॉग..पण तसे बघतानाच जास्त मज्जा येते त्यांना Wink

Spoiler

आणखी एक,
पुस्तकापेक्षा चित्रपटात अ‍ॅरॅगॉर्न जरा दुर्लक्षिलेला वाटतो का तर..
गाँडोर च्या लढाई नंतर त्याचं The hands of the king are the hands of the healer, and so shall the rightful king be known. हे लोर साध्य करताना वाचन भारी वाटतं Happy

मज्जा आली थोडक्यात..आता क्लायमॅक्स परिक्षा झाल्यावर...यिप्पी..बहोत खुश आहे मी..आणि पुस्तक संपायला आल्यामुळे दु:खी पन Sad .. पुस्तकांच्या काही रचना हातच्या राखुन ठेवलेल्या असतात मी .. पुरवून पुरवून वाचायला. त्यात हिचं नाव बरच वर होत..जेव्हा पहिल्यांदा चित्रपट बघीतला होता तेव्हापासुन..आता ते संपायला आल्यामुळे खुपच कसतरी वाटत आहे. हातुन काहीतरी सुटल्यासारखं.. वाचन्यापूर्वी आहे शिल्लक आहे शिल्लक हा दिलासा असायचा आता तो नसणार Sad जरी परत वाचायला गेली तरी पुढं आता काय वाढून ठेवलय या अज्ञानातला आनंद परत अनुभवता नै येणार याच दु:ख मला किती होतं हे तुम्हाला नै समजावता येणार ..
Sad

घेतला एकदाचा हा सेट पण विकत..इपब होतं जवळ पण काही पुस्तकं प्रिंट वाचण्यातच मजा आहे. अ‍ॅमॅझोनवर बिलियन डिस्काउंट मध्ये 'Hobbit and lord of the rings' चा ४ पुस्तके असलेला सेट बर्‍यापैकी किंमतीत मिळाला. सध्या होबिट वाचायला सुरु केलय छान आहे. मजा येतेय वाचायला, पण LOTR सिनेमे आधी बहितलेत त्यामुळे त्यात जशी पात्र दाखवलिएत तशीच वाचताना मनात येतात, तो अनटच्ड फिलिंग नाही ह्यावेळेस वाचताना.
बाकी हॅपॉ चा सेट मी घेतलेल्या किमतीपेक्षा ४००/ रु यांनी स्वस्त पाहुन जळफळाट झाला.. (तरी मी लाइटनिंग डील मध्ये घेतला होता)
शिवा सिरिज चा कलेक्टर सेट चक्क ६००-७०० पर्यंत मिळत होता (१६००/- ला मिळतो जनरली तो)

झालं एकदाच हॉबिट वाचुन..
ठीक आहे, पण मजा नाही,कुठेच खिळवुन ठेवलं नाही ह्या पुस्तकाने.रोलिंग बाई जेव्हढा सस्पेन्स आणि क्लायमॅक्स तयार करतात त्याच्या आसपासही हॉबिट जात नाही. आता हे मान्य आहे की हॉबिट आणि एलोटीआर मधल्याच बर्याचश्या कल्पना रोलिंग बाईंनी घेतल्यात, पण रोलिंगची स्टाइअल खुप खिळवून ठेवते.
हॉबिट वाचताना फाफट पसारा वाचल्यासारख वाटत होतं, नंतर नंतर तर फक्त पुर्ण करायचय म्हणुन वाचत होतो.
आशा आहे की "लॉर्ड ऑफ द रिंग्स" बोअर करणार नाही. सध्या ऑफिशियल पुस्तक वाचुन पुर्ण करायचं आहे मग ते झाल्यावरच LOTR सुरु करता येइल.
रच्याकने जर LOTR च्या तिन पुस्तकातुन ३ सिनेमे बनले, पण हॉबिटच्या एकाच पुस्तकातुन ३ सिनेमे बनवलेत (अजुन पहिले नाहीत) पण खरच हॉबिट मध्ये असं काहीही मला तरी सापडलं नाही..

खरं तर मी LOTR अजून वाचायला सुरुवात नाही केली आहे माझी बहिण LOTR ची खूप चाहती आहे तिच्याकडे LOTR ची मराठी अनुवादित पुस्तकं आहेत. कोणी ही पुस्तकं मराठीतून वाचली आहेत का ??

टिनू - LOTR ची मी सुद्धा खूप चाहती आहे.
मुव्ही आधी पाहीला... एकदा pcmc च्या सावरकर लॅब मध्ये गेलेले, तेव्हा मला ही पुस्तके सापडली मराठी अनुवादीत.
मस्त अनुवाद आहे. राजाचे पुनरागमन , दोन मनोरे, मीनास टिरीथ वगैरे नावे आहेत.
हॉबिट सुद्धा आहे.

हो हॉबीट पण आहे तर मग मी आता लवकरच सुरुवात करतो पुस्तक वाचायला मराठीतून सिद्दी तुम्ही इंग्रजीतून पण वाचले आहेत का??

लॉर्ड ऑफ द रिंग्ज चा उल्लेख आलाय तर माझेही दोन शब्द.
Lol
जेव्हा लॉर्ड ऑफ द रिंग्ज चे तिन्ही भाग मिळाले, तेव्हा एका दिवसात सगळे भाग बघून काढले. गंमत म्हणजे मी हॅरी पॉटरचे भाग आधी बघितले होते, आणि त्यानंतर लॉर्ड ऑफ द रिंग्जचे बघितले.
प्रत्येक चित्रपट साडेतीन तासाच्या वर आहे, पण तरीही बोर होणं सोडाच, पुढे काय, पुढे काय, अशी उत्सुकता लागून राहिली होती. कलाकारही काय जबरदस्त घेतलेत (केट ब्लानचेट अजूनही तशीच दिसते.)
ते हॉबीटच शायर, नदीतून जाताना दिसणारे पूर्वजांचे भव्यदिव्य पुतळे, आणि भीषण शेवटची लढाई, अप्रतिम.
मग यानंतर इंग्रजीतून पुस्तके वाचणं आलंच. यात मात्र थोडीशी मलाच भाषा जरा जड वाटली. तरीही नेटाने वाचूनच काढलीत. मात्र मराठी अनुवादापेक्षा हिंदी अनुवाद जबरदस्त रंगलाय, हे माझं वैयक्तिक मत.
हॉबीट मधला माझा वैयक्तिक आवडता पार्ट म्हणजे smaug!!! बेनेदिक्तचा आवाज आणि सोन्यात फिरणारा smaug... जबरदस्त...
बॅटल ऑफ five आर्मीज त्यामानाने तेवढं रंगल नाही.
होबिटची पुस्तके मात्र आवडली आणि अनुवाद देखील...
Silmarion कुणी वाचलंय का???

हॉबीटच शायर, नदीतून जाताना दिसणारे पूर्वजांचे भव्यदिव्य पुतळे - जबरदस्त यार.... आज परत बघेन म्हणते. Lol Lol Lol

अजून एक!
हॉबिटचं गाणं!

फ्रॉम ओव्हर द मिस्टी माउंटेन्स कोल्ड!!!
ऐकताना अंगावर थंडगार शहारे आणत...
(जबलपूरला भेडाघाट मध्ये रात्री थन्डित कुडकुडत होडीतून चकाकणारे मार्बल रॉक्स बघताना हेच गाणं आठवत होतं.)
नक्कि बघा सिद्धि!!!

फ्रॉम ओव्हर द मिस्टी माउंटेन्स कोल्ड!!!
ऐकताना अंगावर थंडगार शहारे आणत.
- खर भारीच आहे.

LOTR ची ringtone तर आज चार वर्षे माझ्या मोबाईलला वाजते. आधी आई, मग नवरा बिच्चारे सगळे वैतागले ऐकूण, ऐकूण . Lol Lol Lol

LOTR ची ringtone तर आज चार वर्षे माझ्या मोबाईलला वाजते. आधी आई, मग नवरा बिच्चारे सगळे वैतागले ऐकूण, ऐकूण >>>>>>>>>>>>>
भारीच!!!!!!1
माझी होती बरेच दिवस, मग 'राजे इले राजे,' असं वाजल्यावर आई चिडवायला लागली. आनि तिची जागा शेप ऑफ यु ने घेतली... Happy

The सिल्मारिलिओन!

हे टॉल्किनच रिंग्ज आणि हॉबिटशी निगडित माझं सगळ्यात आवडत पुस्तक. का? कारण यात सगळंच येत. हे अनवट वाटेने जाणार, विस्कळीत वाटणारं अर्धवट पुस्तक टॉल्किनने निर्माण केलेल्या जगाची संपूर्ण माहिती देत...

या पुस्तकाचे पाच भाग आहेत.
Ea ची निर्मिती कशी झाली?
Valar आणि maiar विषयी माहिती.
तिसरा भाग हा हॉबिट आणि लॉर्ड ऑफ द रिंग्जच प्रिक्वेल म्हणता येईल. (चुकवू नका)
चौथा आणि पाचवा भाग लॉर्ड ऑफ द रिंग्ज शी संबंधित आहे.

तुम्ही मेबी द शायर थीम विषयी बोलता आहात,
मी बॅटल थीम विषयी बोलतोय.
पण आता हे डिस्कशन इथेच थांबवूयात, कारण आपण कुठेही गप्पा मारायला लागतो हा आरोप आपल्यावर आधीच झालेला आहे... Lol

अर्रर्र.. एवढ्या आवडत्या विषयाचा धागा एवढ्या लेट बघितला
मी जबरदस्त फॅन आहे लॉर्ड .. आणि हॉबिट चा
एवढे झपाटलेपण दिलय ह्या सीरिजने कि त्याचा उतारा अगणित फँटसी चित्रपट बघूनहि सापडलेला नाही
कथा, लोकेशन्स, पात्र, युद्ध आणि संगीत.. सगळं केवळ अफाट आहे.
पराक्रम आणि थक्क करणाऱ्या युद्धकौशल्या मुळे लीगोलस माझं सगळ्यात आवडत पात्र आहे.
पुस्तके नाही वाचलीत मी पण मुवि सीरिजची पारायने झाली आहे,
किती मेहनत घेतली आहे पीटर जॅकसन ने ते मेकिंग बघितल्यावर कळते.
मुळात शतकातल सर्वोत्तम साहित्य आणि तेही एवढा आवाका असणारं पडद्यावर आणणे
हेच एक चॅलेंज होत आणि ते उत्तम पार पडलय.
..आता लवकरच मराठी पुस्तकं पण वाचतो

अहो , अज्ञातवासी LOTR चा भारतीय भाषांत फक्त मराठीतच अनुवाद झालाय हिंदी अनुवाद तर झालाच नाही आहे आणि तुम्ही म्हणतात की हिंदी अनुवाद रंगलाय. खोटं बोलण्याची पण काही परिसीमा असते की नाही ?? हा हा हा

धन्यवाद टिनू, फक्त मला खोटं ठरवण्यासाठी प्रतिसाद दिल्याबद्दल. नाहीतर तुमचा मायबोलीवर फार वावर दिसत नाही.
आणि हो, मी कन्फ्युज झालो होतो, पण ते हॅरी पॉटर आणि लॉर्ड ऑफ द रिंग्ज मध्ये होतं. ते हॅरी पॉटर विषयी झालं होतं. आता बदल करू शकत नाही, कान्ट हेल्प!
बादवे... माझ्या खोट्या बोलण्याची परिसीमा तुम्ही बघितली आहे का? आय मिन, आपली ओळख असेल म्हणून विचारतोय...

Pages