माझी आई (इंदिरा वैद्य - १९३०:२०१२)

Submitted by मोहन वैद्य on 16 December, 2012 - 01:26

साधीच राहणी साधीच विचारसरणी
आई तुझी नव्हती कधी कशाचीच मागणी

जे मिळेल ते खाणे साधी वसने लेणे
विना तक्रार जिणे अजात शत्रू असणे

नाटकात अभिनय केला
आयुष्यात न दाखविला

पतिसेवेत जीवन गेले
तेच तुवा कृतार्थ मानिले

तव सेवेस जरी वंचिले पुत्र कुणी
तु न कधी झिजविशी तक्रारवाणी

हळवे भाबडे मन आज गेले
जगातले साधेपण मरण पावले

चारित्र्यसंपन्न साधेपणाचा दीप तू लाविला
तव पश्चात त्यानेच आमचा मार्ग उजळला

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_()_

आई बद्दल लिहणेच अवघड असते .कारण लिहायचे म्हटले कि आभाळ फाटते .पावसाच्या पाण्या सारखे सारे हातातून निसटून जाते