तळणाशिवाय दहीवडे

Submitted by मृण्मयी on 6 July, 2015 - 10:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी (बिनसालांची) उडीद डाळ
(तिखटपणानुसार) हिरवी मिरची
पेरभर आल्याचा तुकडा
मीठ
भरपूर दही
साखर
भाजलेल्या जिर्‍याची पावडर
हिरवी मिर्ची आणि आलं वाटून त्याचं गाळलेलं पाणी
चिंच-खजूर गोड चटणी
कोथिंबिरीची चटणी
काश्मिरी तिखट पूड

क्रमवार पाककृती: 

-डाळ ६-८ तास भिजवून घ्यावी

- उपसून, पुन्हा स्वच्छ धुऊन, मिक्सरमधून बारीक वाटावी. वाटतानाच त्यात आलं, मिर्ची आणि मीठ घालावं. पीठ फार पातळ किंवा अती घट्टं असू नये.

-एकीकडे (झाकण असलेला) नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवावा.

-पिठात २ टेबलस्पून इनो फ्रूट सॉल्ट घालून हलक्या हातानां फेटून घ्यावं. पीठ २-५ मिनिटं बाजूला ठेवावं.

-गरम तव्यावर चमचाभर पीठ घालत जावं.

dahivade-1-maayboli.jpg

-तव्यावर मावतील एवढे वडे घालून झाल्यावर आच मध्यम करून झाकण ठेवावं.

-साधारण २ मिनिटांनी झाकण काढून किंचित तेल सोडून वडे उलटावे.

-दुसर्‍या बाजूनं सोनेरी रंगावर खरपूस करावे.

-कढत पाण्यात १-२ मिनिटं ठेवून, हलक्या हातांनी पिळून, मीठ-साखर-आलंमिर्ची वाटणाचं पाणी घातलेल्या दह्यात सोडावे.

-२-३ तास फ्रिजमध्ये गार करून, वरून चटण्या घालून खावे.

dahivade-2-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
साधारण ४-५ माणसांना, इतर पदार्थांबरोबर पुरेसे
अधिक टिपा: 

-आवडत असेल तर पिठात ओबडधोबड कुटलेले मिरे घालावे.

-वडे फार कोरडे आणि कडक वाटले तर पाणी भरपूर गरम करून जास्त वेळ बुडवून ठेवावे.

-पाककृतीला नाव सुचवल्याबद्दल शुगोल ह्यांचे आभार. Happy

माहितीचा स्रोत: 
तरला दलाल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली, दहीवड्यांची कथा आणि फोटो मस्त!
गुबगुबीत बाळ वडे दह्याची नक्षीदार दुलई पांघरून गुरगटून झोपलेत असं वाटतंय. डू नॉट डिस्टर्ब! >> Biggrin

सगळेच फोटो भारी, दहिवडे अती आवडते!( मला दहीवडे खाताना कुणिही आपल्याशी बोलुही नये अस वाटत.. अगदी हळुहळु आस्वाद घेत खावे ..असो भलतच विषयान्तर!)

(एक प्रामाणीक प्रशन : तळलेले वडे पाण्यात टाकल्यावर बरचस तेल तर तसही निघुनच जात ना! मग, गिल्ट तर तसाही यायला नको! ...असो तळायपेक्षा खटाटोप कमिच आहे हा)

प्राजक्ता,
तळलेले वडे पाण्यात टाकल्यावर बरचस तेल तर तसही निघुनच जात ना!>>> हो पण बरचसं राहतं ही ;). तळताना नक्की काय केमिकल रीअ‍ॅक्शन होते माहित नाही. पण भरपूर तेलात तळलेले विरूद्ध अगदी थेंबभर तेलात केलेले (आप्पेपात्रात नक्की भाजले जातात किंवा शिजतात कल्पना नाही) यात मी चवीत का ही ही फरक नसल्यास दुसर्‍या पर्यायाला प्राधान्य देईन. आणि तू म्हणतेस तसा खूप कमी खटाटोप वाटला.

अंजली, दहीवड्यांचे फोटो सुंदर आहेत. पहिल्या फोटोतले दहीवडे मस्तं खमंग आणि जरासे इंग्लिश मफिन्ससारखे दिस्ताहेत. तव्यावर पसरलं म्हणजे पीठ थोडं पातळ झालं असावं. अप्पेपात्रात केले तेव्हा माझं पीठ बहुतेक जाड आणि घट्टं होतं, म्हणून शिजायला वेळ आणि तुटणे प्रकार झाले. आता टिप्स लक्षात ठेवते.

आशुएडे, Lol

दहीवडे जामच आवडीचे असल्यानं ट्राय केले. तव्यावर जरा उत्तप्पे झाले म्हणून अप्पेपात्रात केले. अतततततततिशय भारी झाले. तळलेले होतात तेवढे.
शंभर धन्यवाद.

काल वडा सांबारसाठी अशा पद्धतीनं वडे केले. फ्रूट सॉल्ट नसल्यानं अर्थात घातलं नाही Proud दहीवडे बाफवर लिहिलेल्या युक्तीप्रमाणे थोडं मीठ घालून फेटून घेतलं पीठ. तव्यावर टाकल्या टाकल्या छान फुलून येत होते. कमी तेलात मस्त कुरकुरीत वडे झाले. आयडियेसाठी धन्यवाद Happy

हे फोटो-

image1(1).JPGimage4(1).JPG

प्रयोग म्हणून एक घाणा आपेपात्रात काढला. ते पण छान फुलले आणि आत जाळी-बिळी पडली तरी बाहेरून कुरकुरीत झाले नाहीत, कोरडे वाटले. अगदीच पथ्यकर व्यक्तीसाठी करायचे असतील तर आप्पेपात्राचा पर्याय चांगला आहे असं माझं मत झालं.

image2(1).JPG

अरेच्चा, हे वाचलेच नव्हते. भन्नाट कल्पना आहे. सर्व मुलींचे वड्याचे फोटो पण मस्तालेत. अंजली व तॄप्तीची कल्पना वापरुन करण्यात येतील.

मी ३ डाळी(उडिद+मुग_+ह.डाळ) समप्रमाणात घेवुन आप्पेपात्रात केले. अगदी चिमुटभर सोडा घातला, मस्त फुलले होते, php4GdN1IAM.jpg
आप्पेपात्राच्या आयडियासाठी थॅन्क्यु!

Pages