स्वित्झर्लंड भाग १० - रिगी

Submitted by kulu on 7 July, 2015 - 03:13

आधीचे भाग
स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810
स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827
स्वित्झर्लंड भाग ५ - बॉटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/52991
स्वित्झर्लंड भाग ६ - युफ http://www.maayboli.com/node/53065
स्वित्झर्लंड भाग ७ - सुरसी http://www.maayboli.com/node/53248
स्वित्झर्लंड भाग ८ - अर्नीसी ! http://www.maayboli.com/node/53359
स्वित्झर्लंड भाग ९ - आईनसिडऽन आणि इन्नरथाल http://www.maayboli.com/node/54499

थंडी ऑलरेडी सुरु झाली होती. डिसेंबर होता. डिसेंबर ला मार्था बेक्कार महिना म्हणायची! कारण सुर्य जवळ जवळ नसायचाच. पण एक दिवस अचानक चक्क तो बाहेर आला. अगदी लखलखीत! आणि मार्था ने मला बाहेर पिटाळले...रिगी बघायला.
रिगी म्हणजे पर्वतांची राणी! स्वित्झर्लंड्च्या बरोबर मधे असलेली ही पर्वतराणी जवळ जवळ ६००० फुट उंच आहे. श्विझ नावाच्या कॅन्टॉन मध्ये ती आहे. रिगीच्या पीकला अर्थ-गोल्डाऊ इथुन जी रेल्वे जाते ती युरोपातल्या सर्वात जुन्या रेल्वेज पैकी आहे. अगदी छोटुशी!


रेल्वेत माझ्या शेजारी एक गतिमंद मुलाला घेऊन त्याचे वडील बसले होते. तो मुलगा इतका खळखळुन हसत होता की सगळ्यांचे लक्ष्य त्याच्या त्या निरागस हसण्याकडेच होत! Happy

हे अर्थ गोल्डाऊ खेडं! आपल्याकडे जसं एखाद्या धर्मस्थळी अगदी मटणाच्या दुकानापसुन ते बंगल्यांना देखील त्या देवाचे नाव दिलेले असते तस इथे सगळ्याची नावे रिगीशी रिलेटेड!

आमच्या आणि सुर्यच्या मधे खुद्द रिगी होती. आम्ही अंधारात होतो. आणि आमची रेल्वे आम्हाला "तिमिरातुनी तेजाकडे" नेत होती.

आलो आलो प्रकाशाच्या प्रदेशात!

त्या टोकाला जायचंय!

रिगी रेल्वे एका ठराविक ठिकाणी आपल्याला नेऊन सोडते. तिथुन जरा चढलं की आपण रिगीच्या टोकाला पोहोचतो
नुकताच हिमवर्षाव होऊन गेला होता. त्याच्या शुभ्रखुणा सगळीकडे दिसत होत्या!

टोकाला लवकर सुर्यप्रकाश पोहोचल्याने तिथला बर्फ वितळला होता. आणि ही पायवाट मोकळी झाली होती. जराशी विरक्तच वाटली मला!

पोहोचलो वर!

रिगीच्या तिन्ही बाजुला तीन तळी आहेत!
त्यातले हे झुग चे तळे! त्यात रिगी स्वतःचीच सावली न्याहळुन पाहत होती!

आणि हे लेक ओफ लुत्झर्न!

वरच्या कुरणावर कुठे फिरु न कुठे नको असे झाले होते मला. बाम्बी नावाच्या हरणाच्या पडसाबद्दल एक धडा होता शाळेत आम्हाला. बाम्बी सारखीच अवस्था झाली माझी.

य्हे पाहिलं की लक्ष्यात येईल की रिगीला पर्वतांची राणी का म्हणतात. चारही बाजुना पर्वत दिसतात. अगदी दुरदुरचे! जणु रिगीच स्वयंवर सुरुय आणि हे पर्वत आलेत तिच्याशी जन्मोजन्मीची गाठ बांधायला!

कुरण खरंच अगदी तिरकस चालीच होतं!

त्यावर चालणारा मी आणि ह समोरचा सोडुन कोणीही नव्हता! तसं बागडणं दमछक करायला लावत होतं. कारण एकतर थंडी मुळे अंगावर बरंच काही घातलं होतं आणि हवा विरळ!

तिथेच अगदी दिसायला माझ्यासारखा आणि सेम माझ्यासारखे कपडे घातलेला मुलगा दिसला. त्याचेही नाव कुलदीप मोरेच Proud

खुपच बागडल्याने दमलो! नेहमीचं आवडतं रोष्टी आणि रिवेल्ला हा लंच घेतला!
आणि समोरच्या दृश्याकडे फक्त पाहत बसलो!
"आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे" असं झालं होतं. कसले विचार नाहीत.कसं खुप कमी वेळा होतं. असं वाटलं की या क्षणी काहीही मागितलं तरी देव देईल पण अशावेळी आधीच ओंजळीत इतकं दान पडलेलं असतं की अजुन काही मागायचं तरी काय आणि ते आपण सांभाळु शकणार तरी किती वेळ! आहे तेच पुरेल किती जन्मांसाठी! किती सुंदर ग्रहावर जन्माला आलो आपण! का माहित नाही अशावेळी एकतर जीवन संपावे किंवा अनंत काळासाठी ते स्थगित व्हावे असं वाटत रहातं! जे अनुभवतोय ते तसंच चालु रहावं असं वाटत रहातं!

जायची घटिका जवळ आली. जाताना वित्झ्नाऊ मार्गे जाणारी ट्रेन घेतली!
वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?

जाताना लुझर्न चा तळं सोबत करत होतं! धुक्याची दुलई होती त्याच्यावर अजुन!

कडेच्या वित्झ्नाऊ वर सुरेख ऊन!
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे

अजुन एक दिवस थक्क होण्यात गेला!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्ये ह्ये ह्ये एव्हढाले फोटो तुम्ही कसे लोड करता बुवा? आम्ही तर आपले १५० केबीच्याच घोळात अडकलेले असतो.

खुलासा करावा
-- हुक्मावरून

सर्वांचे खुप खुप आभार! Happy
रॉबीनहुड, श्री यांनी जे सांगितलेय तेच मी करतो. पिकासावरुन लिंक देतो!

तुझ्या फोटोसकट सगळंच अप्रतिम. ___/\___.

हे असं लिहिणं पण तोकडं वाटायला लागलं, कुलु. जे काही वाटतंय बघुन, वाचून.

त्यामुळे भारतीताईना मम.

अरे काय हे. छळ आहे नुसता!

पण आता मी जवळ आहे बरं स्वित्झर्लॅड च्या. तुमच्या अश्या लेखांनी अगदीच त्रास झाला तर जाऊनच येईन सरळ.