हिरव्या आकाशातील तारका

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 July, 2015 - 07:23

ह्या वर्षी मदनबाण अगदी जोमाने बहरला. मदनबाणच्या वेलीवर छोटे कोंब फुटतानाच जाणवत होते की ह्यावेळी काही वेगळाच नजारा पहायला मिळणार. कोंबावर पांढरे लांबट मोती दिसू लागले.

१)

हळू हळू हे मोती टपोरे होत कळीदार धार त्याला आली.
२)

काही कळ्या झुबक्यांनीही आल्या होत्या.

३)

४)

मला हे कळीच रुप खुप आवडत.
५)

६)

७) ज्या दिवशी झाड फुलल त्या दिवशी जणू आकाशातील तारकाच जणू आपल निळ आकाश विसरून ह्या हिरव्या आकाशात चमचमताहेत असे वाटत होते.

८)

९) सगळ्या परीसरात सुगंधी सुगंध गडे झाले होते.

१०)

११)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास!

बापरे बाप.. किती ती फुले.. मस्तच.

अजुन आहे का बहर?

माझ्याकडे मोग-याला इतका नाही पण ठिकठाक बहर येतो,. पण एकदाच येतो. मी यावर्षी बहर गेल्यानंतर पुर्ण मोगरा छाटला. त्याला परत नविन कोंब फुटले आणि त्या फुटलेल्या कोंबावर नविन फुले आली.

जागू,
अतिशय देखणे.खूप तृप्त वाटत असेल ना.
मला हे कळीच रुप खुप आवडत.>>>> अर्धोन्मिलित असा सुरेख शब्द आहे त्याला. मलाही अशी टपोरलेली कळी खूप आवडते.माझ्या मामाकडे ७-८ अनंताची ( चटकचांदण्यांची) झाडे लावली होती.४.५-५ फूट उंचीच्या झाडे अशीच अंगभर फुलांनी डवरलेली पाहिली होती.त्याची आठवण झाली.त्यावेळी मनात चांदण्यांनी भरलेली झाडे असाच विचार आला होता.

वाह! केवढा तो बहर.. सुगंध जाणवतोय अगदी..
पावसाने गच्च भिजला की अजून काही दिवसात बांधावा लागेल कुंपणाला.. Happy