मायबोली वर्षाविहार २०१५ दवंडी

Submitted by ववि_संयोजक on 3 July, 2015 - 02:28

पावसाळ्याची चाहूल लागली रे लागली की समस्त मायबोलीकर ज्याची वाट अतिशय उत्सुकतेने पाहात असतात असा वर्षाविहार २०१५ येत आहे खास आपल्यासाठी!

मायबोली ही आजपर्यंत हजारो मायबोलीकरांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाली आहे. मायबोलीवरचे लेखन, इतर अनेक उपक्रम, चर्चा, गप्पा, चेष्टा-मस्करी, विनोद (आणि येथेच झडणारी तात्विक चर्चावादळे वा मतभेद) यांबद्दल मायबोलीच्या सभासदांचे कुटुंबिय रोज काहीतरी ऐकत असतातच. मायबोलीच्या वर्षाविहार उपक्रमाद्वारे त्यांनाही ती खमंग चर्चा, धमाल-मस्ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळते आणि तीही इतर मायबोलीकरांसमवेत!

वर्षाविहाराचे (ववि) निमित्त साधून आंतरजालाच्या या आभासी जगातील अनेक आभासी आयडीज् प्रत्यक्ष रूपात एकत्र येतात, नव्या ओळखी होतात, जुन्या ओळखींचे पुनरुज्जीवन होते, काही ओळखी मैत्रीत बदलतात तर आपल्या नित्य परिचयाच्या असलेल्या मायबोलीकरांचीही एक वेगळी ओळख साध्य होते. नेहमीचे वाद, स्पर्धा, समज-गैरसमज, मतभेद इत्यादी बाजूला सारून नवीन ओळखी होतात व नवे मैत्र जुळते.

यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे रविवार, २६ जुलै २०१५ या दिवशी, खोपोली येथील यू.के.’ज्‌ रिसॉर्टच्या साथीने. पाऊस तर दरवर्षीचा सांगाती असतोच!

पण मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणे हेही गरजेचे आहे.

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी.
वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले/आई-वडील) येऊ शकतात. आपले इतर नातेवाईक/मित्र-मैत्रिणी यांनाही वविला यायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे मायबोलीचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी varshaavihaar2015@gmail.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.

नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती ई-मेलमध्ये देणे आवश्यक आहे.

१. नोंदणी करणार्‍याचे नाव
२. मायबोलीचा user id
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक )
४. कुठल्या शहरातून येणार (मुंब‌ई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला email id
६. सहभागी होणार्‍या एकूण व्यक्तींची संख्या, स्त्री, पुरुष, त्यांचे पूर्ण नाव आणि त्यांचे वय
७. लहान मुले ( १ ते ३ किंवा ३ ते १० वयोगट) असल्यास त्यांचे पूर्ण नाव आणि वय
८. मायबोली ग्रुपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९. बरोबर असलेल्या लहान मुलाला/मुलांना बसमध्ये स्वतंत्र सीट हवी आहे का?
१०. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनला‌ईन?
११. वविला काढण्यात येणार्‍या छायाचित्रासंदर्भात खाली इंग्रजीत दिलेले डिस्क्लेमर वाचा आणि तुम्हाला कोणता पर्याय हवा आहे तो इथे द्या.

नावनोंदणीची अंतिम तारीख आहे १८ जुलै २०१५.

नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.

वर्षाविहार-२०१५ वर्गणी आहे :

मुंबईसाठी :-
प्रौढ : रु. ९००/-प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ५५०/-, बस : रु. ३००/-, इतर खर्च : रु. ५०/-)

पुण्यासाठी
प्रौढ : रु. ९५०/-प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु ५५०/-, बस : रु.३५०/-, इतर खर्च : रु. ५०/-)

मुले (वय ३ ते १० वर्षे) : रु. ४२५/- प्रत्येकी (रिसॉर्ट फी). आणि बसमध्ये बसायला स्वतंत्र जागा हवी असल्यास बसचे वर दिल्याप्रमाणे मुंबईसाठी ३०० रु./- आणि पुण्यासाठी ३५० रु./-

३ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.

१० वर्षापासून पुढे रिसॉर्टचा पूर्ण आकार लागेल.

रिसॉर्ट च्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा बिस्किटे यांचा समावेश आहे.

वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी ५० माणसांप्रमाणे धरला आहे. संख्या कमी झाली तर प्रवास खर्च कदाचित जास्त येऊ शकतो.

(इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्‍या खर्चाचा अंतर्भाव आहे.)

पुणे आणि मुंबई इथे १९ जुलै २०१५ या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: १९ जुलै २०१५, सं. ५.३० ते ८.००

मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: १९ जुलै २०१५, सं. ५.३० ते ८.००

समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केले तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.

स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.

ऑनला‌ईन पैसे भरणार्‍यांना ज्या अका‌ऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल. जे बँक डिटेल्स ऑनलाईन ट्रान्सफरसाठी दिले जातील, त्या अकाऊंटमध्ये कॅश डिपॉझिट करु नका.

ऑनलाईन पैसे भरण्याकरता १९ तारखेपर्यंत वाट पाहायची गरज नाही.

प्रत्यक्ष पैसे भरणार्‍यांपैकी कोणाला १९ला पैसे भरायला येणे शक्य नसेल तर त्यांनी आधीच संयोजकांशी संपर्क साधून तसे बोलून घ्यावे.

मुंब‌ई आणि पुणे सोडून इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

वर्षाविहार २०१५ संयोजन समिती :

पुणे -

मयूरेश कंटक (मयूरेश) (भ्र्.क्र.-९९२२४०१७७८)
योगेश कुळकर्णी (योकु) (भ्र.क्र.-९९३००५६९६३)
मल्लीनाथ करकंटी( मल्लीनाथ के):
हिमांशु कुलकर्णी (हिमस्कूल)

मुंबई -
आनंद चव्हाण (anandmaitri) (भ्र.क्र.-९७६९४५४४२९)
राजू रविंद्र (राजू७६) (भ्र क्र.-९८२०५८४०८३)
संदिप शिंपी (संदिप एस) (भ्र क्र.-९९८७०५३४४३)
अमित देसाई (बागुलबुवा) (भ्र क्र.-९६१९५०३८४८)

http://uksresort.com/ या दुव्यावर यू. के.’ज्‌ रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल.
आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा varshaavihaar2015@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.

वविची रुपरेषा साधारण अशी असेल......

सकाळी ९.०० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल व इतर उपलब्ध राईड्स/रेन डान्स मध्ये धम्माल मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३० - ४.३० मनोरंजन
५.०० वाजता चहा व बिस्किट्स
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बसमधून प्रयाण.

तेव्हा, भेटू या, २०१५च्या वविला!

वविचे अंतीम बस मार्ग १९ तारखेनंतर स्वतंत्र धाग्यावर देण्यात येतील.

सूचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील). पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही.

युके'ज् रिसॉर्टला पुन्हा ववि करण्याच महत्वाचे कारण म्हणजे बाकी सर्व रिसॉर्टचे दर खूप वाढलेले असल्यामुळे त्यामुळे माणशी खर्च १००० रु. पेक्षा जास्त जात होता. त्याचबरोबर युके'ज् मध्ये वविसाठी लागणार्‍या सर्व सोयी उपलब्ध आहेत आणि दर्जादेखील चांगला आहे. मुंबई - पुणे दोन्हीकडच्यांना प्रवासही सोयीचा आहे.

तर मायबोलीकरांनो हा सोहळा चुकवू नका, मुंबई पुण्याचे मायबोलीकर एकत्र भेटण्याचे हमखास ठिकाण म्हणजेच वर्षा विहार .....!

================================================
Disclaimer:-

Let us respect everyone (both female and male members) who may or may not like their picture posted here or anywhere. The same rule applied to picture sent through email , as once it is sent there is no control anyway who sees it.

For those of us who do not want their picture posted, please write here your wish.

A) I do not want my pictures to be posted at all
B) I don't mind my pictures posted only after my approval. So send pictures only to me, and I will post it myself if I choose.
C) I don't mind my pictures to be posted at all,(No prior permission required) but if I don't like one, please respect my wish take it down
D) Post only the big group picture of me (with everyone)

Everyone, Please respect these wishes. And maayboli administration is committed to respect this for everyone to communicate to us.

In the Hindsight , this should have been announced before the start of VAVI, but we learned and we want to acknowledge. Better late than never. Thank you for your support.

Writing this from Organizers point of view too.

1. It is very difficult for organizers to police this. All of them are very busy organizing the event and if they keep focusing on this, the event won't happen. So it is responsibility of all people to present and respect their wish. The question everyone should ask, if this was a picture of my mother, father, brother, sister, daughter, son, wife, husband do I feel comfortable posting this.

2. Organizers can understand the objection if the picture was taken without permission of the person. But if the person has specifically posed for picture (e.g group photo) to be taken, it is difficult to understand the reason why you don't want to be in the picture now. It also applies to photos of 3-4 people specifically posing to get their picture taken. Once you are in a group picture, it is very impossible for organizers to prevent its spread. Even if it is not posted here, it still spreads (without anyone's knowledge) from people to people through emails. So preventing posting of a group picture on the public forum gives only a false sense of security.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे व्वा...... ववि आला ववि आला....
कार्याध्यक्षही आले (की उगवले?) Proud
युके रिसॉर्ट बेस्टच आहे..... मागल्यावेळेस लिंबोटल्याला उचलुन पाण्यात घेतला (आय मीन टाकला) होता..... मला पण उचलायचा बेत होता काही जणांचा, पण मी तो हाणुन पाडला.... कसा? तर बाकिच्यांचे क्यामेरे/मोबाईल्/कपडे हातात सांभाळित बसलो होतो... मग कसे पाण्यात टाकणार?
शिवाय घारूअण्णांचा आदर्श ठेवुन एक "टेकायची काठीही" हातात ठेवली होती! बहुधा घारूअण्णांचीच असावी...! Proud
यावेळेस्(ही) चहा सांडणार की कॉफी, कप उलटणार की ग्लास यावर बेट लावायला हरकत नाही.
(अन कोण कोण काय काय सांडवणार याचीही नावनोंदणी घ्यायला हरकत नसावी, नै? Proud )

: )

दादर च्या बसेस वाशी वरूनच येणार असतील न? तर नवी मुंबईच्या सदस्यासाठी वाशी ला पीक अप शक्य आहे का? किंवा मुंबई पुणे महारास्त्यावर .बरिच सोय होईल … धन्यवाद

>>>> मग ह्यावर्षीही काठी हवी का ? "टेक" ईट ऑर लीव्ह ईट <<<
अरे बाबा, इथुन पुढे वयपरत्वे हातात "काठीच" असणार ना! Happy हवीच ती.. तू आण. (अन माझ्याकरता कैतरी आण मागल्यावेळिसारखे डबीतुन).
[आता आमच्या नशिबात काठीच हो... ... ]

मा. संयोजक , हा धागा , मायबोलीच्या, पहिल्या पानावर घेता येइल का? तिथे अनेक जुन्या बातम्या अगदी २०१४ पासुनच्या पडुन आहेत .
वविचे एखादे चित्र ही वापरता येइल ... अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित उपयोग होइल.. ए. भा. सु.

यूकेज् जेवण मस्त म्हणजे वविमधील समस्त खादाडवर्गीय मंडळींना रसनातृप्ती करायचे खासे निमित्तच की!

बघितलेत! Proud
गुलाबजामाचा फोटू खासम् खास व तोंपासु आहे! जेवणाऱ्या (येथे 'ताव मारणाऱ्या' असे वाचावे) लोकांच्या चेहऱ्यांवरील तल्लीन भाव देखणे आहेत. Lol

>>>> अण्णा असतातच विथ दंड! <<<<
हो हो हो.... अन अण्णांचा दंड मजसारख्या म्हातार्‍यांना टेकायची काठी म्हणूनही उपयोगी पडतो... Proud

योकु आणि लिंबु(जी)...

या वर्षापुरती अण्णांनी 'स्वेच्छा निवृत्ती' घेतली... असे कानावर आलेले, म्हणून खात्री करुन घेतोय हो... Wink
Proud

Pages