वर्षाविहार २०१५: संयोजक हवेत आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by webmaster on 26 May, 2015 - 23:18

यंदाचा (२०१५) वर्षाविहार हा आपला १३वा ववि आहे.. गेली १२ वर्ष उत्साहात साजर्‍या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्याध्यक्षानू.... द्येवा या आता उघडपणे सामोरे... दर्शन द्यावा द्येवा.. तुमच्यावीणे वविची नौका पार होणे अवघड आहे.... नका अंत पाहु जास्त वेळ लावून, लौकर सांगावा धाडावा वविचा... Happy

कोन कोन येनार हाये वविला. किती जन खर्रेखुर्रे येनार आनि किती जन नुश्ते दवंडी वाचाया येताहायत.

१२५ च्या संख्येत होऊ द्या की ववि..

सर्व मायबोलीकर आपल्या घरच्यांसमवेत वर्षाविहाराला येऊ शकतात. फक्त पुणे, मुंबईच नव्हे तर आजूबाजूच्या शहरांमधून, पार नाशिक सोलापूर वगैरे ठिकाणांवरून मायबोलीकर आपल्या कुटुंबियांबरोबर वविला आल्याची उदाहरणे आहेत. भारतवारीसाठी आलेले परदेशस्थ माबोकरही आपल्या परिवारासोबत येऊ शकतात. Happy

Pages