वर्षाविहार २०१५: संयोजक हवेत आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by webmaster on 26 May, 2015 - 23:18

यंदाचा (२०१५) वर्षाविहार हा आपला १३वा ववि आहे.. गेली १२ वर्ष उत्साहात साजर्‍या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे बघा ...

KanchanKulka यानी आधीच जागू ताई न्ची लिन्क दिली आहे.
http://www.maayboli.com/node/35046?page=1

http://www.aayushresort.com

AAYUSH RESORT (Aayush Retreat Pvt. Ltd. Company)
Village Shedung,
Between Amol & Raigad Petrol Pump,
(8 kms drive from Panvel towards Khopoli)
Mumbai-Pune National Highway (Old)
Taluka: Panvel, District: Raigad
Maharashtra, India
Pin - 410 206

हो

Me MB chi 4 yrs pasun member ahe...me ani maje Mr yeu shakto ka? >>> माबोकरासाठीच असतो ववी
पैसे भरले की तुम्ही जावु शकता..( तुम्ही दोघे जावु शकता )

पहिल्यांदाच वविला येणा-या मायबोलीकराच्या मनामध्ये पहिला प्रश्न असतो तो म्हणजे मी कोणाला ओळखत नाही, मग कसं जायचं?
पण प्रत्यक्षात बस सुरु झाल्यावर अडीचव्या मिनिटाला आपण विसरुन जातो कि आपण कोणाला ओळखत नाही. अनुभवून पहा

पहिल्यांदाच वविला येणा-या मायबोलीकराच्या मनामध्ये पहिला प्रश्न असतो तो म्हणजे मी कोणाला ओळखत नाही, मग कसं जायचं?
पण प्रत्यक्षात बस सुरु झाल्यावर अडीचव्या मिनिटाला आपण विसरुन जातो कि आपण कोणाला ओळखत नाही. अनुभवून पहा
>> +१

अरे वाह ठरले का ठिकाण आणि दिवस???

संयोजक मंडळींना शुभेच्छा आणि काही मदत लागल्यास तत्पर Happy

यावेळी टीशर्ट्स आहेत का?

पण प्रत्यक्षात बस सुरु झाल्यावर अडीचव्या मिनिटाला आपण विसरुन जातो कि आपण कोणाला ओळखत नाही. अनुभवून पहा
>>
आणि यावर विश्वास नसेल तर आधीचे वृत्तांत वाचा.
किमान एका तरी वृत्तांतामधे ' आधी कोणाला ओळखत नव्हतो असं वाटलंच नाही' हे वाक्य असतंच Happy

मज्जा करा धम्माल करा.
एकही ववि केली नाहीत तर माबोवरचं सगळं आयुष्य ऑलमोस्ट वेस्टच Wink

मागच्या पानांवर जाहीर केलंय की यंदा टीशर्ट, टोपी, पिशवी वगैरे काहीही असणार नाही.
>>>
कुठे जाहिर केलय? मी मिसल का काही?? Uhoh

असो.

आपण मायबोलीवर एक्मेकांना भेटतोच ना? मग ओळख नाही असे कसे. आणि धम्माल करायला नावे आणि तोंड ओळख नाही लागत. मायबोली हा कॉमन धागा पुरतो, गेल्या वर्षांतला गटग आणि वविचा अनुभव.

प्रत्यक्ष ओळ्ख असो नसो घरच्यांना घेऊन या. मजा करूया. आणि ओळखी करून घेऊया.

नेहमीच्या अनुभवा प्रमाणे 'जुलै'च्या शेवटच्या 'रविवारी' - म्हणजे या वर्षी २६/जुलै रोजी 'ववि' असेल, असा अंदाज... माबो कडुन अजुन अधीकृत घोषणा झालेली नाही...

संयोजन समितीssss.... घोषणा करा आता लवकर - यंदाच्या 'ववि'ची... Wink
Proud

Pages