भानामतीकरांचे बुरे दिन केव्हा येणार ..

Submitted by उडन खटोला on 19 June, 2015 - 09:26

नवीन सरकार येऊन अर्धे वर्ष उलटले पण त्याने भानामतीकरांवर कारवाई करण्याचा मुहुर्तच न साधल्याने आमनेसामने असे दोन हात झालेच नाहीत,

पण परवा armastrong नाशिककरा वर कारवाई काय झाली आणि भानामतीकरांचे वांधे झाले. नाही हो,पैसा भरपूर होता पण खुर्चीशिवाय पटरीवरची ट्रेन रखडली होती. कुठून पकडली आणि कुठे पोहोचायचे होते, तेवढे विचारू नका.

आता ज्यांना हे सवयीचे झालेय ते इथेच धागा सोडून पसार होतील. पण अरे थांबा. आता चालायचंच, म्हणत कधीपर्यंत हे चालवून घेणार. सरकारने कडक कारवाई केली तेव्हा सारे कसे पोटावर पाय पडल्यासारखे कळवळून उठले होते. मग तसे रोज गळा आवळला जाताना का नाही चवताळून उठत. रोज श्वास घुसमटला जाताना का नाही एखाद्या दिवशी धुमसून बाहेर पडत. स्साला काय लाईफ आहे आपली! वेळेला काही किंमत आहे की नाही आपल्या!.. आहे ना, आपण जन्मभर मारमरून पाच पैसे शिल्लक नसताना फुले विकून २६०० कोटी मिळवता येतात म्हणजे काय?

काही हरकत नाही. थोडे ऊशीरा पैसे मिळतील . पण मी उद्यापासून दादारच्या बाजारात फुले विकायला बसणारच !

या वरच्या पॅराग्राफमध्ये राजकारण शोधायला जाऊ नका. लेखातही शुद्धलेखनाच्या चुका शोधायला जाऊ नका. त्या होतच राहतात. मोबाईलवर लिहीत असल्याने जरा जास्तच असतील. तरीही छोटी छोटी वाक्ये. सोपे सोपे शब्द. छोट्या छोट्याश्याच तुकड्यातील, साधे सोपे आयुष्य. पाऊण तास असा वसूल केला.. चार ओळी खरडून.. मन मोकळे करून.. मूड चांगला लागला असता तर पावसावरच्या चारोळ्याच खरडल्या असत्या.. पण काही हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाईम.. उद्या पुन्हा अडकली ट्रेन तर पुन्हा भेटूया..

तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज..
आपलाच , (उ)न्मेश !!!

प्रेरणा - http://www.maayboli.com/node/54292

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लई भारी बर का उडन खटोला :).. एका दगडात बरेच पक्षी मारले आहेत.

तुमच्या फुलं विकायच्या धंद्यात भागीदार होईन म्हणतो. किंवा 'मंडई, पुणे' शाखा काढतो!

हा हा .. भारीये.. तर्रीच मी टायटल वाचूनच बोल्लो साला ये कुछ सुना सुनाईसा लगता है Proud
पण त्या लास्ट पॅराग्राफमध्येही जरा किडेबदल करायचे होते की.. तो सेम राहिलाय

जे काय होतंय ते कायद्यानुसारच.. आमचा कुणावरही आकस नाही, कुणाही साहेबांनी आम्हाला चिथावलेलं नाही.. त्यांची डबल सेंचुरी झालीय आता !