अळकुड्यांची भाजी

Submitted by मृण्मयी on 17 June, 2015 - 11:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आळकुड्या
भरपूर कांदे (अळकुड्यांच्या पावपट तरी)
भक्कम तेल
तिखटपूड
मीठ
धणेपूड
हळद
आमचूर पावडर
कढीलिंबाची पानं
मोहरी
हिंग

क्रमवार पाककृती: 

-अळकुड्या प्रेशर कुकरात मऊ शिजवून घ्याव्या.
-गार झाल्यावर सालं सोलून बारीक तुकडे करावे.

Aravi-cubed-maayboli.jpg

-कांदा उभा आणि पातळ चिरून घ्यावा.
-तेलात मोहरी हिंगाची फोडणी करून त्यात कढीलिंबाची पानं घालावी.
-कांदा घालून खमंग परतावा.
-कांदा परतून होत असताना हळद, तिखट, मीठ, धणेपूड आणि आमचूर पावडर असे सगळे घटक एकत्र करून ठेवावे.

aravi-masala-maayboli.jpg

-ह्यातली अर्धी पूड कांद्यावर घालून परतावी, तर अर्धी चिरलेल्या अळकुड्यांना लावावी.

Aravi-cubed-withmasala-maayboli.jpgAravi-kanda-masala-maayboli.jpg

-अळकुड्या कांद्यावर खरपूस परताव्या.

Aravi-tayar-bhaji-maayboli.jpgAravi-bhaji-chapati-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
१ किलो अळकुड्यांची भाजी ४ माणसांना पुरते.
अधिक टिपा: 

-कुकरमधून काढलेल्या अळकुड्या पूर्ण गार होऊ द्याव्या. २ तास फ्रिजमध्ये ठेवल्या तर बुळबुळीतपणा कमी होतो.
-प्रेशरकुक करताना काही आंबट घालू नये.
-कांदा अगदी लाल होईपर्यंत परतावा. नाहीतर त्याचा गोडीळपणा विचित्र लागतो.
-आमचूरपावडरीखेरीज दुसरं आंबट घालू नये.
-तेलात कंची मारायची झाल्यास भाजी करू नये. Proud
-फायनल प्रॉडक्ट अजीबात बुळबुळीत किंवा तारा सुटलेलं होत नाही.
-३० मिनिटं हा प्रत्यक्ष कृतीचा वेळ आहे. अळकुड्या शिजवण्याचा वेळ ह्यात धरलेला नाही.

माहितीचा स्रोत: 
बंगलोरात घरी स्वयंपाक करणारी जयाम्मा.
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
माझी आजी अळकुड्यांचे भाजी बटाटाच्या काचर्‍या करतो तशी करते. अळकुड्या स्वच्छ धूवून, सोलून, काप करून नेहेमीच्या फोडणीत परतून शिजवणे. त्यालाही तेल असतंच जरा जास्त. आंबट काही घातलं नाही तरी चांगली होते.

ही पद्धत जास्त सोपी वाटते आहे. अळकुड्या कुकरमधून शिजवल्यानी सोलायला सोप्या होतील. अश्या पद्धतीनी करून पाहीन.

ओह तेल भरपूर का?
तरीच. मी एकदा केली होती तेलात कांचमकोंचम करून, कॅलरी फॅलरी मोजत तेव्हा भयाण चिकट झाली होती.

मस्त आहे !
इथे एक ही शाही अळकुड्या की काय रेसिपी आहे ना.. ती करतो आम्ही. दही घातलेली. मस्त लागते ती पण.

मीठ लावून उकडलेल्या अळकुड्या किंवा ओवा घालून काचऱ्या भाजी खाल्ल्येय नेहेमी. कालच उकडायला आणलेल्या, हे ट्राय केलं पाहिजे.

माझी मैत्रीण अळकुड्या चक्क तळून घेते. बाकी मागची-पुढची रेस्पी ठाऊक नाही. म्हणजे उकडून मग तळून की कसं ते.. पण तीही खलास लागते. तेल खूप हेच रहस्य असणार!

फोटो जाम तोंपासू आहे!

धन्यवाद! Happy

इथे सिंडीचा प्रश्न अगदी फिट्टं बसतो. Proud घाला **टे. योकु, प** घालून केल्यावर कळवावे. Proud

काचरा भाजी घरी व्हायची. मस्तच लागते. उकडून, तूपजिरं-हिरव्या मिर्च्यांच्या फोडणीत घालून, दाण्याचा कूट आणि दही घातलेली भाजी खाल्ली आहे. पण जरा चिकट लागली म्हणून नाही आवडली. मै, तुझ्या सासूबाई कशी करतात?

अळकुड्या म्हणजे अरवी, तेच तेच बाहेरुन छोट्या बटाट्या सारख दिसणारं. माझ्यासारख्या विदर्भातल्यांना ज्याना अळकुड्या म्हणजे काय ते कळलं नाही, त्यांच्यासाठी.
ह्यान्ची एक आठवण म्हणजे आमच्या घरी फक्त आजीला ही भाजी करता यायची. बाकी सगळ्यांचीच बिघडायची. माझ्या बहुतेक मैत्रिणींच्या घरी हे असच होतं.

माझ्या साबांची काही कॉंप्लिकेटेड रेसिपी नाहीये . त्या फोडणीत अळकुड्या परतून घेतात मग त्यात हळद , तिखट, फेटलेलं दही, अन धणे जिरे पावडर घालतात. आले टाकतात की नाही आठवत नाही मला.
अ‍ॅक्चुअली अळकुड्यांना काहीतरे वेगळा शब्द आहे ना विदर्भात ? काय आहे मृ ? तो पण मी विसरले!

हो, हो, आरवी म्हणतात. आणि 'घुईयाँ'पण. Happy

मैच्या सासुबाईंची दह्यातल्या अळकुड्यांची रेस्पी आवडली. करून बघते.

माशी तेलात शिंकणार की काय? Wink

मस्त आहे रेसिपी .. अळकुड्या कधी घरी आणून स्वतः कूक केलेल्या नाहीत तेव्हा शिजवायची, सोलायची काही कटकट असल्यास कल्पना नाही पण अदरवाईज् कमी कटकटीची वाटत आहे .. फोटो खरंच मस्त आहे पोळी भाजीचा .. Happy (पोळ्यात तेल फारसं नाहीये वाटतं .. ;))

कच्च्या केळ्याची भाजी अशी केली तर? Wink Proud

अळकुड्यांचं उकडून सायीच्या दह्यात हिरवी मिरची, दाण्याच कूट घालून भरित/रायतंही मस्त लागतं. हवं असल्यास वरुन तुप-जिर्‍याची फोडणी घालायची. वरुन कोथिंबीर.

मृ !! येस्स Lol घुइयाँच!! मला वाटतच होतं काहीतरी भारी विदर्भियन नाव आहे म्हणून Happy

आमच्या मित्राच्या आई ने घुया केल्या की आम्ही
"मस्त झाल्या व् बुडे" म्हणायचो अन बारक्या बहिणी ने केल्या की "ह्या खाजर्या घुयाँ तुयाल्या सासरच्याहीले चारजो व बाले" म्हणुन तूफ़ान छळ करायचो तिचा!!

अरे वा मस्त रेसिपी. अरवी ची मी नेहेमी कापं(चिप्स) च करते....सॉलीड आवडतात. आता भाजी करून बघेन.
काप अजिबात बुळबुळीत होत नाहीत.

Pages