बाजीराव दूसरा

Submitted by उडन खटोला on 4 June, 2015 - 12:08

मराठेशाहीचा उत्तरार्ध बघितला की नक्कीच मनाला वाईट वाटत , शिवबांनी उभी केलेली हि हिंदू रियासत काळानुसार लोप पावत चालली … याला जबाबदार कोण अस विचारलं तर खूप विचार मनात येतात , मराठी सरदारांचा नाकर्तेपण म्हणावं तर ते उत्तम लढले , पेशव्याच्या नावे भांड फोडाव तर तोही समर्थपणे लढला , राजाला दोष द्यावा तर राजाने शस्त्र बाजूला ठेवून शत्रूलाच मित्र केल , मग मराठेशाही संपवणारे गुन्हेगार कोण ? तर आपण स्वतः ,फंद फितुरी ,पराकीयांवरचा विश्वास ,त्यांचीच मदत घेवून शत्रूला माजघरात येवू दिलच पण स्वतः घर त्याच्या नावे करूनही दिल , परत स्वतः फसले दुसर्या बाजीरावाचा कालखंड बघितल्यावर असाच विचार मनात येतो ,नाना फडणीस यांनी जे राखाल ते काळाने उलटून नेलं … सुरुवात होते तिथूनच ,सवाई माधवरावला पेशवा करून नाना फडणीस याने राज्य उत्तम चालवल,त्याने भट घराण्याची निष्ठा बाळगलीच ,पण हे करताना आनंदीबाईकडे दुर्लक्ष केलं , यात दोष नानाला देण्यासारखा आहे का ? तर वादाचा विषय, पण आनंदीबीईची नानाला लिहिलेली पत्र या बाजीराव रघुनाथाच्या संगोपनाविषयीची काळजी दिसून येते ,सवाई माधवरावांच अकस्मात जाणं हा मराठ्यांच्या सत्तेला मोठा धक्का होता , कारण आता वारस कोण ? आणि यातूनच सुरु झाली मराठेशाहीच्या अस्ताची सुरुवात ....

खरतर नानाने सवाई माधवरावाच्या नावाने पेशवाई चालवली होती,त्यातुन त्याने आपली निष्ठा सिद्धही केली होती,मग पहील मराठा ईंग्रज युद्ध असो ,वा फर्मानबाडी साठी ईंग्रजांना दिलेला नकार असो वा रघुनाथरावाचा राजकीय अंत असो,अश्या अनेक गोष्टी नानाने केल्या,पण हे करताना सवाई माधवराव जाईल अशी पुसटशी कल्पनाही त्यास नव्हती ,आता बाजिराव रघुनाथरावाला सत्तेवर आणायचं तर त्यास तो अनुकुल नव्हता,कारण बाजिरावावर त्याची मर्जि नव्हतीच,हा दोष खरतर कारभार्यानांच दिला पाहीजे कारण शेवटी बाजिराव हा पेशव्यांचा थेट वंशज होता,तरीही नानाने हट्टाने बाजिरावाच्या धाकट्या भावाला अर्थात चिमाजीला सवाई माधवरावाच्या बायकोने दत्तक घेवुन पेशवा बनवुन आणण्याचा घाट घातला,तो पुर्णत्वास नेला ही,पण हे दत्तक विधान मान्य होणार नाही कारण खुद्द सासर्याला दत्तक घ्यायची ही योजना शास्त्र संमत नसल्याने मोठा घोळ होणार होता,पण यातुन बाजिराव बाजुला होवुन ,बाळ बुद्धीचा चिमणाजी पेशवा झाला तर पुन्हा कारभार नानाच्या हाती येयील हे सरळ सरळ दिसतं होतं,यातुनच परशुराम पटवर्धन सारख्या १२ भाईच्या सरदारावर वचक मिळवुन पुन्हा राज्य कारभार एकहाती घेवुन सुरळीत करायचा मानस नानाचा होता,पण बाजिराव त्यास दाद देईना,शेवटी नाईलाजाने नानाने बाजिरावाला अटी घालून पेशवा बनायचा घाट घातला,त्यासाठी त्याने शिंदे,होळकर,भोसल्याना पैसा दिला,पटवर्धनाना कैद केली आणी बाजिरावाला पेशवाई वस्त्र मिळवुन देण्यास मदत केली,आणी हेच होतं त्याच गाजलेलं,अशक्य पण तरीही शक्य करुन दाखवलेल,भल्या भल्याना न समजणारं "महाडच राजकारण" ह्यावर लिहायच म्हटलं तर पोस्ट वाढेल,पण यातुन नानाची कसदार बुद्धी दिसुन येते,नानाने आणि बाजिरावाने करार केला होता,आणि नानाने बाजिराववर विश्वास टाकला हीच मोठी चुक होती यातुन बाजिराव पेशवा झाला,पण हे होण्यासाठी त्याने दौलतराव शिंद्याला हाताशी धरुन १ कोटी रुपये देतो असा करार केला होता.

थोडक्यात कोणतंही राजकीय दृष्टी नसणारा,शिपाईगिरीचं व्यवस्थित शिक्षण नसणारा,कैदेत वाढलेला रघुनाथरावाचा राजकीय दृष्ट्या अपरीपक्व असा बाजिराव थेट पेशवाच्या मसलतीवर जावून आरुढ झाला,त्यातच शिंद्याना पैशाची चटक लागली होती,होळकरानाही आपला ताबा हवा होता,भोसले स्वतंत्र झाल्यात जमाच होते,कोणाचाही धरबंद नाही,सातार्याचा राजा शस्त्र न धरता येणारा त्यातही राजकीय चतुरता नसलेला असा होता,थोडक्यात मराठेशाही त्यावेळी स्वार्थात पुरेपुर बुडली होती, त्यातचं नानाने आपल्याला वाईट वागणुक दिली होती म्हणुन बाजिरावाने नानालाच अटक केली,ही मोठी चुक बाजिरावाच्या हातुन झाली, त्यातचं बाजिराव पेशवा झाल्यावर दौलतरावाने आपल्यासासर्याला हाताशी धरुन बाजिरावाकडे पैशाची मागणी केली,पण बाजिरावाकडे स्वत:कडे पैसे नसताना त्याने नकार दिला मग दौलतरावाने पुणं लुटायला सुरुवात केली , बाजिरावाला आपण काय करतोय ह्याचा अंदाजही नव्हता,त्यातच कुंजिराच्या सांगण्यावरुन विठोजी होळकराची निर्घुण हत्या केली. . .यात बाजिरावाच्या अक्षम्य चुका होत गेल्या ,विठोजीच्या रागाचा बदला म्हणुन आणि शिंद्याना उत्तर म्हणुन यशवंतराव होळकराने अमृतराव (राघोबाचा दत्तक पुत्र) याला हाताशी धरुन पुण्यावर चाल केली,त्याला बाजिराव सामोरा गेला पण बाजिरावाचा त्यात पराभव झाला,यशवंत होळकराने पुणं लुट लुट लुटलं, त्यात होळकराला सनदा हव्या होत्या,अमृतरावाने नकार दिल्याने ,बाजिरावाला जिवंत सोडण्याशिवाय दुसरा पर्याय होळकरांना नव्हता पण ह्याची भिती येवढी होती की बाजिराव वसईला निघुन गेला

दुसरीकडे ईंग्रज अधिकारी हेस्टिंग आपले भारतातले पाय मजबुत करायच्या प्रयत्नात होता,मराठे हे एकमेव त्याचे प्रबळ शत्रु राहीले होते,त्यातचं बाजिरावाने त्यांच्याशी तह करुन फौजा घेवुन पुण्यात आला,ह्या तहानुसार पेशवा बाजिरावच होणार होता पण ईंग्रजांचा प्रतिनिधी म्हणुन. . एकंदरीत ही राजकीय परिस्थिती बघितली तर बाजिरावाच्या चुका सरळ सरळ दिसतात पण एका अपरीपक्व माणसाकडुन बदलत्या राजकीय परीस्थितीत दुसरं काय घडु शकतं का?? ही गोष्ट विचार करण्यासारखीच आहे, पण या चुका सुधारुन बाजिराव हळुहळु इंग्रजांच्या विरुद्द खलबत रचू लागला,आपण केलेल्या चुकां त्याच्या लक्षात येवू लागल्या म्हणुन गुप्तपणे तो भोसले,होळकर,शिंदे यांच्याशी संधान बांधू लागला,तोवर शिंदे तर मांडलिक झालेच होते,भोसल्यानी हार मानली होती, दुसरे मल्हारराव होळकर यासं मात्र अनुकुल होते,त्याना ईंग्रजांबद्दल द्वेष होताच ते भोसलेना लिहीलेल्या पत्रातुन दिसते पण भोसल्याविरुद्ध ईंग्रजानी पुकारलेल्या युद्धात होळकर मात्र तटस्थ राहिले,थोडक्यात शिंदे होळकर भोसले यांना वेगवेगळं करुन हरवण्यात इंग्रजांना यश मिळालं होतं. . पण अजुन बाकी होतं ते सातारची गादी,खरतर प्रतापसिंहानी बाजिरावाला पदच्युत करुन तेव्हाच दुसरा पेशवा नेमुन वसईचा तह नाकारायला हवा होता,पण तेच इंग्रजांचे मित्र बनुन बाजिरावाविरुद्द कारस्थानं रचू लागले,हीच मोठी गोम आहे, ईकडे बाजिराव इंग्रजांविरुद्ध उघड उघड बंड करु पाहतं होता आणी त्यातच हा मसलतीचा राजा त्याच ईंग्रजांशी संधान बांधु पाहतं होता,बाजिरावाने केलेला वसईचा तह हा जर ईग्रजांचा पुण्यातला प्रवेश म्हटला तरी तो राजाला नाकारता आला असता,त्यातच बाजिराव मुर्ख असता तर ईंग्रज तेव्हाच गप्प बसले असते . पण बाजिरावाचा धुर्तपणा त्यांच्या लक्षात येवू लागला,येथुनच रचली गेली गंगाधरपंताच्या खुनाची कारस्थान,गंगाधरपंत...

हे गायकवाडांचे कारभारी होते ,गायकवाड यांनी ३ कोट रुपये थकवले होते , आणि त्यानाही म्हणून बाजीराव नको हवे होते , त्यावेळी ह्या वर मार्ग काढण्यासाठी आपल्या कारभार्याला अर्थात गंगाधरपंताना त्यांनी बाजीरावाकडे पाठवलं , बाजीराव त्यांना घेवून पंढरपूरला गेले होते , आणि तेव्हाच त्यांचा तिथे खून झाला , आणि त्याचं खापर इंग्रजांनी बाजीरावावर फोडून त्याला दाबण्याचा प्रयत्न केला ,खरतर या गंगाधरपंतांच्या रक्षणाची जबाबदारी इंग्रजांची होती पण त्यासाठी त्यांनी त्यांना कोणतीही सुरक्षा पुरवली नव्हती ,पंढरपूरसारख्या पवित्र ठिकाणी बाजीराव त्यांना मारण जवळपास अशक्य होत , पण त्याच खापर बाजीरावावर फोडून त्यांनी हात वर केले , एवढी काळजी असणाऱ्या इंग्रजांनी गंगाधार्पन्ताच्या नातेवाईकांना भरपाई पण दिली नाही ,या उलट बाजीराव आणि गंगाधरपंत यांचे संबध चांगले होते , कदाचित तो त्यांना पुण्याचा कारभारी बनवणार होता, पण इंग्रजांनी ते खापर बाजीरावाच्या सहकारी डेंगळे यांच्यावर फोडून त्याचा काटा काढायचा मार्ग सुकर केला ,हे डेंगळे म्हणजे प्रती नाना असेच होते ,बाजीरावावर दबाव वाढत गेला ,नाईलाजाने डेंगळे पकडले गेले ,पण ठाण्यातून ते पळून गेल्याने इंग्रजांची नाचक्की झाली ,

बाजीराव हुशार होता हे सहज लक्षात येवू लागल्याने इंग्रजांनी राजे प्रतापसिंहांना आपलस केलं ,आणि या राजाने आपल्याच लोकांविरुद्ध इंग्रजांना मदत केली ,गंगो बापुतर्फे गुपचूप पत्रव्यवहार केला ,बाजीराव उघड उघड इंग्रजांविरुद्ध लढणार हे दिसत होत ,त्याने गुपचूप भोसले ,शिंदे यांच्या कडे आपले वकील रवाना केले ,इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी प्रतापसिंहयांना माहुलीला जावून भेटला ,पण दुर्देव मोठ हा सारा प्रकार या मराठी राज्याच्या धन्याने इंग्रजांना कळवला … हे पाप ह्या राजाने केले हे मात्र आपण सोयीस्कर विसरतो … ह्या लढाईत त्याने ह्या राजाला घेतले हे त्याच्या हुषारीच लक्षण आहे ,पण इंग्रजांनी छत्रपतीयांना बाजीरावाने कैद केले म्हणून फितवण्यास सुरुवात केली , तुम्ही पेशव्यांना संपवा आम्ही राज्य तुमच्या हातात देवू अस वचन इंग्रजांनी राजांना दिल ,पण नंतर ते पाळल नाही हे मुद्दाम सांगावयास नको … बाजीरावाची हि धडपड परिपूर्ण होत नव्हती कारण शिंदे ,भोसल्यांनी त्याला मदत केली नाही ,तरीही बाजीरावाने आपले सेनापती बापू गोखल्यांच्या मदतीने इंग्रजांवर खडकी येथे हल्ला केला पण त्यात तो हरला त्यात तो स्वतः नव्हता … इंग्रजांनी पुणे ताब्यात घेतलं ,बाजीराव मोठ्या शिताफीने बापू गोखाल्यांबरोबर तिथून निसटला ,आणि सासवड मुक्कामी आला , तिथून पुढे ६ महिने बाजीराव इंग्रजांविरुद्ध लढत राहिला , काही महाभाग ह्याला पळपुटा म्हणतात ,ते किती एकांगी आहे हे दिसून येत ,तो पळपुटा असता तर पुन्हा लढलाच नसता … पण नंतर त्याने खडकी ,आष्टा , कोरेगावात इंग्रजान्विरुद्द लढाया केल्या ,त्याच सुमारास इंग्रजांनी बापू गोखाल्याला फितूर करण्याचा प्रयत्न केला, पण तो बाजीरावाशी एकनिष्ठ राहिला ,दरम्यान इंग्रजांनी सातारा जिंकल आणि प्रतापसिंहांना देवून आम्ही कसे चांगले असा बनाव केला ,आणि त्यात बाजीराव आणि प्रतापसिंह वेगळे आहेत अस सांगितलं ,त्यातच आष्टा येथे बाजीरावाने इंग्रजांना धूळ चारली , कोरेगाव ,आष्टा ह्या दोन्ही ठिकाणी इंग्रजांना हरवण्यात ह्या बाजीरावाला यश मिळालं ,पण त्यानंतर इंग्रंजानी प्रतापसिंहाशी करार करून मराठी राज्य ताब्यात घेतलं ,ती तारीख होती ४ एप्रिल १८१८ ,या करारानुसार बाजीराव बंडखोर ठरवला गेला ,मराठेशाहीचा खरा अंत इथे झाला ,बाजीराव मूर्ख असता तर इंग्रजांना आता काही करावेच लागले नसते ,या करारानुसार बाजीराव कायद्याने पेशवा राहिलाच नाही ,कारण खुद्द राजानेच शरणागती पत्करली होती , तरीही आपण सार खापर बाजीरावावर फोडून मोकळे होतो ,हे मात्र इतिहास न जाणता केलेले विधान होय ,या नंतरही बाजीराव लढाला ,शेवटी ४ जूनला धुलकोट येथे तो इंग्रजांविरुद्ध हरला …

खरतर इंग्रज इतके हुशार होते की राजाशी करार करूनही ,त्यांना बाजीरावाविरुद्ध लढून करार करावा लागला ,यातच बाजीरावाची हुशारी दिसून येते …. बाजीराव त्याच्या पूर्वजाप्रमाणे कर्तृत्ववान नव्हता हे उघड उघड आहे ,पण कैदेत वाढवलेल्या ह्या बाजीरावाला इतिहासात पळपुटा म्हणून हिणवलं गेले हे चुकीच आहे, तस असत तर त्याने युध्द केलं नसत ,छत्रपतीनी करार केल्यानंतर त्याला लढायची गरजही नव्हती,पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोट ठेवून टीका करण्यात काही लोक धन्यता मानतात ,त्याकाळात हे समाजमान्य होत हे लोक विसरतात , लग्नात मुलीकडून पैसे घातल्यास त्यास दंड करण्यात येयील हा आदेशही त्याने काढला होता ह्याकडेही इतिहासकार सोयीस्कर दुर्लक्ष करतात,

माझ्या मते दुसरा बाजिराव हा मानवी मनाचा नी कर्तव्याच्या लढाईचं प्रतिक आहे. . त्याच्या हातुन मोठ्या चुकाही झाल्या पण त्याने त्या सुधारल्याही. . . पुर्वायुष्यात होणार्या चुकांना समाज कसं बघतो,स्वार्थि लोक अशा माणसांचा वापरं कसा करुन घेतात आणी मग नामानिराळं कसं होतात याचं हे उत्तम उदाहरणं आहे,सरदार,राजा या दोहोंनीही याला भरपुर वापरुन घेतला . . तो पळपुटा नव्हता,मुर्खही नव्हता पण उभरत्या वयात योग्य संस्कार न झालेल्या तरीही अनुभवातुन शिकलेला हा बाजिराव मनाला विचार करुन जगायला भाग पाडतो. .

सौजन्य ----- Raju Karlekar,Pune

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>
सम आर मोअर इक्वल दॅन अदर्स या न्यायाने?
>>

प्रश्न चर्चेशी संबंधित आहे असे भासवून खोड्या कशा काढाव्यात हे वरील वाक्य व त्या पोष्टीतून मस्त समजते.

<<<<त्यांचा स्वतःचा अपवाद वगळता?
सम आर मोअर इक्वल दॅन अदर्स या न्यायाने?>>>>>

मला स्वतःला माहित नाही, पण पेशव्यांच्या काळात पटवर्धन, गोखले वगैरे नावाचे लढवय्ये सरदार होते. ते तरी ब्राह्मणच असावेत. आणखीहि काही चिल्लर योद्धे असतीलच.
तेंव्हावर अनिरुद्ध_वैद्य यांनी 8 June, 2015 - 04:04 ला सांगितलेले बरोबर असावे.

झक्की अनिरुद्ध, सहमत.
शिवाय ब्राह्मणांस "गुरू" म्हणुन ६४ कला विद्या अवगत असाव्यात व त्या दुसर्‍यास शिकवता याव्यात असेही अपेक्षित असायचेच. युद्धकला, मल्लविद्या ही देखिल त्यातिलच.
तेव्हा एखादा तत्कालिक वा गेल्या शतकातील ब्राह्मण उठला अन हाती शस्त्र धरून काही एक पराक्रम केला तर त्यात एकवीसाव्या शतकातल्या बुभुक्षितांच्या भुवया का उंचाव्यात हे कळत नाही! Proud

एकवीसाव्या शतकातल्या बुभुक्षितांच्या भुवया का उंचाव्यात हे कळत नाही!>>>

खरे आहे.

एकवीसाव्या शतकातले संविधान एका दलिताने लिहला आहे.
दनदनीत पुरावा.

Proud

ब्राह्मणांस "गुरू" म्हणुन ६४ कला विद्या अवगत असाव्यात व त्या दुसर्‍यास शिकवता याव्यात असेही अपेक्षित असायचेच..

.....

अरेरे ! संविधान लिहायला मात्र कुणी ब्राह्मण मिळाला नव्हता.

काउ,

मिळाला की ब्राह्मण. त्याचं नाव भीमराव रामजी सकपाळ. महारांमधले ब्राह्मण आहेत ते. हे माझ्या दलित मित्राचे उद्गार.

आ.न.,
-गा.पै.

महार काय वाईट असतात का? नि ब्राह्मण चांगले? सोडा असल्या फालतू कल्पना.

प्रत्येक माणूस स्वतंत्रपणे काहीहि असू शकतो त्याला वाईट म्हणा, चांगला म्हणा, पण हिंदू, मुसलमान, महार ब्राह्मण म्हणू नका, किंवा अमेरिकन, पाकीस्तानी, चिनी, भारतीय असेहि म्हणू नका.
चांगला वाईट, दुष्ट,दयाळू, स्वार्थी, परोपकारी असे काही तुमच्या मते म्हणायचे असेल तर म्हणा.

मिळाला की ब्राह्मण. त्याचं नाव भीमराव रामजी सकपाळ. महारांमधले ब्राह्मण आहेत ते. हे माझ्या दलित मित्राचे उद्गार.>>>>>> गामा हे खरे आहे मला सुद्धा असले बरेच महाभाग आढळले . ह्याला कारणीभूत आहे आपल्या इथील समाजव्यवस्था. तिच्यावर जाणीवपूर्वक बिम्बवलेले उच्च्नीच्तेचे विचार त्याच्यासाठी निर्माण केलेली धार्मिक साहित्यसंपदा नि त्या साहित्यिक संपदेला दिलेले दैवी स्वरूप.

एक साधे उदाहरण देतो संत ज्ञानेश्वर-माऊली, संत रामदास-स्वामी मात्र संत चोखा महार, संत नामदेव-शिंपी , संत गोरा -कुंभार, संत रविदास-चांभार आता थोडे राजकारणातील व्यक्तिमत्व आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळ्याचे,अन्नाभावू साठे मातंग नेते टिळक मात्र लोकमान्य, सावरकर मात्र स्वातंत्र्यवीर आता सध्याचे नेते मुंडे-वंजारी समाजाचे नेते, भुजबळ- माळ्याचे
नेते, राणे मराठा समाजाचे नेते आणि गडकरी-देशाचे नेते, प्रमोद महाजन-देशाचे नेते.

आपल्या इथला समाज हा धार्मिक नि जाती व्यवस्थेवर चालतो हे सत्य आहे भले ते कुणाला पटो वा न पटो

इथल्या राजकारणातही सामान्य माणूस,विकास हा केंद्रबिंदू नसून धार्मिक वर्चस्व, सामाजिक वर्चस्व मिळवणे हीच लढाई असते.

पेशवाई आणि मराठेशाहीच्या अंताविषयी इतके सविस्तरपणे कधी वाचले नव्हते.

एक शंका जी विषयाला धरुन नाही, पण त्यासाठी वेगळा धागा काढणे योग्य होईल का कळत नाही.

मराठ्यांचे चलन "होन" आणि दिल्लीकरांचे "रुपये" होते, हे inter-convertible होते का? त्यांचा exchange rate कोण ठरवायचे? तसेच चलन कुठुन बदलुन मिळत.

जेव्हा शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात वैर होते, तेव्हा चलन बदलले जायचे का? की महाराष्ट्राबाहेर होन बाद किंवा महाराष्ट्रात रुपया बाद ठरत?

एक साधे उदाहरण देतो संत ज्ञानेश्वर-माऊली, संत रामदास-स्वामी मात्र संत चोखा महार, संत नामदेव-शिंपी , संत गोरा -कुंभार, संत रविदास-चांभार आता थोडे राजकारणातील व्यक्तिमत्व आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळ्याचे,अन्नाभावू साठे मातंग नेते टिळक मात्र लोकमान्य, सावरकर मात्र स्वातंत्र्यवीर आता सध्याचे नेते मुंडे-वंजारी समाजाचे नेते, भुजबळ- माळ्याचे
नेते, राणे मराठा समाजाचे नेते आणि गडकरी-देशाचे नेते, प्रमोद महाजन-देशाचे नेते. >>> पगारे हा पॉइंट जरा आणखी डीटेल मधे समजावू शकाल का? नीट कळाले नाही. संत चोखा महार असे मी कधी वाचल्याचे लक्षात नाही "चोखामेळा" असेच ऐकले आहे. तसेच नामदेवांबद्दल. नामदेव-शिंपी हा उल्लेख नामदेव-शिंपी समाजाबद्दल ऐकलेला आहे, खुद्द नामदेवांबद्दल नाही. गोरा कुंभार असे कायम ऐकलेले आहे पण ते व्यवसायवाचकही असू शकते.

या सर्व लोकांच्या जाती काय होत्या ते गेल्या ८-१० वर्षात जास्त ठळकपणे पुढे आलेले आहे.

पेशव्यांच्या वंशजाविषयी सहज शोधता मुक्तपीठातला हा लेख मिळाला.

http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5316477282483140195&Se...मुक्तपीठ&NewsDate=20150603&Provider=स्नेहा जोशी&NewsTitle=नाते जुळते मनाचे मनाचे.. (मुक्तपीठ)

इथे कुणीतरी पेशवे नावाचे कुटुंब सदाशिव पेठेत असल्याचा उल्लेख केलाय, अर्थात ते पेशव्यांचे वंशज असतील असे नाही.

या सर्व लोकांच्या जाती काय होत्या ते गेल्या ८-१० वर्षात जास्त ठळकपणे पुढे आलेले आहे.

>>

आणि त्या जाणीवा आता टोकदार करून पद्धतशीरपणे राजकारण सुरु झालेयचं! असो, तो लेखाचा विषय नाही.

राहुल,

विषय रोचक मांडलात. मुळात नाणी सगळी धातूंची असल्याने त्याला बहुधा त्या धातूइतकीच किंमत असायची. सो विनिमय सोपा होता. अर्थात, ह्या विषयावर अजून माहिती मिळाल्यास आवडेल.

अत्यंत दुर्मिळ पुस्तके:

Peshwa Bajirao II and the downfall of the Maratha power (5th ed.) 1976,
Dr. S.G. Vaidya
Pragati Prakashan, Nagpur, India.

Devil’s Wind (दुसरे नानासाहेब पेशवे)
Manohar Malgoankar
Orient Paperbacks, New Delhi, 1972

बाळाजी विश्वनाथांना भाऊ बहिणी होत्या असतील. पुढच्या पेशव्यांनाही मुली झाल्या असतील. त्यांची काही माहिती किंवा वंशावळ उपलब्ध आहे का?
लेख आणि (काही)प्रतिसाद दोन्ही उत्तम आहेत.
मूळचं बिठूरचं राहाणारं भट आडनावाचं एक महाराष्ट्रीय कुटुंब सात-आठ वर्षापूर्वी पुण्याच्या उपनगरात स्थायिक झालेलं एकदा भेटलं होतं. त्यांची भाषा आता तुरळक मराठी शब्दांची पखरण असलेली हिंदी आहे. बायका (बहुधा उत्तर हिंदुस्तानी पद्धतीनुसार) डोक्यावरून पदर घेतात. घरात कट्टर सोवळं. घरातल्या बाई आपुलकीने सांगत होत्या की ते एकेकाळचे महाराष्ट्रीय ब्राह्मण. खरं तर त्या वेळी त्यांच्याकडून अधिक माहिती मिळू शकली असती. कारण बिठूर आणि भट ही नावं ऐकल्याबरोबर माझे कान टवकारले गेले होते. पण त्या बाई इतक्या संकोची आणि उत्तरहिंदुस्तानी मर्यादशील वाटल्या की जास्त बोलणे होऊ शकले नाही याची आता खंत वाटते.

Pages