बाजीराव दूसरा

Submitted by उडन खटोला on 4 June, 2015 - 12:08

मराठेशाहीचा उत्तरार्ध बघितला की नक्कीच मनाला वाईट वाटत , शिवबांनी उभी केलेली हि हिंदू रियासत काळानुसार लोप पावत चालली … याला जबाबदार कोण अस विचारलं तर खूप विचार मनात येतात , मराठी सरदारांचा नाकर्तेपण म्हणावं तर ते उत्तम लढले , पेशव्याच्या नावे भांड फोडाव तर तोही समर्थपणे लढला , राजाला दोष द्यावा तर राजाने शस्त्र बाजूला ठेवून शत्रूलाच मित्र केल , मग मराठेशाही संपवणारे गुन्हेगार कोण ? तर आपण स्वतः ,फंद फितुरी ,पराकीयांवरचा विश्वास ,त्यांचीच मदत घेवून शत्रूला माजघरात येवू दिलच पण स्वतः घर त्याच्या नावे करूनही दिल , परत स्वतः फसले दुसर्या बाजीरावाचा कालखंड बघितल्यावर असाच विचार मनात येतो ,नाना फडणीस यांनी जे राखाल ते काळाने उलटून नेलं … सुरुवात होते तिथूनच ,सवाई माधवरावला पेशवा करून नाना फडणीस याने राज्य उत्तम चालवल,त्याने भट घराण्याची निष्ठा बाळगलीच ,पण हे करताना आनंदीबाईकडे दुर्लक्ष केलं , यात दोष नानाला देण्यासारखा आहे का ? तर वादाचा विषय, पण आनंदीबीईची नानाला लिहिलेली पत्र या बाजीराव रघुनाथाच्या संगोपनाविषयीची काळजी दिसून येते ,सवाई माधवरावांच अकस्मात जाणं हा मराठ्यांच्या सत्तेला मोठा धक्का होता , कारण आता वारस कोण ? आणि यातूनच सुरु झाली मराठेशाहीच्या अस्ताची सुरुवात ....

खरतर नानाने सवाई माधवरावाच्या नावाने पेशवाई चालवली होती,त्यातुन त्याने आपली निष्ठा सिद्धही केली होती,मग पहील मराठा ईंग्रज युद्ध असो ,वा फर्मानबाडी साठी ईंग्रजांना दिलेला नकार असो वा रघुनाथरावाचा राजकीय अंत असो,अश्या अनेक गोष्टी नानाने केल्या,पण हे करताना सवाई माधवराव जाईल अशी पुसटशी कल्पनाही त्यास नव्हती ,आता बाजिराव रघुनाथरावाला सत्तेवर आणायचं तर त्यास तो अनुकुल नव्हता,कारण बाजिरावावर त्याची मर्जि नव्हतीच,हा दोष खरतर कारभार्यानांच दिला पाहीजे कारण शेवटी बाजिराव हा पेशव्यांचा थेट वंशज होता,तरीही नानाने हट्टाने बाजिरावाच्या धाकट्या भावाला अर्थात चिमाजीला सवाई माधवरावाच्या बायकोने दत्तक घेवुन पेशवा बनवुन आणण्याचा घाट घातला,तो पुर्णत्वास नेला ही,पण हे दत्तक विधान मान्य होणार नाही कारण खुद्द सासर्याला दत्तक घ्यायची ही योजना शास्त्र संमत नसल्याने मोठा घोळ होणार होता,पण यातुन बाजिराव बाजुला होवुन ,बाळ बुद्धीचा चिमणाजी पेशवा झाला तर पुन्हा कारभार नानाच्या हाती येयील हे सरळ सरळ दिसतं होतं,यातुनच परशुराम पटवर्धन सारख्या १२ भाईच्या सरदारावर वचक मिळवुन पुन्हा राज्य कारभार एकहाती घेवुन सुरळीत करायचा मानस नानाचा होता,पण बाजिराव त्यास दाद देईना,शेवटी नाईलाजाने नानाने बाजिरावाला अटी घालून पेशवा बनायचा घाट घातला,त्यासाठी त्याने शिंदे,होळकर,भोसल्याना पैसा दिला,पटवर्धनाना कैद केली आणी बाजिरावाला पेशवाई वस्त्र मिळवुन देण्यास मदत केली,आणी हेच होतं त्याच गाजलेलं,अशक्य पण तरीही शक्य करुन दाखवलेल,भल्या भल्याना न समजणारं "महाडच राजकारण" ह्यावर लिहायच म्हटलं तर पोस्ट वाढेल,पण यातुन नानाची कसदार बुद्धी दिसुन येते,नानाने आणि बाजिरावाने करार केला होता,आणि नानाने बाजिराववर विश्वास टाकला हीच मोठी चुक होती यातुन बाजिराव पेशवा झाला,पण हे होण्यासाठी त्याने दौलतराव शिंद्याला हाताशी धरुन १ कोटी रुपये देतो असा करार केला होता.

थोडक्यात कोणतंही राजकीय दृष्टी नसणारा,शिपाईगिरीचं व्यवस्थित शिक्षण नसणारा,कैदेत वाढलेला रघुनाथरावाचा राजकीय दृष्ट्या अपरीपक्व असा बाजिराव थेट पेशवाच्या मसलतीवर जावून आरुढ झाला,त्यातच शिंद्याना पैशाची चटक लागली होती,होळकरानाही आपला ताबा हवा होता,भोसले स्वतंत्र झाल्यात जमाच होते,कोणाचाही धरबंद नाही,सातार्याचा राजा शस्त्र न धरता येणारा त्यातही राजकीय चतुरता नसलेला असा होता,थोडक्यात मराठेशाही त्यावेळी स्वार्थात पुरेपुर बुडली होती, त्यातचं नानाने आपल्याला वाईट वागणुक दिली होती म्हणुन बाजिरावाने नानालाच अटक केली,ही मोठी चुक बाजिरावाच्या हातुन झाली, त्यातचं बाजिराव पेशवा झाल्यावर दौलतरावाने आपल्यासासर्याला हाताशी धरुन बाजिरावाकडे पैशाची मागणी केली,पण बाजिरावाकडे स्वत:कडे पैसे नसताना त्याने नकार दिला मग दौलतरावाने पुणं लुटायला सुरुवात केली , बाजिरावाला आपण काय करतोय ह्याचा अंदाजही नव्हता,त्यातच कुंजिराच्या सांगण्यावरुन विठोजी होळकराची निर्घुण हत्या केली. . .यात बाजिरावाच्या अक्षम्य चुका होत गेल्या ,विठोजीच्या रागाचा बदला म्हणुन आणि शिंद्याना उत्तर म्हणुन यशवंतराव होळकराने अमृतराव (राघोबाचा दत्तक पुत्र) याला हाताशी धरुन पुण्यावर चाल केली,त्याला बाजिराव सामोरा गेला पण बाजिरावाचा त्यात पराभव झाला,यशवंत होळकराने पुणं लुट लुट लुटलं, त्यात होळकराला सनदा हव्या होत्या,अमृतरावाने नकार दिल्याने ,बाजिरावाला जिवंत सोडण्याशिवाय दुसरा पर्याय होळकरांना नव्हता पण ह्याची भिती येवढी होती की बाजिराव वसईला निघुन गेला

दुसरीकडे ईंग्रज अधिकारी हेस्टिंग आपले भारतातले पाय मजबुत करायच्या प्रयत्नात होता,मराठे हे एकमेव त्याचे प्रबळ शत्रु राहीले होते,त्यातचं बाजिरावाने त्यांच्याशी तह करुन फौजा घेवुन पुण्यात आला,ह्या तहानुसार पेशवा बाजिरावच होणार होता पण ईंग्रजांचा प्रतिनिधी म्हणुन. . एकंदरीत ही राजकीय परिस्थिती बघितली तर बाजिरावाच्या चुका सरळ सरळ दिसतात पण एका अपरीपक्व माणसाकडुन बदलत्या राजकीय परीस्थितीत दुसरं काय घडु शकतं का?? ही गोष्ट विचार करण्यासारखीच आहे, पण या चुका सुधारुन बाजिराव हळुहळु इंग्रजांच्या विरुद्द खलबत रचू लागला,आपण केलेल्या चुकां त्याच्या लक्षात येवू लागल्या म्हणुन गुप्तपणे तो भोसले,होळकर,शिंदे यांच्याशी संधान बांधू लागला,तोवर शिंदे तर मांडलिक झालेच होते,भोसल्यानी हार मानली होती, दुसरे मल्हारराव होळकर यासं मात्र अनुकुल होते,त्याना ईंग्रजांबद्दल द्वेष होताच ते भोसलेना लिहीलेल्या पत्रातुन दिसते पण भोसल्याविरुद्ध ईंग्रजानी पुकारलेल्या युद्धात होळकर मात्र तटस्थ राहिले,थोडक्यात शिंदे होळकर भोसले यांना वेगवेगळं करुन हरवण्यात इंग्रजांना यश मिळालं होतं. . पण अजुन बाकी होतं ते सातारची गादी,खरतर प्रतापसिंहानी बाजिरावाला पदच्युत करुन तेव्हाच दुसरा पेशवा नेमुन वसईचा तह नाकारायला हवा होता,पण तेच इंग्रजांचे मित्र बनुन बाजिरावाविरुद्द कारस्थानं रचू लागले,हीच मोठी गोम आहे, ईकडे बाजिराव इंग्रजांविरुद्ध उघड उघड बंड करु पाहतं होता आणी त्यातच हा मसलतीचा राजा त्याच ईंग्रजांशी संधान बांधु पाहतं होता,बाजिरावाने केलेला वसईचा तह हा जर ईग्रजांचा पुण्यातला प्रवेश म्हटला तरी तो राजाला नाकारता आला असता,त्यातच बाजिराव मुर्ख असता तर ईंग्रज तेव्हाच गप्प बसले असते . पण बाजिरावाचा धुर्तपणा त्यांच्या लक्षात येवू लागला,येथुनच रचली गेली गंगाधरपंताच्या खुनाची कारस्थान,गंगाधरपंत...

हे गायकवाडांचे कारभारी होते ,गायकवाड यांनी ३ कोट रुपये थकवले होते , आणि त्यानाही म्हणून बाजीराव नको हवे होते , त्यावेळी ह्या वर मार्ग काढण्यासाठी आपल्या कारभार्याला अर्थात गंगाधरपंताना त्यांनी बाजीरावाकडे पाठवलं , बाजीराव त्यांना घेवून पंढरपूरला गेले होते , आणि तेव्हाच त्यांचा तिथे खून झाला , आणि त्याचं खापर इंग्रजांनी बाजीरावावर फोडून त्याला दाबण्याचा प्रयत्न केला ,खरतर या गंगाधरपंतांच्या रक्षणाची जबाबदारी इंग्रजांची होती पण त्यासाठी त्यांनी त्यांना कोणतीही सुरक्षा पुरवली नव्हती ,पंढरपूरसारख्या पवित्र ठिकाणी बाजीराव त्यांना मारण जवळपास अशक्य होत , पण त्याच खापर बाजीरावावर फोडून त्यांनी हात वर केले , एवढी काळजी असणाऱ्या इंग्रजांनी गंगाधार्पन्ताच्या नातेवाईकांना भरपाई पण दिली नाही ,या उलट बाजीराव आणि गंगाधरपंत यांचे संबध चांगले होते , कदाचित तो त्यांना पुण्याचा कारभारी बनवणार होता, पण इंग्रजांनी ते खापर बाजीरावाच्या सहकारी डेंगळे यांच्यावर फोडून त्याचा काटा काढायचा मार्ग सुकर केला ,हे डेंगळे म्हणजे प्रती नाना असेच होते ,बाजीरावावर दबाव वाढत गेला ,नाईलाजाने डेंगळे पकडले गेले ,पण ठाण्यातून ते पळून गेल्याने इंग्रजांची नाचक्की झाली ,

बाजीराव हुशार होता हे सहज लक्षात येवू लागल्याने इंग्रजांनी राजे प्रतापसिंहांना आपलस केलं ,आणि या राजाने आपल्याच लोकांविरुद्ध इंग्रजांना मदत केली ,गंगो बापुतर्फे गुपचूप पत्रव्यवहार केला ,बाजीराव उघड उघड इंग्रजांविरुद्ध लढणार हे दिसत होत ,त्याने गुपचूप भोसले ,शिंदे यांच्या कडे आपले वकील रवाना केले ,इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी प्रतापसिंहयांना माहुलीला जावून भेटला ,पण दुर्देव मोठ हा सारा प्रकार या मराठी राज्याच्या धन्याने इंग्रजांना कळवला … हे पाप ह्या राजाने केले हे मात्र आपण सोयीस्कर विसरतो … ह्या लढाईत त्याने ह्या राजाला घेतले हे त्याच्या हुषारीच लक्षण आहे ,पण इंग्रजांनी छत्रपतीयांना बाजीरावाने कैद केले म्हणून फितवण्यास सुरुवात केली , तुम्ही पेशव्यांना संपवा आम्ही राज्य तुमच्या हातात देवू अस वचन इंग्रजांनी राजांना दिल ,पण नंतर ते पाळल नाही हे मुद्दाम सांगावयास नको … बाजीरावाची हि धडपड परिपूर्ण होत नव्हती कारण शिंदे ,भोसल्यांनी त्याला मदत केली नाही ,तरीही बाजीरावाने आपले सेनापती बापू गोखल्यांच्या मदतीने इंग्रजांवर खडकी येथे हल्ला केला पण त्यात तो हरला त्यात तो स्वतः नव्हता … इंग्रजांनी पुणे ताब्यात घेतलं ,बाजीराव मोठ्या शिताफीने बापू गोखाल्यांबरोबर तिथून निसटला ,आणि सासवड मुक्कामी आला , तिथून पुढे ६ महिने बाजीराव इंग्रजांविरुद्ध लढत राहिला , काही महाभाग ह्याला पळपुटा म्हणतात ,ते किती एकांगी आहे हे दिसून येत ,तो पळपुटा असता तर पुन्हा लढलाच नसता … पण नंतर त्याने खडकी ,आष्टा , कोरेगावात इंग्रजान्विरुद्द लढाया केल्या ,त्याच सुमारास इंग्रजांनी बापू गोखाल्याला फितूर करण्याचा प्रयत्न केला, पण तो बाजीरावाशी एकनिष्ठ राहिला ,दरम्यान इंग्रजांनी सातारा जिंकल आणि प्रतापसिंहांना देवून आम्ही कसे चांगले असा बनाव केला ,आणि त्यात बाजीराव आणि प्रतापसिंह वेगळे आहेत अस सांगितलं ,त्यातच आष्टा येथे बाजीरावाने इंग्रजांना धूळ चारली , कोरेगाव ,आष्टा ह्या दोन्ही ठिकाणी इंग्रजांना हरवण्यात ह्या बाजीरावाला यश मिळालं ,पण त्यानंतर इंग्रंजानी प्रतापसिंहाशी करार करून मराठी राज्य ताब्यात घेतलं ,ती तारीख होती ४ एप्रिल १८१८ ,या करारानुसार बाजीराव बंडखोर ठरवला गेला ,मराठेशाहीचा खरा अंत इथे झाला ,बाजीराव मूर्ख असता तर इंग्रजांना आता काही करावेच लागले नसते ,या करारानुसार बाजीराव कायद्याने पेशवा राहिलाच नाही ,कारण खुद्द राजानेच शरणागती पत्करली होती , तरीही आपण सार खापर बाजीरावावर फोडून मोकळे होतो ,हे मात्र इतिहास न जाणता केलेले विधान होय ,या नंतरही बाजीराव लढाला ,शेवटी ४ जूनला धुलकोट येथे तो इंग्रजांविरुद्ध हरला …

खरतर इंग्रज इतके हुशार होते की राजाशी करार करूनही ,त्यांना बाजीरावाविरुद्ध लढून करार करावा लागला ,यातच बाजीरावाची हुशारी दिसून येते …. बाजीराव त्याच्या पूर्वजाप्रमाणे कर्तृत्ववान नव्हता हे उघड उघड आहे ,पण कैदेत वाढवलेल्या ह्या बाजीरावाला इतिहासात पळपुटा म्हणून हिणवलं गेले हे चुकीच आहे, तस असत तर त्याने युध्द केलं नसत ,छत्रपतीनी करार केल्यानंतर त्याला लढायची गरजही नव्हती,पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोट ठेवून टीका करण्यात काही लोक धन्यता मानतात ,त्याकाळात हे समाजमान्य होत हे लोक विसरतात , लग्नात मुलीकडून पैसे घातल्यास त्यास दंड करण्यात येयील हा आदेशही त्याने काढला होता ह्याकडेही इतिहासकार सोयीस्कर दुर्लक्ष करतात,

माझ्या मते दुसरा बाजिराव हा मानवी मनाचा नी कर्तव्याच्या लढाईचं प्रतिक आहे. . त्याच्या हातुन मोठ्या चुकाही झाल्या पण त्याने त्या सुधारल्याही. . . पुर्वायुष्यात होणार्या चुकांना समाज कसं बघतो,स्वार्थि लोक अशा माणसांचा वापरं कसा करुन घेतात आणी मग नामानिराळं कसं होतात याचं हे उत्तम उदाहरणं आहे,सरदार,राजा या दोहोंनीही याला भरपुर वापरुन घेतला . . तो पळपुटा नव्हता,मुर्खही नव्हता पण उभरत्या वयात योग्य संस्कार न झालेल्या तरीही अनुभवातुन शिकलेला हा बाजिराव मनाला विचार करुन जगायला भाग पाडतो. .

सौजन्य ----- Raju Karlekar,Pune

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेख .. या काळातल्या इतिहासावर प्रकाश टाकणार फारसं काही वाचनात नव्हत.. यानिमित्ताने बरच काही कळेल.. माबोवरील इतिहास तज्ञांचे प्रतिसाद आणि चर्चा वाचण्यास उत्सुक ..

लेखाबद्दल धन्यवाद ..

लेख 'चालू घडामोडी' टाकला गेला आहे ..
(त्यामुळे वाचताना त्या कालखंडात गेल्यासारखं वाटून आता स्वराज्य कस वाचवावं वगेरे विचार येत होते Proud )

मस्तानीशी आंतरजातीय आय मीन आंतरधर्मीय विवाह करणारे ते हेच बाजिराव का? की ते पहिले होते?

सौजन्य Raju Karlekar, Pune म्हणजे काय? त्यांचा लेख ढापून डकवलाय का इथे?

समशेर बहादुर नावाचा मुलगा कुणाचा होता ?
---- पहिले बाजीराव - मस्तानी... यान्चा मुलगा समशेर बाहाद्दुर, पानिपतास विरगती प्राप्त झाली.

मस्तानीशी आंतरजातीय आय मीन आंतरधर्मीय विवाह करणारे ते हेच बाजिराव का? की ते पहिले होते?
---- ते पहिले बाजीराव होते...

दुसर्‍या बाजीरावावर लिहीलेलं 'मंत्रावेगळा' हे पुस्तक वाचा.
एका निराळ्या दृष्टीकोनातून पेशवाईच्या अंतिम पर्वाचा त्यात आढावा घेतला आहे.

दुसर्‍या बाजीरावाला जेव्हा कळायला लागलं, तोपर्यंत जे व्हायचे ते सगळे होऊन गेलेलं! आणि त्याच्या आधीच इतर मातब्बर, एक तर आपापसांत झगडून कमजोर झाले किंवा इंग्रजांशी लढून कम कुवत झाले.
शेवटी, वारस योग्य नसला की घात होतोच! त्याची काळजी आणि राजकीय शिक्षण आधीपासून केल गेल असतं तर कदाचित वेगळ चित्र दिसलं असत पण असो.

एक एक राज्य पोखरत ब्रिटीश यशस्वी झाले Lol

आणि आपण अजूनही काहीच शिकत नाही ... आनंद आहे!

>>>> त्यातच आष्टा येथे बाजीरावाने इंग्रजांना धूळ चारली , कोरेगाव ,आष्टा ह्या दोन्ही ठिकाणी इंग्रजांना हरवण्यात ह्या बाजीरावाला यश मिळालं ,पण त्यानंतर इंग्रंजानी प्रतापसिंहाशी करार करून मराठी राज्य ताब्यात घेतलं ,ती तारीख होती ४ एप्रिल १८१८ ,या करारानुसार बाजीराव बंडखोर ठरवला गेला ,मराठेशाहीचा खरा अंत इथे झाला <<<<<
हे वाक्य सर्वात महत्त्वाचे. खास करुन सद्यस्थितीत. हा इतिहास शाळा कॉलेजमधे शिकवलाच जात नाही.
बाजीराव "माणुस" म्हणुन कसा होता ते समजुन घेण्यापेक्षाही तो पेशवा होता, व शेवटपर्यंत आधीच्या पेशव्यांसारखाच स्वराज्याच्या शत्रुशी लढत राहिला हे सत्य. पण बाकी सर्व सरदारदरकदारांनी शस्त्रे इंग्रजांपुढे ठेवल्यावर त्याचा नाईलाज झाला होता. काही अंशी हे देखिल सत्य असेल की लढण्याचे त्याचे निर्णय कदाचित उशीरा झाले असतील, पण त्याकरताही तत्कालिक राजकीय/सामाजिक परिस्थिति कारणीभूत होती असे म्हणण्यासही वाव आहे.

लेख आवडला.
दुसर्‍या बाजीरावावर आधारित "मंत्रावेगळा" हे पुस्तक घ्यावे की आणखी कोणते?

बाजीराव "माणुस" म्हणुन कसा होता ते समजुन घेण्यापेक्षाही तो पेशवा होता, व शेवटपर्यंत आधीच्या पेशव्यांसारखाच स्वराज्याच्या शत्रुशी लढत राहिला हे सत्य!
>>
हे कधीच सांगितले जात नाही! निव्वळ तो कसा वाईट होता ह्याच्याच सुरस कथा प्रचलित आहेत!

बाजीराव "माणुस" म्हणुन कसा होता ते समजुन घेण्यापेक्षाही तो पेशवा होता, व शेवटपर्यंत आधीच्या पेशव्यांसारखाच स्वराज्याच्या शत्रुशी लढत राहिला हे सत्य!>>>>>>> बाजीराव हा स्वराज्याच्या शत्रूशी लढत राहिला हे सत्य आहे त्या काळात राजेशाही असल्याने बळी तो कानपिळी हे होतेच स्वराज्याचे शत्रू कोण तर आपल्या भूभागावर आक्रमण करणारे. परंतु पेशवाईच्या काळात स्वराज्यात सारे आल बेल होते? जातीभेद इतक्या प्रचंड प्रमाणात वाढला होता कि शेवटी स्वराज्यातल्या सामाजिक स्तरावर हीन समजणाऱ्या लोकांनी इंग्रजांशी मिळून कोरेगावचा लढा दिला . स्वकीया कडूनच पेशवाई संपली. इंग्रजांचे राज्य आले नि देश राजेशाहीच्या जोखडातून बाहेर पडून खुल्या विस्तीर्ण जगाचे दर्शन इथल्या जनतेला झाले. नंतर ब्रिटिशा विरुद्ध यल्गार पुकारून राजेशाहीत एकेक राजाच्या अधिपत्याखाली वाटली गेलेली जनता हि कुठल्या राजाची जनता म्हणून न राहता १९४७ साली भारताची जनता झाली . राजेरजवाडे, ब्रिटीश सर्व इतिहासजमा होवून लोकशाहीच्या सुवर्णक्षणाची भागीदार झाली ..

आंबटकाकांसाठी ठळक वाक्य महत्वाचे कारण त्यानुसार मराठी राज्य लयास जाण्यामागे 'पेशव्यांचा' हात नव्हता असे म्हटले आहे . Proud

सामाजिक विषमता, जातीभेद होता हे खरे आहे, पण एकमेकांविरूद्ध लढण्याचा त्याच्याशी संबंध नाही. एकाच कुटुंबातील भाउबंद सुद्धा एकमेकांशी लढत, अगदी इंग्रजांच्या बाजूनेही. एवढेच काय भारताला स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता जोरात होती, 'चले जाव' चळवळी च्या वेळेस ब्रिटिशांना तत्कालीन नेत्यांनी प्रचंड विरोध केला होता, आणि त्याच वेळेस सुमारे १०-२० लाख भारतीय सैन्य ब्रिटिशांच्या बाजूने दुसर्‍या महायुद्धात लढत होते. त्यावेळची सर्वात मोठी आर्मी!

दलित लोकांना अत्यंत वाईट वागणूक मिळाली यात शंकाच नाही. पण इंग्रजांकडेही सामाजिक स्तर होते, कॉमनर्स ना वेगळेच राहावे लागे. अगदी आपल्याएवढी वाईट अवस्था नव्हती पण एकसंध समाज वगैरे अजिबात नव्हता. तरीही त्यांनी अर्ध्या जगावर राज्य केले. अमेरिका दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस महाप्रचंड ताकदवान होती (कदाचित अजूनही आहे), पण तेथील विषमता तितकीच प्रचंड होती. त्यामुळे 'याच्यामुळे अमुक झाले' या केवळ कल्पना/अंदाज आहेत. ते ऐतिहासिकरीत्या सिद्ध करणे अशक्य आहे.

दुसर्या बाजीराव वर धागा ? एकवेळ पहिल्या बाजीरावांवर आला असता तर समजले असते
असो असते एकेकाची मनस्थिति Wink
कुरवाळणे चालू द्या.

दुसर्‍या बाजीरावाचे उदात्तीकरण करणे फारसे उचित होणार नाही.
कोरेगावच्या लढाईबद्दल ...
एकतर जे लोक इंग्रजांच्या बाजुने लढले ते इंग्रजांकडे सैनिक म्हणुन नोकरी करत असणार त्यामुळे त्यांना इंग्रज सांगतील त्यांच्याशी लढणे भागच होते. ते काही अगदी आपण पेशवाईच्या विरोधात लढून खुप चांगले करत आहोत अशा अभिनिवेशाने लढत असतील असे वाटत नाही. हे सगळे रंग नंतर दिले गेले असावेत. एकतर इंग्रज फोडा आणि राज्य करा यात पटाईत होतेच, आणि तसेही दुसर्‍या बाजीरावाच्या विरोधात अनेकच लोक होते. होळकरादी लोकांनी देखील पुण्याची राखरांगोळी केलीच होती. उलट ही घटना आपल्यात असलेली सामाजिक दरी वाढविण्यास कारणीभुत होणारी दुर्दैवी घटना असे समजावे.
नानासाहेब पेशव्याने पण अशीच एक दुर्दैवी घटना (लढाई) घडवून आणली होती. आंग्रे यांचे आरमार बुडविण्याकरता त्याने कोणाचे सहाय्य घ्यावे तर निजाम आणि इंग्रज. Sad
कोणाचेही चुकले असले तरी त्याला वेगळा रंग दिला जाऊ नये असे वाटते.

एकतर जे लोक इंग्रजांच्या बाजुने लढले ते इंग्रजांकडे सैनिक म्हणुन नोकरी करत असणार त्यामुळे त्यांना इंग्रज सांगतील त्यांच्याशी लढणे भागच होते. ते काही अगदी आपण पेशवाईच्या विरोधात लढून खुप चांगले करत आहोत अशा अभिनिवेशाने लढत असतील असे वाटत नाही.

........

आँ ! हे विधान शिवाजी , प्रभु राम , भारत ... ़कुणाच्याही सैन्याबद्दल खरे ठरु शकते.

>>आँ ! हे विधान शिवाजी , प्रभु राम , भारत ... ़कुणाच्याही सैन्याबद्दल खरे ठरु शकते.
अगदी बरोबर बोललात. शिवाजीच्या सैन्यात पठाण होते, पेशव्यांच्या सैन्यात इब्राहिमखान होता, रामाच्या सैन्यात बिभिषण सामिल झाला होता. Happy

अरे कुणी याचे उत्तर द्याल का --

अप्पाकाका | 5 June, 2015 - 10:20
दुसर्‍या बाजीरावावर आधारित "मंत्रावेगळा" हे पुस्तक घ्यावे की आणखी कोणते?

त्यानंतरही यशवंतराव होळकर यांनी सुद्धा मराठेशाही जिवंत ठेवली होती हो!

काही लोकांना सातारा आणि पुणे याच्याबाहेर स्थापिलेल्या राज्याला मराठेशाही म्हणन थोड अवघड वाटत. वरील लेख उदात्तीकरणाचा उत्तम नमुना आहे.

त्या यशवंतराव होळकराचे काही सांगू नका. विठोजी होळकराला पेशव्यांनी मारले याचा राग मनात धरून त्याने इंग्रजांच्या मदतीने पुण्याचे अतोनात नुकसान केले. शनिवारवाडा तब्बल एक आठवडा जळत होता.

सातारा, पुणे याच्या बाहेर असलेल्या मराठा सरदार दरकदारांच्या अधिपत्याला मी तरी कधीच मराठी राज्य असे म्हणणार नाही. Angry
एकतर खुद्द पेशवे सुद्धा स्वतःला छत्रपतींच्या राज्याचे मंत्री असेच मानत होते. त्यांनी नेमलेल्या सरदारांनी स्वतःची एवढी भर करून घेतली आणि तिकडे जाऊन मराठीपण असे काहीच राखले नाही, उलट हिंदी भाषिक झाले. कायतर म्हणे राजे सिंदिया Angry
पेशवे किंवा दस्तुरखुद्द छत्रपतींच्या मालकीचे असे काय दिसते राहिलेले ? एक करोड होनांचे राज्य निर्माण केलेल्या महाराजांच्या मालकीची राहिलेली आणि अभिमानाने दाखविता येईल अशी एक फुटकी कवडी तरी आहे का ? Angry
गायकवाड, होळकर आणि शिंदे यांनीच सारे खिसे भरून ठेवले होते. जे अजुनही भरभरून शिल्लक आहेत. यांना कशाच्या आधारावर आपले म्हणायचे ? Angry

विठोजी होळकराला पेशव्यांनी मारले>>>>

मान्य आहे ना नक्की?? कि याला पण 'वध' वगैरे संबोधन लावणार?? ठरवा काय ते. स्वतःच्या जवळच्या माणसाला कट करून मारल्यावर यशवंतरावाने दुसऱ्या बाजीरावाची आरती ओवाळली पाहिजे होती का.

सातारा, पुणे याच्या बाहेर असलेल्या मराठा सरदार दरकदारांच्या अधिपत्याला मी तरी कधीच मराठी राज्य असे म्हणणार नाही. >>>>>
याअर्थी अहिल्याबाई तर परकीय झाली आम्हाला.

उलट हिंदी भाषिक झाले.>>>> त्यात चूक काय आहे?? तिथली प्रजा कोण होती??

<<<<पेशवे किंवा दस्तुरखुद्द छत्रपतींच्या मालकीचे असे काय दिसते राहिलेले ? एक करोड होनांचे राज्य निर्माण केलेल्या महाराजांच्या मालकीची राहिलेली आणि अभिमानाने दाखविता येईल अशी एक फुटकी कवडी तरी आहे का ? राग गायकवाड, होळकर आणि शिंदे यांनीच सारे खिसे भरून ठेवले होते. जे अजुनही भरभरून शिल्लक आहेत. यांना कशाच्या आधारावर आपले म्हणायचे ?>>>>>

सातारा आणि पुणे यांच्या वंशजांचा दोष आहे तो, त्यासाठी होळकर, गायकवाड, शिंदे यांना का दोष द्यायचा. सातारकर आणि पुणेकर यांच्या पूर्वजांनी लोकांना एकत्र बांधून ठेवले होते त्याच्या विरुद्ध कारभार त्यांच्या वंशजांनी केला, त्याची परिणिती आहे ती.

नंतरच्या काळात महादजी, अहिल्याबाई हे सन्मानीय अपवाद होत.

>>सातारा आणि पुणे यांच्या वंशजांचा दोष आहे तो, त्यासाठी होळकर, गायकवाड, शिंदे यांना का दोष द्यायचा. >>सातारकर आणि पुणेकर यांच्या पूर्वजांनी लोकांना एकत्र बांधून ठेवले होते त्याच्या विरुद्ध कारभार त्यांच्या >>वंशजांनी केला, त्याची परिणिती आहे ती.
सहमत.

नाना गेला आणि पुण्याचे शहाणपण लयास गेले.

छान लेख. दुसर्‍या बाजीरावाबद्दल आणि मराठेशाहीच्या अंताबद्दल वेगळी माहिती वाचायला मिळाली.

वर यशवंतराव होळकरांचा विषय आलेलाच आहे त्यांच्या वरील झुंज हे पुस्तक वाचले होते. त्यामध्ये होळकरी दंगा ते इंग्रजांविरूध्द लढण्याकरिता फौजेची बांधणी ह्या दृष्टीने यशवंतराव होळकरांची भुमिका एका वेगळ्याच अंगाने दाखविली आहे.

Pages