मग पात्रानु खाटुं - अर्थात अळू-मुगाचं आंबट

Submitted by भरत. on 8 June, 2015 - 07:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मूग १/४ कप, तूर डाळ १/४ कप ,अळू ६-७ पाने
गूळ एक ते दीड टेबलस्पून , चिंचेचा कोळ : दीड टेबलस्पून
मोहरी १/४ टीस्पून ,जिरे १ टीस्पून, हिंग १/४ टीस्पून, आले-मिरचीचे वाटण २ टीस्पून, कढीपत्ता ७-८ पाने, हळद १/४ टीस्पून,
आले अर्धा इंच
फोडणीसाठी : तेल , मोहरी, जिरे, मेथीदाणे, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता

क्रमवार पाककृती: 

१) मूग व तुरीची डाळ दीड-दोन तास एकत्र भिजत घाला.
२) अळूचे देठ सोलून, पाने व देठ बारीक चिरून घ्या.
३) कुकरमध्ये मूग, तुरीची डाळ, अळू, जिरे,मोहरी, मेथीदाणे, हिंग, कढीपत्ता घेऊन नीट ढवळून पाणी घालून मध्यम आचेवर तीन-चार शिट्या होतील इतका वेळ शिजवा.
४) डाळ शिजली की त्यात हळद, आले-मिरची पेस्ट, गूळ, चिंचेचा कोळ, मीठ व किसलेले आले घालून मंद आचेवर शिजू द्या.
५) फोडणी तयार करून डाळीवर ओता . थोडावेळ उकळू द्या.

कशाशी खायचे,: चपाती की भात यावर आमटी किती घट्ट्/पातळ करायची ते ठरवावे.
गूळ, मिरच्यांचे प्रमाण आपापल्या आवडीवर
mug alu.jpg

वाढणी/प्रमाण: 
४-५ वाट्या
अधिक टिपा: 

नावात खाटुं असलं तरी ही आमटी आंबट लागत नाही. भाताबरोबर ही आमटी आणि आंबट कढी (भातत एकदमच कालवून) जोडीला पापड असा बेत असतो.

माहितीचा स्रोत: 
ईटीव्ही गुजरातीवरील रसोई शो मध्ये हीना देसाई यांनी दाखवलेली कृती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोडणी नंतर ओतणे हे नवीन आहे.

मी प्रत्येक वेळी आधी फोडणी करुन मग त्यात शिजवलेले मटेरियलघालतो. यात ओल्या खोबर्‍याचे अगदी पातळ काप घालावेत.

नरसोबावाडीला टेंबे स्वामी जयंती की पु तिथीला एका मोठ्या अती विशाल पात्रात ही भाजी करतात.

त्यात येणारा प्रत्येकजण काही ना काही भाजी भोपळा , इतर पाला , बटटा वांगी वगैरे टाकतो. मस्त लागते भाजी. लोक किटली भरुन घरीही नेऊ शकतात.

अख्खे मूग. छोट्या हंडी कुकरमध्ये शिजवलेले तेव्हा मुगासकट सगळे मस्त शिजून आणि मिळून आले होते. आज भाताच्या जोडीला कुकरच्या डब्यात लावले तेव्हा नंतर गॅसवर जरा जास्त वेळ शिजवून घोटावे लागले.

मूग पटकन शिजतात. रात्री कडधान्य भिजत घालायला विसरलो तर मूगच मदतीला धावून येतो.

ही दक्षिण गुजराथ -सुरतेकडची पाककृती आहे.

Aalu chya patal bhaji shi multi julti pa kru..
Mug ghalun Karin pahin.
ALU ani gujrathi paddhatini nakkich chaan lagat asnar. .

) कुकरमध्ये मूग, तुरीची डाळ, अळू, जिरे,मोहरी, मेथीदाणे, हिंग, कढीपत्ता घेऊन नीट ढवळून पाणी घालून मध्यम आचेवर तीन-चार शिट्या होतील इतका वेळ शिजवा.>>>>>>>>> जिरे,मोहरी, मेथीदाणे, हिंग, कढीपत्ता हे कच्चेच घालायचे ?

हे तर फतफते Happy कालच केले होते.

फक्त फोडणीत मेथी घालत नाही. आलंही नाही. थोडे शेंगदाणे व थोडी चणाडाळ भिजवून घालते.

Devki aala mirchee pest ani kadhi patta kachha ghatal hoto ani mohari methi dane ani lasun yachi pali phodni dili hoti