बाजीराव दूसरा

Submitted by उडन खटोला on 4 June, 2015 - 12:08

मराठेशाहीचा उत्तरार्ध बघितला की नक्कीच मनाला वाईट वाटत , शिवबांनी उभी केलेली हि हिंदू रियासत काळानुसार लोप पावत चालली … याला जबाबदार कोण अस विचारलं तर खूप विचार मनात येतात , मराठी सरदारांचा नाकर्तेपण म्हणावं तर ते उत्तम लढले , पेशव्याच्या नावे भांड फोडाव तर तोही समर्थपणे लढला , राजाला दोष द्यावा तर राजाने शस्त्र बाजूला ठेवून शत्रूलाच मित्र केल , मग मराठेशाही संपवणारे गुन्हेगार कोण ? तर आपण स्वतः ,फंद फितुरी ,पराकीयांवरचा विश्वास ,त्यांचीच मदत घेवून शत्रूला माजघरात येवू दिलच पण स्वतः घर त्याच्या नावे करूनही दिल , परत स्वतः फसले दुसर्या बाजीरावाचा कालखंड बघितल्यावर असाच विचार मनात येतो ,नाना फडणीस यांनी जे राखाल ते काळाने उलटून नेलं … सुरुवात होते तिथूनच ,सवाई माधवरावला पेशवा करून नाना फडणीस याने राज्य उत्तम चालवल,त्याने भट घराण्याची निष्ठा बाळगलीच ,पण हे करताना आनंदीबाईकडे दुर्लक्ष केलं , यात दोष नानाला देण्यासारखा आहे का ? तर वादाचा विषय, पण आनंदीबीईची नानाला लिहिलेली पत्र या बाजीराव रघुनाथाच्या संगोपनाविषयीची काळजी दिसून येते ,सवाई माधवरावांच अकस्मात जाणं हा मराठ्यांच्या सत्तेला मोठा धक्का होता , कारण आता वारस कोण ? आणि यातूनच सुरु झाली मराठेशाहीच्या अस्ताची सुरुवात ....

खरतर नानाने सवाई माधवरावाच्या नावाने पेशवाई चालवली होती,त्यातुन त्याने आपली निष्ठा सिद्धही केली होती,मग पहील मराठा ईंग्रज युद्ध असो ,वा फर्मानबाडी साठी ईंग्रजांना दिलेला नकार असो वा रघुनाथरावाचा राजकीय अंत असो,अश्या अनेक गोष्टी नानाने केल्या,पण हे करताना सवाई माधवराव जाईल अशी पुसटशी कल्पनाही त्यास नव्हती ,आता बाजिराव रघुनाथरावाला सत्तेवर आणायचं तर त्यास तो अनुकुल नव्हता,कारण बाजिरावावर त्याची मर्जि नव्हतीच,हा दोष खरतर कारभार्यानांच दिला पाहीजे कारण शेवटी बाजिराव हा पेशव्यांचा थेट वंशज होता,तरीही नानाने हट्टाने बाजिरावाच्या धाकट्या भावाला अर्थात चिमाजीला सवाई माधवरावाच्या बायकोने दत्तक घेवुन पेशवा बनवुन आणण्याचा घाट घातला,तो पुर्णत्वास नेला ही,पण हे दत्तक विधान मान्य होणार नाही कारण खुद्द सासर्याला दत्तक घ्यायची ही योजना शास्त्र संमत नसल्याने मोठा घोळ होणार होता,पण यातुन बाजिराव बाजुला होवुन ,बाळ बुद्धीचा चिमणाजी पेशवा झाला तर पुन्हा कारभार नानाच्या हाती येयील हे सरळ सरळ दिसतं होतं,यातुनच परशुराम पटवर्धन सारख्या १२ भाईच्या सरदारावर वचक मिळवुन पुन्हा राज्य कारभार एकहाती घेवुन सुरळीत करायचा मानस नानाचा होता,पण बाजिराव त्यास दाद देईना,शेवटी नाईलाजाने नानाने बाजिरावाला अटी घालून पेशवा बनायचा घाट घातला,त्यासाठी त्याने शिंदे,होळकर,भोसल्याना पैसा दिला,पटवर्धनाना कैद केली आणी बाजिरावाला पेशवाई वस्त्र मिळवुन देण्यास मदत केली,आणी हेच होतं त्याच गाजलेलं,अशक्य पण तरीही शक्य करुन दाखवलेल,भल्या भल्याना न समजणारं "महाडच राजकारण" ह्यावर लिहायच म्हटलं तर पोस्ट वाढेल,पण यातुन नानाची कसदार बुद्धी दिसुन येते,नानाने आणि बाजिरावाने करार केला होता,आणि नानाने बाजिराववर विश्वास टाकला हीच मोठी चुक होती यातुन बाजिराव पेशवा झाला,पण हे होण्यासाठी त्याने दौलतराव शिंद्याला हाताशी धरुन १ कोटी रुपये देतो असा करार केला होता.

थोडक्यात कोणतंही राजकीय दृष्टी नसणारा,शिपाईगिरीचं व्यवस्थित शिक्षण नसणारा,कैदेत वाढलेला रघुनाथरावाचा राजकीय दृष्ट्या अपरीपक्व असा बाजिराव थेट पेशवाच्या मसलतीवर जावून आरुढ झाला,त्यातच शिंद्याना पैशाची चटक लागली होती,होळकरानाही आपला ताबा हवा होता,भोसले स्वतंत्र झाल्यात जमाच होते,कोणाचाही धरबंद नाही,सातार्याचा राजा शस्त्र न धरता येणारा त्यातही राजकीय चतुरता नसलेला असा होता,थोडक्यात मराठेशाही त्यावेळी स्वार्थात पुरेपुर बुडली होती, त्यातचं नानाने आपल्याला वाईट वागणुक दिली होती म्हणुन बाजिरावाने नानालाच अटक केली,ही मोठी चुक बाजिरावाच्या हातुन झाली, त्यातचं बाजिराव पेशवा झाल्यावर दौलतरावाने आपल्यासासर्याला हाताशी धरुन बाजिरावाकडे पैशाची मागणी केली,पण बाजिरावाकडे स्वत:कडे पैसे नसताना त्याने नकार दिला मग दौलतरावाने पुणं लुटायला सुरुवात केली , बाजिरावाला आपण काय करतोय ह्याचा अंदाजही नव्हता,त्यातच कुंजिराच्या सांगण्यावरुन विठोजी होळकराची निर्घुण हत्या केली. . .यात बाजिरावाच्या अक्षम्य चुका होत गेल्या ,विठोजीच्या रागाचा बदला म्हणुन आणि शिंद्याना उत्तर म्हणुन यशवंतराव होळकराने अमृतराव (राघोबाचा दत्तक पुत्र) याला हाताशी धरुन पुण्यावर चाल केली,त्याला बाजिराव सामोरा गेला पण बाजिरावाचा त्यात पराभव झाला,यशवंत होळकराने पुणं लुट लुट लुटलं, त्यात होळकराला सनदा हव्या होत्या,अमृतरावाने नकार दिल्याने ,बाजिरावाला जिवंत सोडण्याशिवाय दुसरा पर्याय होळकरांना नव्हता पण ह्याची भिती येवढी होती की बाजिराव वसईला निघुन गेला

दुसरीकडे ईंग्रज अधिकारी हेस्टिंग आपले भारतातले पाय मजबुत करायच्या प्रयत्नात होता,मराठे हे एकमेव त्याचे प्रबळ शत्रु राहीले होते,त्यातचं बाजिरावाने त्यांच्याशी तह करुन फौजा घेवुन पुण्यात आला,ह्या तहानुसार पेशवा बाजिरावच होणार होता पण ईंग्रजांचा प्रतिनिधी म्हणुन. . एकंदरीत ही राजकीय परिस्थिती बघितली तर बाजिरावाच्या चुका सरळ सरळ दिसतात पण एका अपरीपक्व माणसाकडुन बदलत्या राजकीय परीस्थितीत दुसरं काय घडु शकतं का?? ही गोष्ट विचार करण्यासारखीच आहे, पण या चुका सुधारुन बाजिराव हळुहळु इंग्रजांच्या विरुद्द खलबत रचू लागला,आपण केलेल्या चुकां त्याच्या लक्षात येवू लागल्या म्हणुन गुप्तपणे तो भोसले,होळकर,शिंदे यांच्याशी संधान बांधू लागला,तोवर शिंदे तर मांडलिक झालेच होते,भोसल्यानी हार मानली होती, दुसरे मल्हारराव होळकर यासं मात्र अनुकुल होते,त्याना ईंग्रजांबद्दल द्वेष होताच ते भोसलेना लिहीलेल्या पत्रातुन दिसते पण भोसल्याविरुद्ध ईंग्रजानी पुकारलेल्या युद्धात होळकर मात्र तटस्थ राहिले,थोडक्यात शिंदे होळकर भोसले यांना वेगवेगळं करुन हरवण्यात इंग्रजांना यश मिळालं होतं. . पण अजुन बाकी होतं ते सातारची गादी,खरतर प्रतापसिंहानी बाजिरावाला पदच्युत करुन तेव्हाच दुसरा पेशवा नेमुन वसईचा तह नाकारायला हवा होता,पण तेच इंग्रजांचे मित्र बनुन बाजिरावाविरुद्द कारस्थानं रचू लागले,हीच मोठी गोम आहे, ईकडे बाजिराव इंग्रजांविरुद्ध उघड उघड बंड करु पाहतं होता आणी त्यातच हा मसलतीचा राजा त्याच ईंग्रजांशी संधान बांधु पाहतं होता,बाजिरावाने केलेला वसईचा तह हा जर ईग्रजांचा पुण्यातला प्रवेश म्हटला तरी तो राजाला नाकारता आला असता,त्यातच बाजिराव मुर्ख असता तर ईंग्रज तेव्हाच गप्प बसले असते . पण बाजिरावाचा धुर्तपणा त्यांच्या लक्षात येवू लागला,येथुनच रचली गेली गंगाधरपंताच्या खुनाची कारस्थान,गंगाधरपंत...

हे गायकवाडांचे कारभारी होते ,गायकवाड यांनी ३ कोट रुपये थकवले होते , आणि त्यानाही म्हणून बाजीराव नको हवे होते , त्यावेळी ह्या वर मार्ग काढण्यासाठी आपल्या कारभार्याला अर्थात गंगाधरपंताना त्यांनी बाजीरावाकडे पाठवलं , बाजीराव त्यांना घेवून पंढरपूरला गेले होते , आणि तेव्हाच त्यांचा तिथे खून झाला , आणि त्याचं खापर इंग्रजांनी बाजीरावावर फोडून त्याला दाबण्याचा प्रयत्न केला ,खरतर या गंगाधरपंतांच्या रक्षणाची जबाबदारी इंग्रजांची होती पण त्यासाठी त्यांनी त्यांना कोणतीही सुरक्षा पुरवली नव्हती ,पंढरपूरसारख्या पवित्र ठिकाणी बाजीराव त्यांना मारण जवळपास अशक्य होत , पण त्याच खापर बाजीरावावर फोडून त्यांनी हात वर केले , एवढी काळजी असणाऱ्या इंग्रजांनी गंगाधार्पन्ताच्या नातेवाईकांना भरपाई पण दिली नाही ,या उलट बाजीराव आणि गंगाधरपंत यांचे संबध चांगले होते , कदाचित तो त्यांना पुण्याचा कारभारी बनवणार होता, पण इंग्रजांनी ते खापर बाजीरावाच्या सहकारी डेंगळे यांच्यावर फोडून त्याचा काटा काढायचा मार्ग सुकर केला ,हे डेंगळे म्हणजे प्रती नाना असेच होते ,बाजीरावावर दबाव वाढत गेला ,नाईलाजाने डेंगळे पकडले गेले ,पण ठाण्यातून ते पळून गेल्याने इंग्रजांची नाचक्की झाली ,

बाजीराव हुशार होता हे सहज लक्षात येवू लागल्याने इंग्रजांनी राजे प्रतापसिंहांना आपलस केलं ,आणि या राजाने आपल्याच लोकांविरुद्ध इंग्रजांना मदत केली ,गंगो बापुतर्फे गुपचूप पत्रव्यवहार केला ,बाजीराव उघड उघड इंग्रजांविरुद्ध लढणार हे दिसत होत ,त्याने गुपचूप भोसले ,शिंदे यांच्या कडे आपले वकील रवाना केले ,इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी प्रतापसिंहयांना माहुलीला जावून भेटला ,पण दुर्देव मोठ हा सारा प्रकार या मराठी राज्याच्या धन्याने इंग्रजांना कळवला … हे पाप ह्या राजाने केले हे मात्र आपण सोयीस्कर विसरतो … ह्या लढाईत त्याने ह्या राजाला घेतले हे त्याच्या हुषारीच लक्षण आहे ,पण इंग्रजांनी छत्रपतीयांना बाजीरावाने कैद केले म्हणून फितवण्यास सुरुवात केली , तुम्ही पेशव्यांना संपवा आम्ही राज्य तुमच्या हातात देवू अस वचन इंग्रजांनी राजांना दिल ,पण नंतर ते पाळल नाही हे मुद्दाम सांगावयास नको … बाजीरावाची हि धडपड परिपूर्ण होत नव्हती कारण शिंदे ,भोसल्यांनी त्याला मदत केली नाही ,तरीही बाजीरावाने आपले सेनापती बापू गोखल्यांच्या मदतीने इंग्रजांवर खडकी येथे हल्ला केला पण त्यात तो हरला त्यात तो स्वतः नव्हता … इंग्रजांनी पुणे ताब्यात घेतलं ,बाजीराव मोठ्या शिताफीने बापू गोखाल्यांबरोबर तिथून निसटला ,आणि सासवड मुक्कामी आला , तिथून पुढे ६ महिने बाजीराव इंग्रजांविरुद्ध लढत राहिला , काही महाभाग ह्याला पळपुटा म्हणतात ,ते किती एकांगी आहे हे दिसून येत ,तो पळपुटा असता तर पुन्हा लढलाच नसता … पण नंतर त्याने खडकी ,आष्टा , कोरेगावात इंग्रजान्विरुद्द लढाया केल्या ,त्याच सुमारास इंग्रजांनी बापू गोखाल्याला फितूर करण्याचा प्रयत्न केला, पण तो बाजीरावाशी एकनिष्ठ राहिला ,दरम्यान इंग्रजांनी सातारा जिंकल आणि प्रतापसिंहांना देवून आम्ही कसे चांगले असा बनाव केला ,आणि त्यात बाजीराव आणि प्रतापसिंह वेगळे आहेत अस सांगितलं ,त्यातच आष्टा येथे बाजीरावाने इंग्रजांना धूळ चारली , कोरेगाव ,आष्टा ह्या दोन्ही ठिकाणी इंग्रजांना हरवण्यात ह्या बाजीरावाला यश मिळालं ,पण त्यानंतर इंग्रंजानी प्रतापसिंहाशी करार करून मराठी राज्य ताब्यात घेतलं ,ती तारीख होती ४ एप्रिल १८१८ ,या करारानुसार बाजीराव बंडखोर ठरवला गेला ,मराठेशाहीचा खरा अंत इथे झाला ,बाजीराव मूर्ख असता तर इंग्रजांना आता काही करावेच लागले नसते ,या करारानुसार बाजीराव कायद्याने पेशवा राहिलाच नाही ,कारण खुद्द राजानेच शरणागती पत्करली होती , तरीही आपण सार खापर बाजीरावावर फोडून मोकळे होतो ,हे मात्र इतिहास न जाणता केलेले विधान होय ,या नंतरही बाजीराव लढाला ,शेवटी ४ जूनला धुलकोट येथे तो इंग्रजांविरुद्ध हरला …

खरतर इंग्रज इतके हुशार होते की राजाशी करार करूनही ,त्यांना बाजीरावाविरुद्ध लढून करार करावा लागला ,यातच बाजीरावाची हुशारी दिसून येते …. बाजीराव त्याच्या पूर्वजाप्रमाणे कर्तृत्ववान नव्हता हे उघड उघड आहे ,पण कैदेत वाढवलेल्या ह्या बाजीरावाला इतिहासात पळपुटा म्हणून हिणवलं गेले हे चुकीच आहे, तस असत तर त्याने युध्द केलं नसत ,छत्रपतीनी करार केल्यानंतर त्याला लढायची गरजही नव्हती,पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोट ठेवून टीका करण्यात काही लोक धन्यता मानतात ,त्याकाळात हे समाजमान्य होत हे लोक विसरतात , लग्नात मुलीकडून पैसे घातल्यास त्यास दंड करण्यात येयील हा आदेशही त्याने काढला होता ह्याकडेही इतिहासकार सोयीस्कर दुर्लक्ष करतात,

माझ्या मते दुसरा बाजिराव हा मानवी मनाचा नी कर्तव्याच्या लढाईचं प्रतिक आहे. . त्याच्या हातुन मोठ्या चुकाही झाल्या पण त्याने त्या सुधारल्याही. . . पुर्वायुष्यात होणार्या चुकांना समाज कसं बघतो,स्वार्थि लोक अशा माणसांचा वापरं कसा करुन घेतात आणी मग नामानिराळं कसं होतात याचं हे उत्तम उदाहरणं आहे,सरदार,राजा या दोहोंनीही याला भरपुर वापरुन घेतला . . तो पळपुटा नव्हता,मुर्खही नव्हता पण उभरत्या वयात योग्य संस्कार न झालेल्या तरीही अनुभवातुन शिकलेला हा बाजिराव मनाला विचार करुन जगायला भाग पाडतो. .

सौजन्य ----- Raju Karlekar,Pune

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेशवे घराण्याची अखेर!

हिंदुस्थानच्या इतिहासात हिंदूवर्चस्वी राजसत्ताचालकांच्या घराण्यात एकापाठोपाठ चार चार कर्तबगार पिढ्या जन्मास आल्या याचे अत्यंत दुर्मिळ उदाहरण म्हणजे पेशवे घराण्याचे! बाळाजी विश्‍वनाथ, बाजीराव बल्लाळ, बाळाजी बाजीराव आणि माधवराव बल्लाळ आणि त्यानंतर पाचवा माधवराव नारायण. साधारण या ८५ वर्षांच्या कालखंडात मराठ्यांचा भगवा दिमाखात फडकविण्याचे काम या पाच लोकांनी त्यांच्या तडफदार सरदारांतर्फे केले. दक्षिणसिंधूपासून पार टोकाला अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत हा मराठ्यांचा समूह आपल्या पराक्रमाची पताका फडकवीत होता.

दुर्दैवाने शेवटचा पेशवा बाजीराव रघुनाथ याने मात्र या सार्‍यावर आपल्या कृतकर्माने बोळा फिरवून टाकला. राज्य घालविले. सत्त्व गमाविले. बेबंदशाहीचा, भित्रेपणाचा कारभार करून नालायकी म्हणचे काय हे त्याने सिद्ध केले. ते पण किती वर्षे? जवळजवळ त्याच्या मरणापर्यंत. १८५१ सालापर्यंत. पेशवेपदावरील त्याची २२ वर्षांची काळी कारकीर्द सोडली तर पुढे ३३ वर्षे इंग्रजांचे पेन्शन खात, ते पण अवाढव्य! आठ लाख रुपये प्रतिवर्ष! मोठ्या वैभवात. पण इंग्रजी आश्रयाने जगणार्‍या या बाजीरावाला जी मुलगी ७२ व्या वर्षी झाली ती म्हणजे ही बयाबाईसाहेब ऊर्फ सरस्वतीबाईसाहेब. १६ जानेवारी १८४७ रोजी तिचा जन्म झाला. या नादान पेशव्याच्या मृत्यूबरोबरच पेशवे घराण्याचे औरस पुरुष समाप्त झाले. मागे उरली ही एकमेव निशाणी. दुर्दैवी, हतभागी. बापाच्या मागे ती ६६ वर्षे जिवंत होती.

राणोजी शिंदे घराण्याच्या वारस बायजाबाई शिंदे यांनी मोठ्या कौतुकाने या लहान मुलीचे लग्न त्यांच्याच एका सरदारपुत्राबरोबर म्हणजे रावसाहेब आपटे यांच्याबरोबर ठरविले. १८५७ चा सेनानी तिचा दत्तकभाऊ, बाजीरावाचा दत्तकपुत्र नानासाहेबाने ब्रह्मवर्ताच्या आपल्या राजवाड्यात मोठ्या थाटामाटात लावून दिले. महिनाभर लग्नसोहळा चालला होता. नऊ-दहा वर्षांची ही मुलगी वय लहान म्हणून माहेरीच राहत होती. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा अध्याय लिहिला जात होता तेव्हा ती माहेरीच होती. होत आलेल्या पराभवाच्या अंदाजाने एकेरात्री नानासाहेब, त्याची पत्नी, बाजीरावाच्या दोन स्त्रिया आणखी काही मंडळी आणि ही बयाबाईसाहेब एका नावेत बसली. गंगापार रात्री होण्याचा त्यांचा इरादा होता. नावेत मेणबत्त्या पेटविल्या गेल्या. सर्वांना नमस्कार केला गेला. पेशवा स्वत:ला गंगार्पण करून घेणार असल्याचा हा भास निर्माण केला. सोबत जडजवाहिरांची, दागिन्यांची पेटी होती. श्री शिवाजी महाराजांना साक्षात समर्थ रामदासांनी एक भगवे वस्त्र, एका चंदनी पेटीत ठेवले गेले होते. भररात्री अंधारात नौका वल्हवली गेली. थोड्या अवधीत मेणबत्त्या विझवल्या गेल्या. लोकांचा समज झाला - महाराजांचे कुटुंब निजधामास गेले! गंगार्पण झाले!! शोकमग्न नागरिक परत गेले. पण तसे नव्हते! ही मंडळी नेपाळात गेली. तिथल्या राजाने मोठ्या आदराने त्यांना आश्रय दिला. नानासाहेब मात्र इंग्रजांचा अपराधी असल्याचे ते मानत असल्याने त्यांची वाताहत झाली. तो पुढे नेपाळातच नैमिषाख्यात मरण पावल्याचे इतिहास सांगतो.

बयाबाईंचे सासरे सरदार आपटे मोठे वजनदार होते. त्यांनी इंग्रजांमार्फत आपल्या सुनेला ग्वाल्हेरला परत आणले. १७ जून १८६१ च्या ‘ज्ञानप्रकाशात’ ही बातमी छापून आली होती. पुढे जवळजवळ २३ वर्षे त्यांनी संसार केला. त्या निपुत्रिक होत्या. धार येथील पवार, ग्वाल्हेरच्या, इंदूरच्या शिंदे-होळकरांच्या वारसांनी त्यांना फार सन्मानाने वागविले. ग्वाल्हेरी ज्या ज्या वेळी कारणपरत्वे बाजीरावाची ही कन्या शिंद्यांच्या महाली जात असे. त्यावेळी महाराज जयाजी शिंदे तिला मुजरा करीत. ती जाईपर्यंत उभे राहत. होळकरांनीसुद्धा तिला काही वर्षासन दिले होते. आपल्या उदरनिर्वाहासाठी काही पेन्शन इंग्रजांनी द्यावे असा प्रयत्न बयाबाई अखेरपर्यंत करीत होती. सुरुवातीस इंग्रजांनी त्यांना ५००० रुपये पेन्शन देऊ, मुंबईत रहा असे सुचविले. बयाबाई महाराष्ट्रात निवासास फारशा आल्याच नाहीत. आपला बाप कुलांगार आहे याची कदाचित त्यांना त्यांच्या अंतर्यामी जाणीव असावी, पण घराण्याच्या कर्तबगारीची योग्यता त्या जाणत असल्याने आठ लाख वर्षासन घेणार्‍या बापाच्या कन्येने ५००० हजारांवर समाधान मानून राहावे हे त्यांनी मान्य केले नाही. कार्यपरत्वे त्या नेपाळात राणीगंजलाही जात असत. गंगाकिनारी वाराणसी येथील त्यांच्या वाड्यात त्यांनी राहणे पसंत केले. बाई अत्यंत निस्पृह, अभिजात आणि धैर्यशील होती. कारणपरत्वे त्या पुण्यास येत. एका भेटीत १९१३ साली त्यांनी साहित्यसम्राट केळकरांचे ‘तोतयाचे बंड’ हे नाटक पाहिले होते.

१९१७ साली त्यांचे निधन झाले. वाराणसीच्या वाड्यात पेशव्यांच्या वंशाची ही अखेरची वेल वाळून गेली. बाळाजी विश्‍वनाथांच्या वंशातील पुरुषांची अखेर १८५१ मध्ये पळपुट्या बाजीरावाच्या मरणाने झाली. संपूर्ण कुलक्षय १९१७ साली श्रीमंत सरदार प्रतिष्ठाश्रयी सरस्वतीबाईसाहेब ऊर्फ बयाबाईसाहेबांच्या निधनाने झाला.

साभार दै. सामना. - अनंत शंकर ओगले

मायबोलीवरिल दुसर्‍या बाजीरावाबद्दल आणखी एक लेख: - दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग १

विजय आंग्रे,

माहितीबद्दल धन्यवाद! Happy

दुसरा बाजीराव पळपुटा व कर्तृत्वहीन असल्याचे शंकर ओगल्यांचे मत अगदी प्रातिनिधिक आहे. यामागील कारण असं की दुसरे बाजीराव पडले राघोबांचे पुत्र. राघोबांच्या कारवायांमुळे त्यांचे कुटुंबीय आनंदीबाई आणि दुसरे बाजीराव कैदेत टाकले गेले. बाजीराव वाढले ते कैदेतच. त्यामुळे राज्यकारभार आणि शिपाईगिरीचे शिक्षण शून्य. अचानक विसाव्या वर्षी पेशवेपद गळ्यात येऊन पडले. समोर आदर्श म्हणून कोणीही वडीलधारे नाही. त्यातून नाना फडणीस विरोधात. त्यामुळे कसलाही अनुभव नाही आणि मौजेची साधने भरपूर.

पुढे पेशवाई मोडीत काढून ब्रह्मावर्तास इंग्रजांचे निवृत्तीवेतन खात बसायची पाळी आली. मात्र तरीही ते स्वस्थ बसले नसावेत. तिथल्या वास्तव्यात अनेक विवाह करून बरेच संबंध जोडले असावेत. लग्ने न करताही मजा मारता आली असती. त्यामुळे विवाह करण्यामागील कारण राजकीय सोयरिकी व वारसाची प्राप्ती हेच असावे. काही कारणाने वारसाची प्राप्ती न झाल्याने दत्तक निधान घेतले. ते दुसरे नानासाहेब म्हणून आज ओळखले जातात. दुसऱ्या बाजीरावांनी १८५७ च्या लढाईची पायाभरणी निश्चितच केली असावी असा माझा अंदाज आहे.

मात्र फारसे कर्तृत्व अंगी नसल्याने काही संध्या हुकल्या असाव्यात. उदा. : १८३९ मध्ये इंग्रजांनी सातारची गादी खालसा केल्यावर छत्रपतींना हाताशी धरून काहीतरी करायला हवं होतं. पण वयाच्या पासष्टाव्या वर्षी ती धम्मक दाखवणं शक्य झालं नसावं.

कधीकधी वाटतं की १८५७ चा उठाव जर दहाबारा वर्षे आधी झाला असता तर रोचक निकाल लागला असता. कारण १८५७ च्या वेळेस साताऱ्यात फंदफितुरी झाली. १८४५ साली छत्रपती प्रतापसिंह हयात असतांना तशी न होण्याचा संभव जास्त होता. असो.

आ.न.,
-गा.पै.

गा पै ,
दोन असेच प्रश्न,
आपण दिलेल्या लिंक मध्ये प्रतापसिंग (belongs to sisodia rajput clan) असे का म्हणले आहे..
मराठ्यांचा छत्रपती sisodia rajput कसा.?
या महाराजांचं नाव प्रतापसिंग कसे .?

प्रकु,

१.
>> आपण दिलेल्या लिंक मध्ये प्रतापसिंग (belongs to sisodia rajput clan) असे का म्हणले आहे..

शिवाजी महाराज शिसोदिया वंशाचे राजपूत होते. त्यातच प्रतापसिंह जन्मले.

२.
>> या महाराजांचं नाव प्रतापसिंग कसे .?

बहुतेक भाषाभेद आहे. हिंदी वा राजस्थानी बोलीत सिंग म्हणतात. मराठीत/संस्कृतात सिंह पदवी लावतात.

आ.न.,
-गा.पै.

शिवाजी महाराज शिसोदिया वंशाचे राजपूत होते. >> Uhoh माहितच नव्हते ..
घोर अज्ञान Sad

मला वाटले राजपूत लोक हे फक्त उत्तरेकडे आढळतात .. गुग्लुन पहिले असता Maratha caste claims their origin from Rajputs असे कळाले Light 1
अधिक माहितीसाठी दुवा : http://www.indianetzone.com/27/maratha_community_hindu_community.htm

बाजीराव इंग्रजांशी लढताना हरला होता ना ?

मग इंग्रज त्याला पेन्शन का देत होते ?

राज्य खरोखरच हरला होता की पेन्शनीच्या मोबदल्यात देऊन टाकले ?

शिवाजी महाराज शिसोदिया वंशाचे राजपूत होते. >> अ ओ, आता काय करायचं माहितच नव्हते ..
घोर अज्ञान अरेरे
<<

आता राजपूतांनी 'महाराष्ट्रात गेले अन मराठी बोलू लागले, यांना राजपूत कसे म्हणावे, अरेरे' इत्यादि तारे लाल स्मायल्या टाकटाकून तोडायला हवेत.

हो ना?

मधुकर, धन्यवाद. मंत्रावेगळाची मागणी नोंदवलेली आहे. लवकरच येईल.

मराठी पुस्तके महाग असतात, नाहीतर अधिक प्रती घेउन परिचितांमधे भेटीदाखल देण्याचे मनी होते.

प्रकु,

काही राजपूत घराणी महाराष्ट्र + कर्नाटकातून उत्तरेत गेल्याचे ठोस पुरावे आहेत. राष्ट्रकूटवाले रठ्ठउड घराणे राठोड राजपूत झाले. इथे रंजक माहिती आहे (इंग्रजी दुवा) : http://historum.com/asian-history/40042-rajput-origin-south-india.html

आ.न.,
-गा.पै.

लेख छान आहे. नविन माहिती मि|ळाली.

काही प्रतिसाद वाचुन थोडे वैषम्य वाटले. इतिहास हा इतिहास असतो. तो वाचा, समजुन घ्या, त्यातुन काही शिकण्यासारखे आहे असे तुम्हाला वाटले तर शिका नाहीतर सोडुन द्या. पण आजच्या काळातले सामाजिक संकेत, न्याय अन्यायाच्या कल्पना, लोकांचे समाजातले स्थान ठरायच्या पद्धती इत्यादी गोष्टी त्या इतिहासावर कशाला लादताय? तो इतिहास ज्या काळात घडत होता त्या काळात जे सामाजिक संकेत, न्याय अन्यायच्च्या कल्पना, मतेमतांतरे होती त्याचे पडसाद त्या त्या इतिहासात पडले एवढेच.

आजचा चष्मा लाऊन कालचा इतिहास पाहिला तर त्यातुन फक्त वाद निर्माण होतात, जे मायबोलीवरच्या प्रत्येक धाग्यावर होतात.

राहुल -रे आणि सुरेख१,

पेशव्यांचे बहुतेक सर्व वंशज मारले गेले.
इंग्रजांनी त्यांचे नामोनिशाणही पुण्यात राहू नये म्हणून सगळी स्थावर इस्टेट हिसकावून घेतली.
शेवटचे एक वंशज अमृतराव वाराणसीला पोहोचले आणि तिथे आपल्या कर्तृत्वाने मोठे झाले. त्यांची तिकडे एक दोन देवळेही आहेत आणि अजूनही पेशवाई थाटात पण उत्तरभारतीय परंपरेने तिथे गणेशोत्सव साजरा होतो.

अमृतरावांचे एक वंशज पुन्हा पुण्यात येऊन स्थायिक झाले. प्रभात रोडवर त्यांचा 'रघुनाथ' नावाचा बंगला आहे.
तिथे रहाणारे श्री विनायकराव पेशवा हे भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक आहेत तर तिथेच दुसर्‍या बंगल्यात रहाणारे श्री कृष्णराव पेशवा रत्नपारखी म्हणून प्रसिद्ध होते. आता त्यांची मुले तुमच्या आमच्यासारखीच नोकरीधंदे करतात. कुणीही राजकारणात नाही.
पुण्यात 'पेशवा' या आडनावाखेरिज त्यांच्याकडे म्हणावा असा स्थावर वारसा नाही. मात्रं वाराणसीला दरवर्षी गणेशोत्सवादि कुलधर्म करायला जातात.

(ही आणि अशीच माहिती विनायकराव पेशवा यांच्या मुलाखतीत लोकसत्ताच्या दिवाळी अंकात मागे वाचली होती.)

<<<<<सुंदर लेख .. या काळातल्या इतिहासावर प्रकाश टाकणार फारसं काही वाचनात नव्हत.. यानिमित्ताने बरच काही कळेल.. >>>>>
अनुमोदन.
फारेंड यांचा ५ जूनचा व साधना यांचा ७ जूनचा लेखहि पटला.

साती,
मस्त माहितीपूर्ण प्रतिसाद.
कधी इमॅजिनही न केलेल्या बाबतीतली छान माहीती.
धन्यवाद!

<<<<थोडक्यात कोणतंही राजकीय दृष्टी नसणारा,शिपाईगिरीचं व्यवस्थित शिक्षण नसणारा,कैदेत वाढलेला>>>>>
१७०७ साली हेच वर्णन छत्रपती शाहूमहाराजांच्या बाबतीतहि लागू पडते.
सुदैवाने त्यांना पेशव्यांसारखे एकनिष्ठ कारभारी मिळाले.

माझ्या मनात पार श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर संभाजी व राजाराम या दोन पक्षात जी तेढ पडली तीच मराठे शाही च्या दुर्दैवाची सुरुवात. कर्तबगार व्यक्तींचा वध, आपआपसात सलोखा न करण्याची वृत्ती ही शेवटपर्यंत तशीच. ना त्यांनी सलोखा केला ना शाहू ताराबाईंनी.
राघोबादादा नि आनंदी बाईंचा स्वार्थ, त्याचा परिणाम या सर्वच गोष्टी हळू हळू स्वातंत्र्याचा शेवट होण्यास कारणीभूत ठरला. माधवरावांनंतर उरलेले राज्य नुसते तरले,
त्यातून इंग्रज महाहुषार, व त्यांचे उद्दिष्ट ठरलेले, त्यांच्या राणीच्या राजकीय उद्दिष्टांशी सगळे एकनिष्ठ.
(बाकी, लुटलेले पैसे राणीच्या खजिन्यात किती नि स्वतःच्या खिशात किती हा हिशेब अजून पूर्ण व्हायचा आहे. )

साती, अजुन एक प्र्श्न पेशवे क्षत्रिय होते का? शास्त्रानुसार युद्ध विद्या फक्त क्षत्रियांनाच घेता येते ना? त्यांना योद्धा हा

शब्द वापरल्या मुळे हा प्रश्न मनात आला.

सुरेख१,
तुमच्या वरच्या प्रश्नाचं उत्तर वरिल लेख आणि चर्चेशी सुसंगत वाटत नसल्याने ते उत्तर वेळ मिळताच तुमच्या विपूत लिहिते.
Happy

ब्रा क्ष वै शू

असे स्तर ह्ते.

वराच्या स्तरावरील व्यक्तीला खालच्या स्तरावर जाणेअलाउड होते

काऊ ही portability फक्त वैदिक काळात अलाऊड होती. नन्तर त्यात रिजिडिटी आली आणि वंशपरम्परेने व्यवसाय करणे कम्पलसरी झाले. जाती व्यवस्था ही व्यवसाय व्यवस्थाच होती फक्त आजकाल व्यवसाय निवडणे जसे ऑप्शनल झाले आहे ते नन्तर काही मंडळींच्या हेकट पणाने बंदिस्त झाले. व त्याला धर्माचेही अधिष्ठान देण्यात आले. पेशव्यांच्या काळात ही पद्धत रिजिडच होती.

पेशव्यांच्या काळात ही पद्धत रिजिडच होती>>

त्यांचा स्वतःचा अपवाद वगळता?
सम आर मोअर इक्वल दॅन अदर्स या न्यायाने?

चला ... आता पटापट शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पवार, आंग्रे यांच्या जाती काढा बर! आणि हे पण सांगा की त्यांना राज्य करण्याची परवानगी होती का ?

मग बाकी म्हणा ... हु इज मोअर इक्वल दॅन अदर्स Happy

अनिरुद्ध वैद्य,
उगाच हुकुमी टाळ्या मिरवणारा चोंबडेपणा करू नका.
रॉबिनहुड यांच्या प्रतिसादातील 'पेशव्यांच्या काळात ही पद्धत रिजिड होती' याला उद्देशून तो प्रतिसाद आहे.
तुम्हा टाळीबाज लोकांपायी मायबोलीवर कुठली शिस्तीत चर्चा होणे अवघड आहे.

(माझे या चर्चेतील आत्तापर्यंतचे प्रतिसाद रिलेवंट आहेत आणि तुमच्यासारखे 'टाळीबाज' नाहीत असा माझा समज आहे.)

>>
सम आर मोअर इक्वल दॅन अदर्स या न्यायाने?
>>

हे काय होत मग? हे खटकल, म्हणून लिहील.

'माझे या चर्चेतील आत्तापर्यंतचे प्रतिसाद रिलेवंट आहेत. ' असलं स्पष्टीकरण कोणी मागितलं नाही तुम्हाला.

सुरेख@ पेशवे क्षत्रिय होते का? शास्त्रानुसार युद्ध विद्या फक्त क्षत्रियांनाच घेता येते ना?>>>

काउ@वराच्या स्तरावरील व्यक्तीला खालच्या स्तरावर जाणेअलाउड होते>>>>.

अनिरुद्ध_वैद्य @चला ... आता पटापट शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पवार, आंग्रे यांच्या जाती काढा बर! आणि हे पण सांगा की त्यांना राज्य करण्याची परवानगी होती का ? >>>>>

सुरेख, काउ खोटे ठरताहेत .

रॉबीनहूड @ काऊ ही portability फक्त वैदिक काळात अलाऊड होती. नन्तर त्यात रिजिडिटी आली आणि वंशपरम्परेने व्यवसाय करणे कम्पलसरी झाले. जाती व्यवस्था ही व्यवसाय व्यवस्थाच होती फक्त आजकाल व्यवसाय निवडणे जसे ऑप्शनल झाले आहे ते नन्तर काही मंडळींच्या हेकट पणाने बंदिस्त झाले. व त्याला धर्माचेही अधिष्ठान देण्यात आले. पेशव्यांच्या काळात ही पद्धत रिजिडच होती>>>>

हे मत बरोबर ठरत आहे.

मला वाटते ज्याच्या हातात तलवार गाजवायची ताकद, किंवा मुत्सद्देगिरी करून मालकाचे काम करून देण्याचे स्कील होते, ते सर्वच लोक प्रचंड यशस्वी झालेले आढळतात.

Pages