ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड"

Submitted by गणेश पावले on 1 June, 2015 - 02:05

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड" (३१/०५/२०१५)

कशासाठी आणि जगावे कसे मी
विचारा स्वताला असा प्रश्न नेहमी
जगू पांग फेडावया माय भू चे
जगू पांग फेडावया धर्म भू चे
आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे….

राजांची पालखी
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड"
मी संपूर्ण परिवारासोबत "ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "( रविवार ३१/०५/२०१५) श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड" वर जाण्याचे ठरवले,
सकाळी ४ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहचलो आणि ध्येय्यमंत्र, प्रेरणामंत्र खड्या आवाजात म्हणून, पहिल्या पायरीच दर्शन घेतलं, अंगात वेगळाच आवेश आला आणि आम्ही गड चढायला सुरवात केली, रात्रीच्या अंधारात उजेडासाठी टॉर्च होता त्याच्या प्रकाशात आम्ही गड चढायला सुरवात केली. आश्चर्य म्हणजे वाटेत कुठेही न थांबता, थोडासाही विसावा न घेता आम्ही महादरवाजा गाठला, माझा २ वर्षाचा चिमुकला त्याला खांद्यावर घेवून रायगड चढलो, वरती जात पर्यंत १ ते १/५ तास लागला होता आता सुर्यनारायण आपली सोनेरी किरणे या सोहळ्यासाठी रायगडावर पाडण्यास उत्सुक होता. आम्ही राजदरबारात पोहचे पर्यंत पालखी निघाली होती.
सुर्यनारायण आपली सोनेरी किरणे या सोहळ्यासाठी रायगडावर पाडण्यास  उत्सुक होता.पालखीपालखीसोहळ्यासाठी रायगडावर हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराजा, माहाराजा, अखंड हिंदुस्थानाचा अधिपती, पहिला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा ३४२ वा राज्यभिषेक सोहळा काल (रविवारी) मोठ्या थाटात रायगडावर पार पडला. ढोल-ताशांचा गजर आणि हर-हर महादेवच्या घोषणांनी रायगड दणाणून निघाला होता.
" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "'मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’ दिवसभर हाच आवेश हाच जोश प्रत्येक शिवभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. प्रचंड आनंद कल्लोळ आज रायगड वर दिसत होता, भगव्या पताका झळकत होत्या, शांत आणि थंड हवेत मन मोहरून निघत होत.
" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " राजांची पालखी ढोल ताशांच्या गजरात सदरेतून जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली तेंव्हाचा जल्लोष याच जन्मी याची डोळा आनुभवन्याचा योग मला आणि माझ्या चिमुरड्याला मिळाला. तो हि या सोहळ्याचा आनंद घेत होता.
" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "होळीच्या माळावर ढोलताशांच्या गजरात, हर हर महादेव गर्जनेचा संगम झाला, तलवारी उंचावल्या भगव्या पताका झळकल्या. आणि रायगड पुन्हा एकदा धन्य झाला.

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "हा सारा आवेश पाहून अजून २ वर्षे ही पूर्ण न झालेला माझा चिमुरडा रुद्र हातात भगवा घेवून सामील झाला होता.
" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "भगवा करात धरिला कधीही ना सोडू।
हिंदुत्व शञु सगळे हुडकुनी गाडू।।
शिवसुर्य ध्येय आमुच्या नित काळजात।
रणकंदनी फडकवू भगवा जगात।।

काही क्षण या देदिप्यमान सोहळ्याचे-

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

******************************************


लेखन / छायाचित्रण
- गणेश पावले

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या वेळेस पहिल्यांदाच मी शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवला.दुर्ग दुर्गेश्वर रायगडी ....
खरच धन्य जाहलो...:)

छान फोटो,
३१ मेच्या या कार्यक्रमला पाऊस नव्हता आता सहा जुनला तरी असेल ही आशा.