तनु वेड्स मनु रिटर्न

सध्या जुनंच भांडवल वापरुन नव्याने नफा कमविण्याचा उद्योग चालू आहे. "सेकडं पार्ट" हा हॉलीवूडचा यशस्वी फॉर्म्युला हिन्दी फिल्म इंडस्ट्रीचा नवा ट्रेन्ड आहे. हिन्दीत म्हण आहे "सब्र का फल मीठा होता है." त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे "सेकडं पार्ट"च्या नावाने अनेकानेक अत्याचार सहन केल्यावर रसिक प्रेक्षकांना एक उत्तम कलाविष्कार पहायला मिळाला तो म्हणजे तनु वेड्स मनु रिटर्न.
"सेकडं पार्ट"ची जमेची बाजू १) - ब्रॅन्ड सेट झालेला असतो, नव्याने मार्केटींग करण्याची कसरत तुलनेने थोडी कमी करावी लागते. फिल्ममेकर्स ह्या गोष्टीचा पुरेपुर फायदा घेत, थातुरमातुर मुलामा चढवलेली जुनीच गोष्ट प्रेक्षकांच्या गळी उतरवण्याचे उद्योग करताना सध्या दिसून येत आहेत.
"सेकडं पार्ट"ची जमेची बाजू २) - सिनेमा हे कथा सांगण्याच एक माध्यम आहे, ज्यात प्रात्र उभी करावी लागतात त्यांच कथेतील वागणं जस्टीफाय होण्याकरता त्या पात्राचे स्वभावविषेश, पार्श्वभूमी ह्यात सिनेमाचा जो वेळ जातो नेमका तोच वेळ ह्या"सेकडं पार्ट" मध्ये शिल्लकीत असतो. त्याचा फायदा उचलून उत्तम कथानक देण्याच्या भानगडीत कोणी फिल्ममेकर्सच्या नाही आहे.
अश्यातच आनंद एल राज नावाचा कोणी अवलिया तनु वेड्स मनु रिटर्न घेऊन येतो. "सेकडं पार्ट"ची जमेची बाजू २) चा पुरेपुर फायदा उचलत एक अत्यंत वेगवान नि दर्जेदार कथानक आपल्याला पाहायला मिळंत. जिथे ज्या लग्नसमारंभात सिनेमा चार वर्षापूर्वी संपलेला अगदी त्या तिथूनच रिटर्न्स सुरु होतो. मोठ्यामेहनतीने अरेन्ज मॅरेजच रुपांतर लव्ह मॅरेज मध्ये करुन तनु-मनु हॅप्पी एन्डिग नोट वर संपलेल्या सिनेमाचे हिरोईन-हिरो. पुढची जेमतेम चार वर्ष संसाराची सहन करुन (लंडन मध्ये) पुन्हा भारतात परतात. त्यांच्या ह्या नव्या भारत सफारीने धमाल उडवून दिली आहे. हिरोईन-हिरोच नाही तर इतर सर्वच पात्र आयुष्याच्या ज्या वळणावर उभे आहेत तेथे त्यांनी घेतलेले निर्णय, त्याचे परिणाम हे अप्रतिमरित्या उतरलेत. सिनेमाचा वास्तव जिवनाशी काही संबंध नसतो ह्या ही रुढीला पूर्ण फाटा देत प्रत्येक पात्र समोर येतं ते आपलं वाटू लागतं. व्हॉट्स अप वर कमेन्ट्चा चूकीचा अर्थ काढून पप्पीभैया घोड्चूक करुन बसतो. मनुला त्याचे वडील डायवोर्स पासून परावृत्त करण्याच्या मागे असताना स्व:त मात्र बायकोच्या कटकटीने वैतागून संयम गमावून बसतात, चारदा दीदी म्हणून झाल्यावरही तनुच्या प्रेमात पडणारा भाडेकरु, सगळ्यांचा स्वभाव काळाशी सुसंगत असल्याने आपल्याला सिनेमाशी रिलेट करणं सोप होऊन जातं. आणि हो कानपूर, पंजाब चे बारकावे मागील भागात ज्यासुंदर रितीने टिपलेले त्याचं नेक्स्ट व्हर्जन म्हणजे हरियाणा.
हिरो-हिरोईन हा प्रचलित शब्द सोडून हिरोईन-हिरो लिहण्याची दोन कारणे १) - संपूर्ण कथेत वरचढ असणारी तनु.
२) - तनु म्हणुन असणारी कंगणा, ह्या ही वर्षीचा नॅशनल अॅवार्ड मिळण्याची पुरेपुर संधी. संधी जी कंगणाने अतिशय महेनतीने निर्माण केली आहे. मिळालेल्या उत्तम भुमिकेचं तिने आपल्या अप्रतिम अभिनयाने खरचं सोनं केलं. रस्त्याने सहजच फिरताना समोरुन चाललेल्या लग्नाच्या मिरवणूकित मनसोक्त नि बिनधास्तपणे नाचून वरवर जरी जूनी तनु नि तिचा बिनधास्तपणाचा आव आणताना मात्र काळाच्या ओघात हळवी झालेली तनु निव्वळ अप्रतिम. हरियाणवी टोन, अॅथलिटचा पुरुषी ढंग मिथुनदा च्या भाषेत क्या बात! क्या बात!! क्या बात!!!
सशक्त, वेगवान पटकथा सिनेमाच्या इतर तांत्रिक बाबींकडे पहायला वेळच देत नाही. एडिटिंग जबरदस्त, लोकेशन्स्, कॉस्च्युम डि़झाइनिंग रोचक आहेतच पण डबल रोल कसा असावा नि तो कसा निभवावा याचे नवीन आयाम उभे केलेत. कथा, पटकथा, संवाद नि व्यक्तिरेखा सर्वच बाबींत हा चित्रपट मैलाचा दगड ठरला आहे. आनंद एल राज हे नाव पुरेसं असणार आहे पुढील चित्रपट पाहण्यासाठी.
ते च्च! वाटणं ही
ते च्च! वाटणं ही दिग्दर्शकाची, कंगनाची, स्क्रिप्टची जबरदस्त अचीव्हमेंट आहे. कुसुमच्या व्यक्तिरेखेचा ग्राफ असा चढता नेत नेत विलक्षण उंचीवर पोचल्यावर जेव्हा हा सीन येतो तेव्हा प्रेक्षक सटकन भानावर येतो.. की ही कुठली सिनेमाची गोष्ट नाही तर खरीखुरी मातीचे पाय असलेली, उसनं अवसान आणलेली कुसुम आहे. इतक्या अभावितपणे ते च्च निसटतं की आपण दहा मिनीटांपूर्वी तनुच्या एकाकी उदास चेहर्यापुढे तिची सगळी थेरं माफ केली होती, हतबल मनुला एखादी शिवी दिली होती हेही विसरतो. अतिशय अस्सल, वास्तव व्यक्तिरेखा आणि कंगनामुळे मला हा सिनेमा फार आवडला. माधवनकडे लक्षही गेलं नाही इतकं कंगनाने पहिल्या सीनपासून सगळं काबीज केलं.
सशक्त, वेगवान पटकथा
सशक्त, वेगवान पटकथा सिनेमाच्या इतर तांत्रिक बाबींकडे पहायला वेळच देत नाही. एडिटिंग जबरदस्त, लोकेशन्स्, कॉस्च्युम डि़झाइनिंग रोचक आहेतच पण डबल रोल कसा असावा नि तो कसा निभवावा याचे नवीन आयाम उभे केलेत. कथा, पटकथा, संवाद नि व्यक्तिरेखा सर्वच बाबींत हा चित्रपट मैलाचा दगड ठरला आहे. आनंद एल राज हे नाव पुरेसं असणार आहे पुढील चित्रपट पाहण्यासाठी.>>>>
पटकथा????
कुठे आहे पटकथा??? काहीही व्यक्तिरेखा उभ्या केल्या आहेत.
१. मनु च्या आई वडिलांना आणि कुसुम च्या भावाला कशाला आणले सिनेमात? काही रोलच नाही.... मुलं जे काय करताहेत ते चाललय आपलं...
२. आज पेपर साईन केले की उद्या नाही दुसरे लग्न करता येत.... त्या साठी कोर्ट संमती लागते. कुसुम चा भाऊ त्याला तयार होतो??? काय इल्लॉजिकल आहे. काय कायदा वगैरे काही आहे की नाही
३. मनू शर्मा डॉक्टर आहे... तो वेड्यांच्या हॉस्पिटल मधे होता... तडक इंडियाला आला.... दिल्ली ला त्याचे लेक्चर ठेवले कोणी....?
४. लंडन ला बायकोशी भांडला म्हणुन वेडा ठरवतात..... डायरेक्ट शॉक देतात????
५. कुसुम कॉलेज मधे दाखवली आहे.... हा ४० वर्षांचा..... म्हणजे २० वर्षांचा फरक....तिचा भाउ ह्याच्या आईवडिलांना भेटत नाही... काही नाही.... असे जमते लग्न...तेही भारतात?
६. कोणीही कोणाच्याही लग्नाला जातात... तिकडे रहातात.... उदा> मनूचा शिख मित्र बायका पोरा सह येतो, रहातो, तनूचे आईवडिल येतात...लग्नात घुसतात.... तनू येते कुसुम च्या शेजारच्या लग्नात घुसते....तिकडे हे सगळे सीन करतात. कुसुमची भाभी तिच्या लग्नाला गायब.....
७. तनुचा नोकर असल्या सारखा तो चिंटु आणि अवस्थी तिच्या मागे धावतात..... प्रेमा पोटी??
उलट पटकथा छान असती तर हा इल्लॉजिकल गोंधळ सुध्धा मस्त झाला असता....
कंगना, माधवन, पप्पीचे काम केलेला दिपक डोब्रियाल ....अप्रतिम....मेक अप सुरेख... बाकी काही प्रष्नच नाही... संवादांना १०० मार्क.... पण लॉजिक आणि पटकथा सॉलिड गंडली आहे.....
मी परत पाहिला तर माधवन आणि पप्पी साठी पाहिन
नॅशनल
नॅशनल अॅवॉर्ड????
कंगनाला..... काहीही काय..... क्वीन साठी ठीक...पण ह्याच्या साठी????
ती सुरेख दिसली...डबल रोल मस्त डिफरन्शीयेट केला... तरी नॅशनल अॅवॉर्ड .....? जरा जास्त वाटतं....
की ही कुठली सिनेमाची गोष्ट
की ही कुठली सिनेमाची गोष्ट नाही तर खरीखुरी मातीचे पाय असलेली, उसनं अवसान आणलेली कुसुम आहे. इतक्या अभावितपणे ते च्च निसटतं की आपण दहा मिनीटांपूर्वी तनुच्या एकाकी उदास चेहर्यापुढे तिची सगळी थेरं माफ केली होती, हतबल मनुला एखादी शिवी दिली होती हेही विसरतो. >> आशुडी +१०००० मोदक तुला .. म्हणूनच ते च्च च्च होतं
मोहन की मीरा >> सेम प्रश्न माझ्याहि मनात आले पण सगळ गंडलेल असुनही बस अभिनय , संवाद साठी बघायला गेलेली मी चित्रपट ..पहिला चित्रपट पण कंगणा ने जे कॅरेक्टर प्ले केलेल आहे त्यासाठीच बघायला आवडतो . मुळात ती आवडती अभिनेत्री वगैरे नै माझी पण सतत ते गँगस्टर आणि ड्रगिस्ट सारखे उदासवाणे रोल/ चित्रपटामधे बघुन हिच्यात खरच कै चार्म नै का काय अस वाटायला लागेपर्यंत तिच्या चित्रपटांचा मारा झाला होता . त्यात क्वीन आणि तवेम सारखे चित्रपट पहिल्या पावसाचा आनंद देऊन जातात माझ्यासारखीला .. तसतर कमर्शिअल चित्रपटाच्या वाटी मी सहसा जात नै पण आपल्यातले वाटले (लोक, राहणिमान, विचार इत्यादि..) तरच पाहायला धजावते
दत्तो आणि तनुच्या मेकपमध्ये
दत्तो आणि तनुच्या मेकपमध्ये थोडा गोंधळ वाट्ला काही वेळा....मानेवर एक काळा तीळ दाखवला आहे...पण तो कधी दत्तोच्या मानेवर कधी तनुच्या मानेवर अश्या उड्या मारतो अस वाट्ल मला ....कुणाला जाणवलं का हे? कि मलाच भास झाला?
दत्तोच्या हनुवटीच्या खाली एक
दत्तोच्या हनुवटीच्या खाली एक मस पाहिला. दुसर्या प्रसंगी तो तिथे नव्ह्ता.
क्विन इज बॅक विथ बॅन्ग,
क्विन इज बॅक विथ बॅन्ग, कन्गणा हॅड प्रुव्हड हर मेटल, दोन्ही भुमिका तिने इतक्या सरस निभावल्यात की कुठेही नुक्स काढायला अजिबात जागा नाही..
विशेष्तः नुसत्या देहबोलि आणी हरयाणवी अॅक्सेन्ट मधुन अॅथेलिटचा पर्फेक्ट लुक जमवालाय.. बाकी सहकलाकार उत्तम
वर म्हटलय तस पटकथा आणी गाणि मात्र विशेष जमुन आलि नाहित...जा जा बेफवा उत्तम वापरलय.... सन्वाद चुरचुरित आहेत, कन्गणाचे ड्रेसिन्ग्,साड्या अप्र्तिम आहेत...
(डायरेक्ट शॉक देतात????>> हे तनुला फ्लाईट मधे बसवल्यावर विचार करत असताना वाटलेल म्हणून ती पपिला फोन करते)
पाहीला! आवडला..पण बऱ्याच
पाहीला! आवडला..पण बऱ्याच gaps/loose ends आहेत गोष्टीत. खूप वेगाने गोष्टी घडतात म्हणून पाहताना खटकत नाही पण पुन्हा पुन्हा पाहण्याच्या category तला (उदा. क्वीन) नाही. कंगना बेस्ट आहे! बाकी सगळ्यांनी पण मस्त कामं केली आहेत!
मोहन की मीरा | 27 May, 2015 -
मोहन की मीरा | 27 May, 2015 - 10:45
>>>>>
प्रचंड सहमत, आपण नमूद केलेल्या बरेच गोष्टी कायच्या काय आणि अशक्य होत्या हे आजच चित्रपट पाहिलेल्या मलाही जाणवल्या.
पण चित्रपटच तो म्हणत नजरेआड करत एंजॉयही केले ..
कंगणाच्या अभिनयाबद्दल खूप आदर दाटून येतो चित्रपटगृहातून बाहेर पडताना हे मात्र खरे.
असो, याव्यतिरीक्तही एका जाणवलेल्या आणि विचारात पाडणार्या बाबीबद्दल बरेच काही लिहावेसे वाटतेय, पण तुर्तास वेळ नाही.
लग्नव्यवस्था..प्रेमाला काही
लग्नव्यवस्था..प्रेमाला काही अर्थच नाही यार
कसली भैताड आहे ती. पार्ट एक
कसली भैताड आहे ती. पार्ट एक आणी दोन मधेही.
भैताड हा शब्द मी ऐकून आहे, पण
भैताड हा शब्द मी ऐकून आहे, पण नेमका अर्थ माहीत नाही, सांगू शकाल का ..
भैताड = पागल / मॅड
भैताड = पागल / मॅड
टिना! ईतके दिवस भैताड म्हणजे
टिना! ईतके दिवस भैताड म्हणजे भित्रा अस समजत होते.. वैदर्भैय शब्दकोष युनिक आहे.
ओके टीना ... @ भैताड .. मलाही
ओके टीना ...
@ भैताड ..
मलाही साधारण याच अर्थाने हा शब्द माहीत होता, पण "भ" च्या बाराखडीत असल्याने अर्वाच्य तर नाही ना अशी शंका होती... ती दूर झाली
भैताड = पागल / मॅड - यडच्याप,
भैताड = पागल / मॅड - यडच्याप, आचपेच नसलेलं वागणारी व्यक्ती
"भ" च्या बाराखडीत असल्याने
"भ" च्या बाराखडीत असल्याने अर्वाच्य तर नाही ना>>>>>>>>>>>>> ऋ __/\__
काल पाहिला तनु वेड्स मनु
काल पाहिला तनु वेड्स मनु रिटर्न्स ! सगळ्यांचे अॅक्टिंग अप्रतिम झाले आहे, संवाद चुरचुरीत आहेत आणि दोन तासांचा आटोपशीर आहे ह्या जमेच्या बाजू सोडल्या तर अचाट आणि अतर्क्य कॅटेगरी चित्रपट वाटला. पहिला भागही अचाट होता पण त्यात तो अचाटपणा निदान चित्रपट बघताना खटकण्याएवढा वरचढ झाला नाही.
एकंदरीत पहिल्या भागाची आणि विशेषकरुन कंगनाची पूर्वपुण्याई सहीसलामत तारुन नेईल ह्या गाढ आत्मविश्वासापोटी हा भाग अजिबातच सिरियसली घेतलेला नाही असे सतत जाणवत होते. साधा तनुच्या चेहेर्याखालचा मस ( कंगनाला आहे ), कुसुमच्या बाबतीत काही दृष्यांत दिसतो, काही सीन्समध्ये मेकअपने लपवून दिसतो !
पटकथा कुठूनही कशीही वाहते. अनेक कच्चे दुवे सोडले आहेत. मुळात मनुचे कुसुमच्या प्रेमात पडून डायरेक्ट बोहल्यावर उभे राहणे हाच भाग अतर्क्य वाटतो. मोकिमी ह्यांच्या पोस्टमध्ये हे मुद्दे येऊन गेले आहेतच.
कंगनाचा डबलरोल कमाल वठलाय. मात्र पूर्ण चित्रपटभर दोन वेगवेगळ्या व्यक्ती वावरत आहेत असे वाटावे इतके सुंदर बेअरिंग घेतल्यावर शेवटी कुसुम लग्नाच्या मंडपाबाहेर चालत येते ती चाल मात्र हुबेहूब तनुसारखी. बाकी ठिकाणी ती वेगळी चाललीय त्यामुळे हे एकदम लक्षात आले. अर्थात इथे दिग्दर्शक कमी पडलाय.
मोकिमी आणि अगो +१ पण तरीही
मोकिमी आणि अगो +१
पण तरीही चित्रपट भन्नाट आहे. मस्ट वॉच आहे.
कंगणा, माधवन, अ आणि अ यातलं काहीही.. अगदी काहीही आवडत नसेल तरी मन्नुचा मित्र पप्पी उर्फ डोब्रियाल साठी बघावाच. त्याने खुप मजा आणलीये.
बाकी बरंच काही लिहिता येईल पण स्पॉयलर नकोच.
पियू >> +१ .. दिपक डोब्रियाल
पियू >> +१ .. दिपक डोब्रियाल खतरनाक

जिमी शेरगिल पन छाने गं पियू ..
Bollywood comedy genre असल्यानं डोक बाजुला ठेऊन बघायचा ..
चला... गंगेत घोडं न्हालं.
चला... गंगेत घोडं न्हालं.
Pages