तनु वेड्स मनु रिटर्न

Submitted by संदीप आहेर on 22 May, 2015 - 15:16

तनु वेड्स मनु रिटर्न

tvm_640x480_81432153246.jpg
सध्या जुनंच भांडवल वापरुन नव्याने नफा कमविण्याचा उद्योग चालू आहे. "सेकडं पार्ट" हा हॉलीवूडचा यशस्वी फॉर्म्युला हिन्दी फिल्म इंडस्ट्रीचा नवा ट्रेन्ड आहे. हिन्दीत म्हण आहे "सब्र का फल मीठा होता है." त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे "सेकडं पार्ट"च्या नावाने अनेकानेक अत्याचार सहन केल्यावर रसिक प्रेक्षकांना एक उत्तम कलाविष्कार पहायला मिळाला तो म्हणजे तनु वेड्स मनु रिटर्न.

"सेकडं पार्ट"ची जमेची बाजू १) - ब्रॅन्ड सेट झालेला असतो, नव्याने मार्केटींग करण्याची कसरत तुलनेने थोडी कमी करावी लागते. फिल्ममेकर्स ह्या गोष्टीचा पुरेपुर फायदा घेत, थातुरमातुर मुलामा चढवलेली जुनीच गोष्ट प्रेक्षकांच्या गळी उतरवण्याचे उद्योग करताना सध्या दिसून येत आहेत.
"सेकडं पार्ट"ची जमेची बाजू २) - सिनेमा हे कथा सांगण्याच एक माध्यम आहे, ज्यात प्रात्र उभी करावी लागतात त्यांच कथेतील वागणं जस्टीफाय होण्याकरता त्या पात्राचे स्वभावविषेश, पार्श्वभूमी ह्यात सिनेमाचा जो वेळ जातो नेमका तोच वेळ ह्या"सेकडं पार्ट" मध्ये शिल्लकीत असतो. त्याचा फायदा उचलून उत्तम कथानक देण्याच्या भानगडीत कोणी फिल्ममेकर्सच्या नाही आहे.

अश्यातच आनंद एल राज नावाचा कोणी अवलिया तनु वेड्स मनु रिटर्न घेऊन येतो. "सेकडं पार्ट"ची जमेची बाजू २) चा पुरेपुर फायदा उचलत एक अत्यंत वेगवान नि दर्जेदार कथानक आपल्याला पाहायला मिळंत. जिथे ज्या लग्नसमारंभात सिनेमा चार वर्षापूर्वी संपलेला अगदी त्या तिथूनच रिटर्न्स सुरु होतो. मोठ्यामेहनतीने अरेन्ज मॅरेजच रुपांतर लव्ह मॅरेज मध्ये करुन तनु-मनु हॅप्पी एन्डिग नोट वर संपलेल्या सिनेमाचे हिरोईन-हिरो. पुढची जेमतेम चार वर्ष संसाराची सहन करुन (लंडन मध्ये) पुन्हा भारतात परतात. त्यांच्या ह्या नव्या भारत सफारीने धमाल उडवून दिली आहे. हिरोईन-हिरोच नाही तर इतर सर्वच पात्र आयुष्याच्या ज्या वळणावर उभे आहेत तेथे त्यांनी घेतलेले निर्णय, त्याचे परिणाम हे अप्रतिमरित्या उतरलेत. सिनेमाचा वास्तव जिवनाशी काही संबंध नसतो ह्या ही रुढीला पूर्ण फाटा देत प्रत्येक पात्र समोर येतं ते आपलं वाटू लागतं. व्हॉट्स अप वर कमेन्ट्चा चूकीचा अर्थ काढून पप्पीभैया घोड्चूक करुन बसतो. मनुला त्याचे वडील डायवोर्स पासून परावृत्त करण्याच्या मागे असताना स्व:त मात्र बायकोच्या कटकटीने वैतागून संयम गमावून बसतात, चारदा दीदी म्हणून झाल्यावरही तनुच्या प्रेमात पडणारा भाडेकरु, सगळ्यांचा स्वभाव काळाशी सुसंगत असल्याने आपल्याला सिनेमाशी रिलेट करणं सोप होऊन जातं. आणि हो कानपूर, पंजाब चे बारकावे मागील भागात ज्यासुंदर रितीने टिपलेले त्याचं नेक्स्ट व्हर्जन म्हणजे हरियाणा.

हिरो-हिरोईन हा प्रचलित शब्द सोडून हिरोईन-हिरो लिहण्याची दोन कारणे १) - संपूर्ण कथेत वरचढ असणारी तनु.
२) - तनु म्हणुन असणारी कंगणा, ह्या ही वर्षीचा नॅशनल अ‍ॅवार्ड मिळण्याची पुरेपुर संधी. संधी जी कंगणाने अतिशय महेनतीने निर्माण केली आहे. मिळालेल्या उत्तम भुमिकेचं तिने आपल्या अप्रतिम अभिनयाने खरचं सोनं केलं. रस्त्याने सहजच फिरताना समोरुन चाललेल्या लग्नाच्या मिरवणूकित मनसोक्त नि बिनधास्तपणे नाचून वरवर जरी जूनी तनु नि तिचा बिनधास्तपणाचा आव आणताना मात्र काळाच्या ओघात हळवी झालेली तनु निव्वळ अप्रतिम. हरियाणवी टोन, अ‍ॅथलिटचा पुरुषी ढंग मिथुनदा च्या भाषेत क्या बात! क्या बात!! क्या बात!!!

सशक्त, वेगवान पटकथा सिनेमाच्या इतर तांत्रिक बाबींकडे पहायला वेळच देत नाही. एडिटिंग जबरदस्त, लोकेशन्स्, कॉस्च्युम डि़झाइनिंग रोचक आहेतच पण डबल रोल कसा असावा नि तो कसा निभवावा याचे नवीन आयाम उभे केलेत. कथा, पटकथा, संवाद नि व्यक्तिरेखा सर्वच बाबींत हा चित्रपट मैलाचा दगड ठरला आहे. आनंद एल राज हे नाव पुरेसं असणार आहे पुढील चित्रपट पाहण्यासाठी.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान काम केले आहे कंगनाने पण लगेच अ‍ॅवॉर्ड?!! ह्या वर्षी पुन्हा स्ट्राँग फिमेल लीड रोल्स असणारे सिनेमे आहेत. दिपीकाचे पिकू आहे. प्रियांकाचा दिल धडकने दो येईल, ऐश्वर्याचा जझबा येईल,... घाई कसली Happy

ह्या वर्षी पुन्हा स्ट्राँग फिमेल लीड रोल्स असणारे सिनेमे आहेत. दिपीकाचे पिकू आहे. प्रियांकाचा दिल धडकने दो येईल, ऐश्वर्याचा जझबा येईल,... घाई कसली
>>>>>>>>>>>>>>>

मेरी अधूरी कहानी बाय मोहित सुरी... विद्या बालन चा

दिल धडकने दो कोणा एका अ‍ॅक्टर अ‍ॅक्ट्रेसचा मुव्ही नाही.... तो झोयाचा मूव्ही आहे... सर्वस्वी झोयाचा. तिथे अ‍ॅक्टर्सना चांगलं काम करण्याव्यतिरिक्त काही ऑप्शन ठेवलेलाच नसतो :स्मितः

पहिल्या भागातील कंगणाला पुरस्कार मिळालेला का? मी पाहिल नव्हता.
आणि त्याच दुसर्‍या भागासाठी म्हणजे त्याच कॅरेक्टरसाठी मग कसा मिळेल ?

आणि हो, नॅशनल पुरस्कार म्हणजे ईतर भाषेतील पिक्चर पण आलेच, कित्येक आपल्या गावीही नसतील, तर स्पर्धेत निव्वळ दिपिका, ऐश्वर्या आणि विद्या बालनच नाहीयेत.

कंगणाचे जे मी दोनचार चित्रपट पाहिलेत त्यात ती हटके वाटलीय पण आवडली कधीच नाही.

माधवनचा मात्र आरएचटीडीएमपासून जबरदस्त फॅन .. त्या पिक्चरमधील त्याच्या कॅरेक्टरचा सुद्धा.. थ्री ईडियटसमध्ये सुद्धा तो फार्र आवडला ..

पहिला भाग पहीला नाहीये डायरेक्ट हा पाहीला तर चालेल का? समजेल का?

>> मलापण हिच शंका. त्यापेक्षा निदान लॅपटॉपवर आधीचा भाग बघावा म्हणते.

ह्या ही वर्षीचा नॅशनल अ‍ॅवार्ड मिळण्याची पुरेपुर संधी>> ईतर भाषेतील पिक्चर पण आलेच, कित्येक आपल्या गावीही नसतील>>
फार लांब कशाला जाता, हिंदीतच तुमच्या गावीही नसलेला एक चित्रपट आहे जो सहज या सर्व अंदाजांना खोटे ठरवणार आहे. Fly Away Solo (हिंदी शीर्षक : मसन) हा या वर्षी कानला दाखवणार आहेत, आणि ट्रेलर आशादायक आहे सो रिचा चढ्ढा इज अ पोटेन्शियल विनर! कंगनात अभिनेत्री म्हणून क्षमता आहे(क्वीन मध्येतर १००% सिद्ध झालंय) पण तिला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असे ट्रेलर वरून तरी वाटत नाही आणि मिळाला तर मिळू दे.

बाकी तनु वेड्स मनु पाहिला होता. टाईमपास म्हणून बरा वाटला होता. दुसरा देखील ट्रेलर वरून तसाच वाटत आहे.

मी नताशा | 23 May, 2015 - 11:08 नवीन
पहिला भाग पहीला नाहीये डायरेक्ट हा पाहीला तर चालेल का? समजेल का?

पियू | 23 May, 2015 - 12:56 नवीन

मलापण हिच शंका. त्यापेक्षा निदान लॅपटॉपवर आधीचा भाग बघावा म्हणते.

>>

माझ्या मते पहिला पाहण्याची गरजच नाही. कुठलाही संदर्भ लागताना अडचण येत नाही.

कालच पाहिला .. आवडला ..
यावेळी सर्वांचेच डायलॉग्स खतरनाक ..
कंगणा ला मानलं बॉस.. आणि तिच्या मेकअप आर्टीस्ट ला पण .. मस्त घडवल्यात दोघीही .
कुसुम कॅरेक्टर मधे काय भाषेचा लहेजा सांभाळलाय तिनं खत्रा .. अजिब्बात मिक्स नै करत ती दोघींनापन ..
माधवन तो पहेलेसेहीच आवडीका हिरो हय . निव्वळ डोळे ..
शेवटच्या फेर्‍याला त्याला विचारल्यावर त्याच्या आवाजाची थरथर .. एक नंबर .. पहिल्या मुव्हीत जस तिला शेवटी कन्फेस करताना .. मै क्या करु ? .. आईशप्पथ ..
बघाच सर्वांनी एकदा ..

बाकी तनु वेड्स मनु पाहिला होता. टाईमपास म्हणून बरा वाटला होता. दुसरा देखील ट्रेलर वरून तसाच वाटत आहे.>>

बरोबर.

मी कालच तवेम पाहिला आणि मलाही इतका काही खास नाही वाटला.

मला तर कंगना रानावत कोण आहे हेच कळले नाही. एक तर त्या दोघीजणी डबलरोल मुळीच वाटत नाहीत. आत्ता सुद्धा तिचे फोटो बघून तिची ती स्पोर्टमधली भुमिका एकदम वेगळी वाटली. फक्त दत्तु च्या तिच्या भुमिकेसाठी एकवेळ हा सिनेमा पहावा. साडी चुडीदार वाली कंगना नाही आवडली.

पहिला भाग बघितला तर दुसरा भागाचा शेवट जरा पटेल. पहिल्या भागात तनू अटेंशन सीकर, जरा थिल्लर पण तरी अडोरेबल, स्वतःचे दोष ओळखणारी स्वीकारणारी, खरे प्रेम समोर येताच निडर इ इ अशी समोर येते. (फ्रेंडली वॉर्निंगः पहिल्या भागाचाही शेवट जाम बोर आणि खेचलेला आहे.)
दुसर्‍या भागात ती फार बेजबाबदार दाखवली आहे. अडोरेबल अजिबात नाही. दाखवलेला शेवट थोडाफार जरी पटायला हवा असेल तर तिचे पूर्वसुकृत माहित असणे आणि पर्यायाने पहिला भाग बघणे मस्ट आहे.

सीमंतिनी, मी पाहीला होता पहिला भाग. मला त्याचाही शेवट बोर झाला होता अन् याचाही झाला. तवेमरिचा शेवट पटलाही नाही.

Lol रार माझा डबल रोल हे इमॅजिन करूनच गंमत वाटली. मला वाटतं, सीमंतिनी, तो तुला रार म्हणतोय आणि त्याचा प्रश्न हा बहुधा तुला/तुझ्या पोस्टला उद्देशून आहे.

ओह Happy मी रुपाची पोष्ट आरतीची पोष्ट समजून वाचली म्हणून रमड ऐवजी रार लिहिले.

बार आता तोच प्रश्न तुम्हा दोघींसाठी Happy वाटला का तो डबलरोल. मला प्रचंड खटकत राहिले त्या दोघींचे लुक्स. घरी येऊन आधी विकी वर पान उघडून दुसरी नटी कोण आहे हे पाहिले तर तिथे कंगना रानावत लिहिले होते. अजून विश्वास नाही बसत इतका फरक आहे दोघीत.

रारला आत्ता विचारून काही उपेग नाही हे लक्षात आणून दिले तर माझ्याच मानगुटीवर प्रश्न बसवले Biggrin अन्यायहै! रारच देईल उत्तर Wink Happy

ओह स्मित मी रुपाची पोष्ट आरतीची पोष्ट समजून वाचली म्हणून रमड ऐवजी रार लिहिले.
>>>>>>>>>>>>>>>>

मला आता "बी" मनू शर्मा वाटायला लागलाय Rofl

भुंगा Rofl

बी, वाटतो तो डबल रोल. आणि तो तसा दिसायलाच हवा ना? नाहीतर मनू शर्माला तनूचा भास कसा होईल तिच्यात?

रमड +१ शेवट न पटण्याबद्दल.

(स्पॉयलर्स)

पहिल्या भागाचा शेवट त्या ठिकाणी बरोबर होता. इथे मात्र मला दत्तो बरोबर माधवन ने जाणे अधिक बरोबर वाटते आहे. म्हणजे माधवन जितका विचारी दाखवला आहे त्यामुळे तसे वाटते. पण आता नेहमीचेच हिंदी चित्रपटांचे लॉजिक लाऊन प्यार मे पागल है असे दिसते.

त्यानी कन्फ्युज्ड असण्याचा अभिनय मात्र लै भारी केला आहे. वरती म्हटल्याप्रमाणे त्याचे डोळेच खुप काही बोलतात.

Happy आता फोडलाच शेवट तर माझेही २ सेंट्स - कुसुम तनूला पण वठणीवर आणेल अशी 'टू दि पॉईंट' फोकस्ड मुलगी आहे. अशा मुलीशी लग्न म्हणजे स्वतःचे मार्जिन ऑफ एरर कमी करणे आहे. स्वतःच्या पायावर धोंडा कोण मारेल? स्पेशली जेव्हा तनू परत येवून सरळ वागायचा प्रयत्न करते. त्यामुळे शेवट आवडला नाही तरी एक सेकंद विचार केला की पटतो.

धनि, अगदी बरोबर. मलाही तसंच वाटलं. पण एंड फोडायचा नव्हता म्हणून इतकं स्पष्ट लिहीलं नव्हतं.

हा पिक्चर 'मनु वेड्स, तनु रिटर्न्स' असा हवा होता असंच वाटत राहीलं Happy

मी सोमवारी रुमी कम मैत्रीणी सोबत परत एकदा बघीतला..
अरुन तिसर्‍या रो मधे मधे आम्ही आणि बाकी लिटरली तिन्ही रो आजुबाजुला आणि पुढल्या दोन्ही पोरांनी भरुन..
आम्ही दोघीच मधे पोरी ..
शेवटी ती तनु ला बिल पाठवून देईल अस म्हणून तरातरा निघुन जाते आणि दारापलीकडे जाऊन हातात तोंड खुपसुन जस्सा हुंदका देते न त्याबरोबर एकसाथ सर्व पोरांनी च्च अस म्हटलं .. कोण कौतुक वाटलं मला त्यांच्या सेंसिटिव्हिटी च Lol .. बर ठरवून पण नै झाल हं हे.. सगळे लोक ग्रुप ग्रुप ने आलेले .. मज्जा .. काय ती लेकरांमधे शांतता होती Happy

Pages