तडका - सोशियल मिडीया वापरताना

Submitted by vishal maske on 29 May, 2015 - 22:23

सोशियल मिडीया वापरताना

आपली अस्मीता टिकवताना
इतरांची अस्मीता जपली जावी
सोशियल मिडीया वापरताना
माणूसकी ना खपली जावी

नैतिकतेच्या हद्दी पलिकडे
एकमेकांत ना घर्षण असावं
सोशियल मिडीयात वावरताना
सोसेल असंच वर्तन असावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोशम मेडिया 'बा' ची इस्टेट
असे जणु का वाटे ?
वाट चुकलेले कुत्रे
हाडके शोधुन का चाटे?

वाचकानी समजावुनही
पाठीचा कणा का ताठे ?
याला म्हणावे का उल्टा चोर
कोतवाल को डाँटे ?

... खुशाल ठुस्के
झूमरी तलैय्या
९०९७१२३४३०००८६७३२२३११५६१

Dear
काऊजी तुमच्या करपटलेल्या नैतिकतेतुन मस्त धुर निघत आहे,
अजुन निघत असेल तरीही काढा,
करपटलेला आहे पण आनंददायी आहे,...

विशाल म्हस्के,

आपले लेखन सातत्य स्तुत्य आहे. आपल्या लेखनात येणारे मुद्दे हे सामाजिक प्रकारचे असतात व समकालीन समस्यांवर असतात हेही स्तुत्य आहे. पण काव्य सूचकही असावे लागते व सजवावेही लागते. थेट मुद्देच मांडायचे असतील तर गद्यातही मांडता येतात. अर्थात निवड ज्याची त्याची.

आपण मायबोलीवरील भारती बिर्जे डिग्गीकरांच्या कविता वाचता का? किंवा समीर चव्हाणांच्या गझला वगैरे? (अनुक्रमे) लालित्य व सूचकता ह्यांच्या अनुभुती घेता येतील आपल्याला. असे करून मग आपलेही काव्य आहे त्यापेक्षा अधिक गहिरे होईल. बघा पटते का!

रोज अश्या चारोळ्यास्वरूप लेखनापेक्षा अधिक गंभीरपणे मंथन केलेत तर तुम्हालाच अधिक रस निर्माण होईल.

कृपया गैरसमज नसावा. मनात आले ते लिहिले.

शुभेच्छा!