ईस्ट युरोप- खूप सोसलेला युरोप

Submitted by मोहन की मीरा on 28 May, 2015 - 01:02

अनेक वर्ष एखाद्या भागाबद्दल आपल्याला उगाचच आकर्षण असतं. अनेकदा मित्रांमधे गप्पा मारताना त्याची खिल्ली उडवली जाते. त्यात काय पहायचय... हा प्रश्न विचारला जातो. तरीही तुमची इच्छा कायम रहाते. माझं असच काहीस झालं. दूसरे महायुद्ध आणि त्याचे परिणाम ह्या बद्दल मनात खूपच कुतूहल होतं. कोवळ्या वयात व नंतरही त्या संदर्भातली अनेक पूस्तके वाचली होती. ( नाझी भस्मासुराचा उदयास्त, दूसरे महायुद्ध, वॉर्सा ते हिरोशिमा, शिंडलर्स लीस्ट, डायरी ऑफ आन फ्रँक, पहिले महायुद्ध इ.इ.इ) त्या मुळे कुठेतरी हे होरपळलेले देश पहायची इच्छा होती. मुख्य यादीत जर्मनी--- ते ही बर्लीन, मुख्य फ्रँक्फुर्त किंवा हँबर्ग नव्हे. , पोलंड, हंगेरी, झेक हे देश होते.

जे पॉप्युलर म्हणतात ते युरोप, कामाच्या निमित्ताने अनेक वेळा फिरुन झाले होते. पण इकडे नेणारे कोणीतरी हवे होते. आम्ही कट्टर व्हेज असल्याने अशी कंपनी शोधत होतो जे हे देश दाखवतिल पण त्यातही वेगळे पणा असेल. अशा कंपनीच्या शोधात होते. देशी परदेशी अनेक कंपन्यांचे कार्येक्रम कंपेअर केले. त्यातल्या बर्‍याच जणांचा अ‍ॅप्रोच पटला नाही. अनुभव हॉलिडेज च्या मयुरेश भटांशी बोलल्यावर खुप प्रश्नांची उत्तरे मिळालित असे वाटले. त्यांचा प्रोग्राम पण खूपच चांगला वाटला. काही जागां बद्दल पहिल्यांदाच ऐकत होते..... मग नक्कीच करुन टाकले

सविस्तर भागांत लिहायची इच्छा आहे. ही माझ्या प्रवासाची झलक
117 Wall marks germany.JPGDSC06446.JPGIMG_0123.JPG111 German Wall 6.JPGDSC06324.JPGSalt maine 42.JPGIMG_0062.JPGPastonia Caves Slovenia39.JPGPalvitic Lake.JPG

भाग १ = http://www.maayboli.com/node/54087

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीरा सगळे भरभरुन लिही, फोटो पण सगळे आवर्जुन टाक. वाचतेय, छान वाटतय वाचुन पण मनात कुठेतरी सल रहातोच या यादवीबद्दल. विशेषतः पोलन्ड विषयी वाचायचे आहे. जर्मनी आणी रशिया यान्च्या हल्ल्यात भरडला गेलेला हा देश. लिही अजून.

मीरा का मोहन - चांगला विषय निवडलास. मी युरपमधे असताना ही सगळी स्थळे संग्रहालय जीव ओतून पाहिला आहे आणि त्यावेळी ह्या देशांनी काय काय भोगल ते समजल. तू नक्की लिहि ह्या विषयावर. वाट बघत आहे. फोटो छान आहेत.

मीरा, सविस्तर लेखांची वाट बघतोय. तूला आणखी संदर्भ हवे असतील तर मायकल पालिन यांची न्यू युरप हि मालिका बघ ( यू ट्यूबवर आहे ) खुप भयानक भूतकाळ आहे त्यांचा. काही काही देशांना तर काही ओळखच नाही, त्यातल्या.

लिहिताना प्रवास कसा केला, व्हीसाचे काय ते पण लिही.

फोटो मुद्दाम रँडम टाकले आहेत. उत्सुकता वाटावी म्हणून. प्रत्येक फोटो मागे कहाणी आहे.

बरोबर वर्षू ताई ...ही झलक आहे....

पूढचा भाग लौकरच टाकते.

सगळ्यांना धन्स

मोकीमी, मस्तच होणार लेखमालिका.

पाचव्या फोटोत (मागे इन्नाने लिहिलेल्या लेखातली) ६० लाख ज्युंच्या खुनाची स्मारके आहेत ना?

सही... इस्ट युरोप मालिका! वाट बघतोय.
मला प्रवास कसा केला आणि कसं जायचं असं travel गाईड पेक्षा काहीतरी नवीन/ तुमचं पर्स्पेक्टीव्ह/ अनुभव असं वाचायला आवडेल. फोटो अवश्य टाका, पण इस्ट युरप बद्दल नुसते फोटो बघण्यात फार इंटरेस्ट नाही इतिहास इ. वाचायला जास्त आवडेल. (माझं मत)