Submitted by webmaster on 26 May, 2015 - 23:18
यंदाचा (२०१५) वर्षाविहार हा आपला १३वा ववि आहे.. गेली १२ वर्ष उत्साहात साजर्या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..
तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.
संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्या नावडणार्या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आला आला धागा, प्रतीसाद देऊ
आला आला धागा, प्रतीसाद देऊ चला
आतापासुनच शुभेच्छा. नाचा, गा, बागडा, धुमाकुळ घाला, काय वाटेल ते करा.
आला का धागा? वा, वा! चला,
आला का धागा? वा, वा! चला, कल्पना मांडा, नव्या जागा कळवा!
नवीन सदस्यांसाठी 'वर्षाविहार'
नवीन सदस्यांसाठी 'वर्षाविहार' या संकल्पनेचे स्वरुप समजेल का?
नवीन सदस्यांसाठी 'वर्षाविहार'
नवीन सदस्यांसाठी 'वर्षाविहार' या संकल्पनेचे स्वरुप समजेल का? >
http://www.maayboli.com/node/17932
वर्षाविहार २०१० चा वृतांत
धन्यवाद ऐश्वर्या
धन्यवाद ऐश्वर्या
अरे वा ! वविचा धागा आला
अरे वा ! वविचा धागा आला !!!
आमच्या ओवीचा पहिला ववि
(No subject)
खालिल महिती इन्द्राने
खालिल महिती इन्द्राने लिहिलेली आहे
अंदाजे ५० ते ७५ मायबोलीकर ववि साठी येतात... त्या अनुशंगाने लिहित आहे.
१. सुरुवात कशी होते. >>>
१.१ मे महिन्याच्या अखेरीस पुणेकर आणि मुंबईकर संयोजक ववि स्थळ शोध मोहिम आखतात.
१.२ दोन्ही संयोजक टिम आपले फिडबॅक संयोजकाच्या BBवर देऊन चर्चा करतात.
१.३ शक्य असल्यास फोनवर/मेलवर/प्रत्यक्ष भेटूनही स्पॉट बद्दल चर्चा करतात.
२. ठिकाण कसं निवडलं जातं.>>> ववि योग्य ठिकाण निवडण्यासाठी खालिल बाबिंचा विचार केला जातो.
२.१ पुणे-मुंबईला मध्यवर्ती ठिकाणाचा पर्याय शोधणे... (लोणावळा, खंडळा, खोपोली, कर्जत)
२.२ मागिल वविच्या ठिकाणाची पुर्नरावृत्ती टाळणे...
२.३ ववि साठी निवडलेल्या रिसॉर्टचे एका दिवसाचे भाडे प्रत्येकी रु.२५० - ३५०/- च्या दरम्यान असावे.
२.४ रिसॉर्टच्या भाड्यात लहान मुलांसाठी ५०% सूट आहे का ते पहाणे.
२.५ रिसॉर्टवर इलेक्ट्रिसिटीला बॅकअप सिस्टम असावि जेणे करून सांसकृतिक कार्यक्रमाच्या वेळी स्पिकर मधे वत्यय येऊ नये.
२.६ खुर्च्या, स्पिकर व माईकची सोय रिसॉर्टवर आहे का ते पहाणे.
२.७ रिसॉर्टवर २ चेंजिंग रुम असव्यात. (चेंजिंग रुमचे भाडे गृपच्या संखेनुसार negotiate करावे)
२.८ रिसॉर्टवरील जेवण, नाष्ट्याच्या मेन्यूची विविधता तपासणे.
२.९ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एखादा हॉल किंवा शेड उपलब्ध आहे का ते पहाणे.
३. पैसे कसे गोळा केले जातात. >>>
३.१ वविची दवंडी पिटल्यावर पैसे गोळा करण्याचे ठिकाण आणि तारिख त्या दवंडीत नमुद केली जाते.
३.२ वविच्या १ आठवडा आधी नोंदणीकृत सभासदांची वर्गणी जमा करण्यासाठी पुणे संयोजक बाल गंर्धवच्या स्पॉटवर तर मुंबई संयोजक शिवाजी पार्कातील स्पॉटवर भेटायची जागा निश्वित करतात.
३.३ जमा झालेल्या पैश्यातून रिसॉर्टला काही अनामत रक्कम द्यावि लागते.
३.४ वर्गणीची वर्गवारी खालिल प्रमाणे करावि
A. रिसॉर्टचे भाडे प्रत्येकी
B. बस भाडे प्रत्येकी
C. सांस्कृतिक कार्यक्रमांची वर्गणी प्रत्येकी
D. चेंजिंग रुमचे भाडे
E. स्पिकर, माईक आणि खुर्च्यांचे भाडे
४. तिथले कार्यक्रम कसे ठरतात? >>> सांस्कृतिक समिती तेथिल कार्यक्रमांची जबाबदारी पार पाडते... सां.स.ने याबाबत मार्गदशन करावे.
५. जाण्याची सुविधा? त्याचं संयोजन कसं होतं >>>
५.१ जाण्याची सुविधा बसने केली जाते.
५.२ स्वतःच्या गाडीने येणार्या सदस्याकडून बसची वर्गणी घेतली जात नाही.
५.३ संयोजकांनी बसची योग्य ती व्यवस्था करण्यासाठी खालिल गोष्टी पडताळून पहाव्यात...
a. गृपच्या नोंदणी नुसार १८ सिटर, २२ सिटर, २६ सिटर की ५४ सिटर बस सोईची पडेल ते ठरवणे.
b. बसची रक्कम Lumpsum ठरवली असेल तर त्यात Toll include आहे का ते पहाणे.
५.४ वविच्या २-३ दिवस आधी वविच्या BBवर बसची खालिल माहिती पुरविणे.
a. बसचा रुट (pickup points)
b. pickup point वरील वेळ
c. शक्य असल्यास बस क्रमांक, बसचा रंग, बसचा प्रकार याची माहिती देणे.
६. त्या दिवशी करण्याच्या गोष्टी. >>>
६.१ सगळ्या सदस्यांना फोन करून बसच्या ठरलेल्या वेळेवर pickup point वर येण्याची आठवण करणे.
६.२ म्युझिक सिस्टम, सांस्कृतिक कार्यक्रमाच सामान, बसमधील उपहार, First Aidच सामान इत्यादीची योग्य ती सोय करणे.
६.३ रिसॉर्टच्या वाटेवर शक्य असल्यास चहापानाचा कार्यक्रम पार पाडणे.
६.४ रिसॉर्टवर पोहचल्यावर चेंजिंग रूमचा ताबा घेऊन सभासदांची योग्य ती सोय करणे.
६.५ रिसॉर्टवर सांस्कृतिक समितीला म्युझिक सिस्टमची सोय उपलब्ध करून देणे.
६.६ रिसॉर्टवरील नाष्टा, जेवण, चहापान योग्य त्या वेळी पार पाडणे.
६.७ रिसॉर्टचे भाडे चुकते करून रीसिट घेणे.
६.७ संध्याकाळी ५च्या दरम्यान सगळे कार्यक्रम आटोपून एक गृप फोटो काढून परतीच्या प्रवासाला लागणे.
७. काही विशेष सूचना: ज्या पाळायला कींवा टाळायला हव्यात.
७.१ वविच्या ठिकाणी मद्दपान / धुम्रपान टाळणे.
७.२ सगळ्यांना छत्री, रेनकोटची सक्ती करणे.
७.३ रिसॉर्टवर स्विमिंग पूल असेल तर जलक्रिडा करणार्या सभासदांनवर लक्ष ठेवणे आवश्यक.
७.४ बसची सोय शक्यतो माहितीतील ट्रॅव्हल्स वाल्याकडूनच करणे... (ट्रॅव्हल्सवाले ऐन वेळी बस बदलतात)
७.५ वविचा हिशोब त्या नंतरच्या आठवड्यात पार पाडून अॅडमिनकडे सुपुर्द करणे.
यातील रिसॉर्ट चे भाडे आता खुप
यातील रिसॉर्ट चे भाडे आता खुप जास्त वाढले आहे असे समजून चाला
<< यातील रिसॉर्ट चे भाडे आता
<< यातील रिसॉर्ट चे भाडे आता खुप जास्त वाढले आहे असे समजून चाला >>
रिसॉर्ट ऐवजी इतरत्र सार्वजनिक स्थळी करता येईल काय? जसे की, माळशेज घाट, ताह्मिणी घाट, पवना धरण, दुर्गा टेकडी (प्रवेश शुल्क रुपये १०/- प्रत्येकी), इत्यादी. बराच खर्च वाचेल.
वा. आला का धागा?
वा. आला का धागा?
सार्वजनिक ठिकाणी सगळ्या
सार्वजनिक ठिकाणी सगळ्या जणांची जेवायची सोय कशी करणार ते सांगा गुगळे?
अरे वा वविचा धागा आला पण.
अरे वा वविचा धागा आला पण. गेल्या वर्षीच्या जाहिराती फारच कल्पक होत्या. तेव्हा इतरत्र व्यस्त असल्यानं सांगायचं राहूनच गेलं होतं
खालिल महिती इन्द्राने
खालिल महिती इन्द्राने लिहिलेली आहे >>>>
इन्द्रा व नीलेश वेदक - खूप डिट्टेलवार लिहिल्याने नविन संयोजकांना वा भाग घेऊ इच्छिणार्यांना अगदीच सोयीचे जावे - मनापासून धन्यवाद .....
<< सार्वजनिक ठिकाणी सगळ्या
<< सार्वजनिक ठिकाणी सगळ्या जणांची जेवायची सोय कशी करणार ते सांगा गुगळे? >>
दोन पर्याय उपलब्ध आहेत.
मि येनार
मि येनार
वा!वा! यंदाच्या संयोजकांना
वा!वा! यंदाच्या संयोजकांना आत्तापासूनच शुभेच्छा!
वा वा ववि!! सद्य: आणि
वा वा ववि!! सद्य: आणि होणार्या संयोजकांना शुभेच्छा!
धागा वर आणण्यासाठी...
धागा वर आणण्यासाठी...
नवमाबोकरांना संयोजनाचा अनुभव
नवमाबोकरांना संयोजनाचा अनुभव घेण्याची नामी संधी आहे!
अरे वा, बीबी आला का? आमच्या
अरे वा, बीबी आला का?
आमच्या शुभेच्छा आहेतच!
आमच्या ओवीचा पहिला ववि >> अरे
आमच्या ओवीचा पहिला ववि
>>
अरे वा!
मी मिसणार या वेळेचा ववि
खुप खुप मज्जा करा
मला आवडेल संयोजना मधे भाग
मला आवडेल संयोजना मधे भाग घ्यायला
या आधी संयोजनात भाग न
या आधी संयोजनात भाग न घेतलेल्यांनी पुढे या. ववि (आणि संयोजन) म्हणजे धमाल असते. वविसंयोजन, टी-शर्ट समिती आणि सांस्कृतिक समिती - ३ प्रकारची कामं असतात.
चला...चला...नावं येऊ द्या पटापट.
नील. व इंद्रा.... फारच छान
नील. व इंद्रा.... फारच छान तपशील दिला आहे. धन्यवाद.
यंदा टीशर्ट (कॉलर व खिसेवाले) आहेत की नाही? अन बॅग्ज? की अजुन कोणता नविन युटीलिटी आयटेम काढता आहात?
संदिप एस, तुमचा मोबाईल नंबर
संदिप एस, तुमचा मोबाईल नंबर संपर्कातून कळवाल का?
नंबर आणी सविस्तर मेल केली आहे
नंबर आणी सविस्तर मेल केली आहे योकु
मी संयोजनात सहभागी होऊ शकेन.
मी संयोजनात सहभागी होऊ शकेन.
वविच्या ठिकाणी मद्दपान /
वविच्या ठिकाणी मद्दपान / धुम्रपान टाळणे.????
हे होरेच का ? कि थोडे मद्दपान चालते?
अजिबात मद्यपान आणि धुम्रपान
अजिबात मद्यपान आणि धुम्रपान चालणार नाही.
Pages