'नी' ची कहाणी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

हा दागिना म्हणजे 'नी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. आसनं समर्पयामि! मधली गणपतीबाप्पाची कहाणी वाचून एका मायबोलीकर मैत्रिणीने गळ्यातल्यासाठी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या दागिन्यांची ज्वेलरी लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच ज्वेलरी लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होते, ती करता करता माझ्या स्वतःसाठी तांब्या पितळ्याची ज्वेलरी बनत होती.
मैत्रिणीला गळ्यातले करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. तिला हव्या असलेल्या तारखेच्या आत गळ्यातले बनवले. त्याच वेळेला 'नी' हे नाव नक्की केले.
मी बनवलेल्यापैकी विकलेला हा पहिला दागिना.

यातला दगड सिंधुदुर्गातल्या नदिकाठी गोळा केलेला आहे.
धातू जर्मन सिल्व्हर आहे.

_MG_0232_m_scr_swapnali_0.jpg

यानंतर ही कला वापरून बनवलेल्या वस्तू (सध्या फक्त कानातली) 'नी' या लेबलखाली लाँच केल्या.
१० एप्रिल रोजी मराठी स्त्रियांपुरत्या असलेल्या एका संकेतस्थळावर याचे छोटे ओपनिंग केले.
मग १५ एप्रिल रोजी फेसबुक पेज सर्वांसाठी खुले केले.

पूर्ण कलेक्शनपैकी बरेचसे विकले गेले असून आता फक्त ३०% च कलेक्शन उरले आहे.

नियमभंग होऊ नये म्हणून कुठलीच लिंक इथे देत नाहीये.

- नी

विषय: 

ग्रेट .. अभिनंदन .. Happy

वरचा बोहो"नी" दागिना मस्त आहे .. ३०% कलेक्शन बघते परत .. विस्मरणात गेलं होतं .. Happy

हे वॉव.. ,'नी" ...... अभिनंदन!!!!!!!
तुझं कलेक्शन इन्स्टाग्राम मधे टाकलंस तर??

थँक्स सशल आणि वर्षूताई.

वर्षूताई, माझ्या फेसबुक पेजवर. लाइक करण्यासाठी इन्व्हाइट पाठवलेला आहे. तो बघ. Happy

अडाण्यास माफ करणे पण इन्स्टाग्राम काय असते?

छान

अभिनंदन ! सुंदर आहे.

इन्स्टाग्रॅम फोटोज साठी सोशल मिडिया साईट आहे.

पण फोटोंची सोय तर फेबु पेजवर पण आहे. आणि ओपन टू पब्लिक आहे ते सगळे.
मी एटसी किंवा तत्सम साइटसचा प्रयत्न करणार आहे.

छान झाला आहे नेकलेस. अभिनंदन.

पुढच्या भारतभेटीच्या वेळी तुला संपर्क करीनच.

अभिनंदन नी !
सीमन्तिनी म्हणतेय तसं इन्स्टाग्रॅम पण सिरियसली घे.
फेसबुक आहेच पण इन्स्टाग्रॅम इज ह्युज, ग्रोज फास्ट , माझ्यासाठी सर्वात मह्त्त्वाचं टुल !

नीरजा, सुरेख गं.. मनापासून अभिनंदन. ते आसनंसमर्पयामि आठवतय छान.
थोपुवरच्या बघितल्याच नाहियेत.. मी फारशी नसते तिथे.. Sad

आता बघतेच.

सर्वांना थँक्स!
ती माबोकर मैत्रिण सावलीच आहे.
इन्स्टग्राम फक्त आयफोन सुविधा आहे असा समज होता माझा. समजून घेते हे प्रकरण काय आहे ते. मला गेले ४ वर्ष ट्विटर अकाऊंट असून ते येत नाही तेव्हा हे किती जमेल जरा शंकाच आहे. असो..
डिजे, सी, काही मदत लागल्यास तुमचे डोके खाईनच.
सध्या देशांतर्गत कुरियर सुविधा हे प्रकरण अजेंड्यावर आधी आहे.

बाकीचे कलेक्शन सध्या फेसबुक पेजवर आहे.

वाह!!
अभिनंदन Happy

लोगो आणि दागिना दोन्ही भारीच आहे.
एक्सक्लुजिव कलेक्शन हे खास वैशिष्ट्य ठरणार आहे दागिन्यांच.
त्यामुळे ह्या हटके सोचला सलाम. Happy

Pages