'नी' ची कहाणी

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago
Time to
read
<1’

हा दागिना म्हणजे 'नी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. आसनं समर्पयामि! मधली गणपतीबाप्पाची कहाणी वाचून एका मायबोलीकर मैत्रिणीने गळ्यातल्यासाठी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या दागिन्यांची ज्वेलरी लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच ज्वेलरी लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होते, ती करता करता माझ्या स्वतःसाठी तांब्या पितळ्याची ज्वेलरी बनत होती.
मैत्रिणीला गळ्यातले करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. तिला हव्या असलेल्या तारखेच्या आत गळ्यातले बनवले. त्याच वेळेला 'नी' हे नाव नक्की केले.
मी बनवलेल्यापैकी विकलेला हा पहिला दागिना.

यातला दगड सिंधुदुर्गातल्या नदिकाठी गोळा केलेला आहे.
धातू जर्मन सिल्व्हर आहे.

_MG_0232_m_scr_swapnali_0.jpg

यानंतर ही कला वापरून बनवलेल्या वस्तू (सध्या फक्त कानातली) 'नी' या लेबलखाली लाँच केल्या.
१० एप्रिल रोजी मराठी स्त्रियांपुरत्या असलेल्या एका संकेतस्थळावर याचे छोटे ओपनिंग केले.
मग १५ एप्रिल रोजी फेसबुक पेज सर्वांसाठी खुले केले.

पूर्ण कलेक्शनपैकी बरेचसे विकले गेले असून आता फक्त ३०% च कलेक्शन उरले आहे.

नियमभंग होऊ नये म्हणून कुठलीच लिंक इथे देत नाहीये.

- नी

विषय: 
शब्दखुणा: 

भारी ग! मधेच पुपुवर उल्लेख वाचला तेव्हा फेबु वर जाउन बघितले, काहि पिसेस अल्टिमेट जमलेत,

नी म्हणजे समथिन्ग हटके! जशी तु तशिच तुझी कलाकारी,

बाकी शीर्षक बघितल्यावर आधी मला वाटले होते कि आता ही काय "ऐका सोळा सोमवारची कहाणी" वगैरे सारखे काही सांगु लागलिये की काय.... )>> लिन्बु भाउ तुला अस वाटल याच मला आश्चर्य वाटल.

नी मस्तंय बाप्पा आणि नेकलेसही!! नी म्हणजे समथिन्ग हटके! जशी तु तशिच तुझी कलाकारी>> +१११
अभिनंदन. इतर लोकांनी सुचवल्याप्रमाणेच फेसबूक पेजसोबत इन्स्टाग्राम(https://instagram.com/), गूगल प्लस आणि पिनट्रेस्ट(http://pinterest.com/) यावरही फोटोज अपलोड कर. शुभेच्छा.

<<<<< इतर लोकांनी सुचवल्याप्रमाणेच फेसबूक पेजसोबत इन्स्टाग्राम(https://instagram.com/), गूगल प्लस आणि पिनट्रेस्ट(http://pinterest.com/) यावरही फोटोज अपलोड कर. शुभेच्छा..>>>> +१११

मस्त! अभिनंदन आणि शुभेच्छा नी!

नी म्हणजे समथिन्ग हटके! जशी तु तशिच तुझी कलाकारी, <<
अगं प्राजक्ता... Blush

इन्स्टाग्राम बघते काय प्रकार आहे ते. पिंटरेस्टवर टाकलीयेत काही.

सर्वांचे आभार.

Pages