इब्लिस अंडा करी

Submitted by इब्लिस on 17 May, 2015 - 05:10
iblis anda curry
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ कोंबडीची अंडी, १० मिनिट उकडलेली.

१ मोठा कांदा
२ मध्यम टोमॅटो
८-१० लसुण पाकळ्या
अर्धा इंच आले
धणे पूड १ चमचा
जिरे पूड अर्धा-पाऊण चमचा
मूठभर चिरलेली कोथिंबीर

खडा मसाला :
लवंग ३
दालचिनी छोटा तुकडा
३-४ मिरे
(वरील तिन्ही गोष्टी खलबत्त्यात थोड्या भरड कुटून घ्याव्यात)
२ तमाल पत्रे

फोडणीसाठी चिमूटभर जिरं

दीड टेबलस्पून (सुमारे ३० मिली) तेल.

लाल तिखट, गरम मसाला, मीठ : चवीनुसार. रफली अर्धा चहाचा चमचा प्रत्येकी.

क्रमवार पाककृती: 

१. अंडी उकडणे.
जाड बुडाच्या भांड्यात अंडी बुडतील इतके पाणी घेऊन त्याला उकळी काढा.
चमच्यात कच्चे अंडे (न फोडता, सालासहित) घेऊन हलकेच उकळत्या पाण्यात टाका. यामुळे अंडे ट्ण्णकन भांड्याच्या बुडाशी आपटून फुटत नाही.
सगळी अंडी सोडून झालीत, की गॅस कमी करून झाकण ठेवा.
घड्याळ लावून १० मिनिटांनी गॅस बंद करा.
अंडी थंड पाण्यात ट्रान्स्फर करून सोलून घ्या.

२. अंडी तळणे.
सोललेली हार्ड बॉईल्ड एग्ज तळायची आहेत.
यासाठी जाड फ्राइंग पॅनमधे (नॉनस्टिक चालेल) १-दीड मोठा चमचा (टेबलस्पून) तेल गरम करा.
सोललेल्या अंड्याला सुरीच्या टोकाने २-३ छोट्या चिरा द्या. याने अंडी तळताना फुटणार नाहीत. साधारण डार्क तपकिरी रंग येईपर्यंत अंडी तळायची आहेत. थोड्या थोड्या वेळाने उलटवत रहा. याला सुमारे ५-७ मिनिटे पुरतात.

हवा तसा बदामी रंग आल्यावर अंडी तेलातून बाहेर काढा, व बाजूला ठेवा. कढईतले तेल एका वाटीत काढून घ्या. अंडी पुन्हा कढईत टाकून त्यावर थोडे तिखट, मीठ व गरम मसाला भुरभुरवून थोडा वेळ परतून घ्या. अंड्याला तिखट्/मीठ/मसाला सगळीकडून लागला पाहिजे.

आता अंडी बाजूला काढून ठेवा.

egg1.jpg

३. करी.

त्याच पॅनमधे, मघाचं तेल पुन्हा टाका. त्यात जिरं टाकून फोडणी टेंपरेचर आलं, की खडा मसाला टाकून थोडं परता.
यात बाऽरीक चिरलेला कांदा घालून परता. त्याचा कचवटपणा गेला, की त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून पुन्हा परता.
जिरेपुड, धनेपूड घाला.
नंतर थोडं मीठ, तिखट घालून परतून घ्या.
बाजूने तेल सुटायला लागले, की बारीक चिरलेले टमाटे, वा टमाटे उकडून मिक्सरमधून फिरवून केलेली प्यूरी त्यात घालून पुन्हा परता.
मला यात टेक्स्चर आवडते म्हणून मी कांदा/टमाट्याची पेस्ट केलेली नाही. तुम्हाला हवी तर दोन्ही गोष्टी बारीक पेस्ट केल्यात तरी चालतील.
टमाट्यांचा कच्चेपणा गेला असे जाणवले, की त्यात अर्धा पेला गरम पाणी घालून एक उकळी काढा व झाकण ठेवा.

egg2.jpg

५-६ मिनिटांनी यात गरम मसाला अ‍ॅड करा. कोथिंबीर घाला. थोडावेळ झाकण ठेवून मग रश्शाची चव घेऊन पहा. चमच्यात थोडा रस्सा काढून गार होऊ द्यावा, अन चव पहावी. आपल्याला हवी तशी तिखट मिठाच्या चवीची अ‍ॅडजस्टमेंट करावी. त्यात पुन्हा हवे तसे थोडे पाणी घालून एक उकळी काढा. झाकण ठेवून गॅस बंद करा.

खायला देताना अंडी चिरून दोन भाग करून प्लेटमधे ठेवा, व त्यावर करी घालून सर्व करा.

egg3.jpg

या जेवायला.

वाढणी/प्रमाण: 
माझ्या पुरती झाली.
अधिक टिपा: 

आवडत असेल तर हवी तशी बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा फ्राय करताना त्यासोबत घालावी.

मसाला तेलावर परतून झाला, की तो मिक्सरमधून फिरवला तरी चालेल. त्याआधी तेजपत्ता(तमालपत्र) काढून घ्यायला विसरू नका.

फोडलेल्या अंड्याचे पिवळे रश्शात मिक्स झाले की वेगळी छान चव व घट्ट कन्सिस्टन्सी येते. त्यामुळे थोडे पाणी जास्त ठेवावे. माझ्या सारख्या टेक्स्चर्ड करीत पाणी थोडे वेगळे दिसले तरी बलक मिसळून छान होते.

नेहेमीप्रमाणे फोटो मी केल्याचा पुरावा म्हणून आहेत Wink

माहितीचा स्रोत: 
ढाब्यावर खाल्लेली अंडा करी. इंटरनेट.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचा फोटो पाहून सौ इब्लिस यांनी पाकृ केलेली असावी असा डाउट येतोय. Lol Light 1
तोपासू फोटो

<<<< उकडलेल्या अंड्याचे पिवळे बलक
खाउ नये पांढरे खावे असे काहीतरी शास्त्र आहे ना?>>>>> पिवळ्या बलकात हाय calories असतात . म्हणून वजन कमी करताना खाऊ नये असा सल्ला देतात

३. करी.

त्याच पॅनमधे, मघाचं तेल पुन्हा टाका. त्यात जिरं टाकून फोडणी टेंपरेचर आलं, की खडा मसाला टाकून थोडं परता.
<<
यातल्या खडा मसाला मधे →
खडा मसाला :
लवंग ३
दालचिनी छोटा तुकडा
३-४ मिरे
(वरील तिन्ही गोष्टी खलबत्त्यात थोड्या भरड कुटून घ्याव्यात)
२ तमाल पत्रे

हे लिहिलंय की!

संपूर्ण पाककृतीत तेल टोटल ३०-४० मिली आहे.

ढाब्यावर मिळणार्‍या अंडाकरीतली अंडी तळून मिळत होती. अन ती चव जस्ट डिव्हाइन!

तिथल्या 'भट्टीत' (ओपन एयर किचन) जाऊन पाहिल्यावर सुमारे १० लिटर उकळत्या तेलात पटापट अंडी घालून तळली जाताना दिसली होती. त्या अनेकदा उकळलेल्या तेलाकडे पाहून तळलेली अंडी करायची हिम्मत होत नव्हती. मधेच केव्हातरी नेटवर सहज रेस्प्या पाहताना वाहरेवाहशेफ.कॉम वर किंवा कुठेतरी अंडी कमी तेलात तळण्याची रेस्पी सापडली. मग म्हटलं करायलाच हवी.

*

आधीच अख्खं अंडं, प्लस तेलात तळून. अन त्यातलं पिवळं??? बाप्रे!

तर, रोज फोर एग्ज फॉर ब्रेकफास्ट अन बीफ अ‍ॅट लंच वाल्यांसाठी ते अंड्यातल्या पिवळ्याचं पथ्य कडक आहे. इथे आपल्या लहान/ वाढत्या वयातल्या मुलांनाही एग व्हाईट ऑम्लेट खाऊ घालणार्‍या आया आहेत. जे चुकीचं आहे.

१-२ महिन्यातून ४-६ अंडी खाणार्‍यांना पन्नाशीतही अंड्यातलं पिवळं चालायला हरकत नाही, अनलेस, तुमची कोलेस्टेरॉल लेव्हल खूप जास्त आहे, व तुम्ही व्यायाम करीत नाही इ..

बेसिकली, तुमच्या डाएटिशियनला तुमचा रोजचा आहार नीट सांगा, लेट हिम डिसाईड, की काय खाऊ शकता अन काय नाही. नेहेमीचे बेसिक जेवण, अधुनमधून सणासुदी गोड अन "करे"ला चमचमीत चालायला हरकत नाही.

योकु,
नुसती तळलेली अंडीही सुंदर लागतात. वरच्याप्रमाणे तळून तिखटामिठात परतली, व करीत घातलीत की It gives that extra tang.

छान वाटत आहे रेसिपी .. ट्राय करोन बघेन ..

(मी मध्ये कोणाकडून तरी ऐकलं की नुसतं एग व्हाईट पचायला कठिण असतं .. योक खाल्ला नाही तर आपली सिस्टीम एग व्हाईट मधलं प्रोटीन पचवू शकत नाही .. खरंखोटं देव जाणे ..)

मस्त दिसतेय अंडाकरी!

मला एक सांगा, अंडी भांड्यात घेऊन त्यावर पाणी ओतून मग ते उकळायला ठेवलं तर अंडी उकडण्यावर काही परीणाम होतो का? उकळत्या पाण्यात अंडी सोडण्यापेक्षा अंड्यात पाणी घालून उकळवणं सोपं वाटतं.

मंजूडी, गार पाण्यात अंड ठेवून मग गरम करत गेलं तर अंड्याचं तापमान हळूहळू वाढेल; पाण्याबरोबर. पण उकळत्या पाण्यात गार अंड सोडलं तर ते लगोलग शिजायला लागेल.
सडन टेंपरेचर चेंज अन ग्रॅज्युअल चेंज याचा चवीवर वा टेक्स्चरवर कुठेतरी नक्की फरक पडत असणार. बहुतांश वेळेला (नेटवर, कुकिंग शोज मध्ये, फार काय तर मास्टरशेफ ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा) उकळत्या पाण्यातच अंड सोडायला सांगतात.
माहीतगारांनी अजून काही असेल तर सांगावे. Happy

<< सडन टेंपरेचर चेंज अन ग्रॅज्युअल चेंज याचा चवीवर वा टेक्स्चरवर कुठेतरी नक्की फरक पडत असणार. >>

नक्कीच त्यामुळेच तर ते झटकन सोललं जातं.

गरम पाण्यात सोडल्यावर अंड्यातील बाहेरच्या प्रोटीनचे पटकन कोअ‍ॅग्युलेशन होते, व उकळत्या पाण्यातील हलचालींनी कवच टिचल्यास आतील बलक बाहेर येणे टळते. याकरता नेहेमी गरम (बॉयलिंग टेंपरेचर) पाण्यात अंडे सोडावे. यासाठी खोलगट चमचा वापरता येतो. चमच्यात धरून अंडे पाण्यात बुडवून मग हलकेच सोडावे, जेणेकरून टिचणार नाही.

अंड्याचा बलक रश्श्यात कुसकरुन खायला छान लागतो. तेव्हढ्यासाठी मी रस्सा थोडा तिखट करते.
अंड फ्राय करुन छानच लागते पण मी बर्याचदा अंद फोडुन रश्श्यात टाकते. पोर्च केल्यासारखं.

गरम मसाला कुठला वापरायचा कारण बाहेरचा मसाला वापरुन केलेल्या करीची चव मला आवडत नाहि आणि घरगुती गरम मसाल्याच्या चवीप्रमाणे करीची चवपण बदलते ...एकुणच माझी अंडा करी चमचमीत होत नाहि म्हणुन विचारत आहे

Pages