Submitted by बेफ़िकीर on 3 October, 2013 - 02:42
गेले मला तडे
बाकी तुझ्याकडे
मी एक शोधतो
तिसरेच सापडे
स्पर्शू नको हृदय
पडतात पोपडे
कोणी दिसेचना
कोणी चहूकडे
माझे अबोल मन
कर बोलघेवडे
================
काही दिवस तरी
नुसत्या दुधावरी
अपुलेच समजुनी
जगतो तुझ्या घरी
पापे करून घ्या
नंतर हरीहरी
या माणसांहुनी
झाडेबिडे बरी
भिज 'बेफिकीर' तू
आल्या नव्या सरी
===============
वाहू नकोस तू
पडशील ओस तू
आलास चालुनी
कित्येक कोस तू
माझ्यातुझ्यातला
हो पायपोस तू
उचलू नकोस ना
पाऊल ठोस तू
पुढचे पुढे बघू
हा जन्म सोस तू
आहे असाच मी
का हासतोस तू
================
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गेले मला तडे बाकी तुझ्याकडे>>
गेले मला तडे
बाकी तुझ्याकडे>> व्वा व्वा
स्पर्शू नको हृदय
पडतात पोपडे>> हृदयस्पर्शी
काही दिवस तरी
नुसत्या दुधावरी>> अप्रतिम
अपुलेच समजुनी
जगतो तुझ्या घरी>> मस्त
वाहू नकोस तू
पडशील ओस तू>> व्वा व्वा
पुढचे पुढे बघू
हा जन्म सोस तू>> व्वा व्वा
आहे असाच मी
का हासतोस तू>> मस्तच!
लहान वृत्तातही गझलेची झिंग आणलीत.
बढिया, भूषण. आवडल्या.
बढिया, भूषण.
आवडल्या.
सगळेच सही आहेत
सगळेच सही आहेत सर...
मला
स्पर्शू नको हृदय
पडतात पोपडे
हा खूप आवडला...
वा ! वा! व्वा !
वा ! वा! व्वा !
मी एक शोधतो तिसरेच सापडे पापे
मी एक शोधतो
तिसरेच सापडे
पापे करून घ्या
नंतर हरीहरी
पुढचे पुढे बघू
हा जन्म सोस तू
आहे असाच मी
का हासतोस तू
या द्वीपदी सर्वात विशेष वाटल्या.
गेले मला तडे बाकी
गेले मला तडे
बाकी तुझ्याकडे......वाआआआ !
स्पर्शू नको हृदय
पडतात पोपडे......खल्लास !
माझे अबोल मन
कर बोलघेवडे...... सहीय !
++++++++++++++++++++
अपुलेच समजुनी
जगतो तुझ्या घरी
या माणसांहुनी
झाडेबिडे बरी
भिज 'बेफिकीर' तू
आल्या नव्या सरी
झक्कास शेर !
++++++++++
छोटे बहरही बहारदार !
बहोत आच्छे !
अल्पाक्षरांचे सौंदर्य
अल्पाक्षरांचे सौंदर्य मौनाच्या बोलकेपणासारखेच मनोहारी !
पापे करून घ्या नंतर
पापे करून घ्या
नंतर हरीहरी>>>>>>> इतकं खास आहे ना...
कमी शब्दांत जादुगिरी ...मजा
कमी शब्दांत जादुगिरी ...मजा आयी ..!
सगळेच शेर एकसे एक आहेत बेफी..
सगळेच शेर एकसे एक आहेत बेफी.. अगदी अर्थपुर्ण..
सर्व शेर आवडले
सर्व शेर आवडले
जबरदस्त.
जबरदस्त.
सर्वांचा आभारी आहे
सर्वांचा आभारी आहे
वाह, मस्तच बेफि!
वाह, मस्तच बेफि!
मी एक शोधतो तिसरेच सापडे या
मी एक शोधतो
तिसरेच सापडे
या माणसांहुनी
झाडेबिडे बरी
आहे असाच मी
का हासतोस तू
वा! हे शेर तर फार आवडले!
>> या माणसांहुनी झाडेबिडे
>>
या माणसांहुनी
झाडेबिडे बरी
<<
मस्त!!
धन्यवाद
धन्यवाद
बेफिकीर, 3-4 शेर सोडले तर
बेफिकीर,
3-4 शेर सोडले तर बाकी चांगले आहेत.
(लहान बहरात विचार सांगणे सोपे नसते.)
धागा वर आणला.
धागा वर आणला.
भूषणः इथे परिस्थिती अशी झाली
भूषणः
इथे परिस्थिती अशी झाली की कवी जास्त आणि प्रतिसाद देणारे कमी.
त्यामुळे अलीकडे मजा कमीशी झाल्यासारखे वाटत आहेत.
असो, नाइलाज आहे. आपल्या रचना वर आणणे तेवढा एकमेव पर्याय दिसतो स्वतःला पटला तर.
समीर
समीरजी +१ खरोखर, एखाद्या
समीरजी +१
खरोखर, एखाद्या रचनेला प्रतिसाद न मिळणे ही दुःखदायक गोष्ट आहे . काही निवडक लोकच प्रतिसाद देतात असाच अनुभव येतो आहे गेले अनेक महीने. पण असेही लक्षात येत आहे की वाचकांची संख्या जास्त आहे, पण प्रतिसाद मात्र देण्यात येत नाही. प्रत्येकाकडे आपापलई कारणे असतील, पण प्रतिसाद न मिळणे ही क्लेषदायक गोष्ट आहे याबाबत शंका नाही
जयदीपः आपल्याशी सहमत. बहुतेक
जयदीपः
आपल्याशी सहमत.
बहुतेक गझल पोस्ट करणारे धन्यवाद व्यतिरिक्त प्रतिसाद देत नाहीत.
ही मानसिकता पचायला कठीण आहे. निराशेतून मी माझ्या शेवटच्या पोस्टनंतर काही टाकले नाही.
भूषण, तुझ्या गझलेवर हे अपेक्षित नाही तेव्हा क्षमस्व.
वा! सर क्या बात है.
वा! सर क्या बात है.
व्वा , इतक्या कमी शब्दात
व्वा , इतक्या कमी शब्दात मांडणे अवघडच ..
मस्त ..
लै भारी!
लै भारी!
अख्खी गझलच सुंदर
अख्खी गझलच सुंदर
वा... आवडेश. छोट्या बहरात
वा... आवडेश.
छोट्या बहरात चांगल्या शेरांचा वस्तुपाठ.
भूषणः इथे परिस्थिती अशी झाली
भूषणः
इथे परिस्थिती अशी झाली की कवी जास्त आणि प्रतिसाद देणारे कमी.
त्यामुळे अलीकडे मजा कमीशी झाल्यासारखे वाटत आहेत.
असो, नाइलाज आहे. आपल्या रचना वर आणणे तेवढा एकमेव पर्याय दिसतो स्वतःला पटला तर.
समीर
............... प्रतिसाद देणारेही हातचा राखुन प्रतिसाद देतात.कधी कधी तर वाटते की केवळ मित्रामित्रातील संवाद आहे हा. इथे प्रत्येकाने आत्मपरिक्षण करायला हवे.जयदीप म्हणतात तशी ही खरोखर क्लेश्कारक बाब होय्.इथे अनुभवी म्हणवणार्यांनी नवोदितांना अशाप्रकारे सामावून घ्यायला हवे की त्यांना ही मायबोली आपली वाटावी. माफ करा पण विषय निघाला म्हणून बोललो........ बाळ पाटील